निशान्ची पार्ट १ आणि २ असे २ सिनेमा - अॅमेझॉन प्राइम वर. अनुराग कश्यप ची कथा आणि डायरेक्शन. गँग्ज ऑफ वासेपूर वगैरे आवडले असेल तर साधारण तसा जॉनर आहे. यूपीतले लहान गाव, पैलवानी आखाडे, बाहुबली आणि पॉलिटिशियन्स्च्या हातातले बाहुले असणरे पोलिस , पैसा मिळवायला या लोकांकडे हुजरेगिरी करणारे किंवा गुन्हेगारीचा सर्रास अवलंब करणारे, फावल्या वेळात स्टेज शो मधे नाचणार्या पोरी पटवणारे बेकार तरुण, असा एकूण कॅनव्हास. त्यातच एक साधारण परिस्थितीतले आणि स्पोर्ट्स मधे नॅशनल लेवल वर भाग घेण्याचे स्वप्नं बघणारे नवरा - बायको. नवरा पैलवान आणि बायको रायफल शूटर. दोघांनाही क्षमता असूनही राजकारणामुळे संधी डावलली गेली आहे. बायको धडाडीची आहे, पण प्रॅक्टिकल, परिस्थितीशी समझोता करून जुळ्या मुलांना वाढवण्यावर फोकस करते. नवरा पैलवानी आखाड्यातून चुकीच्या मित्राच्या संगतीने पोटापाण्यासाठी , झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याचे आमिष दाखवून एका टिपिकल बाहुबलीकडे ओढला जातो आणि गुन्हेगारीच्या दलदलीत फसतो. जुळ्या मुलांपैकी एकाकडे लहानपणा पासून नेमबाजीचे स्किल असते (आणि तिरपागडे चालणारे डोकेही )आणि आई त्याला लहान असताना गुलालीने नेमबाजी करायला सहज शिकवते. तो मुलगाही वडिलांच्या वळणावर जातो. त्यातून पुढे झालेली त्या कुटुंबाची स्ट्रगल आणि परवड असा प्लॉट आहे. बघायला एन्गेजिंग वाटले. कदाचित ८- १० लहान एपिसोड्स ची सीरीज केली असती तर बेटर झाले असते. विशेष रेको म्हणजे यातली गाणी आवर्जून ऐकावी अशी मजेशीर आणि मस्त आहेत. म्यूझिक आणि लिरिक्स पण, एकदम टिपिकल यूपी, कानपूर फ्लेवर !! काही धृव घाणेकर ची आहेत काही अजून इतर गीतकार संगीतकार दिसतायत - इथे ऐकता येतील: ( त्यातले डियर कण्टरी, कनपुरिया कन्टाप, फिल्लम देखो ही तर नक्की ऐका ) https://www.youtube.com/watch?v=yoy9tcwd_zs
Submitted by maitreyee on 17 November, 2025 - 11:18
निशान्ची मला पण आवडला. खुप छान, प्रत्येक काळ पण बरोबर दाखवला आहे. तो बबलु अम्बिकाप्रसादच्या घरी एकदम बिंधास्त का जातो ते काय पचले नाही. तो सावध झाला आहे हे त्याला फोनवरुन माहित होते.
काल रात्री जागून अकेले हम अकेले तुम हा आमीर खानचा पिक्चर बघितला. क्रेमर vs क्रेमर ह्या होलीवूग मूवी वरून बेतलेला.
मस्त पिक्चर आहे.
माझ्या मते आमीर चा अर्वोत्कृष्ट सिनेमा . आश्चर्य आहे कि कुणी ह्या विषयी जास्त का बोलत नाही?
आवर्जून पाहावा असा सिनेमा. मला आवडला,
Dil Mera Churaya Kyun why did you break my heart https://www.youtube.com/watch?v=mSu5cz2GFts
केकु मी बर्याच वर्षांपुर्वी पाहिला होता. याची गाणी प्रचंड गाजली होती. माझ्या भावाच्या लग्नाच्या कॅसेटमध्ये राजा को रानी से प्यार हो गया हे गाणे भावाने मुद्दाम सांगुन अॅड करुन घेतले होते इतका तो आमिर, गाणे व त्याच्या नवपरिणीत राणीच्या प्रेमात होता (याच क्रमाने).
आमिरने काम छान केलेय पण मला चित्रपटाचा उत्तरार्ध आवडला नव्हता. सुरवातीला थोडासा मनिषाच्या बाजुने झुकणारा चित्रपट अचानक झोपेतुन जागा झाल्यासारखा मनिषाला गिल्ट फिलिंग द्यायला लागतो. गिल्टी तर आमिरला वाटायला हवे होते. बायको सोडुन गेल्यावर आमिर घर व पोरगा बघायला लागतो, करीअर बॅकफुटवर टाकुन. ते त्याने आधीच केले असते तर मनिषावर घर सोडायची वेळ आलीच नसती. असो. हिंदी चित्रपटात असाच शेवट अपेक्षित असतो.
