माधव पिक्चर पाहिल्यावर जास्त चांगले कळेल. पण ही दिग्दर्शिका तर खूप नावाजलेली आहे. सोशल (सोशल सिक्युरिटी नं) मागण्याचा सीन तर वाचूनही विनोदी वाटतो. जेथून लोक थेट राष्ट्रीय सुरक्षितता लेव्हलच्या मिटिंगला जातात अशा सेण्टर मधे कधी कोणत्याही वेळी नक्की कोण काम करत आहे हे कोणालातरी फोन वर विचारावे लागणे हे विनोदी आहे. इव्हन एखाद्या स्पेसिफिक वेळी आत कोण आहे हे तेथील सिक्युरिटी सिस्टीम्सवरून "अधिकृत" लोकांना समजायला हवे. त्यामुळे तिला तो स्पॅम कॉल आला की काय अशी मला शंका आली. जामतारा मधे २-३ पोरे त्यावरून आता कसे पैसे कमवायचे याचा विचार करताना दाखवायला हवे होते.
ए हाउस ऑफ डायनामाइट - पाहिला. दोन्ही बाजूचे पटतेय
मला टाइमलाइन मागे पुढे करून वेगवेगळ्या लोकांचा तो डे कसा चालला होता आणि त्यांच्या त्यावर अॅक्शन्स कशा होतात ते पहायला इन्टरेस्टिंग वाटले. वेगवेगळे किती प्रकारचे लोक, ज्यांची नावे तर सोडाच , पण त्यांचे डिपार्टमेन्ट्स, ग्रुप्स, टायटल्स अस्तित्वात आहेत हेच सामान्यांना कधी माहित नसतात, ते अशा प्रकारच्या क्रिटिकल डिसिजन्स मधे केवढे इन्फ्लुअन्स करतात/ करू शकतात ते पहाताना एक वेगळच अँगल मिळतो. गोष्टित एखाद्याने अशा प्रेशर खाली आत्महत्या करणे किंवा प्रेसिडेन्ट अशा डिसिजन साठी प्रिपेअर्ड नसणे याचे फार आश्चर्य वाटले नाही. तीही माणसेच आहेत.
पण न झेपणारे पॉइन्ट नक्कीच आहेत - अशा सुपर सिक्रेट कॉलवर तो एक जण कुठेही पब्लिक प्लेस मधे चालत पळत बोलत असतो ते रिडिक्युलस वाटले. सोशल्स चेही मला काही कळले नाही, कशाला मागितले आणि एखाद्या सिनियर सिटिझन बाईने ग्रोसरी लाइन मधे पर्समधले कूपन्स हुडकावे तसे त्या प्रेसिडेन्ट ने खिश्यातल्या डॉलर बिल्स मधून ते एस ए एस की काय ते कार्ड काढणे बघून खरोखर अस्थानी हसू येते. आणि मेन म्हणजे मिसाइल इन्टरसेप्टिंग मेकॅनिजम चा फक्त ६०% स्ट्राइक रेट ??? तोच मला वाटते सगळ्यात मोठा फ्लॉ असावा प्लॉट मधला.
Submitted by maitreyee on 2 November, 2025 - 10:16
धनुषने लिहीलेला आणि दिग्दर्शित केलेला हा सिनेमा आवडला. परंपरा आणि संस्कृतीचा डोस पाजण्याचा प्रयत्न नाही, गड्या आपुला गाव बरा जॉन्राच्या मको छाप सिनेमातला भडकपणा नाही. दाक्षिणात्य सिनेमातला बटबटीतपणा नाही, तरीही अस्सल दाक्षिणात्य सिनेमा आहे. काश, तमिळ समजत असतं तर ती भयंकर डबडी गाणी ऐकायची पाळी आली नसती.
चित्रपटाच्या सुरूवातीपासूनच्या फ्रेम्स सुंदर आहेत. लक्ष वेधून घेणार्या. तमिळनाडूच असं नाही, भारतातलं कोणतंही खरं खुरं गाव. रस्ता आणि घरं दाखवल्ल्यावर पंचायतची आठवण झाली.
एक बसस्टॅण्डजवळचं छोटंसं झोपडीवजा हॉटेल आहे ज्याचं नाव आहे इडली कडाई. शिवनेसन हा ते हॉटेल चालवतो. पहाटे तीन वाजता उठून देवपूजा, स्नान उरकून दोन हातात दोन पिशव्या घेऊन तो हॉटेलकडे चालू लागतो. हा त्याचा नित्यक्रम आहे. चार वाजता तो पाटा वरवंटा आणि दगडी उखळ यावर इडलीचं बॅटर हाताने बनवतो. चटणी बनवतो. चार वाजता बनावलेलं बॅटर संध्याकाळसाठी आणि रात्री घरून बनवून आणलेलं बॅटर सकाळसाठी असा त्याचा शिरस्ता आहे.
त्याच्य हातची इडली आजूबाजूच्या गावातच काय जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. लोक कामावर जाण्याआधी त्याच्याकडे इडली खाऊन जातात. त्याचे आदर्श महात्मा गांधी आणि अहिंसा आहे. अहिंसेबद्दलचा सुविचार स्वहस्ताक्षरात त्याने हॉटेलमधे लिहीलेला आहे. हॉटेल म्हणजे दोन बाकडी आहेत. पण त्याच्या हातची चव संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे.
लहान मुरुगण (हिंदी डबींग मधे मुरली) त्याच्या बरोबर कधी कधी मागे लागून येतो. शिवनेसन च्या आवाजात कौतुक आहे. "माझ्याबरोबर येणार ?" असं तो डोळे मोठ्ठे करून म्हणतो. त्यात प्रेम आहे, कौतुक आहे. लहान मुरुगन बाबाचं बोट धरून पहाटेच्या अंधारात हॉटेलकडे निघतो. निर्मनुष्य रस्ता, दोन्ही बाजूची बंद घरं आणि बापलेकाची पाठमोरी जोडी हे दृश्य हृदयस्पर्शी आहे. साध्या साध्या घरांच्या फ्रेम्समुळे चकचकीतपणा कडे लक्षच जात नाही. सगळं लक्ष भावनांच्यात राहतं. वडील असतील किंवा नसतील जर त्यांची आठवण येत असेल तर हा चित्रपट हळवा करून सोडतो. जर रूक्षपणे पाहिला तर मग पिसं काढायला मन धजावेल.
