बिग बॉस मराठी सिझन ६

Submitted by दीपांजली on 14 January, 2026 - 14:02

बिग बॉस मराठी सिझन ६ सुरु झाला आहे.
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा !
स्पर्धक :
दीपाली सय्यद : ( अभिनेत्री/पॉलिटिक्स्ल बॅक्ग्राउंड)
सागर कारंडे : ( कॉमेडियन/ अ‍ॅक्टर)
सचिन कुमावत: (खान्देशी गायक)
सोनाली राऊत: (मॉडेल, एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट )
आयुष संजीव: (अ‍ॅक्टर )
तन्वी कोलते: (अभिनेत्री)
करण सोनावणे/फोकस्ड इन्डियन : इन्फ्लुएन्सर, कॉमेडियन, क्रिकेट प्लेयर्स/ क्रिकेट क्स्न्टेन्ट साठी फेमस.
प्रभू शेळके:रील स्टार
प्राजक्ता शुक्रे,: इन्डियन आयडॉल सिझन १
अनुश्री माने : मॉडेल्/अ‍ॅक्ट्रेस
रुचिता जामदार,: एम टि.व्ही रोडीज एक्स कॉन्टेस्टन्ट
राकेश बापट,: अ‍ॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
रोशन भजनकर: अमरावतीचा बॉडी बिल्डर
दिव्या शिंदे: युवा नेता
विशाल कोटियन : अ‍ॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
राधा मुंबईकरः लावणी +आयटेम डान्सर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लफडीबाज अवडक्का कोल्हापूरकरला इशल्या म्हणतो तुझ्या आईला गोदीत नाही घेतलं... आईला गोदीत?? काय आहे हे ? हे जर त्या भाऊने धक्क्यावर आणला नाही तर समजून जा, इशल्याने विकत घेतला आहे त्याला.
आणि ही अवडाक्का जर एवढी स्ट्रॉंग असल्याचं दाखवत असेल तर त्याला पाण्याचा ग्लास देण्याइतपत लाचारी? निव्वळ फालतू आहे ही. कोल्हापूरच्या नावावर कलंक

तुझ्या आईला गोदीत नाही घेतलं... >> विशाल हे बोलला नाही. विशाल म्हटला मी तुला गोदित उचलून आणलं नाहिये. त्याचा अर्थ मी जिथे तिथे तुला सपोर्ट करणं किंवा तुझ्या बाजूने बोलणं माझ्यासाठी सक्तीचे नाहीये. कुठे काय बोलायचं आणि कोणाच्या बाजूने बोलायचं ते मला ठरवू दे, ते तू मला सांगू नको. मला तरी विशाल ने घेतलेला स्टँड बरा वाटला. आता रुचिताने त्याच्यापासून सुरक्षित अंतरावर राहून स्वत:चा खेळ खेळावा. विनाकारण प्रेम किंवा तात्पुरता लव्ह अॅंगल यात फसून खेळाची नासाडी करू नये.

तन्वी मूर्ख वाटली कालच्या एपिसोड मध्ये एक तर आयुष वरुन जो काही आरडाओरडा तिने दीपालीवर केला तो अनावश्यक होता. दुसरं म्हणजे कॅप्टन रूम मध्ये राहते, तिथे मेकअप करते पण नेमकं टॉयलेट मात्र कॉमन वापरते मूर्ख. सुविधा वापरायची नाही म्हणते, टॉयलेट सुविधा नाही गरज आहे बावळट.

राखिने सध्या राकेश बापट ला धरलेलं आहे. जाम मजा वाटली मला काल. तुझं नाव काय? राखी सावंत बापट म्हणे.
आणि परस्परच कॅमेऱ्यात सांगून आली की राकेश ला इथून काढू नका माझं मन नाही लागणार.

