मागे एकदा माझा एक मुंबईकर मित्र औरंगाबादला आला होता. ऐन उन्हाळ्यात. म्हणजे नेमके उन्हाळ्याचेच दिवस होते का ते आठवत नाही, पण हवा मात्र होती. त्याच्या येण्याच्या २ दिवस आधी ४३ अंशाच्या आसपास तापमान होतं. त्याने मला विचारलं, 'कसं करावं ?' मीही त्याला म्हटलं की, 'बघ बाबा ! आपण मुंबईकर ह्युमिडिटी सहन करू शकतो, पण हा कोरडा उन्हाळा म्हणजे बिनपाण्याची हजामत केल्यासारखा बिनघामाचं 'डिहायड्रेशन' करवतो. अगदीच आवश्यक असेल तर ये, नाही तर टाळ !' पण त्याचं काम अत्यावश्यक होतं. तो आला. आणि गंमत अशी की पाऊस पडला ! अन् तापमान बऱ्यापैकी सुसह्य झालं ! दोन दिवस मजेत गेले आणि जाताना म्हणाला, 'मुंबईपेक्षा इथेच छान आहे रे !'
त्याला तसं का वाटलं असेल हे मला काल समजलं. 'क्रिश - ३' पाहिल्यावर. तिकिट घाबरत घाबरत काढलं होतं. हृतिकसाठी पाहायचा होता आणि सुपरहिरो व विवेक ओबेरॉय मुळे टाळावासा वाटत होता. पण काढलं तिकीट, घेतली रिस्क, केली हिंमत आणि झाली गंमत ! कारण बऱ्यापैकी सुसह्य होता की ! अडीच तासांच्या स्टंटबाज नाट्यानंतर हा स्पायडरमॅन + एक्स-मेन + सुपरमॅन + मिशन इम्पॉसिबल + वगैरे + देसी शक्तिमान चांगलाच मनोरंजक वाटला.
'कोई मिल गया' मधला अर्धवटराव रोहित 'जादू'च्या मदतीने स्वत: स्वत:ला गवसतो, नंतर 'क्रिश' मध्ये त्याला डॉ. आर्या डांबून ठेवतो व त्याचा मुलगा 'क्रिश' स्वत: स्वत:ला गवसतो. 'क्रिश-३'मध्ये रोहित आणि क्रिश दोघेही आपापल्या क्षेत्रात व्यवस्थित एस्टॅब्लिश झालेले आहेत. बाप एक नावाजलेला शास्त्रज्ञ आणि मुलगा एक नावाजलेला सुपरहिरो !
दुसरीकडे 'काल' (विवेक ओबेरॉय) हा एक महत्वाकांक्षी माथेफिरू अख्ख्या जगावर राज्य करायचं स्वप्न बघत असतो. त्यासाठी तो एक 'मानवर' (मानव + जानवर) फौज तयार करत असतो. जन्मजात अपंग असलेल्या 'काल'ने आपल्या दुर्दम्य आत्मविश्वास, बुद्धी आणि पैश्याच्या जोरावर आपल्या अपंगत्वावर एका मर्यादेपर्यंत मात केलेली असते. पण पूर्णपणे सुदृढ होण्यासाठी तो जंग जंग पछाडत असतो. ह्या सगळ्या संशोधन, निर्मितीसाठी हवा असलेला पैसा कमवायची क्लृप्ती असते, विषाणू आणि त्याच्यावर 'अॅण्टीडोट' (प्रतिबंधक औषध) तयार करणे. आधी स्वत:च तयार केलेल्या विषाणूचा संसर्ग घडवून आणून हाहाकार माजवणे आणि मग त्यावरचं औषध स्वत:च पुरवून अव्वाच्या सव्वा कमावणे !
एक संहार नामिबियात यशस्वीरित्या घडवून आणल्यावर काल व कं. आपला मोर्चा 'बिग्गर मार्केट' भारताकडे वळवते आणि मुंबईत घातपात घडवला जातो.
ओव्हर टू शास्त्रज्ञ व सुपरहिरो.
ते काय करतात ?
अर्थातच शहराला वाचवतात, पण कसं ?
त्यानंतर काय होतं ?
'काल'च्या महाशक्तीस तोंड देताना 'क्रिश'ला कशाकशाला तोंड द्यावं लागतं ?