मुलगा मोठा झाला आहे. त्याला वडलांचं हे छोटंसं हॉटेल खूप संथ जीवनशैलीचं निदर्शक वाटतं. फ्रँचायजीस द्याव्यात, आधुनिक मिक्सर लावावेत हा त्याचा आधुनिक विचार आहे. पण त्याचे वडील अजिबात न चिडता शांतपणे समजावत असतात कि मिक्सरला कधीच हाताची चव येत नाही. आणि फ्रँचायजी बद्दल ते विचारतात कि मी सगळीकडे कसा असेन ?
यावर धनुष म्हणतो कि आपण ट्रेन करूयात.प्रत्येक शाखेतले लोक तिकडे इडल्या बनवतील. यावर त्याचे वडील म्हणतात कि मग माझे नाव नको देऊस. हा ग्राहकांचा विश्वास तोडणे आहे. लोक चवीसाठी येतात. ती चव दुसर्याच्या हाताला येत नाही. यावर मुरुगनची चिडचिड होते.
वडलांना व्यवहार समजत नाही म्हणून तो गाव सोडून जातो. बँकॉक मधे त्याच्या मेहनतीमुळे एका मोठ्या रेस्तराँ ग्रुपच्या वरीष्ठ प दावर जातो. मालकाच्या मुलीशी त्याचं लग्न होणार असतं. मालक म्हणजे आपले कटप्पा. त्यांचा मुलगा function at() { [native code] }इलाडाए वाया गेला आहे. त्यातच मुरुगनचं उदाहरण सातत्याने वडील देतात म्हणून तो त्याच्यावर खार खाऊन आहे.
एकीकडे मुरुगनचे वडील या अपेक्षेत असतात कि मुलगा येईल आणि हॉटेल सांभाळेल. प्रगतीच्या मागे धावून जगणं विसरू नकोस हा त्यांचा सल्ला असतो. दुसरीकडे कटप्पा पण मुलाच्या प्रेमात अंध झालेला असतो. पोलीस केसेस होत असतात. पण पोलीस त्या मिटवत असतात. एके दिवशी मुरुगन विचारतो कि एक कानाखाली का ठेवून देत नाही ? त्यावर कटप्पा सांगतात कि त्याची आई गेल्याने मुलीपेक्षा माझं त्याच्यावर प्रेम आहे.
लग्नाची तयारी चालू असताना आईचा फोन येतो कि तुझे बाबा देवाघरी गेले,अंत्यसंस्काराला येशील ना ?
मीरा आणि तिच्या घरचे त्याला सांगतात कि जाऊन ये पण देशविदेशात पत्रिका गेल्या आहेत. लग्न डोक्यावर आहे, सगळं लवकर उरकून लगेच ये. मीरा कंपनीचा एक अधिकारी मुरुगन बरोबर पाठवते. म्हणजे तो त्याला घेऊन येईल.
इकडे मुरुगनचं मत हळूहळू बदलू लागतं. त्याची आई सुद्धा दुसर्या दिवशी जगाचा निरोप घेते. हळू हळू वडलांनी गावात काय इज्जत कमावली होती हे त्याला समजू लागतं. वडलांनी कधीच त्याला सक्ती केलेली नाही. पण त्यांचे डोळे सतत त्याची वाट बघत होते. असे काही प्रसंग घडतात कि मुरुगन गावात राहून हॉटेल पुढे चालवण्याचा निर्णय घेतो. अनेक अडचणी येतात. दगडी वरवंट्याने त्याला बॅटर बनवता येत नाही. इडली मनासारखी होत नाही.
एक दिवस त्याचे वडील त्याला जागेपणी स्वप्नात येऊन सांगतात कि मी तुझ्यातच आहे. तुझ्या रक्तात आहे. तू ही कला बाहेर काढ. त्या दिवसानंतर तो जिद्दीने पहाटे उठून जड वरवंट्याने बॅटर बनवतो. नेहमी येणारा एक वयस्कर ग्राहक त्याची इडली खातो आणि त्याच्या डोळ्यात अश्रू येतात. शिवनेसन पुन्हा आलाय का ? असं तो बिचारतो.
हळू हळू धनुषला हे आयुष्य आवडू लागतं. पण संकटं वाट बघत असतात. पण हार न मानता पुन्हा बँकॉकला न जाता तो ते हॉटेल कसं चालवतो याची एक साधी सरळधोपट पण हृदयस्पर्शी कहाणी , जर अशा कथेची आवड असेल तर नक्की पहा.
चक्क हॉलीवूडच्या पिक्चरची पिसं काढलीत. >>> "केहना क्या चाहती हो बहन?" अशी अवस्था करून टाकली सिनेमाने मग काय करणार?
तुम्ही लिहिलंय तशी कल्पना असलेला >>> थोड्या फरकाने बॉलीवूड्मध्ये पण असा प्रयोग झाला होता युवा मध्ये. तो प्रयोग मला आवडला होता तेंव्हा. पण त्यात तीन वेगवेगळी पात्रे आणि त्यांच्या ३ कहाण्या एका पॉईंटला एकत्र येतात.
कमाल वेगापर्यंत पोहचू शकते ज्याला इंटरसेप्ट करणे आजघडीला अशक्य (near to impossible) गोष्ट आहे. >>> फेअर पॉइंट. पण हा मुद्दा काही सगळ्या प्रेक्षकांना माहीत नसणार. थोडा खुलवून / समजावून सांगणे भाग होते. पण बेसुमार पात्रे आणि बेसुमार जार्गन्स यांच्या नादात याकडे सपशेल दुर्लक्ष झाले आहे. ६०% सक्सेस रेटचा मुद्दा येतो तेंव्हा तो इतका कमी का हे समजावून सांगायची संधी होती पण ती वाया दवडली आहे.
पण ही दिग्दर्शिका तर खूप नावाजलेली आहे. >>> गुणवत्ता आणि प्रसिद्धी यांचा संबंध असतोच असे नाही. किंवा कधीकधी प्रयोग फसतोही. या सिनेमात कथा नसणे, शेवट नसणे आणि एकच घटनाक्रम तीन वेळा वापरणे असे तीन प्रयोग केले आहेत. त्या तिघांचा एकत्रीत परीणाम मला तरी अत्यंत रटाळ वाटला.