मीही बर्याच वर्षांपुर्वी पाहिला होता.
मला पण असंच वाटतं साधना. मनीषा ट्रेंड सिंगर असतानाही तो तिला चूल मूल करायला लावतो आणि मग त्याला गिल्ट आल्यावर मनीषा वाईट का? आमिरचा अभिनय उत्तम आहे पण प्रिमायसेसच पटला नाही. शिवाय first half मध्ये प्रेमाचा जरा जास्तच फापटपसारा आहे.
Last Christmas ऐकल्यामुळे 'दिल मेरा चुराया क्यों'बद्दल फार काही वाटलं नाही.
मला वाटलं कि दोघांच्याही बाजू चांगल्या मांडल्या आहेत. एक गोष्ट निश्चित आहे कि आमीर खूप उशीरा जागा झाला. त्यानेही आपल्या करिअरचा त्याग करून मुलाचा सांभाळ केला. शेवटी तो बाजी हरला. सिंगल पेरेंटचे काय प्रॉब्लेम्स असतात.
मी वर ज्या गान्ताची लिंक दिली आहे टे गाणे मला फार आवडले जरूर ऐका.
Last Christmas मी पण ऐकले आहे तरी देखील...
मला कित्येक मुळ गाणी आवडतात तितकीच त्यांची हिंदी रुपांतरेही आवडतात. एल्विस प्रिस्लेचे मार्गरिटा ऐकायला आवडते पण रफीचे कौन है जो सपनोंमे आया…. कालातीत वाटते. चाल व अर्थ दोन्ही उधारीचे असले तरी …
दिल मेरा चुराया आवडते पण लास्ट ख्रिसमस मात्र जास्त आवडते, अनु मलिकला कॉपी पेस्ट पण धड जमत नाही.
माझेमन, चित्रपट पाहताना अचानक शिफ्ट जाणवते. मंसुरअली खान त्याला हवा तसा चित्रपट बनवत असताना अचानक त्याच्या लक्षात येते आपण हिंदी चित्रपट बनवतोय आणि तो प्रिमायसेसच बदलुन टाकतो
हेमामालिनी व शशी कपुरचा अभिनेत्री बघतानाही सेम असेच वाटलेय. हेमा अभिनेत्री आहे हे माहित असताना, तिच्या नृत्यावर व गाण्यावर मोहित होऊन शशी लग्न करतो. लग्नानंतर ती तिची करिअर पुढे सुरु ठेवते तेव्हा माझी आई कशी घरात लोर्या गुणगुणते तसे तुही लग्नानंतर घरात गुणगुणत बसणार असे मला वाटले असे म्हणुन तिला काम करायला बंदी घालतो. त्याच्या नजरेत स्त्रीची जागा फक्त चुल व मुल एवढ्याचपुरती आहे हे हेमाला कळते, ती त्याला सोडुन परत स्वगृही परतते, ज्या घरात स्त्रीला जराही किंमत नाही तिथे मी जाणार नाही म्हणते आणि शेवटच्या १५ मिनिटांत आधीच्या सगळ्या विचारांवर पाणी फिरवुन परत नवर्याकडे जाते. त्याचे विचार बदललेले दाखवले नाहीत, हीच घरात बसुन लोर्या गाणे बेस्ट हे स्वतःच ठरवते. अचानक शेवटच्या दहा मिनिटात दिग्दर्शक किंवा जो कोणी असेल त्याला आठवते की दोन तास गेले, आता नेहमीच्या हिंदी चित्रपटाची मळलेली वाट धरली नाही तर थेटरात कोणी येणार नाही.
वो सात दिनच्या कथेशी साम्य असलेले कमीतकमी ५-६ चित्रपट तरी असतील - स्वामी, अपनापन, कसक, घरोंदा हे तिनचार चटकन आठवले. लग्नाआधीच्या प्रियकराला सोडुन दुसर्याच्या गळ्यात माळ घालाव्या लागणार्या मुलींचे लग्न मारझोड करणार्या नवर्यांशी जरी झाले असते तरी ते शेवटी सज्जन बनले असते. विवाहित स्त्रीने शेवटी पती व संसार निवडायला हवा नाहीतर थेटरे ओस पडतील ही भिती सर्व संबंधितांना वाटते.
विवाहित स्त्रीने शेवटी पती व संसार निवडायला हवा नाहीतर थेटरे ओस पडतील ही भिती सर्व संबंधितांना वाटते.>>> नाही पटले. काय आहे ना स्त्री ही बाय नेचर समजून घेणारी असते. त्या मुळेतर हे जग सुरकीत चालू आहे.
मासूम मध्ये शेवट काय आहे? मला आता आठवत नाही.
ऋन्मेऽऽष सर
एक धागा काढ बाबा. कोण चूक कोण बरोबर.