तन्वी हॅज लॉस्ट इट, डे १ पासून ती डोक्यातच जातेय.. लोक का तिच्यात विनिंग क्वालिटीज बघत होते काय माहित !
राखी सावन्तने तिचे ओरिजिनल फेक नेचर समोर आणले उत्तम केले.. जेंव्हा राखी रुचीतावर अशाच कॉमेन्ट्स करत होती तेंव्हा ही मजा घेत होती, स्वतःवर आलं कि ढोगळा पसरला !
ना तिने पकडलेलं कॅरॅक्टर ओरिजनल , ना तिची स्टाइल, ना तिचा गेम ..भयंकर टॉक्सिक आणि अनॉयिंग !
स्वस्तं व्हर्जन आहे तानिया मित्तल +फरहानाचे.. कोणीही जिंकु देत अगदी रुचीताही पण तन्वी नको !
दीपाली अचानक स्मार्ट गेम खळतेय, रुचीता दुखावल्यावर काय लग्गेच संधी साधली Happy
राखी सावन्त आल्यापासून काय लेव्हल अप झालाय शो आणि बर्‍य॑च लोकांचा गेम, हॅट्स ऑफ टु राखी!

शाळा गेम बोअर झाला काल.
तन्वी चा राडा बघुन राकेश कसला वैतागला होता ... फारच किंचाळत होती ती काल.. गरज नसताना.. राखी ट्रीगर दाबत होती आणि ही होत होती.. काय गरज आहे तिला हे सगळं करायची कोण जाणे..
दीपाली खरंच प्रेमळ असावी असं वाटलं काल.. रुचिता चं आणि तिचं येवडं वाजलं असुनही समजवायला गेली काल रुचिता रडत असताना..
रुचिता खरंच गुंतली आहे ही स्वत: चा फायदा करुन घेण्यासाठी नाटक करत आहे कळत नाहीये...
तन्वी ने खरंतर स्वत: चं टॉयलेट वापरुन इतरांना कॉमन टॉयलेट वापरु दिलं पाहिजे. गरजेला कॅप्ट्न रुममधलं पण वापरा असं सांगितलं असतं तर जास्त चांगली दिसली असती. खाण्यापिण्याच्या सुविधा सोडल्या हे ठीक पण टॉयलेट ही बेसिक गरज आहे.

विशाल हे बोलला नाही. विशाल म्हटला मी तुला गोदित उचलून आणलं नाहिये. त्याचा अर्थ मी जिथे तिथे तुला सपोर्ट करणं किंवा तुझ्या बाजूने बोलणं माझ्यासाठी सक्तीचे नाहीये<<<
दोन्ही म्हंटला, पहिल्यांदा फक्त हिला गोदीत उचलून आणलं का आणि नंतर रागात ‘हिच्या आईला , हिला गोदीत उचलून आणलं का‘ म्हंटला, म्हणजे फ्रस्ट्रेशन मधे ‘च्या मायला‘ वगैरे शिवी देतो त्या अर्थाने.
बेसिकली ‘I am not here to babysit you ‘ असा अर्थं असावा, शब्द्शः तिच्या आईसाठी असे काही नाही म्हंटला Happy
त्याचं मराठी तसे काही वाइट नाहीये, कधीकधी वाक्यरचना गडबडत असेल पण बिन्धास्त बोलतो, न अडखळता, शिवाय ‘एकटा जीव सदाशिव, आपलेच दात आपलेच ओठ‘ वगैरे वाक्यही टाकतो.

राखीने खरंच मजा आणली आहे..
पार झोपी गेलेला सिझन जरासा जागा केलाय..
परवा कॅप्टनने सांगितलं म्हणुन पुर्ण कोबीच्या गड्डीची भाजी केली होती ....फार मजा येते तिचे किस्से बघताना.... नॉमिनेशन टास्क मधे पण गंमत आणली. मधेच आडवी झोपुन गेली.. त्या टास्क मधे पण "स्वतः चं डोकं वापरता येत नसेल तर माझं घे" हे तन्वी चं वाक्य भारी ... फार हसले.
काल रोशन तिला वहिनी वहिनी म्हणत होता.. राबा च्या मागे लागली आहे सध्या...राखी सावंत बापट .. हा हा हा..
अजुन २-३ आठवडे ठेवा तिला .. जरा बघावसं वाटेल...

