>>> शेवटी मिसकॅरेज वगैरे आठवते पण ती गाणे सोडते का लक्षात नाही.
तिने सोडलेलं गाणं परत सुरू करावं म्हणून असरानी आणि पश्चात्तापदग्ध अमिताभ प्रयत्न करतात शेवटी.
Submitted by स्वाती_आंबोळे on 18 November, 2025 - 10:43
हा प्रश्न कुणी विचारला नाही जी समजा पत्नीच्या हातून लग्नापूर्वी/ लाग्नानंतर मोहाच्या क्षणी अशी चूक झाली तर पतीचा काय अटित्युड असेल ? आहे का असा काही सिनेमा >>>>
शशी कपुर व रिना रॉयचा आहे. ती लग्नाआधी गरोदर राहते व गर्भपात करते. शशी कपुरला माहित असते तरी लग्न करतो कारण त्याची बहिण रिनाची डॉक्टर असते (मग लग्नात का नसते देव जाणे) आणि रिना फसवली गेलीय हे त्याला माहित असते. तिला फसवणारा नसिर परत उपटतो व ब्लॅक्मेल करतो.
कभी अल्विदा ना केहना आचरट होता हेमावैम. प्रिती हीच एकमेव डोके ठिकाणावर असलेली व्यक्ती आहे त्यात. बाकी शाहरुख आणि राणी दोघेही महागाढव. शेवटी बहुतेक प्रितीच त्यांना शिव्या घालते, मुर्खानो आता (तरी) लग्न करा, तेव्हा ते करतात.
प्रितीचे काम खुप सुंदर झालेय. शाहरुख एका दृश्यात तिला आदमी बननेकी कोशीश मत करो म्हणतो तेव्हा ती त्याला चांगलेच सुनावते. तोच एकमेव चांगला प्रसंग आहे चित्रपटात. बाकी सगळा आचरटपणा.

इजाजतमध्ये नसिर गाढव असतो बिचारा. जिच्यावर प्रेम ती पोरगी लग्नाला तयार नाही. आणि जिच्याशी लग्न केलेय ती ‘जा नसीर जा, जी ले अपनी जिंदगी माया के साथ‘ म्हणत सोडुन जाते. मायाकडे जातो तर ती लग्न करायच्या कल्पनेला घाबरुन घर सोडुन पळालेली. म्हणुन परत घरी येतो तर बायको याला मोकळं करण्यासाठी घर सोडुन गेलेली. याची इजाजत न घेताच. ह्याला हार्ट अॅटॅकच येतो एकदम. तीच एकमेव डोके ठिकाणावर असलेली त्यामुळे ती व्यवस्थित घटस्फोट वगैरे घेऊन शशी कपुरशी लग्न करुन सुखी होते. शशी कपुरला तिचे पुर्वायुष्य माहित असते. वेटिण्ग रुममध्ये नसीरला बघुन तो ओळखतो हा हिचा पहिला नवरा हे. पण तो शशीबाबा असल्याने कसलाही संशय न घेता रेखाला नसिरची इजाजत घ्यायला वेळ देतो.
रच्याकने, कोणी शशी मुमताज राजेशचा ‘फुल आहिस्ता फेको’ चित्रपट पाहिलाय काय,?? शशी इतका सरळमार्गी की हे दोघे त्याच्यासमोर इकमेकांना फुल आहिस्ता फेको करत टोमणे मारतात तरी त्याला काहीच न कळता नुसते वा वा करत बसतो. पुर्ण चित्रपटभर तो वावाच करत बसतो हे बघुन कंटाळलेला इंग्रज पोलिस शेवटी फायलीतुन मुमताज-राजेशच्या प्रेमप्रकरणाची माहिती देतो तेव्हा याची ट्युब पेटते.
तो ही वो साथ दिनवालाच मसाला… वर्षभर लागुन ज्याच्यावर प्रेम केलं ते ह्या वीराने महिनाभरात विसरवायला लावलं… इतकी येड्यासारखी ट्रामच्या समोर मरता मरता वाचते ते केवळ सलमानला अजय किती प्रेमळ हेच सांगायला??? लग्न झालं की नवर्याला सोडायचे नाही म्हणजे नाही.
च्याकने, कोणी शशी मुमताज राजेशचा ‘फुल आहिस्ता फेको’ चित्रपट पाहिलाय काय,?? >>> त्या पिक्चरचं नाव काहीतरी वेगळं आहे ना. फुल आहीस्ता फेको, फुल बडे नाजूक होते है हे गाणं त्यात होतं. बालपणी टीव्ही वर बघितला आहे. राजेश खन्ना मरतो शेवटी असं काहीतरी आठवतंय. शशी कपूर बहुतेक ब्रिटीश चाकरी करत असतो, पोलीस असतो आणि हा स्वातंत्र्यसैनिक असं काहीसं आठवतंय.