आता थोडे नमक छिडकतो .
आम्ही रात्री तीन वाजता वाद घालत होतो कि हाच रोल आमिरच्या ऐवजी शाखाने केला असता तर?
सिनेमाची वाट लावली असती,
btw परवा रात्री "कल हो ना हो" बघितला. त्याबद्दल नंतर सवडीने लिहीन.
आधी आज रात्री आनंद बघणार मग बावर्ची आणि मग नंतर..,. लिहीन.
अनु मलिकला कॉपी पेस्ट करायला जमत नाही हे खरे आहे. आणि मार्गारिटापेक्षा कौन हैं जो जास्त चांगले वाटते हे ही खरे.
बाकी जबरदस्तीने गळ्यात माळ घालायला लागणाऱ्या केसमध्ये स्वामी पटला होता मला. कारण तो विक्रम शबानाकडे आल्यावर गळी पडतो तेव्हा शबानाच्या मनात काही नसते. उलट गिरीश कर्नाडबद्दल जरा सहानुभूतीचा असते. पण तिचे सासरचे तिला हाकलवतात. रेल्वे स्टेशनवर गिरीश कर्नाड येतो तेव्हा तिला हायसंच वाटत असावं.
वो सात दिनही बरा वाटला होता. कारण पद्मिनी, अनिल कपूर प्रचंड ट्रॅडिशनल फॅमिलीतून आलेले असतात. त्यातल्या त्यात पद्मिनी बंड करते म्हणजे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते. पण तेही फेल जातं तेव्हा ते सामाजिक मानदंड मोडून काही ऍक्शन घेतील अश्या प्रकारातले नसतात.
एखादीने तरी भारतीय संस्कृतीला फारसं न जपता नवऱ्यालाच सोडलंय आणि आणि दोघे मजेत जगताहेत अशी स्टोरी पाहायची फार इच्छा आहे. अगदी मेट्रोमध्ये आपण एकाकडे मानसिकरीत्या आकर्षित झालो होतो ही कबुली देणारी शिल्पा स्वतःची १०० अफेअर्स असली तरी तिला मुलगी नेमकी कुणाची आहे असं विचारणाऱ्या केकेला पण सोडत नाही.
बाकी अचानक भारतीय संस्कृतीची आठवण येणाऱ्या नायिका पाहून भयंकर मज्जा वाटते. उदा पडोसन, पूरब और पश्चिम
मासूम मध्ये शेवट काय आहे?
>>>>
मासूम मध्ये शबानाचा मातृत्वभाव दुखावलेल्या पत्नीवर मात करतो. ती मुलाला स्वीकारते. सगळे घरी जातात पण ती नासिरला माफ करते का नाही मला वाटतं गुलदस्त्यात ठेवले आहे.
ओरिजिनल पुस्तकात मात्र तो मुलगा परदेशात कॉन्व्हेंटमध्ये जातो. बहुतेक कधीच परत येत नाही. ते वाचून फार वाईट वाटलं होतं.
आणि हो तो सलमान खान मला वाटत जब प्यार किसी से होता है.
>>>>
त्याच्यात सलमानखानला सगळ्यात जास्त भीती काय तर ट्विंकल होऊ घातलेलं लग्न मोडेल याची. त्या मुलाला तो चक्क न्यूसन्स सारखा वागवत असतो.
मासूम अप्रतिम आहे. कारण नसीर आणि शेखर कपूर - आपण केलेली प्रतारणा, त्यामुळे दुखावलेली बायको, तिला सावरताना आपण मुलाच्या आईकडे परत वळूनही पाहिलं नाही ही गिल्ट, आपल्याला आपल्या मुलाबद्दल साध्या गोष्टीही माहित नाहीत याचं एक बाप म्हणून वैफल्य आणि मुलाला दूर तर करायचं नाहीये पण त्याला जबरदस्तीने संसारात घुसवून बायकोचा घरी दारी आणिक अपमान करायचा नाहीये याचं भान या गोष्टी फार सुंदर दाखवल्या आहेत.
"The divorce subject isn't as shocking, but Kramer vs. Kramer is still a thoughtful, well-acted drama that resists the urge to take sides or give easy answers"
क्रेमर vs क्रेमर रिव्यू मधून.
>>> एखादीने तरी भारतीय संस्कृतीला फारसं न जपता नवऱ्यालाच सोडलंय आणि आणि दोघे मजेत जगताहेत
इजाजत
कभी अलविदा ना कहना
हे पटकन आठवले. पहिल्या स्पाउजेसना भेटल्यावर थोडा मेलोड्रामा करतात, पण इन जनरल नवीन आयुष्यात सुखी असावेत असं दिसतं.
Submitted by स्वाती_आंबोळे on 18 November, 2025 - 09:49
कभी अलविदा ना कहना मध्ये प्रीतीला जोडीदार मिळतो का? आठवत नाही मला. पण मुळात तिला शाहरुखच्या गळ्यात जबरदस्तीने माळ घालावी लागलेली नसते ना? मर्जीनेच झालेली असतात ना दोन्ही (पहिली) लग्नं?