वेगवेगळे किती प्रकारचे लोक, ज्यांची नावे तर सोडाच , पण त्यांचे डिपार्टमेन्ट्स, ग्रुप्स, टायटल्स अस्तित्वात आहेत हेच सामान्यांना कधी माहित नसतात >>> याचा इतका भडीमार केला आहे की २-३ वेळा मी मागे जाऊन ते लक्षात ठेवायचा प्रयत्न केला (हे असे होऊ देणे हेच मुळात चुकीचे आहे कारण थेटरमध्ये मागे जाणे शक्य नसते. पण आजच्या ओटीटीच्या जमान्यात ते क्षम्य असू शकते). पण माझ्या लक्षात ठेवण्याचा काहीच उपयोग नाहीये कारण एका पात्राचे दुसर्या पात्राशी काही देणे घेणेच फारसे नाहीये हे समजल्यावर मी सगळे डोक्यातून फ्लश केले.
मैत्रेयी +१ . जितकी टीका झाली आहे तितकही काही वाईट नाही हा चित्रपट . ट्रिटमेंट आणि थीम वेगळी आहे हे सुरुवातीलाच कळत.
हाउस ऑफ डायनामाईट हा चित्रपट टिपिकल संकट आणि त्याचे हरण करणारा उद्धरकर्ता या दृष्टिकोनातून पाहिल्यास बंडल वाटेलच . त्या चित्रपटाची ती थीम नाहीच आहे. थिम आहे ती आपत्तीला सामोरे जाताना वेगवेगळ्या माणसांच्या प्रतिक्रिया . मोठ्या पदावरील असली तरीही ती माणसेच आहेत . पूर्ण मानवजात ज्या अस्त्रामूळ चिंतेत आहे ते अस्त्र आपल्याच देशावर पडणार आहे हे कळतच कोणीही भांबावून जाऊ शकतो . मुंबईवर २६/११ हल्ला अश्या रीतीने होईल ही कल्पना तरी कोणी केलेली का ? त्यावेळी देखील सुरुवातीची सुरक्ष यंत्रणांची प्रतिक्रिया हे गॅंगवॉर आहे अशीच होती . त्या दृष्टिनेच पहिला रिस्पॉन्स दिला गेला. नंतर नुकसान झाल्यावर हल्ल्याचे गांभीर्य समजले. तोपर्यंत सगळेजण आपल्या परिनेच रिस्पॉन्स करत होते.
राहिली गोष्ट मागे जाऊन घटना सांगण्याची तर मला पद्धत आवडली . नीट बघितल्याने समजली देखील
चित्रपटात फ्लॉज जरूर आहेत . विशेषत अमेरिकेसारख्या देशात मिसाईल विरोधी यंत्रणा नसणे . पण वर फार्स यांनी लिहिल्याप्रमाण अपवाद आहेत अमेरिकेतही . तसेच अमेरिकेच्या शत्रुराष्ट्राचा उल्लेख आहे, मित्र राष्ट्राचा काहीच उल्लेख नाही . त्यातच पाकिस्तान अमेरिकेविरुद्ध दंड थोपटून उभा राहिला आहे असा उल्लेख आल्याने तर टडोपाच झाले
अतिशय फुसका.. टिपिकल.. नॉर्थ इंडियन आणि साऊथ इंडियन यांच्या स्टिरीओटाईप्सने ओतप्रोत भरलेला.
मलाही कुकरमधून भात पानात घेऊन कालवेपर्यंत हे प्रेमात कसे पडले काही कळेना.
जान्हवी काही काही ठिकाणी फार श्रीदेवीची आठवण करून देते. विशेषतः तिचा "वोई तो" (वहीं तो) हा डायलॉग ऐकताना. केरळात तिच्या वयाच्या मुली इतक्या सर्रास रोजच्या वावरात साड्या नेसतात हे बघून आश्चर्य वाटलं. आणि मग तसल्या पारंपरिक साडीवर पूर्ण पाठ आणि काही ठिकाणी संपूर्ण पोट, छाती, बेंबी वगैरे उघडी राहील/ पडेल असे ब्लाऊज. :कपाळबडवंती:
पिसं काढायला बसले तर सिनेमा नागडा होईल इतका बोर आणि टिपिकल आहे.
मी तो इडली कडाई बघायला घेतला. सॉलिड पीळ आहे बाबा. साऊथ इंडियन सिनेमातले सदगुणी हीरो, कुटुंबवत्सल, मेहनती, सच्छील वडील, बडे बाप का बिगडा बेटा, कंपनीच्या मालकाच्या होणार्या जावयाला बँकॉक मधल्या ऑफिसमधे आल्यावर उभं राहून विश करणारे साऊथ इंडियन कर्मचारी वगैरे सगळे क्लिशे भरले आहेत. वर कुणीतरी लिहिलेल्या रिव्ह्यूत हे सुद्धा कळलं की स्टोरी पण अपेक्षित मार्गानेच पुढे जाते. जाऊ दे, वेळ वाचवावा.
धनुष अतरंगी आहे. मला मजा येते त्याचे पिक्चर बघायला. एकदा रांझना पाहिला होता तेव्हापासून सपाट्याने बघू लागलो.
पण इडली कढई ट्रेलर बघून बघावासा वाटला नव्हता. आता इथले रिव्ह्यू वाचून बघेन असे वाटत नाही.
पण काही सांगता येत नाही. अचानक मला तर आवडला बाई गट सक्रिय झाला तर विचार बदलेल सुद्धा..
परमसुन्दरी पहाण्याचा मी ही प्रयत्न केला .
प्रचंड स्तीरीओटाईप .
ईडली-डोसा विरुद्ध आलू पराठे . अंगठी हरवणं , बाईकवरून फिरताना प्रेमात पडणं , माझे बाबा माझे हिरो टाईप्स संभाषण , कलरीपट्टूमध्ये मुद्धामून अडकवणं , मार खायला लावण , मग हिरोगीरी , पस्चाताप, .. प्लीजच ...grow up ! ( मी ईथपर्यन्तच बघितला , पुढे बघण्याची ईच्च्छाच नव्हती)
जान्वी एरवी तर PJ , स्कर्ट वापरते , मग मध्ये मध्ये साड्या वापरण्याचं प्रयोजन कळलं नाही .
हीच्या ऐवजी रश्मिकाला घेतलं असतं तर अॅक्सेन्ट नॅचरली आला असता.
एक प्रश्न जो माझ्या लेकाने विचारला , पण मी सुरुवातीपासूनच लक्श देउन न बघितल्यामुळे उडवून लावला " जी मुलगी सोशल मिडीयावर नाहीये , ती या लोकांचं नवीन अॅप रजिस्टर करून आपली माहिती का देइइल ?? "
ह्युमन्स इन लुप हा हिंदी चित्रपट नफ्लिवर पाहिला.खुप बक्षिसे मिळालीत, लोक कौतुक करताहेत म्हणुन मी पाहिला. मला चित्रपट काहीही कळला नाही.