परवा प्रभु ला सगळे एकत्र चिडवत होते ते अजिबात आवडलं नाही.. सगळे एकदम त्याच्या अंगावर गेले.. त्याचं रडणं खरं वाटलं. अशी शरीरयष्टी कोणी मागुन घेत नाही देवाकडे. लहानपणापासुन त्याची उंची,त्याचा आजार यामुळे अनेक ठिकाणी त्याला ऐकुन घ्याव लागलं असेल, तरी तो इथवर पोचलाय..थेट नॅशनल टीव्ही वर...वीक वीक म्हणुन सतत त्याला बोललं जातं.. शक्ती वापरता येत नाही मग चुकिची हा होईना पण युक्ती वापरली त्याने.. बरं सोनं चांदी चोरली नाहिये.. बिबॉ च्या खेळातली वस्तु आहे.. त्याला नक्कीच वाईट वाटलं असणार.
सागर आत जाउन त्याला म्हणाला की कॅमेरा साठी करतोय.. सागर दिवसेंदिवस वाईट दिसतोय...

बेसिकली ‘I am not here to babysit you ‘ असा अर्थं असावा, >> बरोबर.

राखी काल प्रभूला जवळ घेऊन म्हटली हा माझा मुलगा.. प्रभू म्हटला इतका काळा मुलगा का जन्माला घातला?
मी लय हासले. राखीचं टायमिंग पण जबरी आहे, लगेच म्हटली मी आतून जळत होती ना म्हणून तू काळा झाला..

रुचिता खरंच गुंतली आहे ही स्वत: चा फायदा करुन घेण्यासाठी नाटक करत आहे कळत नाहीये... >> मला नाही वाटत ती नाटक करतेय. कारण तिला जितकी प्रसिद्धी आहे (आधीची) त्यापेक्षा विशाल चे एक्सपोजर, अनुभव सगळंच मोठं आहे आणि अशा माणसाकडून अटेन्शन मिळतंय म्हटल्यावर काय? आणि ती नेहमी त्याच्याबाजूला बसलेली दिसते. तो मात्र कटाक्षाने तिच्याच बाजूला बसेल असं नाही. जमेल तेव्हा वाटेल तेव्हा फ्लर्ट मात्र करतो.

ब्रॉन्झ रेशन कार्ड मिळालं तर म्हणतो मी यातच खूश आहे की तू बाजूला झोपशील. झालं लगेच मैना लाजली.

