Submitted by दीपांजली on 14 January, 2026 - 14:02

बिग बॉस मराठी सिझन ६ सुरु झाला आहे.
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा !
स्पर्धक :
दीपाली सय्यद : ( अभिनेत्री/पॉलिटिक्स्ल बॅक्ग्राउंड)
सागर कारंडे : ( कॉमेडियन/ अॅक्टर)
सचिन कुमावत: (खान्देशी गायक)
सोनाली राऊत: (मॉडेल, एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट )
आयुष संजीव: (अॅक्टर )
तन्वी कोलते: (अभिनेत्री)
करण सोनावणे/फोकस्ड इन्डियन : इन्फ्लुएन्सर, कॉमेडियन, क्रिकेट प्लेयर्स/ क्रिकेट क्स्न्टेन्ट साठी फेमस.
प्रभू शेळके:रील स्टार
प्राजक्ता शुक्रे,: इन्डियन आयडॉल सिझन १
अनुश्री माने : मॉडेल्/अॅक्ट्रेस
रुचिता जामदार,: एम टि.व्ही रोडीज एक्स कॉन्टेस्टन्ट
राकेश बापट,: अॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
रोशन भजनकर: अमरावतीचा बॉडी बिल्डर
दिव्या शिंदे: युवा नेता
विशाल कोटियन : अॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
राधा मुंबईकरः लावणी +आयटेम डान्सर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बिबॉसचा गेम असाही खेळता येऊ
बिबॉसचा गेम असाही खेळता येऊ शकतो हे अनुश्री दाखवत आहे.गुडी बाई तिच्यामुळे थोड्यातरी नेहमीपेक्षा एकदम वेगळ्या वाटत आहेत.अनुश्रीला शेवटपर्यंत नेतील की नाही हे माहित नाही,पण जर नेक्स्ट सिझन आलाच तर तिला एखादातरी फॉलो करेल.असा गेम ती खेळत आहे.खरतर असाच माईंड,इमोशनल,कधी अँग्रेसिव्ह गेम आहे बिबॉसचा. पण इथे ते नाही अपील होणार.
तन्वी कधी खूप छान वाटते पण कधी आपण परत निगेटिव्ह दिसू या भीतीने कदाचित ओपनली खेळत नाही ,अस वाटत.
तिला टोळीचे काही मुद्दे पटतात,पण काट्यांपुढे बोलत नाही.राकेश आणि दिपालीला तर काहीच बोलत नाही.
काल रुचिता आणि अनुश्रीमधला संवाद पण मस्त होता.रुचिताला माहित आहे अनुश्रीचा गेम आणि अनुश्रीलाही रुचिता कच्ची खिलाडी नाही हे माहित असूनही,दोघींमधला संवाद मस्त वाटला.
विशाल आणि अनुश्री राखीलापण मस्त हँडल करतात.या दोघांमुळेच गुडीबाई फ्रंटला आल्या आहेत.
राकेशचे लाड फार झाले.काढा त्याला .काहीच उपयोग नाही त्याचा.
मला दीपाली वर्स्ट कंटेस्टंट वाटते.तिलाही काढायला हव.
या विकमध्ये सचिन किंवा रोशन जाईल.प्रभूपण जाऊ शकतो.
स्मिताच्या सगळ्या मुद्द्यांना
स्मिताच्या सगळ्या मुद्द्यांना अनुमोदन..पण सगळ्या टोळीला बाहेर काढून अनुश्री राहील असं मला नाही वाटत..ती गेम चांगला खेळतेय पण तळ्यात मळ्यात करतेय ते नाही आवडत..अशीच खेळत राहिली तर तिच्याकडून कोणीच राहणार नाही आणि मग रुचिता बोलली तशी लांडगा आला रे आला situation होईल...दम असेल तर टोळी सोडावी तिने..ते जास्त चांगलं राहील तिच्यासाठी
हा धागा आला कि महत्प्रयासाने
हा धागा आला कि महत्प्रयासाने स्वतःला आवरावं लागतं. काही वेळा लिहून खोडून टाकलं.