ए आयसाठी हजारो फोटो गोळा करुन त्याला लेबलिंग करुन तो डेटा एआयला पुरबुन त्याला शिकवत राहायचे हा चित्रपटाचा एक भाग. झारखंडातल्या एका आदिवासी खेड्यातल्या १०-१२ बायका या लेबलिंगचे काम करतात त्यात एक आपली नायिका. फोटो व लेबल्स दोन्ही क्लायंट्ने पुरवले आहेत. यांना योग्य फोटो व लेबलचे लग्न लावायचे आहे.
तिने तिच्या जमातीबाहेरच्या माणसाबरोबर जमातीच्या पद्धतीने लग्न केलेय ज्याला भारतीय कायद्यात मान्यता नाही. २ मुले झाल्यावरही ती शहरात रमु शकत नसल्याने परत गावात येते. मुलगी १०-१२ वर्षांची दाखवलीय, दुसरे मुल काही महिन्यांचे दाखवलेय आणि ही शहरातुन आलीय हा उल्लेख आलाय. इतकी वर्षे शहरात होती तर तिकडचे मान्यताप्राप्त लग्न का केले नाही कळले नाही. गावाने तिच्यावर बहिष्कार नक्की का टाकलाय हेही कळले नाही. बहुतेक जमातीबाहेर लग्न हे कारण असावे पण ट्रायबल शब्दांचा अर्थ कळत नसल्याने मला कळले नाही. बाप मुलीला न्यायला तडफडतोय तर हिला शिक्षणाची धड सोय नसलेल्या, स्वतः बहिष्कारीत असल्यामुळे मुलीला मैत्रिणी मिळणे कठिण असलेल्या गावात मुलीला हट्टाने ठेवायचेय.
३०-३५ वर्षांपुर्वीचे समांतर चित्रपट असेच असत. वेग अगदीच कासवाचा आहे.
काल पगलेट पाहिला.
थोडासा स्पीड कमी असूनही फार आवडला चित्रपट
स्वचा शोध लागण्याची प्रोसेस असे म्हणता येईल
ऍक्टर्स सगळेच चांगले आहेत.
सान्या मल्होत्रा लीड ऍक्टर
पगलेट मलाही आवडला होता.
छान होता. वेगळा होता.
तशी पोस्ट लिहिली असेल कुठेतरी.
कधी विस्मरणात जाईल तेव्हा पुन्हा बघायलाही आवडेल.
कारण शेवट बघितल्यावर एक समाधान मिळते त्या कॅटेगिरी मधील आहे.
जिम मध्ये गाणी ऐकताना सावन वर 90 डान्स हिट्स गाणी लावलेली
तेव्हा बादशाह आणि मै खिलाडी तू अनाडी चित्रपट आठवले.
पाहिलेत तेव्हा आवडलेले आणि इंटरटेनिंग होते.
खलनायक देखील पाहिला नाहीये हे जाणवले.
मागच्या आठवड्यात मोकळ्या वेळेत बादशाह लावला.
शारुखचे फार कमी चित्रपट आवडलेले त्यातला हा एक मॅड कॉमेडी म्हणून. पहिल्या वेळी इतका फार भारी वाटला नाही पण आवडलाच.
Vfx नाही, अचाट अतर्क्य मारामारी नाही.
कॉमेडी साठी बरंच काही केलंय ते अतर्क्य आहे पण ते आवडते.
मै खिलाडी तू अनाडी आणि खलनायक बघायचा आहे आता
वेळ manage करून बघणार.
घरचे ज्युनियर पोस्टर बघून हा नकोच बघायला असे ठरवतात.
बादशाह मी थिएटरमधे पाहिला होता. मस्त होता. मै खिलाडी तू अनाडी सुद्धा थिएटरमधेच पाहिला होता. तो आवडला होता का ते लक्षात नाही.
"चायना गेट' परत पाहिला. काही प्रसंग आता बाळबोध वाटले तरी पिक्चर अजूनही एंगेज करतो. फौजी लोकांची कामे चांगली आहेत. परेश रावळही मस्त आहे. मात्र मुकेश तिवारीचे काम तेव्हाही आवडले होते आणि आता पुन्हा बघतानाही आवडले. त्याच्या संवादफेकीत एक "नाद" आहे.
हा पिक्चर भारतात नक्की कोठे घडतो हा मात्र सस्पेन्स आहे. यातला परिसर शोलेसारखाच बंगलोरजवळचा वाटतो - हिमालयाजवळचा वाटत नाही. पोलिसही कर्नाटक पोलिस जसे हॅट्स घालतात तसेच दिसतात. सुरूवातीचे सीन्स हिमाचल मधले वाटतात. मुकेश तिवारीची भाषा उत्तरेकडची लगान मधल्यासारखी आहे. बाकी गावकरी वेगळेच हिंदी बोलतात. हे सगळे फौजी लोक सुरूवातीला साउथ मधे कोठेतरी जमून पुणे-मुंबई रेल्वेने देवदुर्गला जातात.
यावर शोलेचा (व शोलेवर ज्यांचा आहे त्या पिक्चर्सचा) प्रभाव होता हे कॉमन नॉलेज आहेच. पण शोलेशी साम्य असलेली आणखी एक गोष्ट सापडली - यातही विजू खोटे एका सीनमधे त्याच्याबरोबरचे इतर लोक हसू लागल्यावर मग हसू लागतो
राजकुमार संतोषी खरंच खूप चांगला दिग्दर्शक होता, आता त्याचा फॉर्म गेलाय. घायल, दामिनी, घातक, चायना गेट, अंदाज अपना अपना, खाकी, पुकार,.Legend of Bhagat Singh अजूनही चांगले वाटतात
Submitted by Sadha manus on 4 November, 2025 - 11:09
मै खिलाडी तू अनाडी .. मस्त आठवण काढली. अक्षय कुमार आणि सैफ जोडीची भारी क्रेझ झालेली तेव्हा. अमिताभ आणि ऋषी कपूर सारखी. अक्षय कुमार या पोलिस इन्स्पेक्टर सोबत सैफ अक्टिंग शिकायला म्हणून त्याच्या सोबत राहणार या सिच्युएशनमध्ये मस्त सीन होते त्यांच्यात. लहानपणीच खूपदा पाहिला होता. पण आता पुन्हा एकदा बघायला हवा.