मर्जीने असतात, पण मिसमॅच्ड / ड्रिफ्टेड अपार्ट असतात - आणि तेही व्हॅलिड कारण असू शकतं असं हिंदी सिनेमाने म्हणणं कौतुकास्पदच वाटलं मला, जरी ते केजो-स्टाइलने दाखवलं असलं तरी. तसंच प्रीती झिंटाच्या कॅरेक्टरने लगेच नवीन जोडीदार शोधायच्या भानगडीत न पडणंही.
राखी तिच्या मर्जीविरुद्ध झालेल्या लग्नात सुखी झालेली दाखवली आहे 'कभी कभी'मध्ये.
Submitted by स्वाती_आंबोळे on 18 November, 2025 - 10:03
कोर्ट सीन, युक्तीवाद, तपास, डावपेच वगैरे अजून चालले असते जे तिघांच्या स्पीच पुरते राहिले. पण ते तिन्ही स्पीच छान जमले. ज्यात एक प्रतिस्पर्धी पक्षाचा वकिलाचा सुद्धा होता. आशय आणि विषय बरोबर पोहोचले. >> बरोबर.
मला वाटतं पार्ट वन मुळे तीच अपेक्षा प्रेक्षक करतो. पण या पिक्चरमधे कोर्ट रूम ड्रामा किंवा वकिली खोडे, युक्तीवाद यापेक्षाही विषयाला प्राधान्य दिलं आहे. बंदे मे है दम पण असाच होता. उगीच ओढून ताणून वकिली डावपेच दाखवण्याला फाटा मारला हे योग्य झालं. दोन नायकांमुळे रीळं एकमेकांचे क्लाएंट पळवापळवीत खर्ची पडली मग आटोपता घेतला.
धीरूभाईं वर बेतलेलं पात्र हिराभाई खेतान साकारणारे गिरीराज राव मस्त अॅक्टर आहेत. यात त्यांचं पात्र सुरूवातीला थंड डोक्याचा प्रोफेशनल वाटलं होतं, मधेच ते इगोइस्टिक आणि नंतर तोल सुटलेलं वाटलं. तरी पण त्यांनी ही सर्कस ताकदीने जमवलीय. दुसरा कुणी असता तर या पात्राचं माकड झालं असतं.
हा प्रश्न कुणी विचारला नाही जी समजा पत्नीच्या हातून लग्नापूर्वी/ लाग्नानंतर मोहाच्या क्षणी अशी चूक झाली तर पतीचा काय अटित्युड असेल ? आहे का असा काही सिनेमा ?
अभिमान कोठे बसेल यात? त्यात बायकोच्या करीयर बद्दल तक्रार नसते पण तिने जास्त लोकप्रिय होण्याबद्दल आकस असतो. शेवटी मिसकॅरेज वगैरे आठवते पण ती गाणे सोडते का लक्षात नाही.
मुंबई-पुणे-मुंबईतही बोलतात ना ते पास्ट अफेअर्सबद्दल? 'दिल से'मध्ये प्रीती झिंटा शाहरुखला सांगते तिच्या अफेअरबद्दल, पण तो सांगत नाही.
'इजाजत' आणि 'कभी कभी'मध्ये शशी कपूरच्या कॅरेक्टरने बायकोचं आधीचं लग्न / अफेअर स्ट्राइडमध्ये घेतलेलं दाखवलं आहे.