ह्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी चित्रपट बघा.

काही वर्षांपूर्वी काही सुपरहिरो किंवा चमत्कारी पुरुष हिंदीत आणायचे हास्यास्पद प्रयत्न केले गेले होते. 'क्रिश'सुद्धा मी घरी, टीव्हीवर तुकड्या-तुकड्यांत पाहिला होता. थेटरात जायची हिंमत झाली नव्हती. सुपरहिरो किंवा काहीही सुपरह्युमन दाखवण्यात बॉलीवूड मार खातं किंवा हॉलीवूड मात देतं ते मुख्यत्वेकरून 'स्पेशल इफेक्ट्स' मधल्या तफावतीमुळे. क्रिश-३ ही तरी उणीव भरून काढतो. (थ्री चिअर्स फॉर 'रेड चिलीज'!) पण फुटकळ प्रेमकहाणी अन् फडतूस गाणी मात्र कोंबतोच आणि बॉलीवूडपण राखतो.
प्रियांका चोप्राला स्वत:कडून नेमक्या काय अपेक्षा आहेत ? असा प्रश्न 'जंजीर' आणि 'क्रिश-३' मुळे पडतो. जिथे 'नटी की केवळ शोभेची बाहुली असते' हा पूर्वीचा बहुमान्य समज हळूहळू मोडीत निघत आहे, तिथे प्रियांका एकानंतर एक कमजोर भूमिका करते आहे. स्वत:ची अधोगती स्वत:च करवते आहे. कदाचित आधीच्या भागात तीच 'प्रिया' होती म्हणून कंटिन्यू केलं असेल, पण तरी डझ नॉट मेक सेन्स.
गाणी म्हणजे तर कोपरापासून दंडवत आहेत ! राजेश रोशन साहेबांचं घणाघाती संगीत त्यांच्या वयाच्या इतर कुठल्या सामान्य माणसास ऐकवलं तर त्याचा रक्तदाब निश्चित वाढेल, कदाचित गचकेलही ! 'छू कर...', थोडा हैं थोडे की जरूरत हैं', 'बातो बातो में' सारखं तरल संगीत आत्ताच्या काळात अपेक्षित नाही. पण हे ? असं ?
बरं, गाणी भंकस आहेतच. त्यांची पेरणी ? म्हणजे कसंय.... कहाणी आपली पुढे जात असते. मध्येच 'कट' ! --------- गाणं ---------- गाणं संपलं. कहाणी पुढे………. अरे काय लावलंय काय ? गणेशोत्सवाचा मंडप आहे का हा ?
समीर अनजान कोण आहे माहित नाही. तो 'अनजान'च राहिलेला बरा. 'समीर'कडून काहीच अपेक्षा कधीच नव्हती. त्यामुळे गाण्यांच्या शब्दांबद्दल तक्रार नाही. चालू द्या दळण.
हृतिक हा एक अत्यंत प्रामाणिक कलाकार आहे. तो प्रत्येक भूमिकेत जीव ओततो. त्याने साकारलेला म्हातारा रोहित अप्रतिम ! सुपरहिरोच्या भूमिकेतही तो अगदी फिट्ट. आजच्या हिरोंपैकी तो एकटाच आहे जो 'सुपर' वाटू शकतो. दोन्ही भूमिका करताना त्याने लाजवाब अदाकारी केली आहे, नि:संशय ! इतकं की, हे दोन नट नसून एकच आहे ह्याचाही विसर पडावा !
'काल'ची हुकमाची राणी मानवर 'काया' उभी करणारी 'कंगना राणावत' एक आश्वासक अभिनेत्री वाटते बऱ्याचदा. प्रियांकापेक्षा कंगना लक्षात राहावी, ह्यातच सर्व काही यावं, नाही का ?
पण, द सर्प्राईज इज 'विवेक ओबेरॉय' ! हातापायाची हालचाल करण्याला काही वावच नसताना, केवळ मुद्राभिनयातून त्याने 'काल' सुंदर साकारला आहे. ह्यापूर्वी अत्युत्साही अभिनयाने काही बऱ्या भूमिकांची माती करणारा वि. ओ. इथे समजूतदार, संयत अभिनयाचं दर्शन घडवून सुखद धक्का देतो. आत्तापर्यंतचे हे त्याचे नक्कीच सर्वोत्कृष्ट काम आहे.