त्यातले ते लडकी देखी मूह से सिटी बजे हात से ताली ही लाईन आजही मी अध्येमध्ये गुणगुणतो.
यावर शोलेचा (व शोलेवर ज्यांचा आहे त्या पिक्चर्सचा) प्रभाव होता हे कॉमन नॉलेज आहेच. पण शोलेशी साम्य असलेली आणखी एक गोष्ट सापडली - यातही विजू खोटे एका सीनमधे त्याच्याबरोबरचे इतर लोक हसू लागल्यावर मग हसू लागतो >> मस्त निरीक्षण. चायना गेटवर प्रस्तुती अंगाने शोलेचा प्रभाव फारच आहे, त्यामुळे तो अनेकांना भावला नसणार. पण कथेच्या अंगाने तो सेव्हन समुराईशी, किंवा द मॅग्निफिसण्ट् सेव्हनशी शोलेपेक्षा जास्त (म्हणजे शोले हा सेव्हन समुराईशी जितका जवळ गेलाय त्यापेक्षा जास्त) जवळ जातो. शोले हा द गुड द बॅड ॲंड द अग्लीशी जास्त जवळ आहे हे बहुश्रुत आहेच. अर्थात हे सर्वच पिक्चर सेव्हन समुराईशी नातं सांगत असल्यामुळे "सब मिले हुए हैं जी"चा फील येतो.
Submitted by हरचंद पालव on 4 November, 2025 - 19:31
पाहून बरेच महिने/वर्षे झाली. सेव्हन समुराई यूट्यूबवर होता, आता नाहीये. द मॅग्निफिसण्ट् सेव्हन प्राइमवर होता. त्याचा २०१६ मध्ये रिमेक पण आला होता पण तो मी पाहिला नाही.
Submitted by हरचंद पालव on 4 November, 2025 - 23:30
चायना गेट पाहिलेला नाहीये. Story line माहीत आहे.
पण त्यातील छम्मा छम्मा आणि उर्मिला आठवतेय.
त्यातल्या व्हिलनचा "मेरे मन को भाया " हा डायलॉग आजही आठवतो आणि मित्रमंडळी योग्य ठिकाणी वापरतात.
फा
म्हणतो तसे तेव्हाचे चित्रपट पाहताना काही सिन्स बाळबोध वाटतात पण दुर्लक्ष करून बघतो आपण.
मला तिसरी मंझील चित्रपट पाहायचा आहे.
कुठल्या ott वर आहे?
माधव पिक्चर पाहिल्यावर
माधव
पिक्चर पाहिल्यावर जास्त चांगले कळेल. पण ही दिग्दर्शिका तर खूप नावाजलेली आहे. सोशल (सोशल सिक्युरिटी नं) मागण्याचा सीन तर वाचूनही विनोदी वाटतो. जेथून लोक थेट राष्ट्रीय सुरक्षितता लेव्हलच्या मिटिंगला जातात अशा सेण्टर मधे कधी कोणत्याही वेळी नक्की कोण काम करत आहे हे कोणालातरी फोन वर विचारावे लागणे हे विनोदी आहे. इव्हन एखाद्या स्पेसिफिक वेळी आत कोण आहे हे तेथील सिक्युरिटी सिस्टीम्सवरून "अधिकृत" लोकांना समजायला हवे. त्यामुळे तिला तो स्पॅम कॉल आला की काय अशी मला शंका आली. जामतारा मधे २-३ पोरे त्यावरून आता कसे पैसे कमवायचे याचा विचार करताना दाखवायला हवे होते.
ए हाउस ऑफ डायनामाइट - पाहिला.
ए हाउस ऑफ डायनामाइट - पाहिला. दोन्ही बाजूचे पटतेय
आणि एखाद्या सिनियर सिटिझन बाईने ग्रोसरी लाइन मधे पर्समधले कूपन्स हुडकावे तसे त्या प्रेसिडेन्ट ने खिश्यातल्या डॉलर बिल्स मधून ते एस ए एस की काय ते कार्ड काढणे बघून खरोखर अस्थानी हसू येते. आणि मेन म्हणजे मिसाइल इन्टरसेप्टिंग मेकॅनिजम चा फक्त ६०% स्ट्राइक रेट ??? तोच मला वाटते सगळ्यात मोठा फ्लॉ असावा प्लॉट मधला.
मला टाइमलाइन मागे पुढे करून वेगवेगळ्या लोकांचा तो डे कसा चालला होता आणि त्यांच्या त्यावर अॅक्शन्स कशा होतात ते पहायला इन्टरेस्टिंग वाटले. वेगवेगळे किती प्रकारचे लोक, ज्यांची नावे तर सोडाच , पण त्यांचे डिपार्टमेन्ट्स, ग्रुप्स, टायटल्स अस्तित्वात आहेत हेच सामान्यांना कधी माहित नसतात, ते अशा प्रकारच्या क्रिटिकल डिसिजन्स मधे केवढे इन्फ्लुअन्स करतात/ करू शकतात ते पहाताना एक वेगळच अँगल मिळतो. गोष्टित एखाद्याने अशा प्रेशर खाली आत्महत्या करणे किंवा प्रेसिडेन्ट अशा डिसिजन साठी प्रिपेअर्ड नसणे याचे फार आश्चर्य वाटले नाही. तीही माणसेच आहेत.
पण न झेपणारे पॉइन्ट नक्कीच आहेत - अशा सुपर सिक्रेट कॉलवर तो एक जण कुठेही पब्लिक प्लेस मधे चालत पळत बोलत असतो ते रिडिक्युलस वाटले. सोशल्स चेही मला काही कळले नाही, कशाला मागितले
माक ५ पासून पुढे हायपरसॉनिक
माक ५ पासून पुढे हायपरसॉनिक म्हणतात हो. Happy@>>> हो हपा ती चुकी झाली
पण त्या मुळे माझ्या प्रतिसादाच्या सत्यतेत काही फरक पडत नाही.
इडली कडाई - नेटफ्लिक्स
इडली कडाई - नेटफ्लिक्स
धनुषने लिहीलेला आणि दिग्दर्शित केलेला हा सिनेमा आवडला. परंपरा आणि संस्कृतीचा डोस पाजण्याचा प्रयत्न नाही, गड्या आपुला गाव बरा जॉन्राच्या मको छाप सिनेमातला भडकपणा नाही. दाक्षिणात्य सिनेमातला बटबटीतपणा नाही, तरीही अस्सल दाक्षिणात्य सिनेमा आहे. काश, तमिळ समजत असतं तर ती भयंकर डबडी गाणी ऐकायची पाळी आली नसती.