Submitted by स्वाती_आंबोळे on 18 November, 2025 - 10:42
निशान्ची पार्ट १ आणि २ असे
निशान्ची पार्ट १ आणि २ असे २ सिनेमा - अॅमेझॉन प्राइम वर. अनुराग कश्यप ची कथा आणि डायरेक्शन. गँग्ज ऑफ वासेपूर वगैरे आवडले असेल तर साधारण तसा जॉनर आहे. यूपीतले लहान गाव, पैलवानी आखाडे, बाहुबली आणि पॉलिटिशियन्स्च्या हातातले बाहुले असणरे पोलिस , पैसा मिळवायला या लोकांकडे हुजरेगिरी करणारे किंवा गुन्हेगारीचा सर्रास अवलंब करणारे, फावल्या वेळात स्टेज शो मधे नाचणार्या पोरी पटवणारे बेकार तरुण, असा एकूण कॅनव्हास. त्यातच एक साधारण परिस्थितीतले आणि स्पोर्ट्स मधे नॅशनल लेवल वर भाग घेण्याचे स्वप्नं बघणारे नवरा - बायको. नवरा पैलवान आणि बायको रायफल शूटर. दोघांनाही क्षमता असूनही राजकारणामुळे संधी डावलली गेली आहे. बायको धडाडीची आहे, पण प्रॅक्टिकल, परिस्थितीशी समझोता करून जुळ्या मुलांना वाढवण्यावर फोकस करते. नवरा पैलवानी आखाड्यातून चुकीच्या मित्राच्या संगतीने पोटापाण्यासाठी , झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याचे आमिष दाखवून एका टिपिकल बाहुबलीकडे ओढला जातो आणि गुन्हेगारीच्या दलदलीत फसतो. जुळ्या मुलांपैकी एकाकडे लहानपणा पासून नेमबाजीचे स्किल असते (आणि तिरपागडे चालणारे डोकेही )आणि आई त्याला लहान असताना गुलालीने नेमबाजी करायला सहज शिकवते. तो मुलगाही वडिलांच्या वळणावर जातो. त्यातून पुढे झालेली त्या कुटुंबाची स्ट्रगल आणि परवड असा प्लॉट आहे. बघायला एन्गेजिंग वाटले. कदाचित ८- १० लहान एपिसोड्स ची सीरीज केली असती तर बेटर झाले असते. विशेष रेको म्हणजे यातली गाणी आवर्जून ऐकावी अशी मजेशीर आणि मस्त आहेत. म्यूझिक आणि लिरिक्स पण, एकदम टिपिकल यूपी, कानपूर फ्लेवर !! काही धृव घाणेकर ची आहेत काही अजून इतर गीतकार संगीतकार दिसतायत - इथे ऐकता येतील: ( त्यातले डियर कण्टरी, कनपुरिया कन्टाप, फिल्लम देखो ही तर नक्की ऐका
)
https://www.youtube.com/watch?v=yoy9tcwd_zs
निशान्ची मला पण आवडला. खुप
निशान्ची मला पण आवडला. खुप छान, प्रत्येक काळ पण बरोबर दाखवला आहे. तो बबलु अम्बिकाप्रसादच्या घरी एकदम बिंधास्त का जातो ते काय पचले नाही. तो सावध झाला आहे हे त्याला फोनवरुन माहित होते.
निशान्ची इंटरेस्टिंग वाटतोय.
निशान्ची इंटरेस्टिंग वाटतोय.
काल रात्री जागून अकेले हम
काल रात्री जागून अकेले हम अकेले तुम हा आमीर खानचा पिक्चर बघितला. क्रेमर vs क्रेमर ह्या होलीवूग मूवी वरून बेतलेला.
मस्त पिक्चर आहे.
माझ्या मते आमीर चा अर्वोत्कृष्ट सिनेमा . आश्चर्य आहे कि कुणी ह्या विषयी जास्त का बोलत नाही?
आवर्जून पाहावा असा सिनेमा. मला आवडला,
Dil Mera Churaya Kyun why did you break my heart
https://www.youtube.com/watch?v=mSu5cz2GFts
केकु मी बर्याच वर्षांपुर्वी
केकु मी बर्याच वर्षांपुर्वी पाहिला होता. याची गाणी प्रचंड गाजली होती. माझ्या भावाच्या लग्नाच्या कॅसेटमध्ये राजा को रानी से प्यार हो गया हे गाणे भावाने मुद्दाम सांगुन अॅड करुन घेतले होते इतका तो आमिर, गाणे व त्याच्या नवपरिणीत राणीच्या प्रेमात होता (याच क्रमाने).
आमिरने काम छान केलेय पण मला चित्रपटाचा उत्तरार्ध आवडला नव्हता. सुरवातीला थोडासा मनिषाच्या बाजुने झुकणारा चित्रपट अचानक झोपेतुन जागा झाल्यासारखा मनिषाला गिल्ट फिलिंग द्यायला लागतो. गिल्टी तर आमिरला वाटायला हवे होते. बायको सोडुन गेल्यावर आमिर घर व पोरगा बघायला लागतो, करीअर बॅकफुटवर टाकुन. ते त्याने आधीच केले असते तर मनिषावर घर सोडायची वेळ आलीच नसती. असो. हिंदी चित्रपटात असाच शेवट अपेक्षित असतो.
मीही बर्याच वर्षांपुर्वी
मीही बर्याच वर्षांपुर्वी पाहिला होता.
मला पण असंच वाटतं साधना. मनीषा ट्रेंड सिंगर असतानाही तो तिला चूल मूल करायला लावतो आणि मग त्याला गिल्ट आल्यावर मनीषा वाईट का? आमिरचा अभिनय उत्तम आहे पण प्रिमायसेसच पटला नाही. शिवाय first half मध्ये प्रेमाचा जरा जास्तच फापटपसारा आहे.
Last Christmas ऐकल्यामुळे 'दिल मेरा चुराया क्यों'बद्दल फार काही वाटलं नाही.
मला वाटलं कि दोघांच्याही
मला वाटलं कि दोघांच्याही बाजू चांगल्या मांडल्या आहेत. एक गोष्ट निश्चित आहे कि आमीर खूप उशीरा जागा झाला. त्यानेही आपल्या करिअरचा त्याग करून मुलाचा सांभाळ केला. शेवटी तो बाजी हरला. सिंगल पेरेंटचे काय प्रॉब्लेम्स असतात.