बकवास कन्सेप्ट, बकवास खेळ आणि बकवास शो. सबकुछ स्क्रीप्टेड. यातले काही वाद ठरवून केलेले. ज्यांना पब्लिसिटीची हांव आहे ते करतात.
सलमान खानसारखा फूटपाथवीर लोकांना कुठे कसे वागावे याबद्दल लेक्चर देतो हे मात्र डोळ्यात पाणी आणणारं असतं.
राखी ने केसांचं नेमकं केलंय
राखी ने केसांचं नेमकं केलंय काय ? रंग सोडल्यास मला टेक्श्चर खूप आवडले. तिने हेअर एक्सटेन्शन्स केली असावीत असं वाटतं . देव जाणे मॅनेज कशी करते .
अंगावर पीठ फेकुनही गुडी बाई
अंगावर पीठ फेकुनही गुडी बाई थंड्च होत्या काल. इतकं संत कोण असतं ?.. एक नैसर्गिक प्रतिक्रीया अशी असते की माणुस पटकन जागचा तरी उठेल.. ही शांतपणे तिथेच बसुन.. यालापण फेकच वागणं म्हणतात...>>>राखीने तिला सांगून ,विचारूनच केलं सगळं त्यामुळे ती शांत होती.. पण नंतर स्वतःच सगळ्यांना सांगत होती, राखीने सांगून केलं म्हणून..
राखीचा तो आख्खा विग आहे असे
राखीचा तो आख्खा विग आहे असे दिसते. ते केसच नाहीत ,सिन्थेटिक वाटते मटेरियल
पण त्यांना कुणी सिरियसली घेत नाही, तसे तन्वीचे दिसते !!
तिचे तसेच आहे. एकदम कम्प्लीट वेगळे अवतार असतात सतत.
तन्वीचे बोलायचे तर ती फेक आहे, अॅक्टिंग करत आहे ते उघड दिसते सतत. त्यामुळे ते चांगले वागणे ही जास्त क्रिन्ज होते.
उदाहरण द्यायचे तर - अॅडल्ट्स कामावर जातात, स्वयपाक करतात , जेवतात इ. इ मग इयत्ता पहिलीतली मुले ही ते पाहून घर घर खेळतात, दाण्याचे लाडू बनवतात खोटे खोटे कामावर जातात
तन्वी आणि मेघा मधे जमिन
तन्वी आणि मेघा मधे जमिन आसमानाचा फरक आहे !
मेघा हुषार होती, ती स्ट्रॅटजीज करायची, तन्वी पेपर लिक झाल्यावर २१ अपेक्षित पाठ करून गेलेल्या मठ्ठ विद्यार्थ्यानेही उत्तरं द्यावीत अशी आहे, नुसतीच बडबड, डोकं च्गालवणे कधीही नाही.
मेघाचे बॉन्ड्स ऑरगॅनिक होते, तन्वीने जबरदस्तीने टोळी विरुद्ध गृप हवा म्हणून केलेत, त्यातल्या एकाशीही मैत्री दिसत नाही.
मेघा अॅक्टिव्ह होती , एन्टरटेनिंग होती, कधीच मी काम करणार नाही सूर लावला नाही.. टास्क्स संपल्यावर ती खुन्नस विसरून नॉर्मल वागायची सगळ्यांशी, प्रॉपर जेवायला घालायची त्यामुळे दुश्मन गँगलाही थोडा सॉफ्ट कॉर्नर होता तिच्या बद्दल.
तन्वी घराच्या आत कोणालाही आवडत नाही, अॅक्टिव्हनेस आणि एन्टरटेन्मेन्ट शून्य !
विशाल- रुचीता फेक लव्ह अ
विशाल- रुचीता फेक लव्ह अॅन्गल फार क्रिन्ज वाटतोय.. ती२२ , तो ऑलमोस्ट ४८ आहे.बिगबॉस पण एन्करेज करत आहेत त्यांना.
बिबॉ सिझन १६ ला मधे सेम अशीच सिच्युएशन आली होती तेंव्हा हिन्दी बिबीने अॅक्शन घेतली होती.