चित्रपटाच्या सुरूवातीपासूनच्या फ्रेम्स सुंदर आहेत. लक्ष वेधून घेणार्या. तमिळनाडूच असं नाही, भारतातलं कोणतंही खरं खुरं गाव. रस्ता आणि घरं दाखवल्ल्यावर पंचायतची आठवण झाली.
एक बसस्टॅण्डजवळचं छोटंसं झोपडीवजा हॉटेल आहे ज्याचं नाव आहे इडली कडाई. शिवनेसन हा ते हॉटेल चालवतो. पहाटे तीन वाजता उठून देवपूजा, स्नान उरकून दोन हातात दोन पिशव्या घेऊन तो हॉटेलकडे चालू लागतो. हा त्याचा नित्यक्रम आहे. चार वाजता तो पाटा वरवंटा आणि दगडी उखळ यावर इडलीचं बॅटर हाताने बनवतो. चटणी बनवतो. चार वाजता बनावलेलं बॅटर संध्याकाळसाठी आणि रात्री घरून बनवून आणलेलं बॅटर सकाळसाठी असा त्याचा शिरस्ता आहे.
त्याच्य हातची इडली आजूबाजूच्या गावातच काय जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. लोक कामावर जाण्याआधी त्याच्याकडे इडली खाऊन जातात. त्याचे आदर्श महात्मा गांधी आणि अहिंसा आहे. अहिंसेबद्दलचा सुविचार स्वहस्ताक्षरात त्याने हॉटेलमधे लिहीलेला आहे. हॉटेल म्हणजे दोन बाकडी आहेत. पण त्याच्या हातची चव संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे.
लहान मुरुगण (हिंदी डबींग मधे मुरली) त्याच्या बरोबर कधी कधी मागे लागून येतो. शिवनेसन च्या आवाजात कौतुक आहे. "माझ्याबरोबर येणार ?" असं तो डोळे मोठ्ठे करून म्हणतो. त्यात प्रेम आहे, कौतुक आहे. लहान मुरुगन बाबाचं बोट धरून पहाटेच्या अंधारात हॉटेलकडे निघतो. निर्मनुष्य रस्ता, दोन्ही बाजूची बंद घरं आणि बापलेकाची पाठमोरी जोडी हे दृश्य हृदयस्पर्शी आहे. साध्या साध्या घरांच्या फ्रेम्समुळे चकचकीतपणा कडे लक्षच जात नाही. सगळं लक्ष भावनांच्यात राहतं. वडील असतील किंवा नसतील जर त्यांची आठवण येत असेल तर हा चित्रपट हळवा करून सोडतो. जर रूक्षपणे पाहिला तर मग पिसं काढायला मन धजावेल.
मुलगा मोठा झाला आहे. त्याला वडलांचं हे छोटंसं हॉटेल खूप संथ जीवनशैलीचं निदर्शक वाटतं. फ्रँचायजीस द्याव्यात, आधुनिक मिक्सर लावावेत हा त्याचा आधुनिक विचार आहे. पण त्याचे वडील अजिबात न चिडता शांतपणे समजावत असतात कि मिक्सरला कधीच हाताची चव येत नाही. आणि फ्रँचायजी बद्दल ते विचारतात कि मी सगळीकडे कसा असेन ?
यावर धनुष म्हणतो कि आपण ट्रेन करूयात.प्रत्येक शाखेतले लोक तिकडे इडल्या बनवतील. यावर त्याचे वडील म्हणतात कि मग माझे नाव नको देऊस. हा ग्राहकांचा विश्वास तोडणे आहे. लोक चवीसाठी येतात. ती चव दुसर्याच्या हाताला येत नाही. यावर मुरुगनची चिडचिड होते.
वडलांना व्यवहार समजत नाही म्हणून तो गाव सोडून जातो. बँकॉक मधे त्याच्या मेहनतीमुळे एका मोठ्या रेस्तराँ ग्रुपच्या वरीष्ठ प दावर जातो. मालकाच्या मुलीशी त्याचं लग्न होणार असतं. मालक म्हणजे आपले कटप्पा. त्यांचा मुलगा function at() { [native code] }इलाडाए वाया गेला आहे. त्यातच मुरुगनचं उदाहरण सातत्याने वडील देतात म्हणून तो त्याच्यावर खार खाऊन आहे.
एकीकडे मुरुगनचे वडील या अपेक्षेत असतात कि मुलगा येईल आणि हॉटेल सांभाळेल. प्रगतीच्या मागे धावून जगणं विसरू नकोस हा त्यांचा सल्ला असतो. दुसरीकडे कटप्पा पण मुलाच्या प्रेमात अंध झालेला असतो. पोलीस केसेस होत असतात. पण पोलीस त्या मिटवत असतात. एके दिवशी मुरुगन विचारतो कि एक कानाखाली का ठेवून देत नाही ? त्यावर कटप्पा सांगतात कि त्याची आई गेल्याने मुलीपेक्षा माझं त्याच्यावर प्रेम आहे.
लग्नाची तयारी चालू असताना आईचा फोन येतो कि तुझे बाबा देवाघरी गेले,अंत्यसंस्काराला येशील ना ?
मीरा आणि तिच्या घरचे त्याला सांगतात कि जाऊन ये पण देशविदेशात पत्रिका गेल्या आहेत. लग्न डोक्यावर आहे, सगळं लवकर उरकून लगेच ये. मीरा कंपनीचा एक अधिकारी मुरुगन बरोबर पाठवते. म्हणजे तो त्याला घेऊन येईल.
इकडे मुरुगनचं मत हळूहळू बदलू लागतं. त्याची आई सुद्धा दुसर्या दिवशी जगाचा निरोप घेते. हळू हळू वडलांनी गावात काय इज्जत कमावली होती हे त्याला समजू लागतं. वडलांनी कधीच त्याला सक्ती केलेली नाही. पण त्यांचे डोळे सतत त्याची वाट बघत होते. असे काही प्रसंग घडतात कि मुरुगन गावात राहून हॉटेल पुढे चालवण्याचा निर्णय घेतो. अनेक अडचणी येतात. दगडी वरवंट्याने त्याला बॅटर बनवता येत नाही. इडली मनासारखी होत नाही.