वो सात दिन वरुन हम दिल दे चुके सनम बरोबर. वो सात दिन ज्या साऊथ मुविवरुन केलाय, तो बघितला होता, रविवारी दुपारी टीव्हीवर. तेव्हा टीव्हीवर चांगले साऊथ मुविज असायचे. मामुंटी, मोहनलाल, रेवती, रागिणी हे सर्व ओळखीचे झालेले. रेवतीचा मौनम रागम अजूनही आठवतोय.
कभी कभीत लग्नाआधीचे प्रेम आहे. पण मोहाचा क्षण त्या प्रेमी युगुलात आल्याचे काहीही उल्लेख नाहीत Happy
>>
अंजलीला चक्क मुलगी असते ना? अमिताभला ते माहित नसते.
कभी अल्विदा ना केहना आचरट होता हेमावैम. प्रिती हीच एकमेव डोके ठिकाणावर असलेली व्यक्ती आहे त्यात. बाकी शाहरुख आणि राणी दोघेही महागाढव>>> +१ ओव्हरअॅक्तिन्गची सर्व मर्यादा क्रोस केलीये शाखाने आणी अमिताभने आचरटपणाची. एका क्षणि आपल्या नातिच्या वयाच्या वाटणार्या मुलिबरोबर अन्गचटिला येवुन डान्स करत असताना एकदम साक्षात्कार झाल्यासारखा बायकोची आठवण काढुन रिलेशिपवर लेक्चर सुरु करतो..
विषय जितका गभिर तितका केजोने त्याचा पचकावडा केलेला आहे.
Submitted by प्राजक्ता on 18 November, 2025 - 18:00
कभी अलविदा ना कहना हा काळाच्या पुढचा चित्रपट होता असे खुद्द करण जोहर एकदा म्हणाला होता.
पण तो हे चुकीचे म्हणाला होता.
तो काळाच्या पुढचा नाही तर काळाच्या बराच पुढचा चित्रपट होता.
आजही आपल्याकडे ठराविक चौकटीतच विचार केला जातो. चित्रपटात जो नायक आहे त्याने त्याच साचेबद्ध आदर्शवादात अडकलेले कॅरेक्टर प्ले करावे अशी अपेक्षा करतो.
जर चित्रपटाच्या शेवटी विवाहबाह्य संबंध जुळून आलेले दाखवायचे असतील तर ते जस्टीफाय करायला त्या दोघांच्या जोडीदारांना व्हिलन दाखवले गेलेच पाहिजे. त्याशिवाय पब्लिकच्या भूमिकेत आपल्याला समाधान नाही
केमिस्ट्री न जुळल्याने घटस्फोट हा प्रकार आपल्या समाजाला आजही पचनी पडायचा आहे.
आणि समाजातल्या ज्या घटकाने हे स्वीकारले आहे त्याला आपण बरेच घाणेरड्या शब्दांनी गौरवतो
फक्त मला एक कळले नाही. त्यात शाहरुखला लंगडे का दाखवले होते?
कदाचित त्या निमित्ताने तरी सहानुभूती मिळेल आणि बॉक्स ऑफिसवर स्वीकारला जाईल अशी अपेक्षा असावी का?
काही का असेना..
तो चित्रपट म्हणजे एक धाडस होते
Submitted by ऋन्मेऽऽष on 18 November, 2025 - 15:54
केशवकूल, अकेले हम अकेले तुम माझ्याही फार आवडीचा. गाणी तर आजही ऐकतो.
आमीर त्यात आधी चुकीचा वागतो आणि नंतर सुधारतो. फेअर इनफ.
आयुष्यात प्रत्येकाला आपली चूक सुधारायची संधी मिळायला हवी. प्रेमात तर दुसरी तिसरी चौथी... जोपर्यंत प्रेम आहे तोपर्यंत संधी मिळायला हवी.
मनिषा कोईराला माहेरच्यांच्या आणि कोर्ट केस सुरू असल्याने वकिलाच्या सांगण्यानुसार काही निर्णय घेते. ते निर्णय चुकीचे की बरोबर हे नंतर. पण स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेणे अपेक्षित असते. जसे पहिल्यांदा त्याला सोडायचा योग्य निर्णय घेते. पण नंतर मात्र घरच्यांच्या बेहकाव्यात येत त्याला समजून घेण्यात चुकते. पण नंतर तिची खात्री पटते आणि शेवट गोड होतो. इतका सिंपल आणि सुंदर चित्रपट आहे.
मला चित्रपटाचा सेकंड हाफ जास्त आवडतो जिथून ती त्याला सोडून जाते. तिथून चित्रपटात इमोशन पुरेपूर भरले आहे. म्हणून बरेचदा मी हा चित्रपट अर्ध्यातून बघतो. शेवटच्या दृश्यात तर डोळ्यातले पाणी थांबत नाही.