१९ वर्षाची सुम्बुल , चाळीशीचा शालीन क्रिन्ज लव्हस्टोरी सुरु झाली होती तेंव्हा सुम्बुलच्या वडिलांना बोलावून तिला समज द्यायला लावली होती बिबॉने , तिच्या वडिलांनी तिला शालीनचा हात सोडून शिवच्या गृपमधे जायला सांगितले होते.
इथे तसेच रुचीताच्या पालकांना बोलवून तिला समज द्यायला सांगतील का ?
रुचिताला विशाल अटेन्शन देतो
रुचिताला विशाल अटेन्शन देतो ते आवडतंय. नुकत्याच एका एपिसोडमध्ये तिने पर्पल साडी नेसली होती, ओट्याजवळ सगळे उभे राहून काहीतरी बोलत होते , विशाल ने वेळात वेळ काढून तिला म्हटलं छान दिसतेयस. मुलींच्या मनात जागा कशी मिळवायची ते त्याला बरोबर कळतं .
विशाल- रुचीता फेक लव्ह अ
विशाल- रुचीता फेक लव्ह अॅन्गल फार क्रिन्ज वाटतोय..>>++111
रूचिता सिरियस वाटतेय..लाजते काय, हसते काय..अजिबात छान नाही वाटत..विशाल तर निव्वळ टाईमपास करतोय..दिपाली काल बोलली पण त्याच्याबद्दल..
कोलते बाईंनी परफेक्ट कॅरॅक्टर
कोलते बाईंनी परफेक्ट कॅरॅक्टर पकडले आहे. कॅप्टन झाल्यावर साडी वैगेरे नेसून अगदी हिंदी बिग बॉसमधील तान्या मित्तलसारखं. मागच्या सिजनला निक्किने कसं त्या छोट्या पुढारीला गुंडाळून ठेवलं होतं तसं प्रभूला तीने गुंडाळून ठेवलं आहे. निक्की कधी त्या सूरजला उलटं नाही बोलायची कारण तीला माहिती होतं सूरजला बाहेर खूप सिंपथी आहे. इथं कोलते बाई रोशनला कधी उलटं बोलत नाही बहुदा त्याच कारणासाठी. घरातले बाकी स्पर्धकही तेच म्हणतात की तीने एक कॅरेक्टर पकडले आहे दुसऱ्या आठवड्यापासून.
कोलते बाईंनी परफेक्ट कॅरॅक्टर
कोलते बाईंनी परफेक्ट कॅरॅक्टर पकडले आहे.>>असं दिवसेंदिवस कोण character पकडून राहू शकत...एखाद दोन दिवस ठीक आहे पण इतके दिवस?
काल प्रभूने केलेली
काल प्रभूने केलेली किल्ल्यांची चोरी सोडली तर फारस काहीच नव्हत.राखीने तन्वी आणि प्रभू मध्ये लावलेली आग पेटलीच नाही.शेवटी इमोशनल एंड करताना सुध्दा अनुश्रीच्या निर्लज्ज पणामुळे तो भागही बर्यापैकी आटोपता घेतला.
राकेश आणि प्राजक्ताच दाखवलच नाही बहुतेक .
या विकमध्ये सचिन किंवा रोशनपैकी एक बाहेर जाईल.
अँक्ट राइडरवाल्या मंदारच्या वोटिंग ट्रेंडप्रमाणे गेल्या वीकमध्ये करण पहिला असूनही बाहेर गेला.
या वीकमध्ये रोशन पहिला आणि सचिन तिसरा आहे.
राकेश दुसरा ,अनुश्री चवथी,दिपाली पाचवी आहे.
शेवटी प्राजक्ता आहे.तिच्याआधी रुचिता आहे.
रुचिताला अजिबात वोटिंग होत नाही.
बघू कोणाला काढतात ते.
अँक्टराईडरप्रमाणे हिंदीमध्ये जसा ट्रेंड असतो तस काढतात.तस असेल तर मग रुचिता किंवा प्राजक्तापैकी जाईल.
राखीला पण काढल तरी चालेल.तिचे सगळे खेळ खेळून झालेले आहेत.
काल विशालने त्याच्या आईशी
काल विशालने त्याच्या आईशी बोलताना त्याच्या मुलीचा उल्लेख केला. ह्याला मुलगी आहे? हा मॅरीड आहे की डिव्होर्सी?