एक दिवस त्याचे वडील त्याला जागेपणी स्वप्नात येऊन सांगतात कि मी तुझ्यातच आहे. तुझ्या रक्तात आहे. तू ही कला बाहेर काढ. त्या दिवसानंतर तो जिद्दीने पहाटे उठून जड वरवंट्याने बॅटर बनवतो. नेहमी येणारा एक वयस्कर ग्राहक त्याची इडली खातो आणि त्याच्या डोळ्यात अश्रू येतात. शिवनेसन पुन्हा आलाय का ? असं तो बिचारतो.
हळू हळू धनुषला हे आयुष्य आवडू लागतं. पण संकटं वाट बघत असतात. पण हार न मानता पुन्हा बँकॉकला न जाता तो ते हॉटेल कसं चालवतो याची एक साधी सरळधोपट पण हृदयस्पर्शी कहाणी , जर अशा कथेची आवड असेल तर नक्की पहा.
चक्क हॉलीवूडच्या पिक्चरची
चक्क हॉलीवूडच्या पिक्चरची पिसं काढलीत. >>> "केहना क्या चाहती हो बहन?" अशी अवस्था करून टाकली सिनेमाने मग काय करणार?
तुम्ही लिहिलंय तशी कल्पना असलेला >>> थोड्या फरकाने बॉलीवूड्मध्ये पण असा प्रयोग झाला होता युवा मध्ये. तो प्रयोग मला आवडला होता तेंव्हा. पण त्यात तीन वेगवेगळी पात्रे आणि त्यांच्या ३ कहाण्या एका पॉईंटला एकत्र येतात.
कमाल वेगापर्यंत पोहचू शकते ज्याला इंटरसेप्ट करणे आजघडीला अशक्य (near to impossible) गोष्ट आहे. >>> फेअर पॉइंट. पण हा मुद्दा काही सगळ्या प्रेक्षकांना माहीत नसणार. थोडा खुलवून / समजावून सांगणे भाग होते. पण बेसुमार पात्रे आणि बेसुमार जार्गन्स यांच्या नादात याकडे सपशेल दुर्लक्ष झाले आहे. ६०% सक्सेस रेटचा मुद्दा येतो तेंव्हा तो इतका कमी का हे समजावून सांगायची संधी होती पण ती वाया दवडली आहे.
पण ही दिग्दर्शिका तर खूप नावाजलेली आहे. >>> गुणवत्ता आणि प्रसिद्धी यांचा संबंध असतोच असे नाही. किंवा कधीकधी प्रयोग फसतोही. या सिनेमात कथा नसणे, शेवट नसणे आणि एकच घटनाक्रम तीन वेळा वापरणे असे तीन प्रयोग केले आहेत. त्या तिघांचा एकत्रीत परीणाम मला तरी अत्यंत रटाळ वाटला.
वेगवेगळे किती प्रकारचे लोक, ज्यांची नावे तर सोडाच , पण त्यांचे डिपार्टमेन्ट्स, ग्रुप्स, टायटल्स अस्तित्वात आहेत हेच सामान्यांना कधी माहित नसतात >>> याचा इतका भडीमार केला आहे की २-३ वेळा मी मागे जाऊन ते लक्षात ठेवायचा प्रयत्न केला (हे असे होऊ देणे हेच मुळात चुकीचे आहे कारण थेटरमध्ये मागे जाणे शक्य नसते. पण आजच्या ओटीटीच्या जमान्यात ते क्षम्य असू शकते). पण माझ्या लक्षात ठेवण्याचा काहीच उपयोग नाहीये कारण एका पात्राचे दुसर्या पात्राशी काही देणे घेणेच फारसे नाहीये हे समजल्यावर मी सगळे डोक्यातून फ्लश केले.
मैत्रेयी +१ . जितकी टीका झाली
मैत्रेयी +१ . जितकी टीका झाली आहे तितकही काही वाईट नाही हा चित्रपट . ट्रिटमेंट आणि थीम वेगळी आहे हे सुरुवातीलाच कळत.

हाउस ऑफ डायनामाईट हा चित्रपट टिपिकल संकट आणि त्याचे हरण करणारा उद्धरकर्ता या दृष्टिकोनातून पाहिल्यास बंडल वाटेलच . त्या चित्रपटाची ती थीम नाहीच आहे. थिम आहे ती आपत्तीला सामोरे जाताना वेगवेगळ्या माणसांच्या प्रतिक्रिया . मोठ्या पदावरील असली तरीही ती माणसेच आहेत . पूर्ण मानवजात ज्या अस्त्रामूळ चिंतेत आहे ते अस्त्र आपल्याच देशावर पडणार आहे हे कळतच कोणीही भांबावून जाऊ शकतो . मुंबईवर २६/११ हल्ला अश्या रीतीने होईल ही कल्पना तरी कोणी केलेली का ? त्यावेळी देखील सुरुवातीची सुरक्ष यंत्रणांची प्रतिक्रिया हे गॅंगवॉर आहे अशीच होती . त्या दृष्टिनेच पहिला रिस्पॉन्स दिला गेला. नंतर नुकसान झाल्यावर हल्ल्याचे गांभीर्य समजले. तोपर्यंत सगळेजण आपल्या परिनेच रिस्पॉन्स करत होते.
राहिली गोष्ट मागे जाऊन घटना सांगण्याची तर मला पद्धत आवडली . नीट बघितल्याने समजली देखील
चित्रपटात फ्लॉज जरूर आहेत . विशेषत अमेरिकेसारख्या देशात मिसाईल विरोधी यंत्रणा नसणे . पण वर फार्स यांनी लिहिल्याप्रमाण अपवाद आहेत अमेरिकेतही . तसेच अमेरिकेच्या शत्रुराष्ट्राचा उल्लेख आहे, मित्र राष्ट्राचा काहीच उल्लेख नाही . त्यातच पाकिस्तान अमेरिकेविरुद्ध दंड थोपटून उभा राहिला आहे असा उल्लेख आल्याने तर टडोपाच झाले
मी पण आज "परम सुंदरी" बघितला.
मी पण आज "परम सुंदरी" बघितला.
अतिशय फुसका.. टिपिकल.. नॉर्थ इंडियन आणि साऊथ इंडियन यांच्या स्टिरीओटाईप्सने ओतप्रोत भरलेला.
मलाही कुकरमधून भात पानात घेऊन कालवेपर्यंत हे प्रेमात कसे पडले काही कळेना.
