Movie Review

'घनचक्कर' - A perfect Stress buster (Ghanchakkar - Movie Review)

Submitted by रसप on 29 June, 2013 - 01:53

सोमवार ते शुक्रवार (शनिवार), सकाळ ते संध्याकाळ (रात्र) तेच ते रूटीन असतं. अमुक वाजता उठा, तमुक वाजता ऑफिससाठी निघा, पोहोचा, मग पुन्हा अमुक वाजता निघा, तमुक वाजता घरी या आणि सकाळी पुन्हा अमुक वाजता उठायचं असतं म्हणून ढमुक वाजता डोळ्यांवर झोप ओढून घ्या. काही जण, किंबहुना बहुतेक जण ह्या त्याच त्या दिनक्रमाला जरा कंटाळतात आणि मग त्यातील काही चित्रपटप्रेमी सुटीच्या दिवशी मित्र-मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबासोबत किंवा एकट्यानेही 'स्ट्रेसबस्टर' साठी एखादा चित्रपट पाहातात. ह्या 'स्ट्रेसबस्टर'ची प्रत्येकाची व्याख्या निराळी.

विषय: 

मार्केटमधला नवा 'मजनू' - रांझणा (Raanjhnaa - Movie Review)

Submitted by रसप on 22 June, 2013 - 02:47

एक असतो बनारसी पंडित. त्याचा मुलगा एका मुस्लिम मुलीच्या प्रेमात वेडा होतो. त्या मुलाच्या कहाणीवर एक होतकरू दिग्दर्शक चित्रपट काढायचं ठरवतो. त्या चित्रपटातून एक तमिळ सुपरस्टार हिंदीत आगमन करणार असतो. त्याच्या हिंदी उच्चारांवर मेहनत घेऊन त्याचा आणि स्वत:चा अजून एखाद्या चित्रपटासाठीचा वेळ वाया घालविण्यापेक्षा रोलच जरासा 'अ‍ॅडजस्ट' करू या की, असं ठरवलं जातं आणि कहाणी अशी बनते की - 'एक असतो 'तमिळ' पंडित. तो बनारसला 'प्रॅक्टिस' करत असतो. त्याचा मुलगा एका मुस्लिम मुलीच्या प्रेमात वेडा होतो आणि वगैरे वगैरे'

विषय: 
शब्दखुणा: 

बाहुला झपाटलेला, प्रेक्षक झोपाळलेला ! (Zapatlela 2 - Marathi Movie Review)

Submitted by रसप on 11 June, 2013 - 02:00

लोक उगाच म्हणतात की चित्रपटातून आपण नको ते उचलतो. खरं तर चित्रपट आपल्यातून हवं ते उचलतात. 'घरी कुणी तरी जेवायला येणार' म्हटल्यावर आजकाल काही लोक बाजारात 'रेडीमेड' काय मिळतं ते आधी पाहातात. अर्ध्या तासात घरपोच पिझ्झा मिळायचा हा जमाना आहे. त्याव्यतिरिक्त इडलीपासून बटर चिकनपर्यंत आणि पॉपकॉर्नपासून चिकन लॉलीपॉपपर्यंत स ग ळं 'फक्त पाण्यात मिसळलं/ उकळलं/ भाजलं/ तळलं की तयार' असं उपलब्ध आहे आणि जे पदार्थ असे सहज शक्य नाहीत, ते हळूहळू 'गायब' होत आहेत.

विषय: 
शब्दखुणा: 

एक 'न्यूट्रल' दिवानेपण (Yeh Jawani Hai Deewani - Movie Review)

Submitted by रसप on 2 June, 2013 - 02:22

'प्यार दिवाना होता हैं..' हे शब्द दस्तुरखुद्द आनंद बक्षी साहेबांनीही जितक्या गांभीर्याने लिहिले नसतील, तितक्या गांभीर्याने हिंदी चित्रपटकर्ते वर्षानुवर्षं घेत आले आहेत. किंबहुना, हे शब्द लिहिले जाण्याआधीपासूनच ही भावना त्यांच्या मनात खोलवर रुजलेली आहे. सुरुवातीला हे फक्त 'दिवाना' असावं आणि नंतर नकळतच त्यापुढे 'च' लागला आणि 'प्यार दिवाना'च' होता हैं..' असं समस्त वुड बी गुल-बुलबुलांचं मत झालं असावं. अनेक दशकांच्या इतिहासातील कुठलाही हिंदी चित्रपट काढावा, त्यातील प्रेमाने 'दिवाने'पणाची झलक दाखवलीच असते किंवा बऱ्याचदा त्याची मर्यादाही ओलांडलेली असते.

विषय: 
शब्दखुणा: 

एक वेगळाच 'फोर स्क्रीन' अनुभव (Bombay Talkies - Movie Review)

Submitted by रसप on 4 May, 2013 - 08:19

नियम आणि संकेत ह्यात फरक आहे. कायदा आणि संस्कार ही दोन वेगळी बंधनं आहेत. माणूस, विशेषकरून भारतीय माणूस अश्या द्विधेत बऱ्याचदा असतो. काही गोष्टी कायद्याने प्रतिबंधित असतात पण संस्कारात मुरलेल्या असतात आणि काही गोष्टी संस्कार करू देत नाहीत, पण कायद्याने त्या स्वीकारार्ह असतात ! आयुष्यभर आपण ह्या द्विधेतच राहातो. शेवटपर्यंत, दोन पर्यायांपैकी अचूक कुठला होता, हे लक्षात येतच नाही. मग परिस्थितीच्या हेलकाव्यासोबत, आपणही झुलत राहातो, भरकटत राहातो. मध्येच विरोध करायचा प्रयत्न करतो, पण तो टिकतोच असं नाही..... विचित्र आहे, पण खरं आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