स्पेशली ती मुलाला परत न्यायला येते तेव्हा आमिर त्यांना पुढे पाठवून एकटा जे रडतो त्या एका भावनेशी एकरूप व्हायला पुन्हा पुन्हा बघतो.
त्या आधीचे कोर्टातले एकदोन सीन सुद्धा मस्त आहेत जेव्हा पैशासाठी त्याच्या मागे लागणारा आणि शिव्या घालणारा बनियाच म्हणतो की तो आपल्या मुलांसाठी काहीही करू शकतो.. तसेच शेजारची मैत्रीण जिने मनिषाला पळून जायचा सल्ला दिला असतो, पण नंतर तीच तिला म्हणते की आता तो सुधारला आहे आणि त्याला माफ न करून तू चूक करत आहेस... बस, हे दोन सीनच शेवटचा निर्णय घ्यायला पुरेसे ठरावेत!
Submitted by ऋन्मेऽऽष on 18 November, 2025 - 15:56
बारामुल्लाह कसला बंडल पिक्चर. रॉटन तोमॅतोज वर दोन चार चांगले रिव्ह्यूज पाहून पाहिला.
किडनॅपिंग आणि अमानवीय घटनांचा समांतर प्लॉट बराच काळ व्यवस्थित चालला होता. शेवटच्या अर्ध्या तासात माती खाल्ली.
काश्मीर मधे पंडीतांसोबत जे झालं त्याची भरपाई कुणीही करू शकत नाही. पण त्यावर काश्मीर फाईल्स सारखा दुसरं टोक गाठणारा अजेण्डा मूव्ही येऊन गेल्यानंतर असा सुपरनॅचरल प्लॉट घेऊन त्यातून पंडीतांच्या हत्यांवर भाष्य केलं हे पचनी पडत नाही. शेवटच्या त्या अर्ध्या तासात बालीश तर झालाच आहे, पण आत्तापर्यंत जे दाखवलं त्या फक्त फोडण्या होत्या असं वाटलं.
अकेले हम अकेले तुम
सर
मला सिनेमाच्या शेवटचा सीन प्रचंड आवडला.
आमीर जेव्हा मनिषाला सांगतो कि हे घर तुझेही आहे. आणि मनीषा वळते. जायला निघते, आणि जाऊन फक्त दरवाजा बंद करते.
Oh what a scene!
काल रामप्रसाद की तेरहवी पाहिला. क्या केहना चाहते हो भाई असे अधुन मधुन झाले. घरात १३ दिवस थांबलेल्या लोकांची मनस्थिती, प्रसण्ग छान घेतलेत. असेच होते सगळीकडे.
लोकांना थँक्यु सॉरी लगेच म्हणणारे आपण घरातल्यांना तितके सौहार्द दाखवत नाही हा मुद्दा पटला. शेवटी ती संगिताचे वर्ग सुरु करते. वाद्ये म्हणजे जास्तीची अडगळ व साफसफाई ह्या मतावरुन घरात शिक्षक ठेऊन क्लास काढण्यापर्यंतचा तिचा प्रवास, नवरा गेल्यावर १३ दिवस बिनकामाचे रिकामे बसुन राहते तेव्हा जुन्या आठवणीतुन तो तिला जास्त समजत जातो तो एक प्रवास, जावाजावांचे आपापसातील संबंध असे काहीसे कथानक छान रेखाटलेय.
अभिनेत्री सीमा पाहवाचा हा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न आहे बहुतेक. छान जमलेय.
सिलसिला- रेखा आणि अमिताभचं अफेअर लक्षात आल्यावर संजीवकुमार ते maturely घेतो.
कभी कभीचा उल्लेख आलाच आहे वरती. बायकोचं लग्नापूर्वीचं अफेअर कळल्यावर शशी कपूर आणि अमिताभच्या विरुद्ध reactions आहेत. अमिताभलाही उपरती होताना दाखवलं आहेच.
'कथा' - फारच मस्त आठवण करून दिलीस जिज्ञासा. नसिरुद्दीन शाह आणि दीप्ती नवलचा 'तो' संवाद कसला भारी आहे! शब्द फार कमी, पण अर्थपूर्ण अभिनय.
'अंकुर' मध्ये अनंत नाग हा जमीनदार किंवा तत्सम काही तरी असतो. त्याचं तिथे कामाला असलेल्या बाईशी (शबाना आझमी) जुळतं. तिचं लग्न आधीच झालेलं असतं. नवरा बहुतेक मुका असतो आणि त्यांना मूल नसतं. या अफेअरच्या वेळी बहुतेक नवरा परागंदा झालेला असतो. शबाना अनंत नागपासून गरोदर राहते. पुढे अनंत नागचं रीतसर लग्न होतं. त्याच्या बायकोला (प्रिया तेंडुलकर) या आधीच्या अफेअरचा अंदाज आल्यावर ती तिला कामावरून काढते. पुढे शबानाचा नवरा परत येतो आणि बघतो की बायको गरोदर आहे. त्याला आनंद होतो ( कदाचित हे माहिती असूनही की मूल आपलं नाही) . तो काम मागायला अनंत नागकडे येतो पण अनंत नागला वाटतं की तो आपल्याला जाब विचारायला येतोय आणि म्हणून तो त्याला नोकरांकरवी बडवून काढतो!
