Movie Review

वर्तमानात घेतलेला भविष्याचा शोध (Talaash - Movie Review)

Submitted by रसप on 1 December, 2012 - 00:42

अपनी मर्ज़ी से कहाँ अपने सफ़र के हम हैं
रुख हवाओं का जिधर का है उधर के हम हैं
- निदा फाजली

विषय: 
शब्दखुणा: 

ताण.. जब तक हैं जान ! (Jab Tak Hain Jaan - Movie Review)

Submitted by रसप on 14 November, 2012 - 01:13

मी शहाणा आहे, असं समजण्यात काही वावगं नाही. समोरचा मूर्ख आहे, असंही कधी कधी समजण्यात काही गैर नाही. पण मी(च) शहाणा(च) आहे आणि समोरचे सगळे(च) मूर्ख(च) आहेत, असा समज करून घेऊन जेव्हा एखादी निर्मिती केली जाते, तेव्हा तिला 'जब तक हैं जान' असं नाव दिलं जातं आणि तिच्या केंद्रस्थानी शाहरुख खान येतो.. तो दाढीचे ओंगळवाणे खुंट वाढवून फिरणारा आर्मी मेजर असतो.. तो आणि त्याचे सहकारी सैनिक, सैनिकाची पहिली ओळख - त्याची केशरचना - सुद्धा पाळत नसतात.. ह्या टीमचं काम फक्त बॉम्ब डिफ्युज करणं असतं आणि रोज त्यांना एक तरी बॉम्ब उदरनिर्वाहाकरता मिळतच असतो.. वगैरे, वगैरे..

विषय: 
शब्दखुणा: 

Blunder of the year ! (Student of the Year - Movie Review)

Submitted by रसप on 20 October, 2012 - 01:53

'हसत खेळत शिक्षण' ही संकल्पना मी तरी अनुभवली नाही आणि मला नाही वाटत माझ्या पिढीच्या इतर कुणीही अनुभवली असावी किंवा आजची पिढी अनुभवत असावी. पण करण जोहरने मात्र ती अनुभवली आहे, हे नक्की. तो शिकला आहे हे त्याला इंग्रजी छान येतं ह्यावरून कळतं आणि तो हसत खेळत(च) शिकला आहे हे त्याचा 'स्ट्यूडन्ट ऑफ द इयर' पाहून कळावं. (तसं तर ते 'कुछ कुछ होता हैं' मध्येच दिसलं होतं पण तेव्हा तो लहानही होता!)
असो.

सिनेमा पाहाण्याआधी (किंवा हे परीक्षणही वाचण्याआधी) मला सांगा -

विषय: 
शब्दखुणा: 

'हवाहवाई'ची अफलातून 'शशी गोडबोले' (English Vinglish - Movie Review)

Submitted by रसप on 7 October, 2012 - 01:57

प्रत्येकाचं जीवन जर एक संवादिनी (harmonium) समजली, तर आई हा तिचा षड्ज (सा) असावा. ह्या षड्जाविना मैफल परिपूर्ण वाटत नाही. असं एक अनन्यसाधारण स्थान असतं, आईचं. पण हे आईपण खूप कठीण असतं. एक स्त्री, जेव्हा फक्त एक स्त्री असते, तेव्हा तिचं जग बरंच व्यापक असतं. पराकोटीची वेदना सोसून जेव्हा तीच स्त्री एका मुलाला जन्म देते, तेव्हा तो तिचा स्वत:चाही पुनर्जन्मच असतो. कारण, सोसलेल्या यातना मरणयातनेहून कमी नसतात आणि तिथून पुढे सगळे आयामही बदलणार असतात, बदलतात. एका 'आई'चं जग, एका 'स्त्री'च्या जगापेक्षा संकुचित असतं. तिच्यासाठी मूल, नवरा आणि घर प्राथमिक असतात आणि बाकी सगळं, अगदी स्वत:ही, त्यानंतर.

विषय: 
शब्दखुणा: 

सुमार, टुकार उलाढाल! (Kamaal Dhamaal Malamaal - Movie Review)

Submitted by रसप on 1 October, 2012 - 01:35

विंग्रजीतील एक म्हण म्हणते की, 'घोड्याला पाण्यापर्यंत नेता येऊ शकतं, पण त्याला पाणी पाजता येत नाही.' म्हणजे, त्याला तहान असेल तरच तो पाणी पिणार... कितीही काहीही करा..! पण माणसाचं जरा वेगळं असावं.. म्हणजे, जर एखाद्याने ठरवलं की त्याला शेणच खायचं तर तुम्ही त्याला गोठ्यापासून कितीही दूर न्या.... तो काही ना काही करून शेण खाणारच ! 'कमाल धमाल मालामाल' च्या निमित्ताने एक चांगली कहाणी प्रियदर्शनला मिळाली होती पण... आता शेणच खायचं ठरवलं असेल, तर काय करणार ना ? असो.. उगाच कुणाचं खाणं-पिणं काढू नये म्हणतात. आपण शेणेमाबद्दल बोलू... सॉरी, सिनेमाबद्दल बोलू..

विषय: 
शब्दखुणा: 

जेव्हा 'देव' 'जमिनी'वर येतो.. (Oh My God - Movie Review)

Submitted by रसप on 30 September, 2012 - 01:08

विचार करण्याची क्षमता असणे, बुद्धीचा अधिक परिणामकारक उपयोग करणे, ह्या वैशिष्ट्यांमुळे मानव हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा व श्रेष्ठ समजला जातो. जे बरोबरही आहे. पण ह्या मानावाच्याही हातात अनेक गोष्टी नाहीत. अनेक ठिकाणी हा हतबल होतो, लाचार होतो. तेव्हा 'हे देवाच्या हातात आहे', असं म्हणून तो स्वत:ची लाचारी मान्य करतो व ते मान्य करत असतानाही इतर प्रन्यांहून श्रेष्ठत्व सांभाळतोच. इतपत ठीक आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

हलकट जवानी - बोरिंग कहाणी - (Heroine Movie Review)

Submitted by रसप on 22 September, 2012 - 00:56

images (1).jpg

आजची तुमची जी स्वाक्षरी आहे, ती पूर्वी कशी होती ? आठवतं ? माझ्या बाबतीत सांगतो. माझ्या स्वाक्षरीत माझ्या नावाचं संक्षिप्त स्वरूप होतंच, पण ते प्रत्येक अक्षर अगदी सुस्पष्ट नाही, तरी हलक्यानेच पण असायचं. नंतर, रोज रोज तीच स्वाक्षरी करता करता काही अक्षरं आपोआपच पुसट-पुसट होत जाऊन, आज तर त्यांची जागा सरळ रेषेनेही घेतली आहे !

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - Movie Review