मी वर ज्या गान्ताची लिंक दिली आहे टे गाणे मला फार आवडले जरूर ऐका.
Last Christmas मी पण ऐकले आहे तरी देखील...
मला कित्येक मुळ गाणी आवडतात
मला कित्येक मुळ गाणी आवडतात तितकीच त्यांची हिंदी रुपांतरेही आवडतात. एल्विस प्रिस्लेचे मार्गरिटा ऐकायला आवडते पण रफीचे कौन है जो सपनोंमे आया…. कालातीत वाटते. चाल व अर्थ दोन्ही उधारीचे असले तरी …
दिल मेरा चुराया आवडते पण लास्ट ख्रिसमस मात्र जास्त आवडते, अनु मलिकला कॉपी पेस्ट पण धड जमत नाही.
माझेमन, चित्रपट पाहताना अचानक शिफ्ट जाणवते. मंसुरअली खान त्याला हवा तसा चित्रपट बनवत असताना अचानक त्याच्या लक्षात येते आपण हिंदी चित्रपट बनवतोय आणि तो प्रिमायसेसच बदलुन टाकतो
हेमामालिनी व शशी कपुरचा अभिनेत्री बघतानाही सेम असेच वाटलेय. हेमा अभिनेत्री आहे हे माहित असताना, तिच्या नृत्यावर व गाण्यावर मोहित होऊन शशी लग्न करतो. लग्नानंतर ती तिची करिअर पुढे सुरु ठेवते तेव्हा माझी आई कशी घरात लोर्या गुणगुणते तसे तुही लग्नानंतर घरात गुणगुणत बसणार असे मला वाटले असे म्हणुन तिला काम करायला बंदी घालतो. त्याच्या नजरेत स्त्रीची जागा फक्त चुल व मुल एवढ्याचपुरती आहे हे हेमाला कळते, ती त्याला सोडुन परत स्वगृही परतते, ज्या घरात स्त्रीला जराही किंमत नाही तिथे मी जाणार नाही म्हणते आणि शेवटच्या १५ मिनिटांत आधीच्या सगळ्या विचारांवर पाणी फिरवुन परत नवर्याकडे जाते. त्याचे विचार बदललेले दाखवले नाहीत, हीच घरात बसुन लोर्या गाणे बेस्ट हे स्वतःच ठरवते.
अचानक शेवटच्या दहा मिनिटात दिग्दर्शक किंवा जो कोणी असेल त्याला आठवते की दोन तास गेले, आता नेहमीच्या हिंदी चित्रपटाची मळलेली वाट धरली नाही तर थेटरात कोणी येणार नाही.
वो सात दिनच्या कथेशी साम्य असलेले कमीतकमी ५-६ चित्रपट तरी असतील - स्वामी, अपनापन, कसक, घरोंदा हे तिनचार चटकन आठवले. लग्नाआधीच्या प्रियकराला सोडुन दुसर्याच्या गळ्यात माळ घालाव्या लागणार्या मुलींचे लग्न मारझोड करणार्या नवर्यांशी जरी झाले असते तरी ते शेवटी सज्जन बनले असते.
विवाहित स्त्रीने शेवटी पती व संसार निवडायला हवा नाहीतर थेटरे ओस पडतील ही भिती सर्व संबंधितांना वाटते.
विवाहित स्त्रीने शेवटी पती व
विवाहित स्त्रीने शेवटी पती व संसार निवडायला हवा नाहीतर थेटरे ओस पडतील ही भिती सर्व संबंधितांना वाटते.>>> नाही पटले. काय आहे ना स्त्री ही बाय नेचर समजून घेणारी असते. त्या मुळेतर हे जग सुरकीत चालू आहे.
मासूम मध्ये शेवट काय आहे? मला आता आठवत नाही.
ऋन्मेऽऽष सर
ऋन्मेऽऽष सर
एक धागा काढ बाबा. कोण चूक कोण बरोबर.
आता थोडे नमक छिडकतो .
आम्ही रात्री तीन वाजता वाद घालत होतो कि हाच रोल आमिरच्या ऐवजी शाखाने केला असता तर?
सिनेमाची वाट लावली असती,
btw परवा रात्री "कल हो ना हो" बघितला. त्याबद्दल नंतर सवडीने लिहीन.
आधी आज रात्री आनंद बघणार मग बावर्ची आणि मग नंतर..,. लिहीन.
अनु मलिकला कॉपी पेस्ट करायला
अनु मलिकला कॉपी पेस्ट करायला जमत नाही हे खरे आहे. आणि मार्गारिटापेक्षा कौन हैं जो जास्त चांगले वाटते हे ही खरे.