राखी राखी राखी.
हिला बिबॉसच्या क्रिएटिव्ह टीममध्ये घ्यायला पाहिजे.
तिची फुलकोबीची भाजी लाजवाब.
कँप्टनची ऑर्डर पाळताना मूकपणे केलेला अभिनय लाजवाब
तन्वीला जेरीस आणण लाजवाब.
नॉमिनेशन टास्कमधला एकपात्री प्रयोग -त्याला तोडच नाही
राकेश बापटला सतावण लाजलाब.
आणि काल तन्वीवरती राखी नावाचा पडलेला बॉम्ब .
हिला ट्रॉफी पण कमी पडेल बक्षीस म्हणून.
तन्वी मात्र स्वयःच्या पायावर धोंडा मारून घेत आहे.तिचा नक्की काय प्रॉब्लेम आहे,सारख काय माझ्या घरचे बघत आहेत,?आयुषशी मैत्री केली,त्याच्यासोबत बोलत होती,फिरत होती तेपण बघतच होते ना घरातले.
काल आरडाओरडा करून स्मोकिंग रुममध्ये गेली ते पण पाहिलच असेल ना घरातल्यांनी.
ही आणि तो तापट इतक काय इमेज सांभाळत खेळतात.
तापटला माहित नाही का गेम.
आधी राखीला यांनीच जवळ केल आता राखीचा बॉम्ब यांच्यावरच फुटल्यावर गळे काढत आहेत.
तन्वीला कंट्रोल ठेवावाच लागेल स्वतःवर.
नाहीतर शो स्वतःच सोडून जाण्याची वेळ येईल.
संत राकेश तापट काल तन्वीला सांगत होते की आपण सगळ्यांना रिस्पेक्ट देतो.कसला रिस्पेक्ट
रुचिताच्या अंखशगावर धावून जाण,फेकाफेकी करण,राखीच्या अंगावर बटाटा फेकून मारण,कात्री घेऊन येण हा कुठरा आणि कुणाचा रिस्पेक्ट?
कालच्या गणिताच्या टास्कमध्ये अनुश्री रोशनला बोलली ते बरोबरच होत.नुसताच ढीम्म उभा होता.काही अँक्शनच नव्हती.
काल प्रभू जवळजवळ गायब होता.
रुचिताच नाटक वाटत नाही आहे.ती अडकत चालली आहे,पण तिनेही सावरायला हव.टास्क मस्त खेळते.पण विशालमुळे गेमवरचा फोकस जात आहे.
अनुश्रीला हे कळल असाव आणि बिबॉसला पण तिला पुढे आणायच असाव ,म्हणून चुगली दाखवली असावी कारण नवीन क्लिपिंगनुसार तिच्यात आणि विशालमध्ये प्रंचंड भांडण होऊन तिने टोळी सोडते अस सांगितल आहे.
या आठवड्यात तरी त्या रोशनला काढा.आता तर तो टास्कमध्ये पण दिसत नाही.

हिला ट्रॉफी पण कमी पडेल बक्षीस म्हणून.
<<<
खरय, राखी हीच एक बिबॉला मिळालेली ट्रॉफी आहे Happy

तन्वी सगळ्या गोष्टी फारच इगो वर घेते आणि त्यामुळे over react करते. पण ती मुद्दाम करते असं नाही वाटत, genuine वाटते.असो, त्यानिमित्ताने रुचिताला रिॲलिटी चेक तरी मिळाला.विशालला तन्वी अज्जिबात भाव देत नाही म्हणून ,नाहीतर गेम साठी त्याला तन्वी रूचितापेक्षा नक्कीच जास्त आवडते..रूचिताने धडा घेतला असेल तर तिच्यासाठी चांगलं आहे.बाकी तिची भाषा सुधारण्याची अपेक्षाही करू नये..नॅशनल television वर कोणाला 'खरकटी' वगैरे म्हणणे हे कित्ती नीचपणाचं लक्षण आहे.त्याबाबतीत काटा गँग खरंच dignity ठेवून आहेत..टोळी आणि बाल्कनी काटा गँग बद्दल नेहेमी तावातावाने, कुजकेपणाने चुगल्या करताना दिसतात..याउलट काटा गँग मधले लोक टोळी बद्दल बोलताना इतका त्वेष, द्वेष करत नाहीत.म्हणून राकेशने तन्वीला आपण सगळ्यांची respect करतो असं म्हटलेले गैर वाटले नाही.दिपाली फार दिखाऊपणा करते. काल रूचिता रडत असताना तिच्याजवळ गेली खरी पण आता नंतर एखाद्या भांडणात तेच उकरून काढू नये म्हणजे झालं..राखी तर काड्या टाकणे हेच माझे काम आहे हे उघडउघड सांगते. पण दिपालीही सतत काड्या टाकत फिरत असते. काल प्राजक्ताने रुचिता आणि विशालला ज्या पद्धतीने समजावले ते आवडलं.गेम साठी नसेल पण माणूस म्हणून छान आहे प्राजक्ता..