काल प्रभूने केलेली किल्ल्यांची चोरी सोडली तर फारस काहीच नव्हत. >>> अगदी अगदी. त्या किल्ल्यान्वरुन नन्तर काहीच झाल नाही.
नाही त्याला मुलगी नाही पण तो
नाही त्याला मुलगी नाही पण तो आईला उद्देशून म्हणत होता की माझे लग्न होईल तेव्हा मला मुलगी व्हावी आणि तू माझ्या घरात जन्माला यावंस. त्याचे मराठी भयंकर असल्यामुळे ते नीट बोलता आलं नाही.
लोक तो टास्क चालू असताना सारखे बाथरूम मधे जात येत होते असे दाखवले. एक तर हसू येत असल्यामुळे असेल नाहीतर मग माझी अशी थिअरी आहे की डोळ्यात ग्लिसरीन घालायला जात असावेत 
मला हे असले फोन टास्क नाही आवडत. लोक उकरून उकरून इमोशनल ड्रामा करतात असेच वाटते, त्या दृष्टीने अनुश्रीला हसू येत होतं ते फार चुकीचे वाटलं नाही.
प्रभूने किल्ली चोरली ते बरेच केले पण बिबॉ च्या मनावर आहे त्याला त्याचा किती उपयोग करू द्यायचा ते.
नाही त्याला मुलगी नाही पण तो
नाही त्याला मुलगी नाही पण तो आईला उद्देशून म्हणत होता की माझे लग्न होईल तेव्हा मला मुलगी व्हावी आणि तू माझ्या घरात जन्माला यावंस. त्याचे मराठी भयंकर असल्यामुळे ते नीट बोलता आलं नाही. >>>>>> धन्स मैत्रेयी.
मला हे असले फोन टास्क नाही
मला हे असले फोन टास्क नाही आवडत. लोक उकरून उकरून इमोशनल ड्रामा करतात असेच वाटते, त्या दृष्टीने अनुश्रीला हसू येत होतं ते फार चुकीचे वाटलं नाही. >>मला पण नाही आवडत...मी ते सरळ forward केलं..
राखीचे रिअल लाइफ अवघड आहे, ती
राखीचे रिअल लाइफ अवघड आहे, ती लोनली आहे वगैरे खरं असलं तरी ज्या प्रकारे अचानक तिने जोरात रडायला सुरवात केली , हसु येऊच शकतं, त्यात नंतर तिची एक आयलॅश गालावर ओघळली , खरच हसु आवरता आलं नसेल अनुश्रीला
सागर एक अति शहाणा , रुचीताचं फुटेज घ्यायला आत घुसला, त्याचं ते सतीश तारेंशी बोलणही वियर्डच वाटलं , काहीही असंबद्ध बोलत होता.
तन्वीचा फेकनेस तर खरच बघवत नाही, तिचा आणि दीपालीचा फोनकॉल मी फॉरवर्डच केला, अनबिअरेबल आहे तन्वी, खोटारडी आणि डबल स्टँडर्ड्स मधे नं १ !
या वेळची फिक्स्ड विनर तन्वी असल्याचे बोलले जातय आणि दिसतयही.. बिबॉ प्लिज या वर्षीची ट्रॉफी राखीला द्या , she deserves it after entertaining so many seasons !
खरा गेम घरात फक्त विशाल आणि
खरा गेम घरात फक्त विशाल आणि अनुश्रीच खेळत आहेत.त्यांच्यामुळे इतरांना संधी मिळत आहे.
विशाल निगेटिव्ह असो किंवा अनुश्री पलटीमास्टर असो.पण त्यांच्यामुळे गेम होत आहे.
पण मराठी बिबॉस मध्ये अशा गेमला निगेटिव्ह किंवा गद्दार अशा काट्यांवर बादच ठरवतात..त्यामुळे अनुश्री आणि विशालला कितीही जीव तोडून त्यांनी प्रयत्न केले तरी विनर म्हणून बिबॉस कधीच बघणार नाही.
पण तरीही त्या दोघांनीही कुठल्याही दबावाल बळी न पडता आपला गेम खेळायला हवा.
