मुलासाठी नाव

Submitted by रचना. on 26 July, 2009 - 01:15

नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे. आणि जन्म रामनवमीचा, ३ एप्रिल २००९. (काही कारणाने बारश्याला उशीर होतो आहे.) पण आता १६ ऑगस्ट तारिख पक्की झाली आहे. नाव "ह" वरून किंवा रामाचे किंवा दुसरेही अर्थपूर्ण आणि त्याला शोभेसे हवे. आम्ही "हर्षित" ठरवतो आहे. पण मला ते पंजाबी वाटते. नवर्‍याला "हर्षवर्धन" हवे आहे. पण मला ते जास्तच लांब आणि common वाटते. कृपया मदत करा.
मायबोलीवर नविन असल्याने काही चूक झाल्यास सांभाळून घ्या.

- रचनाशिल्प

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गूगल केल्यावर स्विनी म्हणजे वन हू ऑल्वेज शाईन्स

स्विनी म्हणजे किरण (रे ऑफ एनीथींग)
तेजस्विनी म्हणजे तेजकिरण
तसेच यशस्विनी म्हणजे यशाचे किरण.

स्विनी ? असा शब्द आहे का आपल्याकडे ?की कुठल्या अभारतीय भाषेतील शब्द आहे ? वरचे अर्थ चूक वाटत आहेत मला तरी.

यशस्विनी म्हणजे यशाचे किरण.
<<<
मला वाटतं तेजस्वी , यशस्वी हे शद्ब आहेत आणि त्यावरुन तेजस्विनी, यशस्विनी शब्द आले असावेत !
माझ्या अंदाजा प्रमाणे तेजस्विनी/यशस्विनी म्हणजे 'तेजस्वी आहे अशी ती ', 'यशस्वी आहे अशी ती' असे समास असावेत ! (जसे योगासनांवर प्रभुत्व असणार्‍या पुरुषांना योगी, स्त्रीयांना योगिनी म्हणतात)
यश + स्विनी = यशाचा किरण असलेली अशी हा अर्थ मला तरी चुकीचा वाटतोय, बाकी इथले भाषातज्ञ यावर लिहितीलच.
(चु.भु.दे.घे.)

>>यश + स्विनी = यशाचा किरण असलेली अशी हा अर्थ मला तरी चुकीचा वाटत<<

वरील दिपांजलीच्या पोस्टला अनुमोदन.... संस्कृत मध्ये तेजस्,तपस्, ओजस्, इ. स कारांत नामे आहेत त्यावरून तेजस्विनी, तपस्विनी वगैरे रुपे तयार होतात. स्विनी या शब्दाला काही अर्थ नसावा.

मी काही भाषातज्ञ नाही. थोडेफार संस्कृत शिकलेय, त्यामुळे लिहिलेय. कृपया जाणकारांनी आणखी प्रकाश टाकावा.

मी काही भाषातज्ञ नाही. थोडेफार संस्कृत शिकलेय, त्यामुळे लिहिलेय. कृपया जाणकारांनी आणखी प्रकाश टाकावा.>>> अनुमोदन Happy

मला इथे सापडलं होतं ते मी लिहिलं http://wiki.answers.com/Q/What_is_the_meaning_of_marathi_word_swini
भाषा बिबि वर लिहायला पाहिजे म्हणजे खरंच जाणकार प्रकाश टाकतील. Happy

चिनी कम मध्ये आहे ती छोटी.. सेक्सी.. तिचं नाव आहे स्विनी खेरा की खारा. Happy

.

आरुनी, मिलोनी. मानिनि, श्रावणी सलोनी, कामिनी , अवनी , अंजनी,
हिमानी , मालिनी,मृगिनी, यशोनी, योगीनी, यामीनी,

मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे. आणि जन्म रामनवमीचा, ३ एप्रिल २००९. (काही कारणाने बारश्याला उशीर होतो आहे.) पण आता १६ ऑगस्ट तारिख पक्की झाली आहे.>>>>>>>
अरे बाबांनो! बारस्याची तारीख उलटुन गेली. तरी तुमचे बळजबरी नावे सुचवणे सुरुच आहे.
लोक हसतिल तुम्हाला! असे- Lol

स्विनी ? असा शब्द आहे का आपल्याकडे ?की कुठल्या अभारतीय भाषेतील शब्द आहे ? >>> मी इथे एकाच आडनाव "स्विनी" वाचलयं .

प्रसाद, परेश, पवन, पार्थ, पियुष, परीक्षित, प्रियम, प्रितम, प्रेषित, प्रित, प्रविण, परमित, प्रसेन, प्रसेनजित, पल्लव, प्रणव, प्रथमेश, प्रथम, पराशर

माझ आवडतं नावः "प्रज्ज्वल"

""मला सुहानी , ईशानी सारखे तिसरे नाव हवे आहे. कृपया मदत करा.""
असेच मी ऐकलेले दुर्मिळ नावः 'स्वर्दुनी', 'सर्वस्वी'

Pages