अॅक्शन, स्टण्ट्स आणि स्पेशल इफेक्ट्स अनन्यसाधारण महत्वाचे असणार होते, आहेतही. काही ठिकाणी इंग्रजी चित्रपटांची आठवण येते, नाही असं नाही. पण चालसे. एकूणच हाणामाऱ्या, उड्या, फेकाफेकी, तोडफोड, चिरफाड चांगली रंगली आहे.
शंभर वर्षानंतर हिंदी चित्रपटाला एक सुपरहिरो मिळाला आहे का ?
ह्याचं उत्तर 'हो' द्यावंसं वाटतंय. पण होल्ड ऑन. चित्रपटाच्या अखेरीस पुढील भागाची सोय केलेली आहेच, तोही पाहू या, मग ठरवू ! घाई काय आहे ? १०० वर्षं थांबलो अजून ३-४ थांबू !!
रेटिंग - * * १/२
http://www.ranjeetparadkar.com/2013/11/krrish-3-movie-review.html
मला हृतिक खुप म्हणजे खुपच
मला हृतिक खुप म्हणजे खुपच म्हणजे खुप्पच आवडतो...शाळेत असताना प्रेमात वगैरे होते त्याच्या
त्यामुळे त्याचा कुठलाही मुव्ही मी मिस करत नाहीच..अगदी यादे पासुन आप मुझे अच्छे लगने लगे आणि ना तुम जानो ना हम हे फालतू मुव्ही पण फक्त हा आहे म्हणुनच पाहिलेत मी........हा ही बघणे होईलच....पण तुम्ही लिहिल आहे की चांगला आहे तर कसा आहे काय आहे चे किडे न वळवळवता शांत चित्ताने जाईन...हाहा
'काल'ची हुकमाची राणी मानवर
'काल'ची हुकमाची राणी मानवर 'काया' उभी करणारी 'कंगना राणावत' एक आश्वासक अभिनेत्री वाटते बऱ्याचदा. प्रियांकापेक्षा कंगना लक्षात राहावी, ह्यातच सर्व काही यावं, नाही का ?
<<<
फॅशन मधेही कंगनाच जास्तं भाव खाऊन गेली प्रियांका असताना !
बर्याच दिवसांनी रसपचा
बर्याच दिवसांनी रसपचा रीव्ह्यु आला.
कंगना मला पण आवडते, सेन्सिबल विचार करत काम करते ती. विवेक ओबेरॉय अभिनेता म्हणून चांगलाच आहे कायम. अगदी पहिल्या कंपनीपासूनच. मधे माती केली ती बॉलीवूडच्या सुपरहीरोशी बालिशपणे पंगा घेऊन. त्यानंतर त्याच्या करीअरची अधोगतीच चालू झाली. क्रिशमुळे अॅट लीस्ट व्हिलनचा तरी भाव मिळेल त्याला.
मी बहुतेक सोमवारी बघेन हा सिनेमा.
स्पेशल ईफेक्ट्स मोठ्या पडद्यावर पाहण्यासारखे आहेत का?
स्पेशल ईफेक्ट्स मोठ्या
स्पेशल ईफेक्ट्स मोठ्या पडद्यावर पाहण्यासारखे आहेत का?
- यस... आपल्याला तर भारी वाटले. मला असं वाटतंय की थ्री-डी मध्येही आहे हा पिच्चर..? इज इट ?
मला ट्रेलर पाहून थ्री डी असेल
मला ट्रेलर पाहून थ्री डी असेल असं वाटलं होतं , नाहीये का ?
आमच्या गावात तरी आला नाही
आमच्या गावात तरी आला नाही थ्री-डी..!
the film was supposed to
the film was supposed to release along with its 3D format on Diwali, November 4, 2013.[6][7] However, due to lack of time to convert the film to 3D, Rakesh Roshan later confirmed that the film will be released only in the 2D format.
- विकीपिडिया
थ्रीडी नाहीये. पण तरी बघणार.
थ्रीडी नाहीये. पण तरी बघणार. कुणासाठी नाही तरी ह्रितिकसाठी नक्कीच.
मलापण ह्रितिक आवडतो. वि ओ पण
मलापण ह्रितिक आवडतो.
