Submitted by रचना. on 26 July, 2009 - 01:15
नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे. आणि जन्म रामनवमीचा, ३ एप्रिल २००९. (काही कारणाने बारश्याला उशीर होतो आहे.) पण आता १६ ऑगस्ट तारिख पक्की झाली आहे. नाव "ह" वरून किंवा रामाचे किंवा दुसरेही अर्थपूर्ण आणि त्याला शोभेसे हवे. आम्ही "हर्षित" ठरवतो आहे. पण मला ते पंजाबी वाटते. नवर्याला "हर्षवर्धन" हवे आहे. पण मला ते जास्तच लांब आणि common वाटते. कृपया मदत करा.
मायबोलीवर नविन असल्याने काही चूक झाल्यास सांभाळून घ्या.
- रचनाशिल्प
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हेरंब हे
हेरंब हे नाव खुप छान आहे
"आदि"
हे नाव ही छान आहे..
रामाला आदिपुरुष ही म्हणतात.
त्यावरुन..सहज आणि सोपे नाव..:)
सर्वप्रथम
सर्वप्रथम तुमचे मनापासून अभिनंदन... हेमराज नाव कसं वाटतयं बघा.. याचा अर्थ आहे ..king of gold...हेमेंद्र हेहि नाव कसं वाटतयं बघा..
'आदित्य' पण
'आदित्य' पण छान आहे
मला वाटत कि ते आदित्य म्हणजे सुर्य
हे,
हे, अभिनंदन! हर्ष ठेवू नकोस कारण स्पेलिंग Harsh होते किंवा मग Hersh असे करावे लागेल.
व्हीपीने सुचवलेलं हेरंब छान आहे किंवा हिरण्य = विष्णू किंवा रुपं.
आमच्या सोसायटीत एक राघव आहे छोटासा पण अजून त्याचा रघू झाला नाहिये. घरात काही वेगळ्या नावाने हाक मारायची
मराठीवर्ल
मराठीवर्ल्ड वर मिळालेली ही काही नावे अन त्यांचे अर्थ...

रचना, ठरलं
रचना, ठरलं की नाही तुझ्या गोडुल्याचं नाव? नाहितर कौसल्यामातेलाच मेसेज धाडुया तुझ्या बाळाचं परत बारसं करुन "ह" वरुन नाव ठेव. तिने ते ठेवलं की आपण तेच नाव रामाचं म्हणून तुझ्या बाळाचंही ठेवूया
***************
ॐ नमश्चण्डिकायै |
हवन हेरम
हवन
हेरम (हेराम)
हर्दन
हंस
हिरक
हनुमान (या नावा बद्दल आग्रह नाही )
हनुज
हर्वेश
हवन हेरम
हवन
हेरम (हेराम)
हर्दन
हंस
हिरक
हनुमान (या नावा बद्दल आग्रह नाही )
हनुज
हर्वेश
हवन हेरम
हवन
हेरम (हेराम)
हर्दन
हंस
हिरक
हनुमान (या नावा बद्दल आग्रह नाही )
हनुज
हर्वेश
मि पण एक
मि पण एक सुचवु का ???
हर्षुल
हृतिक कस
हृतिक कस वाटत? बाळ खूपच गोड आहे.
बहुतेक
बहुतेक नावं गुजरातीच आहेत मग
हसमुखलाल का नको???
मला हेरंब आणि हेमक आवडले. रामाचेच नाव ठेवायचे असल्यास "श्रीराम" सारखे सु,न्दर सोपे आणि उच्चारायला सहज दुसरे नाव नाही. हाक मारताना आईवडिलानीच श्री किंवा राम अशी हाक मारली तर अपभ्रंश व्हायची भिती नाही. (राशीप्रमाणे एक आणि कागदोपत्री एक अशी पण दोन नावे ठेवता येतात.)
--------------
नंदिनी
--------------
ही बघा
ही बघा लांबलचक नावांची आणखी एक यादी...
हरमित
हरमिन
हरप्रीत
हरित
हरिश
हरीन
हरींद्र
हरेश
हर्निश
हर्मीत
हर्ष
हर्षद
हर्षन
हर्षनाद
हर्षल
हर्षवर्धन
हर्षांक
हर्षित
हर्षिद
हर्षिल
हर्षीद
हार्दिक
हारील
हितार्थ
हितांशू
हितेन
हितेश
हितेंद्र
हिनांग
हिनांशू
हिनेंद्र
हिमल
हिमालय
हिमांक
हिमांग
हिमांशू
हिमेन
हिमेश
हिरक
हिरण्य
हिरल
हिरेश
हीरेन
हेतन
हेतीश
हेतेन
हेतेश
हेनील
हेनीश
हेमचंद्र
हेमराज
हेमंत
हेमांग
हेमेन
हेमेंद्र
हेरंब
हेरीम
होमेश
ह्रदय
ह्रदयनाथ
ह्रदयेश
धन्यवाद सर्व मायबोलीकरांनो !
धन्यवाद सर्व मायबोलीकरांनो ! प्रश्न विचारला तेव्हा कल्पना नव्ह्ती की इतके प्रतिसाद येतील........ परत एकदा धन्यवाद !!!
मुग्धा,केतकी
मला आदित्य नाव खुप आवडतं........पण ते आता फार common झालं आहे.
अश्विनी,
अगदी अगदी........आता कौसल्यामातेलाच साकड घालणार आहे.
नंदिनी,
अगं ह चा तोच प्रोब्लेम आहे. बरीचशी नावं गुजराती, उच्चारायला कठिण (considering global acceptance), किंवा खास अर्थ सांगावी लागणारी आहेत. त्यामुळे तु म्हट्ल्याप्रमाणे <<राशीप्रमाणे एक आणि कागदोपत्री एक अशी पण दोन नावे ठेवता येतात.>> करणार आहे. तसंही माझी आणि माझ्या नवर्याची दोन नावं आहेत.
शिवम,
अरे बापरे....! तुम्हाला सलाम.
नवर्याकडिल पद्धतीनुसार पाच नावं ठेवायची......शेवटी त्याच्या आवडीचं हर्षवर्धन, राघव, आदि, पलाश (हे माझं आवडतं) अरे बापरे ही तर चारच झाली........
रचना पाचवे
रचना पाचवे नाव वज्र किंवा वज्रांग ठेव.
जन्मतः प्रिमॅचुअर असला तरी पुढे वज्रासारखा मजबूत, बळकट होऊ देत तुमचा गोंडुला!
'पलाश' छानच
'पलाश' छानच आव आहे.
.
.
ए मग
ए मग प्रबळच ठेव. ९६कुळांना शोभेलच
आणि त्याला खास अर्थ पण आहे. पुन्हा वेगळे आहे.
आदित्य
आदित्य नाही..
फक्त "आदि"..:)
रचना,
रचना, बाळाच्या बारशाला सुंठवडा वाटणार का गं ?