किळस न वाटेल असा चांगला भयपट - एक थी डायन (Ek Thi Daayan - Movie Review)

Submitted by रसप on 21 April, 2013 - 02:50

कुत्रा स्वत:चं शेपूट पकडू शकत नाही. हे नॉर्मली कुत्र्याला माहित असतं. पण कधी तरी त्याला हुक्की येते आणि तो स्वत:भोवती जोरात फिरून शेपूट धरण्याचा प्रयत्न करतो, अखेरीस हरतो, थकतो आणि गप्प बसतो. माणसाला शेपूट नाही, पण 'भूतकाळ' आहे आणि हुक्की आली की आपणही त्याला मुठीत घेण्यासाठी गोल-गोल फिरतो. तो कधीच हातात येणार नसतो. त्यामुळे त्याच्या मागे लागण्यापेक्षा त्याला आपल्या मागे लागू द्यावं आणि आपण मात्र आज व उद्यावर लक्ष केंद्रित करावं, जेणेकरून हे शेपूट आपल्याच पायात वळवळ करून आपल्यालाच तोंडावर पाडणार नाही.

विषय: 

जेव्हा म्हणतो राजा, "आजचा दिवस माझा" (Aajcha Divas Majha - Movie Review)

Submitted by रसप on 31 March, 2013 - 02:46

आर्थिक वर्षाखेरीचे दिवस आहेत. नक्कीच ऑफिसमध्ये अनेकांच्या फुल्ल नाईट्स, लेट नाईट्स चालू असतील. हे दिवसच असे असतात की 'लोड' घेतल्याशिवाय काम होणारच नसतं. करोडोंचे पुस्तकी आणि प्रत्यक्ष हिशेब जुळवताना गद्धेमजुरी आणि मगजमारी कुठलाही मागचा-पुढचा, 'हे माझे काम आहे की नाही' वगैरेसारखा विचार न करता, करावीच लागते. ती करत असताना डोकं फिरतं, वैताग येतो, संताप येतो, चीडचीड होते पण अचूक ठोकताळा लागल्यावर, मेहनतीचं चीज झाल्यावर मिळणारा आनंदही अपूर्व असतो. तो पराकोटीचा मानसिक आणि शारीरिक थकवा एक वेगळंच समाधान देतो.

विषय: 

नक्कीच 'स्पेशल' - स्पेशल छब्बीस - (Movie Review - Special 26)

Submitted by रसप on 8 February, 2013 - 09:02

Truth is stranger than fiction, but it is because Fiction is obliged to stick to possibilities; Truth isn't.
- Mark Twain

विषय: 

मटरुच्या बिजलीच्या आयचा घो ! (Matru Ki Bijlee Ka Mandola - Movie Review)

Submitted by रसप on 12 January, 2013 - 01:38

आपल्या लहान मुलाला घेऊन तुम्ही आणि तुमची बायको बाहेर फिरायला जाता.. समजा, बाजारात जाता.. (किंवा कुठेही, त्याने काही फरक पडत नाही म्हणा!) आणि तिथे एक फुगेवाला दिसतो. वेगवेगळ्या आकारांचे, रंगांचे सुंदर फुगे ! साहजिकच लहानगा/गी फुग्याचा हट्ट करतो/ते.. किंवा न करताही तुम्ही एक छानपैकी वेगवेगळ्या रंगांचा मोठा फुगा घेता. फुगा घेऊन घरी येता आणि खेळता खेळता 'फट्ट'दिशी फुगा फुटतो ! का फुटतो ? कळतच नाही ! तुमचं मूल, तुम्ही आणि तुमची बायको एकमेकांकडे बुचकळ्यात पडल्यागत पाहाता, क्षणभरच.. आणि मग भोकाड..............! फुगा फुटला कसा ? हा प्रश्न बाजूला राहातो आणि आता मुलाला/ मुलीला आवरू कसा ?

विषय: 
शब्दखुणा: 

चव अळणी, वास खमंग.... दुसरा दबंग (Movie Review - Dabangg - 2)

Submitted by रसप on 22 December, 2012 - 00:43

सध्या भारत-इंग्लंड सामने चालू आहेत. भारताचे स्टार फलंदाज मोठ्या झोकात खेळपट्टीवर येतात १०-१५ मिनिटं, पाऊण तास, फार तर तास भर चांगल्या फलंदाजीचं दर्शन देतात आणि अचानक हत्तीच्या कानात मुंगीने 'मैं तुम्हारे बच्चे की मां बननेवाली हूं' म्हटल्यावर हत्ती कसा बावचळेल, तसे बावचळतात आणि दांड्या उडतात..... अशी चित्रं मी सिनेमाइतकाच क्रिकेटचाही चाहता असल्याने गेला महिनाभर तरी नियमित पाहात आहे. त्यामुळे असेल, पण जब्बरदस्त स्टाईलमध्ये व दमदारपणे इण्टर्व्हलपर्यंत येणाऱ्या आणि नंतर बावचळल्यागत विकेट फेकणाऱ्या 'दबंग - २' ने, अपेक्षाभंग करूनही, म्हणावं तितकं डोकं फिरवलं नाही.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - Movie Review