वि ओ पण आवडायचा पुर्वी
रिव्ह्युपण बर्यापैकी पॉसिटिव्ह आलाय, सो सुट्टीत नक्कीच बघेन....
चांगला आहे तर एकूण ! प्रोमो
चांगला आहे तर एकूण !
प्रोमो पाहून आणि गाणी ऐकून अज्जिबात पहावासा वाटत नव्हता..
रसप एक अत्यंत मोठी चुक त्यात
रसप
एक अत्यंत मोठी चुक त्यात आहे
लक्षात आली का?
अय्यो रितीकचा मुव्ही आलाय का?
अय्यो रितीकचा मुव्ही आलाय का? सो क्युट. मी तर त्याच्या प्रेमातच पडले. काय मस्क्युलीन आहे नं तो!! मी तर सोडणारच नाही त्याला... म्हणजे क्रिश ३ मुव्हीला.

पाभेजी, लिंगसंभ्रम निर्माण
पाभेजी, लिंगसंभ्रम निर्माण झालाय का मनात?
डागदरसायेब रितीकचा खेळ आलाय
डागदरसायेब रितीकचा खेळ आलाय तवा प्रितीक्रिया द्याया नगो?

रसप एक अत्यंत मोठी चुक त्यात
रसप
एक अत्यंत मोठी चुक त्यात आहे
प्रियांका की कंगना?
इथे सांगितली तर कथा उघडेल
इथे सांगितली तर कथा उघडेल
हृतिक साठी बघणारच !
हृतिक साठी बघणारच !
काल पाहिला. कथा, पटकथा, गाणी
काल पाहिला. कथा, पटकथा, गाणी या बाबतीत चित्रपट मार खाणारा असला तरी स्पेशल इफेक्टस् हॉलीवुडच्या तोंडात मारणारे आहेत. विमानाचा गिअर काढण्याचं पहिलं दृश्य तर अप्रतिम जमलंय. ते पडद्यावरच पहायला हवं. हृतिकच्या अभिनयाला तोड नाही. रसप यांनी म्हटल्याप्रमाणे बॉलीवुडमध्ये तो एकमेव सुपरहिरो आहे. कंगना रानावत अप्रतिम. अगदी हॉलीवुडची सुपरवुमन वाटावी इतपत तिचा अभिनय चांगला झालाय. आणि तिला फुटेजही जास्त मिळालंय. विवेक ओबेराय.कंपनीमध्ये त्याच्या अभिनयाची झलक दिसली होती. ‘काल’चा क्रूरपणा त्याने केवळ चेहऱ्यातूनच उतरवला आहे. तो अपंग दाखवला नसता तर विवेकने हृतिकच्या तोडीस तोड काल साकारला असता, यात शंकाच नाही. क्लायमॅक्सची दृश्ये अप्रतिम. पडद्यावरच पाहणे उत्तम. चित्रपटात रेखाची कमतरता मात्र जाणवते. लहानशी का होईना भूमिका द्यायला हवी होती.
क्रिशचं सगळीकडे परीक्षण नकारात्मकच आलंय. पण संपूर्णपणे देशी बनावटीचा आणि हॉलीवुडच्या तोडीचे स्पेशल इफेक्टस् असणारा सिनेमा राकेश रोशन यांनी तयार केलाय, त्याचे कौतुक करायलाच हवं. त्यामुळे एकदा तरी बच्चे कंपनीसह पहायला हवा, असा हा सिनेमा आहे.
हॉलिवूडशी तुलना हा
हॉलिवूडशी तुलना हा क्रायटेरिया आहे का ?
वरचा रिव्ह्यू / प्रतिक्रिया
वरचा रिव्ह्यू / प्रतिक्रिया वाचलेल्या नाहीत, परंतु ज्यांनी हा चित्रपट पाह्यलाय त्यांनी एक सांगाल का, क्रिश ३ बघण्याआधी क्रिश १ आणि क्रिश २ बघणे आवश्यक आहे का? एक स्वतंत्र चित्रपट म्हणून हा पाहता येईल का? धन्यवाद.
गजा, क्रिश२ आलाच नाहीय. कोइ
गजा, क्रिश२ आलाच नाहीय. कोइ मिल गया म्हणजे क्रिश १ (पण त्यात क्रिश नव्हता, जादू होता), आणि क्रिश (म्हणजे कोइ मिल गया मधल्या रोहितचा मुलगा) म्हणजे क्रिश२. असा काहीतरी अजब हिशोब लावलाय.