मला नाही वाटत ती नाटक करतेय. कारण तिला जितकी प्रसिद्धी आहे (आधीची) त्यापेक्षा विशाल चे एक्सपोजर, अनुभव सगळंच मोठं आहे आणि अशा माणसाकडून अटेन्शन मिळतंय म्हटल्यावर काय? आणि ती नेहमी त्याच्याबाजूला बसलेली दिसते. तो मात्र कटाक्षाने तिच्याच बाजूला बसेल असं नाही. जमेल तेव्हा वाटेल तेव्हा फ्लर्ट मात्र करतो. >>>>>>> अगदी अगदी. विशालने जेव्हा सगळयान्समोर सान्गितले की 'होय मला रुचिता आवडते, आमच्या रिलेशनशिपच आम्ही दोघ काय ते बघून घेऊ' हे ऐकल्यावर रुचिता जरा जास्तच सिरियस झाली त्याच्याबाबतीत.

दिपालीला तर आनन्दच झाला ह्या दोघान्च भाण्डण बघून. ' फायनली मला हेच हव होत, मला आज आनन्द झाला' म्हणत होती.

तन्वीने उगीचच राखीचा मुद्दा पकडून आकांड तांडव केले. घरात कुणालाच तिच्या आणि आयुष वरून काहीच गैरसमज नव्हता. इतके रिअ‍ॅक्ट करण्यासारखे काही नव्हते. सगळे तिला म्हणत पण होते की राखीला काय सिरियसली घेतेस . पण तिचा तसा पचकाच झाला - तिला कदाचित ते कळले नसेल पण त्या झगड्यात रुचिताने मधे घुसून विशाल बरोबर भांडण केल्यामुळे सगळा फोकस तिकडे गेला.
दीपाली ऑब्व्हियसली गेम खेळत आहे. तिला प्रेम वगैरे नाही पण रुचिता आणि विशाल मधे बेबनाव झाल्याचा आनंदच आहे. ती याचा उपयोग करून आगीत तेल ओतत होती. प्राजक्ता मला आवडत नाही पण ती जेन्युइनली त्या सिचुएशन मधे रुचिताला म्हणाली ' असे एखाद्या वाक्यावरुन /प्रसंगावरून नातं खराब करायचं नसतं' याउलट दीपालीचे वाक्य' हे असंच होणार हे मी सांगितलंच होतं, त्याला सोडून दे वगैरे'
आता पुढच्या प्रोमो मधे ती या पॉइन्ट चा वापर टास्क मधे विशाल समोर ट्रॅश टॉक करायला वापरते आहे असे दिसले सुद्धा. पूर्वीही तिने हे केले आहे, रुचिताचा किंवा कुणाचातरी मुद्दा घेऊन इतर ठिकाणी मुद्दाम पोक करणे. पण एकूण ती गेम मधे बरीच स्ट्राँग वाटत आहे आता. गमतीचा भाग म्हणजे यावेळी सगळेच वेगवेगळ्या प्रकारे निगेटिवच प्लेयर आहेत. त्यामुळे रोशन , प्राजक्तासारखा एखादा पॉजिटिव असेल तर ते बावळट वाटत आहेत.

हिला ट्रॉफी पण कमी पडेल बक्षीस म्हणून.
<<<
खरय, राखी हीच एक बिबॉला मिळालेली ट्रॉफी आहे>>> बघा ! मी आधिच साग्नितल होत ना की राखी आल्यावर शो पुढे जाइल...शास्त्र असत ते !! मी शो बघत नाही पण अधुन मधुन इथे वाचत असते.
राखी खुप वर्ष इन्ड्स्ट्रित टिकुन आहे तिने बीबॉ स्पर्धकासारखे अनेकजण कोळुन पिले असतिल.

राखी खरंतर खूप स्मार्ट आणि हुशार आहे. मनाने ने पण चांगली आणि प्रेमळ आहे, acting करत नसते तेव्हा. बाकी तिने विद्या बालन चा डायलॉग स्वतःवर लावून घेतला आहे. क्रिपी असली तरी एन्टरटेन्मेंट एन्टरटेन्मेंट एन्टरटेन्मेंट

