चित्रपट कसा वाटला १२

Submitted by धनि on 4 August, 2025 - 10:36

२००० झाले पण Lol

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/86233?page=66#new

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राहवलं नाही आणि अचूक धागा सापडत नाही म्हणून इथे..

नूतनची दोन गाणी लागोपाठ पाहिली. पेईंग गेस्टचं आणि दिल्ली का ठगचं एक. ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट मधे नूतन काय सुंदर दिसलीय.
आधी कधी लक्षात आलं नाही हे. खूपच आखीव रेखीव चेहरा आहे. आई पेक्षाही सुंदर.

माझेमन, 120 बहादूर डिटेलिंग आवडलं. मला बघायला जमणार नाहीये त्यामुळे वाचलं सर्व.

मेजर शैतानसिंग यांच्यावर मुवि येणार आहे, माहिती होतं दोन वर्षे, त्यांचा एक नातू भावाचा मित्र आहे, त्याचे नाना आहेत ते, दरवर्षी येतो गणपतीत आमच्याकडे.

१२० बहादूर ट्रेलर छान वाटलेला.
अशाप्रकारे मृत्यू निश्चित आहे हे माहीत असताना लढणे हा विचारच अंगावर शहारा आणतो.
चित्रपट आता ओटीटी वर बघेन. परीक्षणाबद्दल धन्यवाद.

रानभूली ज्वालापूर हे हरिद्वार जिल्ह्यातील एक मोठे गाव आहे. उत्तराखंड मधील सर्वात जास्त औद्योगिक विकास तिथेच आहे.
मी iit रुरकी मध्ये चार वर्षे राहिल्याने प्रत्यक्ष पहिला आहे तो भाग.

सलीम सुलेमान यांनी दबंग टाईप्स चित्रपटावरच लक्ष द्यावं
>>
दबंग वाले साजिद वाजिद (आता फक्त साजिद)
सलीम सुलेमान म्हणजे काल, चक दे, रब ने बना दी जोडी, कुर्बान वगैरे अन् असंख्य सिनेमांसाठी बॅकग्राऊंड म्युझिक देणारे...

जॉली 3 हा फॅमिली मॅन 3च्याच लाइन वर गेलाय.
फा नी तिथे आठवण काढलेल्या जाहिरातीप्रमाणे या डायरेक्टर्स ना सांगायला हवं... एक किंवा दोन, बस्स...
(मुन्नाभाई 3 आला नाही हेच बरं आहे)

जॉली ३ चा विषय मला खूप आवडला. काल पुन्हा थोडा वेळ पाहिला. पुन्हा आवडला.
याच पद्धतीने जमिनी घशात घातल्या जातात. चांगल्या विषयाला अ‍ॅड्रेस केलंय. मेन स्ट्रीम सिनेमाकडून हा सुखद धक्का वाटला.
नुकतेच गाजलेले दोन लँड स्कॅम्स, लवासा च्या वेळचे गैरप्रकार आणि ते झाकण्यासाठी हायर केलेले काही पत्रकार.

मूठभर लोकांकडे आलेला पैसा त्यांची भूक काही भागत नाही. जंगलतोड करून नागपूरच्या जवळ प्रोजेक्ट्स आले. त्यामुळं बिबटे नागपूरच्या जवळ भांडेवाडीमधे लोकवस्तीत आले आहेत. पुण्याजवळ जंगल भागात प्लॉटींग चालू आहे. आता सिंहगडाजवळ नागरी आणि काल औंध मधे वस्तीत बिबटे दिसले. फक्त गरीब श्रीमंत एव्हढाच विषय नाही हा.

मर्डर ॲट द एम्बसी ठीक ठाक आहे.
टिपिकल मर्डर मिस्ट्री. पण नाईव्ह्ज आऊट ची सर नाही. पण त्या विद्या बालन / करीना कपूर वाल्या सिनेमांइतका ही वाईट नाही

नुतन खुप तरुण होती तेव्हा खुपच सुंदर दिसायची. आणि अभिनयातही उजवी होती. तनुजा खुप चुलबुली होती, तिला तशाच भुमिका जास्त करुन मिळाल्या. त्यांच्या आईनेही तिचा काळ गाजवला. नुतन दिसायला आईवर गेली होती. शिरिष कणेकरांच्या शब्दात सगळ्या सिकेपी मुली दिसायला सुंदर होत्या Happy Happy

पुण्याजवळ जंगल भागात प्लॉटींग चालू आहे. >>>> आणि ते विकत घेणारे सर्वसामान्य लोकही आहेत. तेही घेतात उड्या मारुन.

जॉली १ खुप आवडलेला. २ बघितला नाही. ३ बघते वेळ मिळाला तर. मर्डर मिस्टरिज बघणे जास्त आवडते Happy मर्डर अ‍ॅट एम्बसी नेफ्लिवर असेल तर बघेन.