मला इथे फक्त दोनच गोष्टी लिहायच्या आहेत
१ कल हो ण हो मध्ये प्रीती झिंटाच्या बाबांनी आत्महत्त्या केलेली आहे. आणि आई ने एक लहान मुलगी सासूच्या इच्छे विरुद्ध दत्तक घेतली आहे. आई शेवट पर्यंत एक रहस्य उराशी बाळगून जगते आहे. ती छकुली तिच्या नवर्याचीच निशाणी असते. ह्या विषयी बोलण्यास शब्द अपुरे पडतात.
२ जब वुई मेट
ह्या सिनेमात एका मुलाची शहीद कपूरची प्रतिक्रिया पहा, त्याची आई नवर्याला सोडून पर पुरुषाकडे जाते. निराश झालेला शाहीद जगापासून आणि स्वतः पासून पळून जायचा प्रयत्न करतो आहे, तेव्हा करीना एका वाक्यात जीवनाचे सार त्याला सांगते, " अरे, वो प्यार मे थी."
काय हे तत्वज्ञान!
पण तो शशीबाबा असल्याने कसलाही संशय न घेता
>>>>
मला वाटतं शशीबाबा एकदम सेल्फ अश्यूअर्ड असणार. का नसावं? त्याने फ्लर्ट केले तर सागवानी लाकूडसुद्धा त्याच्याकडे आकर्षित होतं अशी खऱ्या आयुष्यात त्याची ख्याती होती. त्याला काय भीती असल्या गाढव प्रेमी किंवा नवऱ्यांची?
त्यात शाहरुखला लंगडे का दाखवले होते?>>>>
बहुतेक शाहरुखच्या बिटरनेसचा मूळ कशात आहे हे दाखवण्यासाठी. पण हा बिटरनेस बायकोच्या बाबतीतच असतो. बहुतेक ती जास्त यशस्वी असते म्हणून. राणी जरी टीचर असली तरी तिचा स्वभाव काही ऍम्बिशस वगैरे दाखवलेला नाही किंबहुना ती टीचर असल्याने प्रेमळ, समजून घेणारी वगैरे दाखवायचं असेल. (आमच्या वेळी असल्या टीचर का नव्हत्या?)
सुपरनॅचरल प्लॉट घेऊन त्यातून पंडीतांच्या हत्यांवर भाष्य केलं हे पचनी पडत नाही.
>>> बारामुल्ला पाहायचा होता.
जेव्हा पिक्चर जाहीरही झाला नव्हता त्यावेळी काही काश्मिरी पंडितांच्या खऱ्या कहाण्यांमध्ये ध्यातराजाचे (गृहदेवता) उल्लेख, पौष कृष्णपक्षात गृहदेवतेची पूजा होते, गृहदेवतेचे वास्तव्य सगळ्यात वरच्या मजल्यावरच्या एखाद्या खोलीत असते असे मानणे वगैरे तसेच काही नव्या ऑक्युपन्ट्सना विविध भास झाल्याचे उल्लेख होते.
एखाद्या प्रदेशातील सामान्य सांस्कृतिक मान्यतांचा प्रभाव सर्वांवरच पडू शकतो. आणि मोहापायी डिस्ट्रेस सेलमध्ये घर घेतलेल्या एखाद्याला गिल्ट येऊ शकते, शिवाय त्यावेळचे वातावरण इतके डिप्रेसिंग असताना भास होऊ शकतात असे वाटले होते.
त्यामुळे आदित्य धरने हा प्लॉट वापरणे हेच मला इंटरेस्टिंग वाटले. आता ते पडद्यावर कसे मांडले आहे आणि त्यात तो कितपत यशस्वी झाला हा वेगळा भाग. त्यासाठी पाहीन आता.
>>> शेवटी मिसकॅरेज वगैरे
>>> शेवटी मिसकॅरेज वगैरे आठवते पण ती गाणे सोडते का लक्षात नाही.
तिने सोडलेलं गाणं परत सुरू करावं म्हणून असरानी आणि पश्चात्तापदग्ध अमिताभ प्रयत्न करतात शेवटी.
ओह मग वेगळा आहे इतर तत्कालीन
ओह मग वेगळा आहे इतर तत्कालीन पिक्चर्स पेक्षा.
