ई स्कूटर किंवा बाईक कोणती चांगली?

Submitted by अलीबाबा on 29 September, 2025 - 01:31

सध्याच्या दारूमिश्रीत पेट्रोलमुळे माझी जुनी अ‍ॅक्टिव्हा त्रास द्यायला लागली आहे. तशी १४ वर्षांची पण झाली आहे म्हणा..

तर मुद्दा हा, की दिवसाकाठी ३-४ किमी फिरणे असलेल्या 'अधेड उम्र के नौजवान' को चालेल अशी विजेवर चालणारी कोणती गाडी घेता येईल? तुमच्याकडे आहे का? तुमचा अनुभव काय?

नौजवान असल्याने मोटरसायकल सारखी दिसणारी देखिल चालेल. स्कूटरच हवी असे नाही.

ओला नको. कुणाल कामर्‍याने घाबरवलं आहे बरंच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Good question
Happy
महाग आहेत गाड्या अजूनही
लाखाच्या पुढेच सगळ्या.
शुभेच्छा शोधणे आणि निवडणे साठी.
त्यातल्या त्यात चेतक आणि tvs ची क्यूब दिसतात सगळीकडे आणि कमी प्रॉब्लेम्स असलेल्या.
ओला एकदा पडली तरी खेळण्यातल्या गाडीसारखी तुकडे होईल का असे वाटतेय.
असो

E20 पेट्रोल मुळे त्रास होत असेल जुन्या दुचाकींना.
आधी इथेनॉल मिक्स होत नव्हते तेव्हा हाय octane पेट्रोल मिळायचे
मस्त होते तेव्हा.

VIDA च्या जाहीरातीमधे 45000 वगैरे किंमत दाखवतात. कशी काय ते ठाऊक नाही
Just saw the website
Battery as a Service (BaaS) असं काहीतरी मॉडेल आहे म्हणे

E bike scooter साठी बिग NO
1- ब्रेकिंग सेफ्टी नाही
2- बिल्ट क्वालिटी नाही
3- रेंज इन्झायटी सतत
4- हाइवे मोकळा असला तरी 3ऱ्या पॉइंटमुळे बैलगाड़ी स्पीड
5- कम्फर्ट --- 4 पैसे वाचवू आणि पाठदुखण्या वर लाखो टाकू
6- रिसेल वैल्यू नाही

-------------
दिवसाकाठी ३-४ किमी फिरणे असलेल्या 'अधेड उम्र के नौजवान' को >> 5km साठी e पर्याय हवाच असेल तर स्वस्तात e सायकल (गियर नसणारी) उत्तम

सध्याच्या दारूमिश्रीत
>>
अल्कोहोल म्हणजे दारू???
बेनाड्रिल ला काय म्हणाल मग?? दवादारू???

ओला नको. कुणाल कामर्‍याने घाबरवलं आहे बरंच.
>>
गाडी घेताना एक्स्पर्ट चं मत विचारात घ्या, कुणाल कामरा कधीपासून ऑटो एक्स्पर्ट झाला??

यूझर म्हणून माझं मत हे पेट्रोल बाईक/ स्कूटर घेण्याच्या बाजूनी.
रेंज अँक्झइटी हे एकच कारण फार मोठं आहे.