आमची उद्याची तिकीटे बूक झाली. उद्या पाहून सांगेन. शेजार्यांना तरी फार आवडला म्हणे हा पिक्चर!!
कंगना आणि विवेक ओबेरॉय या
कंगना आणि विवेक ओबेरॉय या अंडर्रेटेड टॅलेंटेड अॅक्टर्स ना चांगला स्कोप आहे वाचून छान वाटलं !
बघायलाच हवा लवकर :).
पाहिला आज. आवडला. हृतिक
पाहिला आज. आवडला.
हृतिक (दोन्ही तरुण आणि म्हातारा), प्रियंका, कंगना, (आणि हो चक्क!) विवेक ओबेरॉयही फिट्ट वाटले आपापल्या जागी. टाईमपास एकदा बघावा. (किंवा काही कारणांनी पुन्हा बघावासाही वाटू शकतो. :फिदी:) गाणी पण चांगली वाटली. नुसती ऐकायला आवडतील का नाही कोण जाणे! पण चित्रपटात आवडली.
(मी याआधीचा क्रिश बघितला नव्हता, पण 'कोई मिल गया' पाहिला होता.)
गाणी म्हणजे तर कोपरापासून
गाणी म्हणजे तर कोपरापासून दंडवत आहेत ! राजेश रोशन साहेबांचं घणाघाती संगीत त्यांच्या वयाच्या इतर कुठल्या सामान्य माणसास ऐकवलं तर त्याचा रक्तदाब निश्चित वाढेल, कदाचित गचकेलही ! >>
बरं, गाणी भंकस आहेतच. त्यांची पेरणी ? म्हणजे कसंय.... कहाणी आपली पुढे जात असते. मध्येच 'कट' ! --------- गाणं ---------- गाणं संपलं. कहाणी पुढे………. अरे काय लावलंय काय ? गणेशोत्सवाचा मंडप आहे का हा ? >>
क्रिश पाहिला नाही, क्रिश३ पाहिन की नाही माहिती नाही, पण तुमचं परिक्षण आवडलं(तं).
इथे सांगितली तर कथा
इथे सांगितली तर कथा उघडेल?>>>>>>>>>>>>>>>. उदय ....फेबु वर तु कथा उघडली आहेस
hopeless movie aahe.
hopeless movie aahe.
रसपशी १००% सहमत. पेपरात अगदीच
रसपशी १००% सहमत. पेपरात अगदीच घाण परिक्षणं आली आहेत. पण सिनेमा वाईट नाही. अडीच तास मस्त टीपी होतो. गोष्टीत योग्य वेळी क्रौर्य, इमोशनल ड्रामे, गाणी, एकदा हा ह्रिथिक, एकदा तो ह्रिथिक वगैरे आहेत. त्यामुळे प्रेक्षक एन्गेज्ड राहतात. स्पेशल ईफेक्ट्समध्येच सगळे पैसे वसूल होतात!
रच्याकने, म्हातारा ह्रिथिक जास्त आवडला
तरूण ह्रिथिकला काही कामच नाही. जे काम आहे हे बाप आणि क्रिशलाच आहे. ट्रिपल रोल असूनही त्याचे अजीर्ण होत नाही मात्र. ह्रिथिक रोशन अनेक वर्ष इन्डस्ट्रीत टिकून राहिल असे दिसते एकूण 
अनि ते फक्त एक आहे अजुन बरच
अनि
ते फक्त एक आहे
अजुन बरच काही आहे....
मला एक आवडले नाही....
शेवटी मुलगा पेक्षा मुलगी झालेली दाखवली असती तर एक सुपरवुमन मिळेल,,,, क्रीश तर होताच....
आणि आजच्या वातावरणात महीलांबद्दल एक चांगला संदेश देखील गेला असता
शेवटी मुलगा पेक्षा मुलगी
शेवटी मुलगा पेक्षा मुलगी झालेली दाखवली असती तर एक सुपरवुमन मिळेल,,,, >> क्रिशसाठी ह्रतिक आहे, पण ‘क्रिशा’साठी तशी हिरॉईन मिळेल का?
कतरीना आहे दिपीका
कतरीना आहे
दिपीका आहे
प्रियांका आहे
Pages