शैतान सिंगबद्दल वाचलेय. मला वाटते कारगीलच्या आर्मी म्युझियममध्ये त्यांचे एक दालन आहे. तेव्हाच पहिल्यांदा नाव ऐकले होते. चित्रपटाविषयी फार उत्सुकता वाटत नाही. आपल्याकडे विषय काहीही असला तरी चित्रपटाचा फोकस भलतीकडेच जातो. उगीच अर्धवट काहीतरी बघण्यापेक्षा
न बघितलेले बरे.

नूतन तनुजा वर्णन अगदी बरोबर, साधना. तनुजा अल्लड, अवखळ यामुळे मला ती जास्त आवडायची. स्माईल दोघींचं क्युट.

शिरीष कणेकर म्हणतात ते बरोबर वाटतं, सीकेपी मुली सुरेख दिसतात.

आणि ते विकत घेणारे सर्वसामान्य लोकही आहेत. तेही घेतात उड्या मारुन. >> +१

नेफ्लिवर होमबाऊंड नावाचा खुप सुंदर सिनेमा पाहिला. गरिबी, जातीयवाद, आरक्षण, नोकरीचे प्रश्न यात भरडल्या जाणार्‍या दोन जिवलग मित्रांची कहाणी!
ईशान खट्टर आणि बाकी सगळ्ञांची कामं फार मस्त आणि नॅचरल आहेत. ईशान स्पेशली फार मॅचुअर अ‍ॅक्टर आहे.

जॉली 3 हा फॅमिली मॅन 3च्याच लाइन वर गेलाय.
<<<<<

जॉली ३ मला चांगला वाटला. मी दोन वेळा म्हणजे घरचे इतर बघत असताना पुन्हा पाहिला.

अश्या सिक्वेलमध्ये आपण तिसऱ्या भागाची तुलना पहिल्या भागांशी करतो. त्यातून निर्माण झालेल्या अपेक्षा पूर्ण होतात का बघतो. ते न करता स्वतंत्र चित्रपट म्हणून सध्याच्या इतर चित्रपटांशी तुलना करा. कदाचित उजवा वाटेल Happy

हो साधना बघ नक्की! विषय नवीन नाही तरी पण बघत राहावासा वाटला. मसान शी थोडाफार सिमिलर आहे. तोच डायरेक्टर आहे बहुधा.

नेफ्लिवर होमबाऊंड नावाचा खुप सुंदर सिनेमा पाहिला. गरिबी, जातीयवाद, आरक्षण, नोकरीचे प्रश्न यात भरडल्या जाणार्‍या दोन जिवलग मित्रांची कहाणी!
>>>>

काल घरी लावलेला असताना अगदी थोडाच पाहिला. पण जेवढा पाहिला तेव्हढा आवडला. आधी कायपोचे आठवला, मग जातीयवाद दिसला.
नुकतेच आमच्याकडे धडक २ आणि सैराट बघून झाल्याने आणि आमचेही आंजा लग्न असल्याने लेकीला अचानक या विषयात कुतूहल निर्माण झालेय. तिनेच लावला होता. लवकरच बघेन पूर्ण.

मुन्नाभाई 3 आला नाही हेच बरं आहे
>>> 'मुन्नाभाई चले अमेरिका' नावाने तिसर्‍या भागाची घोषणा झाली होती. दरम्यान संजय दत्तला पुन्हा अटक की पुन्हा शिक्षा झाली. 'आता या तिसर्‍या भागाचं भवितव्य अंधारात' असा पेज-३ मथळा वाचल्याचं आठवतंय.

मी त्रिदेव, विश्वात्मा, घायल, घातक, अर्जुन, बेताब थेटर मधे जाऊन पाहिले होते. मजा आली.
राम अवतार थेटरात बघितला होता. अजिबात नाही आवडला. डर पण नाही आवडला
डकैत आणि यतीम व्हीसीआर आणून बघितला होता. दोन्ही आवडले.
सलाखे आणि तसलाच एक घरात पाहीला. फार व्हायलन्स होता. जोशीले पण बकवास होता.

परवा डर कुठेतरी लागला होता म्हणून परत पाहिला.त्या काळी पहिल्यांदा पाहिला तेव्हा खूप आवडला होता. पण आता अजिबात म्हणजे अजिबातच नाही आवडला. गाणी बरी आहेत पण शाहरूखचं खूप overacting वाटलं, ही निगेटिव्ह शेड त्याने बाजीगर आणि अंजाममधे जास्त चांगली दाखवली होती. सनीला आपली ताकद दाखवण्यापलिकडे फारसं काम नाही. जुही एरवी आवडते पण यात किरण फारच helpless damsel in distress वाटली. काही झालं की रडतरडत सनीला बिलगायचं, कधीही स्वतः खमकेपणे काही करायचं नाही. नाही आवडली तिची व्यक्तिरेखा. शेवटीशेवटी तर कंटाळा आला, कधी एकदा सिनेमा संपतोय असं झालं.