काटा गँग ठार बावळट आहे, कुणालाही वेळेत पळून एकदाही बटन दाबता आलं नाही! राकेश निम्मा वेळ आमी नाई जा मोड मधे होता. तसेही अनुश्रीने टोळीला फोडूनही तिला त्याचा फायदा होणारच नाहीये. उलट टोळीच्या विरोधातली मते आता अनुश्री आणि प्रभू मधे विभागली जाणार आणि रुचितालाच त्याचा फायदा होणार. त्यापेक्षा विशाल आणि रुचिताला उमेदवार होऊ दिले असते तर उलट झाले असते, टोलीची मते विभागली गेली असती आणि प्रभू जिंकला असता. बिबॉची मर्जी असेल ते होईल. पण मला वाटते रुचिता होईल कॅप्टन.

सोमिवर RB गेला अशी न्यूज आहे. आतापर्यंतच्या सगळ्या न्यूज खऱ्या होत्या. ही पण असेल तर काही खरं नाही..रोशनला ट्रॉफी देऊन जिंकवा आता..तेवढेच बाकी आहे..

फिटनेस रीलेटेड टास्क असतो तेव्हा टोळी भारी पडते बाकिच्यांवर.. विशाल, रुचिता, अनुश्री जीव लावुन खेळतात. काल तेच झालं.. काटा ला एकदाही बझर दाबता आला नाही. दीपाली, राकेश असे टास्क नाही खेळु शकत.. प्रभु तर कमजोर आहेच या बाबतीत... तन्वी त्यातल्या त्यात जीव लावुन खेळते.
काल शेवटचा बझर अनुश्री ने आधी दाबला होता का ?
अनुश्री संधीची वाट बघत होती टोळीतुन बाहेर पडण्यासाठी.
विशाल फारच चालु आहे. रुचिता ला अनुश्री खुप समवाजत होती काल की विशाल च्या मागे फसु नकोस, स्वतः साठी खेळ पण विशाल ने रुचिता ला बरोबर गुंडाळले... रोशन ला पण परवा चुगली नंतर गुंडाळले..
सोमी वर अनुश्री कॅप्ट्न झाली असं वाचलं...
राबा गेला असं वाचलं.. पण इतक्या लवकर कसं कळेल...? गेल्या आठवड्यात पण रुचिता गेली अशा अफवा येत होत्या पण तसं झालं नाही.. राबा च्या बाबतीत पण असु शकतील अफवा... पण खरच गेला असेल तर अवघड आहे एकुण.. रोशन ला काही न करता जिंकवायचा प्लॅन दिसतोय बिबॉ चा..

एव्हिक्शन इतक्या लवकर होत का? शुक्रवारी दुपारी शूटिंग चालू होत अस ऐकल होत.बापट गेल्याची अफवाच असेल.
रोशनच जायला पाहिजे.

रुचिता ला अनुश्री खुप समवाजत होती काल की विशाल च्या मागे फसु नकोस, स्वतः साठी खेळ पण विशाल ने रुचिता ला बरोबर गुंडाळले.. >>>>> अगदी अगदी. ह्यान्च पुन्हा पॅचअप झाल. अगदी फिल्मी स्टाईलने.

त्यामुळे रोशन , प्राजक्तासारखा एखादा पॉजिटिव असेल तर ते बावळट वाटत आहेत. >>>>> प्राजक्ता ज्या लोकान्ना 'क्लासलेस' म्हणत होती त्यान्च टोळीग्रुप मध्ये जाऊन बसलीये. सचिन सुद्दा जाण्याआधी टोळी मध्ये होता.

राबा गेला असं वाचलं.. >>>>> इतक्या लवकर? ह्याने कुठला नियम मोडला का? तसही तो अधून मधून वेडयासारख वागतो.

काल अनुश्री च्या टी शर्ट वर लिहील होत " खल खल नायिका' हा हा हा आहेच ती खलनायिका.