बाकी जबरदस्तीने गळ्यात माळ घालायला लागणाऱ्या केसमध्ये स्वामी पटला होता मला. कारण तो विक्रम शबानाकडे आल्यावर गळी पडतो तेव्हा शबानाच्या मनात काही नसते. उलट गिरीश कर्नाडबद्दल जरा सहानुभूतीचा असते. पण तिचे सासरचे तिला हाकलवतात. रेल्वे स्टेशनवर गिरीश कर्नाड येतो तेव्हा तिला हायसंच वाटत असावं.
वो सात दिनही बरा वाटला होता. कारण पद्मिनी, अनिल कपूर प्रचंड ट्रॅडिशनल फॅमिलीतून आलेले असतात. त्यातल्या त्यात पद्मिनी बंड करते म्हणजे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते. पण तेही फेल जातं तेव्हा ते सामाजिक मानदंड मोडून काही ऍक्शन घेतील अश्या प्रकारातले नसतात.
एखादीने तरी भारतीय संस्कृतीला फारसं न जपता नवऱ्यालाच सोडलंय आणि आणि दोघे मजेत जगताहेत अशी स्टोरी पाहायची फार इच्छा आहे. अगदी मेट्रोमध्ये आपण एकाकडे मानसिकरीत्या आकर्षित झालो होतो ही कबुली देणारी शिल्पा स्वतःची १०० अफेअर्स असली तरी तिला मुलगी नेमकी कुणाची आहे असं विचारणाऱ्या केकेला पण सोडत नाही.
बाकी अचानक भारतीय संस्कृतीची आठवण येणाऱ्या नायिका पाहून भयंकर मज्जा वाटते. उदा पडोसन, पूरब और पश्चिम
मासूम बद्दल लिवा कि हो.
मासूम बद्दल लिवा कि हो.
आणि हो तो सलमान खान मला वाटत जब प्यार किसी से होता है.
मासूम मध्ये शेवट काय आहे?
मासूम मध्ये शेवट काय आहे?
>>>>
मासूम मध्ये शबानाचा मातृत्वभाव दुखावलेल्या पत्नीवर मात करतो. ती मुलाला स्वीकारते. सगळे घरी जातात पण ती नासिरला माफ करते का नाही मला वाटतं गुलदस्त्यात ठेवले आहे.
ओरिजिनल पुस्तकात मात्र तो मुलगा परदेशात कॉन्व्हेंटमध्ये जातो. बहुतेक कधीच परत येत नाही. ते वाचून फार वाईट वाटलं होतं.
कल हो ना हो मध्ये ही असा एक
कल हो ना हो मध्ये ही असा एक सूक्ष्म धागा आहे.
शबानाचा मातृत्वभाव>>> मी ही तेच म्हणतो आहे.
हे माझे मत नाहीय हो,
हे माझे मत नाहीय हो, चित्रपट काढणार्यांचे मत मी लिहिलेय. हल्ली मतपरिवर्तन झाले असले तर बरेच आहे.
ह्यात गॉडफादर ची थीम पण ॲड
ह्यात गॉडफादर ची थीम पण ॲड करा. राजा को रानी से प्यार हो गया ज्यावरून चोरले आहे ती थीम.
आणि हो तो सलमान खान मला वाटत
आणि हो तो सलमान खान मला वाटत जब प्यार किसी से होता है.
>>>>
त्याच्यात सलमानखानला सगळ्यात जास्त भीती काय तर ट्विंकल होऊ घातलेलं लग्न मोडेल याची. त्या मुलाला तो चक्क न्यूसन्स सारखा वागवत असतो.
मासूम अप्रतिम आहे. कारण नसीर आणि शेखर कपूर - आपण केलेली प्रतारणा, त्यामुळे दुखावलेली बायको, तिला सावरताना आपण मुलाच्या आईकडे परत वळूनही पाहिलं नाही ही गिल्ट, आपल्याला आपल्या मुलाबद्दल साध्या गोष्टीही माहित नाहीत याचं एक बाप म्हणून वैफल्य आणि मुलाला दूर तर करायचं नाहीये पण त्याला जबरदस्तीने संसारात घुसवून बायकोचा घरी दारी आणिक अपमान करायचा नाहीये याचं भान या गोष्टी फार सुंदर दाखवल्या आहेत.
सलमानकडून असल्या काही अपेक्षा करणंच चुकीचं.
"The divorce subject isn't as
"The divorce subject isn't as shocking, but Kramer vs. Kramer is still a thoughtful, well-acted drama that resists the urge to take sides or give easy answers"
क्रेमर vs क्रेमर रिव्यू मधून.
>>> एखादीने तरी भारतीय
>>> एखादीने तरी भारतीय संस्कृतीला फारसं न जपता नवऱ्यालाच सोडलंय आणि आणि दोघे मजेत जगताहेत
इजाजत
कभी अलविदा ना कहना
हे पटकन आठवले. पहिल्या स्पाउजेसना भेटल्यावर थोडा मेलोड्रामा करतात, पण इन जनरल नवीन आयुष्यात सुखी असावेत असं दिसतं.