डर मी सुद्धा लहानपणानंतर पाहिला नाहीये. योगायोगाने गेल्या आठवड्यातच शाहरुख मूवी सर्च करताना लेकीला सापडला होता. बघणार सुद्धा होती. पण मी सहज म्हटले की यात तो व्हिलन आहे तसे लगेच त्यावर फुल्ली मारून टाकली. मी सुद्धा तिचे मन बदलायचा विचार केला नाही. कारण आताची त्याची स्टार इमेज आणि क्रेझ पाहता तो पिक्चर या जनरेशनने न बघितलेलाच बरा. उगाच चुकीचा प्रभाव पडायचा.

आणि हो, आता ते ओवर सुद्धा वाटू शकतेच. तेव्हा मात्र हवा झालेली त्याच्या सायकीक सीनची.

सनी देओल आजही त्या चित्रपटाबद्दल मनात राग धरून आहे की चोप्रा यांनी त्याचा गेम केला आणि शाहरुखला फूटेज दिले. पण शेवटी तो धंदा आहे. जे मार्केटमध्ये चालेल असे त्यांना वाटणार तेच ते प्रमोट करणार

दबंग वाले साजिद वाजिद
>>>> ओके. १२० बहाद्दूरला सलीम सुलेमान यांचे संगीत आहे. आणि ते त्यांना अजिबात झेपलेले नाही एवढंच म्हणायचं होते.

बाजीगरमधेही ओव्हरअ‍ॅक्टिंगच होती शाखाची. डर पाहिल्यानंतर सनीचा दणकेबाज रोलच जास्त लक्षात राहतो. नंतरचा शाखा वेगळा. पोस्ट-डीडीएलजे.

होमबाउण्ड ऑल्मोस्ट शेवटपर्यंत एंगेजिंग आहे. मला शेवट मात्र आवडला नाही. दोन्ही लीड कॅरेक्टर्स लगेच आपल्याला इंटरेस्ट निर्माण करतात त्यांच्या कथेत. इशान खट्टर व चंदनचे काम केलेला विशाल जेठवा - दोघांची कामे मस्त आहेत. जाह्नवी कपूरचेही चांगले आहे पण तिचा रोल तुलनेने लहान आहे. या दोघांचे आईवडील व चंदनची बहीण - हे लोक अगदी अस्सल वाटतात. मी जेथे वाढलो तेथे असे लोक आजूबाजूला पाहिले आहेत. त्यामुळे ते वातावरण अगदी परिचित वाटले. खेडेगाव व शहर हा भेद सोडून.

जातीचा अँगल मात्र फारच सुलभीकरण केलेला वाटला. प्रत्यक्षात जातीभेद आहे, मुस्लिम द्वेष वाढला आहे हे माहीत आहे, आणि उत्तरेत तो अगदी उघडपणे चालतो हे ही माहीत आहे. पण जे दाखवले आहे ते ढोबळ समजांना चुचकारणारे आहे. चेरी पिकिंग जातीभेद.

मात्र तरीही पिक्चर आवर्जून पाहण्यासारखा आहे. गळ्यात आवंढा मूमेण्ट्स खूप आहेत. वाटेत यांना पाणी देणार्‍या बाईच्या पायातील भेगा दिसतात तो सीन हे एक फार भारी उदाहरण. आणि त्या सीनला ज्याचा संदर्भ आहे तो चित्रपटातील आधीचा सीनही.

मुन्नाभाई चले अमेरिका' नावाने तिसर्‍या भागाची घोषणा झाली होती.
>>
एकलव्य : द रॉयल गार्ड सिनेमा च्या सोबत हे ट्रेलर जोडलं होतं, पण ते फक्त यू एस पी म्हणून होतं. सिनेमाच्या दृष्टीनी पुढे काहीच डेव्हलपमेंट केली नाही...

जुरासिक वर्ल्ड - रिबर्थ पाहिला. नावीन्य फारसे काही नाही. हे पुन्हा एक रिबूट दिसते त्या सिरीजचे. ही नवीन कास्ट आहे. कोणत्याही जुरासिक वर्ल्ड पिक्चरचे जे चेकमार्क्स असतात ते सगळे आहेत. जुरासिक फॅन्सना तुलनेने कमी आवडेल पण तुम्ही त्या कॅटेगरीतले असाल तर पाहा. स्कार्लेट जोहान्सन, माहेर्शाला अली (याचा उच्चार नक्की काय आहे?), आणि तो लिंकन लॉयर सिरीजवाला - कास्ट चांगली आहे पण त्यांना फारसे काही करायचे नाहीये.

टी-रेक्सलाही फारसे काम नाहीये Happy ख्रिस प्रॅट वाल्या पिक्चर्समधली "ब्लू" मस्त होती. तीही इथे नाही.

कालच्या जॉलीच्या पोस्टमधे ही लिंक द्यायची राहिली. संपादनाची वेळ केव्हांच टळून गेली.

(जॉली एल एल बी वर ही अमेरिकन रिअ‍ॅक्शन आहे. )

होमबाऊण्डच्या रिव्ह्यूबद्दल आभार फारेण्ड.

Pages