हा प्रश्न कुणी विचारला नाही
हा प्रश्न कुणी विचारला नाही जी समजा पत्नीच्या हातून लग्नापूर्वी/ लाग्नानंतर मोहाच्या क्षणी अशी चूक झाली तर पतीचा काय अटित्युड असेल ? आहे का असा काही सिनेमा >>>>
शशी कपुर व रिना रॉयचा आहे. ती लग्नाआधी गरोदर राहते व गर्भपात करते. शशी कपुरला माहित असते तरी लग्न करतो कारण त्याची बहिण रिनाची डॉक्टर असते (मग लग्नात का नसते देव जाणे) आणि रिना फसवली गेलीय हे त्याला माहित असते. तिला फसवणारा नसिर परत उपटतो व ब्लॅक्मेल करतो.
समजा पत्नीच्या हातून
समजा पत्नीच्या हातून लग्नापूर्वी/ लाग्नानंतर मोहाच्या क्षणी अशी चूक झाली तर पतीचा काय अटित्युड असेल ? आहे का असा काही सिनेमा ? >>> कभी कभी
कभी अल्विदा ना केहना आचरट
कभी अल्विदा ना केहना आचरट होता हेमावैम. प्रिती हीच एकमेव डोके ठिकाणावर असलेली व्यक्ती आहे त्यात. बाकी शाहरुख आणि राणी दोघेही महागाढव. शेवटी बहुतेक प्रितीच त्यांना शिव्या घालते, मुर्खानो आता (तरी) लग्न करा, तेव्हा ते करतात.
प्रितीचे काम खुप सुंदर झालेय. शाहरुख एका दृश्यात तिला आदमी बननेकी कोशीश मत करो म्हणतो तेव्हा ती त्याला चांगलेच सुनावते. तोच एकमेव चांगला प्रसंग आहे चित्रपटात. बाकी सगळा आचरटपणा.
हा प्रश्न कुणी विचारला नाही
हा प्रश्न कुणी विचारला नाही जी समजा पत्नीच्या हातून लग्नापूर्वी/ लाग्नानंतर मोहाच्या क्षणी अशी चूक झाली तर पतीचा काय अटित्युड असेल ? आहे का असा काही सिनेमा >>>>
तब्बूचा अस्तित्व असाच आहे ना काहीतरी
कभी कभीत लग्नाआधीचे प्रेम आहे
कभी कभीत लग्नाआधीचे प्रेम आहे. पण मोहाचा क्षण त्या प्रेमी युगुलात आल्याचे काहीही उल्लेख नाहीत
येस. अस्तित्व आहे आणि खुप
येस. अस्तित्व आहे आणि खुप चांगला बनवलेला आहे.
पण मोहाचा क्षण शारीरिक
पण मोहाचा क्षण शारीरिक जवळिकीचाच असतो असं आपण का ठरवलंय? आणि त्याला 'चूक' कधी आणि का म्हणायचं?
इजाजतमध्ये नसिर गाढव असतो
इजाजतमध्ये नसिर गाढव असतो बिचारा. जिच्यावर प्रेम ती पोरगी लग्नाला तयार नाही. आणि जिच्याशी लग्न केलेय ती ‘जा नसीर जा, जी ले अपनी जिंदगी माया के साथ‘ म्हणत सोडुन जाते. मायाकडे जातो तर ती लग्न करायच्या कल्पनेला घाबरुन घर सोडुन पळालेली. म्हणुन परत घरी येतो तर बायको याला मोकळं करण्यासाठी घर सोडुन गेलेली. याची इजाजत न घेताच. ह्याला हार्ट अॅटॅकच येतो एकदम. तीच एकमेव डोके ठिकाणावर असलेली त्यामुळे ती व्यवस्थित घटस्फोट वगैरे घेऊन शशी कपुरशी लग्न करुन सुखी होते. शशी कपुरला तिचे पुर्वायुष्य माहित असते. वेटिण्ग रुममध्ये नसीरला बघुन तो ओळखतो हा हिचा पहिला नवरा हे. पण तो शशीबाबा असल्याने कसलाही संशय न घेता रेखाला नसिरची इजाजत घ्यायला वेळ देतो.
रच्याकने, कोणी शशी मुमताज राजेशचा ‘फुल आहिस्ता फेको’ चित्रपट पाहिलाय काय,?? शशी इतका सरळमार्गी की हे दोघे त्याच्यासमोर इकमेकांना फुल आहिस्ता फेको करत टोमणे मारतात तरी त्याला काहीच न कळता नुसते वा वा करत बसतो. पुर्ण चित्रपटभर तो वावाच करत बसतो हे बघुन कंटाळलेला इंग्रज पोलिस शेवटी फायलीतुन मुमताज-राजेशच्या प्रेमप्रकरणाची माहिती देतो तेव्हा याची ट्युब पेटते.