राकेश बापट कुठला गेम खेळत आहे,त्याला कशाची काहीई पडलेली नाही.त्या काटा ग्रुपशी पण फार अँटँचमेंट आहे अस वाटत नाही.तरी का ठेवत आहेत त्याला.
तन्वी मला फेक पेक्षा इनसिक्युअर वाटत आहे.आपण अस बोललो तर,अस वागलो तर निगेटिव्ह दिसू आणि विनर होणार नाही हे कुठेतरी बँक ऑफ द माईंड असाव,म्हणून ओपनली खेळत नाही आणि फेक आहे अस वाटत.
रुचिताकडे लक्ष न देता,तोंडावर कंट्रोल ठेवून जर ओपनली खेळली तर टॉप टू मध्ये नक्की जाईल.तसही बिबॉस तिला सध्या तरी फेवर करत आहे.
रुचिताने स्वतःचा गेम स्वतःच घालवला आहे.नुसता आरडाओरडा ,भांडण बास ,बाकी काहीच नाही.
बिबॉसला टोळी फोडायची आहे आणि रोशनला बाहेर काढायच असाव कारण त्याला वोटिंग प्रचंड होत आहे,का माहित नाही.त्याचे फॉलोअर्स कुठून आले एवढे?
रोशन टोळीतून फुटला ,तर त्यालाच घेऊन जातील पुढे.
सचिन,सागर,दीपाली,प्रभू हे जातील ,राकेशही जायला पाहिजे.
गुडी बाई हळूहळू पुढे येत आहेत .
राखीला काटा गँगबरोबर राहायच अस सांगून पाठवलेल असाव.
दुसर्या आठवड्यात पण राखी नॉमिनेशन मध्ये नव्हती,राणी असल्याने. म्हणजे ती गेस्ट असावी.
आणखी एक वाईल्ड कार्ड येत आहे अशी चर्चा आहे.निक्कीला पण आणू शकतात,राखी आहे तर.
>>मला हे असले फोन टास्क नाही
>>मला हे असले फोन टास्क नाही आवडत. <<
माझ्यामते हा टास्क एक ट्रमेंडस अपॉर्च्युनिटी आहे - तुमच्या फॅनबेस आणि इतर प्रेक्षकांबरोबर कनेक्ट करण्या बाबत.
लक्षात घ्या, बिगबॉस इज ए माइंड गेम इन्वॉल्विंग सायक्लाजिकल टॅक्टिक्स लाइक - गॅसलायटिंग, गिल्ट-ट्रिपिंग, ब्रेडक्रंबिंग, अँड लास्ट बट नॉट द लीस्ट.. प्रोजेक्टिंग.
हे गमक एकदा समजलं, देन यु विल स्टार्ट एंजॉइंग द शो मोर...
भाऊच्या धक्क्याला आता लोक
भाऊच्या धक्क्याला आता लोक हळदीकुंकु समारंभ म्हणत आहेत

आज उगीच सचिन राखी इश्यु वर इतका वेळ घालवला, ठरवून केले होते, इतके काही इम्पॉर्टन्ट नव्हते.
अख्या काटा गॅन्गचं कौतुक करायची गरज नव्हती, राकेश- दीपाली काहीही करत नाहीत !
प्रभुला आज अॅप्रिशिएट केले इतकच काय तो चांगला पार्ट होता.
तन्वी लगेच तिच्या अनॉयिंग नेजल आवाजात "बघितलस ताईबरिबर रहायच ,कोणी काही म्हणो".
आज तिने कपडे पण काय असे घातले होते , डोक्यावर ओढणी आणि वरून मोठ्या पिना
तन्वी- अनुश्रीची स्तुति झाल्यावर विशाल-रुचीताचे चेहरे बघण्यासारखे झाले होते !
उद्याच्या चुगलीने होती नव्हती ती टोळी तुटणार असे दिसत आहे, कशाला फोडतात टोळी आणि सगळ्यांचा गेम इतक्या लवकर ? अजुन ऑलमोस्ट २ महिने बाकी आहेत शो चे !
विशाल रुचीता विरुद्ध अख्खं घर झालं तर सिम्पथी त्यांनाच मिळेल !