कभी अलविदा ना कहना मध्ये
कभी अलविदा ना कहना मध्ये प्रीतीला जोडीदार मिळतो का? आठवत नाही मला. पण मुळात तिला शाहरुखच्या गळ्यात जबरदस्तीने माळ घालावी लागलेली नसते ना? मर्जीनेच झालेली असतात ना दोन्ही (पहिली) लग्नं?
इजाजत >>> येस्स
कभी कभी मधल्या राखीचं काय? मी पाहिला नाहीये तो.
मर्जीने असतात, पण मिसमॅच्ड /
मर्जीने असतात, पण मिसमॅच्ड / ड्रिफ्टेड अपार्ट असतात - आणि तेही व्हॅलिड कारण असू शकतं असं हिंदी सिनेमाने म्हणणं कौतुकास्पदच वाटलं मला, जरी ते केजो-स्टाइलने दाखवलं असलं तरी. तसंच प्रीती झिंटाच्या कॅरेक्टरने लगेच नवीन जोडीदार शोधायच्या भानगडीत न पडणंही.
राखी तिच्या मर्जीविरुद्ध झालेल्या लग्नात सुखी झालेली दाखवली आहे 'कभी कभी'मध्ये.
निशान्ची रेको घेतला आहे.
निशान्ची रेको घेतला आहे. धन्यवाद,
नवाजुद्दीन सिद्दीकीचा बंदूकबाज होता का ? पाहिलाय पण नीट आठवत नाही.
कोर्ट सीन, युक्तीवाद, तपास,
कोर्ट सीन, युक्तीवाद, तपास, डावपेच वगैरे अजून चालले असते जे तिघांच्या स्पीच पुरते राहिले. पण ते तिन्ही स्पीच छान जमले. ज्यात एक प्रतिस्पर्धी पक्षाचा वकिलाचा सुद्धा होता. आशय आणि विषय बरोबर पोहोचले. >> बरोबर.
मला वाटतं पार्ट वन मुळे तीच अपेक्षा प्रेक्षक करतो. पण या पिक्चरमधे कोर्ट रूम ड्रामा किंवा वकिली खोडे, युक्तीवाद यापेक्षाही विषयाला प्राधान्य दिलं आहे. बंदे मे है दम पण असाच होता. उगीच ओढून ताणून वकिली डावपेच दाखवण्याला फाटा मारला हे योग्य झालं. दोन नायकांमुळे रीळं एकमेकांचे क्लाएंट पळवापळवीत खर्ची पडली मग आटोपता घेतला.
धीरूभाईं वर बेतलेलं पात्र हिराभाई खेतान साकारणारे गिरीराज राव मस्त अॅक्टर आहेत. यात त्यांचं पात्र सुरूवातीला थंड डोक्याचा प्रोफेशनल वाटलं होतं, मधेच ते इगोइस्टिक आणि नंतर तोल सुटलेलं वाटलं. तरी पण त्यांनी ही सर्कस ताकदीने जमवलीय. दुसरा कुणी असता तर या पात्राचं माकड झालं असतं.
हा प्रश्न कुणी विचारला नाही
हा प्रश्न कुणी विचारला नाही जी समजा पत्नीच्या हातून लग्नापूर्वी/ लाग्नानंतर मोहाच्या क्षणी अशी चूक झाली तर पतीचा काय अटित्युड असेल ? आहे का असा काही सिनेमा ?
आणि तेही व्हॅलिड कारण असू
आणि तेही व्हॅलिड कारण असू शकतं असं हिंदी सिनेमाने म्हणणं कौतुकास्पदच वाटलं मला >>>> १००+
रिहाई - अरुणा राजे - विनोद
रिहाई - अरुणा राजे - विनोद खन्ना, हेमा मालिनी, नसीरुद्धिन शहा
एक पल - कल्पना लाजमी - शबाना, नसीर, फारुक शेख
आहे का असा काही सिनेमा ? >>
आहे का असा काही सिनेमा ? >> कथा - सई परांजपे, ललित प्रभाकरचा आरपार.
इतक्यातच ललित प्रभाकरचे प्रेमाची गोष्ट २ आणि आरपार असे दोन चित्रपट पाहीले. दोन्ही आवडले!
भरत.
भरत. जिज्ञासा
आभार.
आता हे सगळे पिक्चर बघतो.
अभिमान कोठे बसेल यात? त्यात
अभिमान कोठे बसेल यात? त्यात बायकोच्या करीयर बद्दल तक्रार नसते पण तिने जास्त लोकप्रिय होण्याबद्दल आकस असतो. शेवटी मिसकॅरेज वगैरे आठवते पण ती गाणे सोडते का लक्षात नाही.
मुंबई-पुणे-मुंबईतही बोलतात ना

Pages