मुलासाठी नाव

Submitted by रचना. on 26 July, 2009 - 01:15

नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे. आणि जन्म रामनवमीचा, ३ एप्रिल २००९. (काही कारणाने बारश्याला उशीर होतो आहे.) पण आता १६ ऑगस्ट तारिख पक्की झाली आहे. नाव "ह" वरून किंवा रामाचे किंवा दुसरेही अर्थपूर्ण आणि त्याला शोभेसे हवे. आम्ही "हर्षित" ठरवतो आहे. पण मला ते पंजाबी वाटते. नवर्‍याला "हर्षवर्धन" हवे आहे. पण मला ते जास्तच लांब आणि common वाटते. कृपया मदत करा.
मायबोलीवर नविन असल्याने काही चूक झाल्यास सांभाळून घ्या.

- रचनाशिल्प

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ग नंदिनी, आम्ही दोघं घरच्या घरीच नाव ठेवणार आहोत. आईला देखिल येऊ नको म्हणून सांगितलं.

अश्विनी,
अगं तो मजेतच असतो.
लालु,
अगं हर्षित, राघव, आदि, पलाश आणि सनत ही नावं ठरली. त्यातील हर्षित हे कागदोपत्री आणि पलाश हे हाक मारण्यासाठी असं एकदाच final झालं.

गुंडुला चुप बसा सांगतोय वाट्टं! मस्त फोटो ! हर्षित नाव छान आहे, अन शोभतयं हो गुंडु ला.. Happy
अनेक आशिर्वाद छोटुस.. Happy

छान हसतय गोडुलं Happy

आता मुलीसाठी नाव सुचवा.
"स"वरून हवय आणि शक्यतो पार्वतीचे नाव हवय.
हरतालिका आणि गणेश चतुर्थी असा जन्म आहे Happy

नन्दिनी, १००० पार्वतीची नावे लिन्क देत आहे. कानोकानी साठी सर्च करत होते.

http://www.indiadivine.org/audarya/hindu-sadhanas/267742-1000-names-devi...

शाश्वती छान आहे. बरीच नावे नव्या बाळापेक्षा लांबडी आहेत.

मी सध्य शोधलेली नावे.
१, शमिका
२. शलाका
३, सहाना
४. शरण्या
५. संस्कृति
६, संयुक्ता
७. सावरी
८. शरयु
९. शर्वाणी
१०. सविनी
११. शलाका
१२. शांभवी
१३. शाश्वती
१४. श्रीगौरी
१५. शिवानी
१६. सृष्टी
१७. सुरिना
१८. सुश्मिता
१९. सानवी
२०. सौम्या

अ‍ॅना, स्नेहा बाळाच्या आईचं नाव आहे.
खरंतर मला हा प्रकार बिल्कुल आवडत नाही. आई वडील काका आजी आजोबा सर्वच एस वरून नाव असणारे. पण आता ते राहू दे! स वरून नाव शोधायचं आहे Happy

बरं. Happy सई नाव छान आहे अन श्रेयाही. सुटसुटीत वाटतात. Happy
श्रध्दा, श्रावणी, श्रीदेवी(?), शारदा, शुभदा(शुभी होणार पण),
जुनी आवडतील का? सीता, सुभद्रा, सुमन

समिक्षा Happy (काल हे नाव मला जाम आठवत नव्हत, रात्री भाजी निवडता निवडता एकदम आठवलं, डीडी १ कुणी पाहतं का? त्यात एक सिरियल यायची पत्रकार तेजस्वी मुलीची - तिचं नाव समीक्षा. Happy

सर्वच नावं छान आहेत!!

शुभदा आज्जीचं नाव आहे. Happy श्रेया नावाने घरात जाम गोंधळ घातला होता त्यामुळे ते अजिबात नको!!!

मला शरण्या शर्वाणी शांभवी आणि स्विनी आवडलय. बाळाच्या आईला सर्व नावं सुपूर्त करेन आज उद्या. Happy

Pages