काय दिव्य धक्का होता.. फारच
काय दिव्य धक्का होता.. फारच बोअर झालं....
पिठावर सगळा धक्का काढला...
विशाल आणि रुचिता मधली अक्षेपार्ह चर्चा विसरले, अनुश्री आणि प्राजक्ता हसल्या त्यावरही काही नाही बोलले...ते तर त्यात प्राजक्ता असल्याने मुद्दाम इग्नोअर केले असं वाटलं.. तिची इमेज फार जपतायत बिबॉ स्वत: पण.. प्राजक्ता ऐवजी रुचिता असती तरी त्यांना असंवेदनशील वगैरे ठरवलं असतं..
काल पण एकुण बोअर च झालं.. राखी डॉकटर बोअर झाली...
बंद करा आता हा शो.. बराच भाग पळवत बघितला जातो..
भाऊंचा धक्का फार बोअर होत
भाऊंचा धक्का फार बोअर होत चालला आहे आजकाल .
काल चा भाग प्रभुमुळे चालला..
काल चा भाग प्रभुमुळे चालला..
पुर्ण वेळ चावी प्रकरण च चालु होतं... प्रभु ने स्वतः च्या मनाने चावी चोरली की तन्वी ने सांगितलं ते कळलं नाही.
प्रभु चोर आहे कळल्यावर त्याला प्राजक्ता, सागर वगैरे सगळे नॉमिनेट करणार म्हणायला लागले.. तेव्हा बिबॉ ने चावी च्या पॉवर ने त्याला सेफ च करुन टाकलं :-)...
या सिझन मधे चोरी हा सगळ्यात हुकमी आणि आवडता टास्क झाला आहे. घरात इतके ( प्राजक्ताच्या भाषेत ) क्लासलेस लोक असताना तिने ती चावी सामानात ठेवलीच कशी. कोणीही घेउ शकतेच. स्वतः जवळ २४ तास ठेवायला काय अवघड आहे का खरच ? त्यांच्याकडे २४ तास माईक असतो त्याची एक छोटी पाउच/बॅग आहे त्यात किंवा एखाद्या चेन मधे अडकवुन स्वतःजवळ ठेवता आली असती.
काल बिबॉ ने राखी ला पण टास्क च्या नावावर टी-शर्ट ची चोरी करायला सांगितलीच की...
दिपाली ने सामान चेक करु देणार नाही म्हणुन फुटेज खाल्लं आणि अनुश्री ने पण त्या भांडणात घुसुन स्वत: दिसु याची काळजी घेतली.
प्रभुने मजा आणली आज,
प्रभुने मजा आणली आज, आयुर्वेदिक प्राजक्तानी तिचं फ्र्स्ट्रेशन काढायला सुरवात केली

आता प्राजक्ताच गेली पाहिजे घराबाहेर !
मला विशाल आणि अनुश्री नंतर आता प्रभुचाच गेम स्ट्राँग वाटतोय , प्राजक्ता प्रत्येक आठवड्यात त्याला नॉमिनेट करतेय, त्याने बरोबरच केले चावी पळवून , कोणाला घाबरला नाही
स्मिता मला पण वाटलं की तिने
स्मिता मला पण वाटलं की तिने किल्ली त्या माईकच्या पाऊच मध्ये ठेवायला काहीच हरकत नव्हती, किंवा सरळ एखादा दोरा बघून गळ्यात बांधून घ्यायची. आता ती घराबाहेर गेली पाहिजे असं वाटतंय.
प्रभू ने खरंच मज्जा आणली काल. मला जाम आवडतो तो. चोरी ही कृत्य वाईटच आहे पण तो इतका गोड आहे की त्याची चोरी ही व्यर्थ वाटत नाही. काही गोड आणि सालस लोकानी शिवी दिली तरी ती शिवी वाटत नाही तसं.
अनूश्री चा डाव नेमका आहे तरी काय ??
बहुधा तिने विशाल ची गॅंग सोडण्याचं नक्की केलं असावं.