पॉइन्ट है पण प्रेम हा ‘क्षण’
पॉइन्ट है पण प्रेम हा ‘क्षण’ नाही, ती काही काळ तरी टिकणारी अवस्था आहे.
ओह 'हम दिल दे चुके सनम'मध्ये
ओह 'हम दिल दे चुके सनम'मध्ये नवरा तिचं पूर्वीचं अफेअर केवळ अॅक्सेप्टच करत नाही, तर दोघा बिचार्या प्रेमी जीवांना भेटवून द्यायचाही प्रयत्न करतो की!
तो ही वो साथ दिनवालाच मसाला…
तो ही वो साथ दिनवालाच मसाला… वर्षभर लागुन ज्याच्यावर प्रेम केलं ते ह्या वीराने महिनाभरात विसरवायला लावलं… इतकी येड्यासारखी ट्रामच्या समोर मरता मरता वाचते ते केवळ सलमानला अजय किती प्रेमळ हेच सांगायला??? लग्न झालं की नवर्याला सोडायचे नाही म्हणजे नाही.
लोल हो.
लोल हो.
च्याकने, कोणी शशी मुमताज
च्याकने, कोणी शशी मुमताज राजेशचा ‘फुल आहिस्ता फेको’ चित्रपट पाहिलाय काय,?? >>> त्या पिक्चरचं नाव काहीतरी वेगळं आहे ना. फुल आहीस्ता फेको, फुल बडे नाजूक होते है हे गाणं त्यात होतं. बालपणी टीव्ही वर बघितला आहे. राजेश खन्ना मरतो शेवटी असं काहीतरी आठवतंय. शशी कपूर बहुतेक ब्रिटीश चाकरी करत असतो, पोलीस असतो आणि हा स्वातंत्र्यसैनिक असं काहीसं आठवतंय.
वो सात दिन वरुन हम दिल दे चुके सनम बरोबर. वो सात दिन ज्या साऊथ मुविवरुन केलाय, तो बघितला होता, रविवारी दुपारी टीव्हीवर. तेव्हा टीव्हीवर चांगले साऊथ मुविज असायचे. मामुंटी, मोहनलाल, रेवती, रागिणी हे सर्व ओळखीचे झालेले. रेवतीचा मौनम रागम अजूनही आठवतोय.
कभी कभीत लग्नाआधीचे प्रेम आहे
कभी कभीत लग्नाआधीचे प्रेम आहे. पण मोहाचा क्षण त्या प्रेमी युगुलात आल्याचे काहीही उल्लेख नाहीत Happy
>>
अंजलीला चक्क मुलगी असते ना? अमिताभला ते माहित नसते.
मुलगी असते ना, नीतू सिंग.
मुलगी असते ना, नीतू सिंग.
मुलगी असते ना, नीतू सिंग.
मुलगी असते ना, नीतू सिंग.
>>
हो बरोबर गुड मेमरी करेक्टेड
कभी अल्विदा ना केहना आचरट
कभी अल्विदा ना केहना आचरट होता हेमावैम. प्रिती हीच एकमेव डोके ठिकाणावर असलेली व्यक्ती आहे त्यात. बाकी शाहरुख आणि राणी दोघेही महागाढव>>> +१ ओव्हरअॅक्तिन्गची सर्व मर्यादा क्रोस केलीये शाखाने आणी अमिताभने आचरटपणाची. एका क्षणि आपल्या नातिच्या वयाच्या वाटणार्या मुलिबरोबर अन्गचटिला येवुन डान्स करत असताना एकदम साक्षात्कार झाल्यासारखा बायकोची आठवण काढुन रिलेशिपवर लेक्चर सुरु करतो..
विषय जितका गभिर तितका केजोने त्याचा पचकावडा केलेला आहे.
कोणी शशी मुमताज राजेशचा ‘फुल
कोणी शशी मुमताज राजेशचा ‘फुल आहिस्ता फेको’ चित्रपट पाहिलाय -प्रेमकाहानी
कभी अलविदा ना कहना हा
कभी अलविदा ना कहना हा काळाच्या पुढचा चित्रपट होता असे खुद्द करण जोहर एकदा म्हणाला होता.
पण तो हे चुकीचे म्हणाला होता.
तो काळाच्या पुढचा नाही तर काळाच्या बराच पुढचा चित्रपट होता.
आजही आपल्याकडे ठराविक चौकटीतच विचार केला जातो. चित्रपटात जो नायक आहे त्याने त्याच साचेबद्ध आदर्शवादात अडकलेले कॅरेक्टर प्ले करावे अशी अपेक्षा करतो.
जर चित्रपटाच्या शेवटी विवाहबाह्य संबंध जुळून आलेले दाखवायचे असतील तर ते जस्टीफाय करायला त्या दोघांच्या जोडीदारांना व्हिलन दाखवले गेलेच पाहिजे. त्याशिवाय पब्लिकच्या भूमिकेत आपल्याला समाधान नाही
केमिस्ट्री न जुळल्याने घटस्फोट हा प्रकार आपल्या समाजाला आजही पचनी पडायचा आहे.