***************
ॐ नमश्चण्डिकायै |
जाजु ला
जाजु ला मोदक.
खरंच, किती छान वाटेल नाव... प्रबळ पाटिल !
मुग्धा, बदल
मुग्धा,

बदल केलाय.
अश्विनी,
नक्कीच........बोलवेन तुला
जाईजुई, शिवम,
पण गालांवर खळ्या असणारा "प्रबळ पाटिल" कसा वाटेल....
सर्वांच्या सहमतीने पाचवे नाव
सर्वांच्या सहमतीने पाचवे नाव 'सनत' (ब्रह्मदेव + माझ्या gynaec चे नाव - complications असतांना देखिल नीट delivery केल्यामुळे) ठरवण्यात आले आहे हो.......
सनत नाव छान आहे
सनत नाव छान आहे
ओह ऊशिरा झाला असो. सनत नाव
ओह ऊशिरा झाला असो. सनत नाव चान आहे.
भविश्यात कदचित दुस्र्यल उपयोग होइल.
रामा ला सचिरायु: म्हन्ट्ल आहे रामरक्शए मध्ये चिरायु नाव आवड्तय का बघा.
अमेरिके मध्ये रहात असाल तर चिरायु च मुल चीरिओ करु शकतात ति समस्या होउ शकअते.
ह चि सर्व नाव बकि लोकनि दिलि आहेतच. रामरक्शए मधलि काहि नाव.
वेदआन्त, प्रमेय, राजेन्द्र, श्यामल, राजीव, रमेश,
क्रुप या मराथि टाय्पिन्ग चुका बद्दल माफ करा.
काहि नाव ठरवलस कि नाहि?
काहि नाव ठरवलस कि नाहि?
धन्यवाद गोडसे ! चिरायु देखिल
धन्यवाद गोडसे ! चिरायु देखिल छान नाव आहे.
केतकी,
अगं हर्षित, राघव, आदि, पलाश आणि सनत ही नावं ठरली. त्यातील हर्षित हे कागदोपत्री आणि पलाश हे हाक मारण्यासाठी असं एकदाच final झालं.
१६ ऑगस्ट तारिख नक्की होती. पण पुण्यात स्वाईन फ्लू चा धुडगुस चालू असल्याने माझ्या गोंडुल्याचं बारसं पुढे ढकलण्यात आलं आहे..........
बिचार्याच्या बारश्याचा काही मुहुर्तच निघत नाहीये गं............
खरच ग. बाळाला खुपच सांभाळाव
खरच ग. बाळाला खुपच सांभाळाव लागणार आहे. काळजि घे.
रचना, बारसे म्हणजे फार मोठा
रचना, बारसे म्हणजे फार मोठा कार्यक्रम वगैरे अपेक्षित असेल तर ते नकोच. स्वाईन फ्लु हे तर कारण झालेच. तसेच बाळ आधीपासूनच नाजुक असल्याने जास्त लोकामधे नेल्यास नजर लवकर लागते हे पण लक्षात ठेव.
घरच्या घरी पाळण्यात घालून नाव ठेवले तरी चालेल. नाहीतरी बाळाना स्वतःचे बारसे एंजॉय करता येत नाहीच
त्याला स्वतःचे नाव काय आहे हे सम्जले की झाले. 
साकेत हे नाव सुद्धा रामाचेच
साकेत हे नाव सुद्धा रामाचेच आहे
Pages