मुलासाठी नाव

Submitted by रचना. on 26 July, 2009 - 01:15

नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे. आणि जन्म रामनवमीचा, ३ एप्रिल २००९. (काही कारणाने बारश्याला उशीर होतो आहे.) पण आता १६ ऑगस्ट तारिख पक्की झाली आहे. नाव "ह" वरून किंवा रामाचे किंवा दुसरेही अर्थपूर्ण आणि त्याला शोभेसे हवे. आम्ही "हर्षित" ठरवतो आहे. पण मला ते पंजाबी वाटते. नवर्‍याला "हर्षवर्धन" हवे आहे. पण मला ते जास्तच लांब आणि common वाटते. कृपया मदत करा.
मायबोलीवर नविन असल्याने काही चूक झाल्यास सांभाळून घ्या.

- रचनाशिल्प

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद !
आता हि नावे मि माझ्या वहिनिला सांगते बघु ति कोणते सिलेक्ट करते.......कारन माझ्या वहिनिला बाळ झालेय Happy

""मला सुहानी , ईशानी सारखे तिसरे नाव हवे आहे. कृपया मदत करा.""
असेच मी ऐकलेले दुर्मिळ नावः 'स्वर्दुनी', 'सर्वस्वी'>>>>>>>>>>>>>>>
'मनस्वि' ,'तेजस्वि'

काही नवीन नावं
शर्व ( विष्णूचं नाव )
शौरी ( विष्णूचं अणि क्रुष्णाचं सुद्धा )
शौरेन ( सूर्याचं नाव )
मी असं ऐकलं आहे की एका जुळ्या भावंडांची नावं आहेत ' थेंब ' आणि ' ठिपका' . हे खरं आहे का? की असंच पसरवलेलं ?

नावांची खूप मोठी xls आहे माझ्याकडे, अर्थासहीत, कोणाला हवी असेल तर ई-मेल आयडी पाठवून द्या..

शर्व म्हणजे सिंहाचा छावा ना?

मला ' द ' या अक्षरापासून मुलीच नाव सुचवाल का ? प्लिज..
गुढीपाडव्याच्या दिवशी तिचा (मुलीचा ) जन्म झाला आहे, आणि तीला 'द' अक्षर आले आहे.

धन्यवाद वर्षा..
मला पण काहि नावे आवडली आहेत जसे..
दिपल, द्विषा, दर्पणा..
गुढिपाडव्याच्या दिवसाच्या महत्वावरून काहि नाव सुचेल का ? 'द' अक्षरावरून नसले तरी चालेल...

मला 'द' नावावरुन मुलासाठी नाव हवं आहे. सुचवाल का? काहीतरी वेगळे पण अर्थपूर्ण हवय. मी नेट शोधलं.. मला दुष्यंत, देवव्रत, देवांग, दिपेंदू, दिप्तांशु, दिग्विजय अशी काही मिळाली आहेत.

Pages