आणि समाजातल्या ज्या घटकाने हे स्वीकारले आहे त्याला आपण बरेच घाणेरड्या शब्दांनी गौरवतो
फक्त मला एक कळले नाही. त्यात शाहरुखला लंगडे का दाखवले होते?
कदाचित त्या निमित्ताने तरी सहानुभूती मिळेल आणि बॉक्स ऑफिसवर स्वीकारला जाईल अशी अपेक्षा असावी का?
काही का असेना..
तो चित्रपट म्हणजे एक धाडस होते
केशवकूल,अकेले हम अकेले तुम
केशवकूल,
अकेले हम अकेले तुम माझ्याही फार आवडीचा. गाणी तर आजही ऐकतो.
आमीर त्यात आधी चुकीचा वागतो आणि नंतर सुधारतो. फेअर इनफ.
आयुष्यात प्रत्येकाला आपली चूक सुधारायची संधी मिळायला हवी. प्रेमात तर दुसरी तिसरी चौथी... जोपर्यंत प्रेम आहे तोपर्यंत संधी मिळायला हवी.
मनिषा कोईराला माहेरच्यांच्या आणि कोर्ट केस सुरू असल्याने वकिलाच्या सांगण्यानुसार काही निर्णय घेते. ते निर्णय चुकीचे की बरोबर हे नंतर. पण स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेणे अपेक्षित असते. जसे पहिल्यांदा त्याला सोडायचा योग्य निर्णय घेते. पण नंतर मात्र घरच्यांच्या बेहकाव्यात येत त्याला समजून घेण्यात चुकते. पण नंतर तिची खात्री पटते आणि शेवट गोड होतो. इतका सिंपल आणि सुंदर चित्रपट आहे.
मला चित्रपटाचा सेकंड हाफ जास्त आवडतो जिथून ती त्याला सोडून जाते. तिथून चित्रपटात इमोशन पुरेपूर भरले आहे. म्हणून बरेचदा मी हा चित्रपट अर्ध्यातून बघतो. शेवटच्या दृश्यात तर डोळ्यातले पाणी थांबत नाही.
स्पेशली ती मुलाला परत न्यायला येते तेव्हा आमिर त्यांना पुढे पाठवून एकटा जे रडतो त्या एका भावनेशी एकरूप व्हायला पुन्हा पुन्हा बघतो.
त्या आधीचे कोर्टातले एकदोन सीन सुद्धा मस्त आहेत जेव्हा पैशासाठी त्याच्या मागे लागणारा आणि शिव्या घालणारा बनियाच म्हणतो की तो आपल्या मुलांसाठी काहीही करू शकतो.. तसेच शेजारची मैत्रीण जिने मनिषाला पळून जायचा सल्ला दिला असतो, पण नंतर तीच तिला म्हणते की आता तो सुधारला आहे आणि त्याला माफ न करून तू चूक करत आहेस... बस, हे दोन सीनच शेवटचा निर्णय घ्यायला पुरेसे ठरावेत!
बारामुल्लाह कसला बंडल पिक्चर.
बारामुल्लाह कसला बंडल पिक्चर. रॉटन तोमॅतोज वर दोन चार चांगले रिव्ह्यूज पाहून पाहिला.
किडनॅपिंग आणि अमानवीय घटनांचा समांतर प्लॉट बराच काळ व्यवस्थित चालला होता. शेवटच्या अर्ध्या तासात माती खाल्ली.
काश्मीर मधे पंडीतांसोबत जे झालं त्याची भरपाई कुणीही करू शकत नाही. पण त्यावर काश्मीर फाईल्स सारखा दुसरं टोक गाठणारा अजेण्डा मूव्ही येऊन गेल्यानंतर असा सुपरनॅचरल प्लॉट घेऊन त्यातून पंडीतांच्या हत्यांवर भाष्य केलं हे पचनी पडत नाही. शेवटच्या त्या अर्ध्या तासात बालीश तर झालाच आहे, पण आत्तापर्यंत जे दाखवलं त्या फक्त फोडण्या होत्या असं वाटलं.
-प्रेमकाहानी >>> करेक्ट , थँक
-प्रेमकाहानी >>> करेक्ट , थँक यु.
प्रेमकहानी मे इक लडका होता है, इक लडकी होती है. कभी दोनो हसते है, कभी दोनो रोते है. हे गाणं होतं. फेमस झालेलं.
अकेले हम अकेले तुम
अकेले हम अकेले तुम
सर
मला सिनेमाच्या शेवटचा सीन प्रचंड आवडला.
आमीर जेव्हा मनिषाला सांगतो कि हे घर तुझेही आहे. आणि मनीषा वळते. जायला निघते, आणि जाऊन फक्त दरवाजा बंद करते.