काल बिबॉसचा गेमच कळला नाही
काल बिबॉसचा गेमच कळला नाही.प्रभूला वाचवयच होत नॉमिनेशन पासून वगैरे नाटक कशाला,तसही बिबॉसला ज्याला ठेवायच आहे त्यालाच ठेवणार आणि ज्याला बाहेर काढायचय त्यालाच काढणार.प्रभू बरोबर अनुश्री लापण नॉमिनेशन पासून इम्युनिटी देऊन सेव्ह केल पण या सगळ्यात तीन लोक नॉमिनेशन पासून सेफ झाले.राखी तशीही सेफच आहे.त्यापेक्षा प्रभूला कँप्टन्सीची उमेदवारी देऊन कँप्टनही केले असते तर जास्त मजा आली असती.
या वीकमध्ये जर प्राजक्ताला काढायच असेल आणि ती झाली नॉमिनेट तर ठीक,पण समजा काढायच नसेल आणि नॉमिनेट झाली तर मग काय वोटिंग लाईन्स बंद ठेवणार का?
प्राजक्ता इतकी मूर्ख आहे,प्रभूने चावी कँप्टनरुममध्ये लपवली होती हे त्याच्याकडून वदवून घेऊन, तिथे इतर सदस्यांनी जायचच नसत म्हणून मी तिथे शोधलीच नाही ,हाच मेन मुद्दा बनवून तन्वीला आणि त्याला टार्गेट करण्यासाठी केवढा चान्स होता ,पण कुणाच्याच लक्षात आल नाही,एरवी फालतू मुद्द्यावरून भांडण करत असतात,हा मुद्दा विसरले,निदान प्रयत्न तर करायचा.पण नको त्या मुद्दयावरून भांडण करत बसले.
प्रभू ने खरंच मज्जा आणली काल.
प्रभू ने खरंच मज्जा आणली काल. मला जाम आवडतो तो. चोरी ही कृत्य वाईटच आहे पण तो इतका गोड आहे की त्याची चोरी ही व्यर्थ वाटत नाही. काही गोड आणि सालस लोकानी शिवी दिली तरी ती शिवी वाटत नाही तसं. >> फार गोड वगैरे वाटत नसला तरी सागर, प्राजक्ता, राबा अशा स्वतः ला फार उच्च समजणार्या आणि चांगुलपणाचा मुखवटा घेउन फिरणार्या लोकांपेक्षा मला तो आवडला. सागर तर अगदीच आता मनातुन उतरलाय. धक्क्यावर जे काही माना डोलावत गुळमुळीत बोलतो ते अजिबात आवडत नाही.प्राजक्ता सज्जन असल्याचं दाखवते, मी अशी नाही, मला असं वागता येत नाही वगैरे बोलते पण त्यात दम नाही. इमेज जपायचा प्रयत्न कळतो. राबा टॉप ५ मधे जायची गॅरंटी घेउन आलाय त्यामुळे निवांत आहे असं वाटतं.
आता या आठवड्यात प्राजक्ता किंवा रोशन उडणार हे नक्की. कोणालाच घालवायचं नसेल तर राखी ला काढतील.
प्राजक्ता उडाली पाहिजे या
प्राजक्ता उडाली पाहिजे या धक्क्याला. फारच बोअर करायला लागली आहे.
मी बिगबॉस बघत नसलो तरी ह्या
मी बिगबॉस बघत नसलो तरी ह्या धाग्याहून वा सोशल मिडीयाहून अपडेट्स घेत असतो. वर्गात शिकवतांना काही मुले उगीचच पुढे पुढे करत असतात, ज्यांना खरं तर काहीही माहीत नसते. तसेच वर्गात एखादा थोराड विद्यार्थी असतो. जिकडेतिकडे उगीचच शहाणपणा दाखवत असतो. स्वतःचेच म्हणणे खरे करण्याचा प्रयत्न करत असतो. ज्ञान पाजळत असतो (मला वर्गात शिकवतांना असे अनेक विद्यार्थी भेटतात). मला सागर कारंडे तसा वाटतो. त्याला वाटतय की चला हवा येवू द्या मुळे खूप लोकप्रिय आहे. प्रत्यक्षात दाखवत नसला तरी इतरांना तुच्छ लेखत असतो.
Pages