>>तन्वी ने खरंतर स्वत: चं टॉयलेट वापरुन इतरांना कॉमन टॉयलेट वापरु दिलं पाहिजे. गरजेला कॅप्ट्न रुममधलं पण वापरा असं सांगितलं असतं तर जास्त चांगली दिसली असती<<
एक्झॅक्टली. घरच्यांबरोबर स्वतःला हि शिक्षा म्हणे; अगदिच लेम आर्ग्युमेंट. ब्लडि हिपक्रॅट. भाऊने या पॉइंटवर तिला झापायला हवं धक्क्यावर...

हो, मला तर अनुश्रीने काटा + टोळीचीही मतं घेतली असणार असं वाटतय.. प्रभुने आता राडा करायला हवाय खरं तर !
तसेही विशालशी भांडण झालं असलं तरी अनुश्री अजुनही रोशन, प्राजक्ता, सागर यांच्याशी गुड टर्म्स वरच आहे , सर्वात स्मार्ट गेम !

रुचिता आणि अनुश्री मधे प्राजक्ता रुचिताची साथ देईल असे वाटले होते. कारण रुचिता तिला सपोर्ट करते आहे सध्या.
रोशन लाही रुचिताच जास्त जवळची आहे. अर्थात आले बिबॉच्या मना तिथे कोणाचे चालेना Happy कदाचित त्यांनी ज्यांना सर्वात कमी कोलॅबरेशन्स तेच जिंकणार असला ट्विस्ट आणला असावा Lol

तापट खरच एव्हिक्ट झाला आहे का,सोमिवर मेडिकल रिझन्समुळे बाहेर गेला अस येत आहे.
आजतर ठणठणीत दिसत होता.
अजूनही अफवाच वाटत आहे.
रोशनच जाईल.

हिन्दी बिबॉ मधूनही किडनी स्टोन मुळे बाहेर गेला होता बापट , सोमि वर रोशन गेल्याचीही अफवा आहे आणि नवीन वाइल्ड कार्डची पण, कुठलीच न्युज कनफर्म्ड नाही जोवर ऑफिशिअल होत नाही !

अरे अनुश्री झाली म्हणे कॅप्टन!! ये कैसे हुआ ?! आता मला उत्सुकता लागलेली आहे Happy >>>>> प्रभु ला कमी मते मिळाली. अनुश्री आणि रुचिता ह्यान्ना सारखी मते मिळाल्यामुले त्यान्च्यात टाय झाला.. सो, बिबॉने त्या तिघान्ना आपपसात चर्चा करुन कॅप्टन ठरवायला सान्गितले. प्रभुला अनुश्रीला मत दयायच होत, त्याने तिच्याकडून वचन घेतल की ' तु मला नॉमिनेट करणार नाही आणि कॅप्टनसी टास्कमध्ये मला साथ देशील' अनुश्रीने हे मान्य केल आणि अश्या प्रकारे ती कॅप्टन झाली. त्याने राडा करायचा प्रश्नच उरला नाही.

राखीने केस बापट साठी नाही, बिबॉच्या प्रेक्षकांसाठी कापले, एन्टरटेन्मेन्ट साठी Proud
खरे केस नव्हते ते, विग आहे तो.
राखी आल्यापासून हहपुवा होतेय ऑलमोस्ट प्रत्येक एपिसोडला.

राखी खरंच फुल्ल धमाल करतेय. ते केस कापणे, केसासोबत अक्कल गेली, ते सावंत-बापट म्हणणे , अंडी फोडणे आणि नंतर मी साफ करणार नाही म्हणत केलेला नाच, सगळेच कहर होते. कुणी काही पंगे घेतले तरी ती नाही झेपायची कुणाला.
बिबॉचा काल मास्टरस्ट्रोक म्हणजे कपल डान्सेस करणार्‍यांनी २ वोट्स द्यायचे होते - पण दोघांनी एकालाच दोन्ही वोट अलाउड नव्हते!! म्हणजे रोशन आणि विशाल आले तर १ रुचिताला दिल्यवार दुसरे त्यांना कंपलसरी दुसर्‍या कुणा उमेदवाराला द्यावे लागत होते. थोडक्यात त्यांना अनुश्रीला कॅप्टन करायचे होते Happy

Pages