Oh what a scene!
अकेले हम अकेले तुम मी आमिर
अकेले हम अकेले तुम मी आमिर नाही तर मनिषासाठी बघितला होता. तेव्हा ती माझे जबरदस्त क्रश होती.
https://www.maayboli.com/node/58022
या क्रश वरील लेखात पहिलेच नाव तिचे आहे आणि या चित्रपटातील राजा को राणी से प्यार हो गया गाण्याचा उल्लेख सुद्धा केला आहे.
काल रामप्रसाद की तेरहवी
काल रामप्रसाद की तेरहवी पाहिला. क्या केहना चाहते हो भाई असे अधुन मधुन झाले. घरात १३ दिवस थांबलेल्या लोकांची मनस्थिती, प्रसण्ग छान घेतलेत. असेच होते सगळीकडे.
लोकांना थँक्यु सॉरी लगेच म्हणणारे आपण घरातल्यांना तितके सौहार्द दाखवत नाही हा मुद्दा पटला. शेवटी ती संगिताचे वर्ग सुरु करते. वाद्ये म्हणजे जास्तीची अडगळ व साफसफाई ह्या मतावरुन घरात शिक्षक ठेऊन क्लास काढण्यापर्यंतचा तिचा प्रवास, नवरा गेल्यावर १३ दिवस बिनकामाचे रिकामे बसुन राहते तेव्हा जुन्या आठवणीतुन तो तिला जास्त समजत जातो तो एक प्रवास, जावाजावांचे आपापसातील संबंध असे काहीसे कथानक छान रेखाटलेय.
अभिनेत्री सीमा पाहवाचा हा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न आहे बहुतेक. छान जमलेय.
सिलसिला- रेखा आणि अमिताभचं
सिलसिला- रेखा आणि अमिताभचं अफेअर लक्षात आल्यावर संजीवकुमार ते maturely घेतो.
कभी कभीचा उल्लेख आलाच आहे वरती. बायकोचं लग्नापूर्वीचं अफेअर कळल्यावर शशी कपूर आणि अमिताभच्या विरुद्ध reactions आहेत. अमिताभलाही उपरती होताना दाखवलं आहेच.
'कथा' - फारच मस्त आठवण करून दिलीस जिज्ञासा. नसिरुद्दीन शाह आणि दीप्ती नवलचा 'तो' संवाद कसला भारी आहे! शब्द फार कमी, पण अर्थपूर्ण अभिनय.
'अंकुर' मध्ये अनंत नाग हा जमीनदार किंवा तत्सम काही तरी असतो. त्याचं तिथे कामाला असलेल्या बाईशी (शबाना आझमी) जुळतं. तिचं लग्न आधीच झालेलं असतं. नवरा बहुतेक मुका असतो आणि त्यांना मूल नसतं. या अफेअरच्या वेळी बहुतेक नवरा परागंदा झालेला असतो. शबाना अनंत नागपासून गरोदर राहते. पुढे अनंत नागचं रीतसर लग्न होतं. त्याच्या बायकोला (प्रिया तेंडुलकर) या आधीच्या अफेअरचा अंदाज आल्यावर ती तिला कामावरून काढते. पुढे शबानाचा नवरा परत येतो आणि बघतो की बायको गरोदर आहे. त्याला आनंद होतो ( कदाचित हे माहिती असूनही की मूल आपलं नाही) . तो काम मागायला अनंत नागकडे येतो पण अनंत नागला वाटतं की तो आपल्याला जाब विचारायला येतोय आणि म्हणून तो त्याला नोकरांकरवी बडवून काढतो!
मला इथे फक्त दोनच गोष्टी
मला इथे फक्त दोनच गोष्टी लिहायच्या आहेत
१ कल हो ण हो मध्ये प्रीती झिंटाच्या बाबांनी आत्महत्त्या केलेली आहे. आणि आई ने एक लहान मुलगी सासूच्या इच्छे विरुद्ध दत्तक घेतली आहे. आई शेवट पर्यंत एक रहस्य उराशी बाळगून जगते आहे. ती छकुली तिच्या नवर्याचीच निशाणी असते. ह्या विषयी बोलण्यास शब्द अपुरे पडतात.
२ जब वुई मेट
ह्या सिनेमात एका मुलाची शहीद कपूरची प्रतिक्रिया पहा, त्याची आई नवर्याला सोडून पर पुरुषाकडे जाते. निराश झालेला शाहीद जगापासून आणि स्वतः पासून पळून जायचा प्रयत्न करतो आहे, तेव्हा करीना एका वाक्यात जीवनाचे सार त्याला सांगते, " अरे, वो प्यार मे थी."
काय हे तत्वज्ञान!
पण तो शशीबाबा असल्याने कसलाही

Pages