जान्हवी काही काही ठिकाणी फार श्रीदेवीची आठवण करून देते. विशेषतः तिचा "वोई तो" (वहीं तो) हा डायलॉग ऐकताना. केरळात तिच्या वयाच्या मुली इतक्या सर्रास रोजच्या वावरात साड्या नेसतात हे बघून आश्चर्य वाटलं. आणि मग तसल्या पारंपरिक साडीवर पूर्ण पाठ आणि काही ठिकाणी संपूर्ण पोट, छाती, बेंबी वगैरे उघडी राहील/ पडेल असे ब्लाऊज. :कपाळबडवंती:
पिसं काढायला बसले तर सिनेमा नागडा होईल इतका बोर आणि टिपिकल आहे.
मी तो इडली कडाई बघायला घेतला.
मी तो इडली कडाई बघायला घेतला. सॉलिड पीळ आहे बाबा. साऊथ इंडियन सिनेमातले सदगुणी हीरो, कुटुंबवत्सल, मेहनती, सच्छील वडील, बडे बाप का बिगडा बेटा, कंपनीच्या मालकाच्या होणार्या जावयाला बँकॉक मधल्या ऑफिसमधे आल्यावर उभं राहून विश करणारे साऊथ इंडियन कर्मचारी वगैरे सगळे क्लिशे भरले आहेत. वर कुणीतरी लिहिलेल्या रिव्ह्यूत हे सुद्धा कळलं की स्टोरी पण अपेक्षित मार्गानेच पुढे जाते. जाऊ दे, वेळ वाचवावा.
>> इडली कडाई <<
>> इडली कडाई <<
झक मारली आणि मी तासभर घालवला.
काहीच धड नाही याच्यात. काहीच. वैताग आला नुसता.
फावीदडी, हो, तुमचा मुद्दा
फावीदडी, हो, तुमचा मुद्दा बरोबर आहे.
धनुष अतरंगी आहे. मला मजा येते
धनुष अतरंगी आहे. मला मजा येते त्याचे पिक्चर बघायला. एकदा रांझना पाहिला होता तेव्हापासून सपाट्याने बघू लागलो.
पण इडली कढई ट्रेलर बघून बघावासा वाटला नव्हता. आता इथले रिव्ह्यू वाचून बघेन असे वाटत नाही.
पण काही सांगता येत नाही. अचानक मला तर आवडला बाई गट सक्रिय झाला तर विचार बदलेल सुद्धा..
मलाही कुकरमधून भात पानात घेऊन
मलाही कुकरमधून भात पानात घेऊन कालवेपर्यंत हे प्रेमात कसे पडले काही कळेना

>>>
अचानक मला तर आवडला बाई गट
अचानक मला तर आवडला बाई गट सक्रिय झाला तर >>कालपासून हे वाक्य समजून घेण्यासाठी प्रयत्न केले, आज समजल.
(माझ्याही खूप चुका होतात म्हणा)
परमसुन्दरी पहाण्याचा मी ही
परमसुन्दरी पहाण्याचा मी ही प्रयत्न केला .
प्रचंड स्तीरीओटाईप .
ईडली-डोसा विरुद्ध आलू पराठे . अंगठी हरवणं , बाईकवरून फिरताना प्रेमात पडणं , माझे बाबा माझे हिरो टाईप्स संभाषण , कलरीपट्टूमध्ये मुद्धामून अडकवणं , मार खायला लावण , मग हिरोगीरी , पस्चाताप, .. प्लीजच ...grow up ! ( मी ईथपर्यन्तच बघितला , पुढे बघण्याची ईच्च्छाच नव्हती)
जान्वी एरवी तर PJ , स्कर्ट वापरते , मग मध्ये मध्ये साड्या वापरण्याचं प्रयोजन कळलं नाही .
हीच्या ऐवजी रश्मिकाला घेतलं असतं तर अॅक्सेन्ट नॅचरली आला असता.
एक प्रश्न जो माझ्या लेकाने विचारला , पण मी सुरुवातीपासूनच लक्श देउन न बघितल्यामुळे उडवून लावला " जी मुलगी सोशल मिडीयावर नाहीये , ती या लोकांचं नवीन अॅप रजिस्टर करून आपली माहिती का देइइल ?? "
ह्युमन्स इन लुप हा हिंदी
ह्युमन्स इन लुप हा हिंदी चित्रपट नफ्लिवर पाहिला.खुप बक्षिसे मिळालीत, लोक कौतुक करताहेत म्हणुन मी पाहिला. मला चित्रपट काहीही कळला नाही.
ए आयसाठी हजारो फोटो गोळा करुन त्याला लेबलिंग करुन तो डेटा एआयला पुरबुन त्याला शिकवत राहायचे हा चित्रपटाचा एक भाग. झारखंडातल्या एका आदिवासी खेड्यातल्या १०-१२ बायका या लेबलिंगचे काम करतात त्यात एक आपली नायिका. फोटो व लेबल्स दोन्ही क्लायंट्ने पुरवले आहेत. यांना योग्य फोटो व लेबलचे लग्न लावायचे आहे.
तिने तिच्या जमातीबाहेरच्या माणसाबरोबर जमातीच्या पद्धतीने लग्न केलेय ज्याला भारतीय कायद्यात मान्यता नाही. २ मुले झाल्यावरही ती शहरात रमु शकत नसल्याने परत गावात येते. मुलगी १०-१२ वर्षांची दाखवलीय, दुसरे मुल काही महिन्यांचे दाखवलेय आणि ही शहरातुन आलीय हा उल्लेख आलाय. इतकी वर्षे शहरात होती तर तिकडचे मान्यताप्राप्त लग्न का केले नाही कळले नाही. गावाने तिच्यावर बहिष्कार नक्की का टाकलाय हेही कळले नाही. बहुतेक जमातीबाहेर लग्न हे कारण असावे पण ट्रायबल शब्दांचा अर्थ कळत नसल्याने मला कळले नाही. बाप मुलीला न्यायला तडफडतोय तर हिला शिक्षणाची धड सोय नसलेल्या, स्वतः बहिष्कारीत असल्यामुळे मुलीला मैत्रिणी मिळणे कठिण असलेल्या गावात मुलीला हट्टाने ठेवायचेय.
३०-३५ वर्षांपुर्वीचे समांतर चित्रपट असेच असत. वेग अगदीच कासवाचा आहे.
काल पगलेट पाहिला.
काल पगलेट पाहिला.
थोडासा स्पीड कमी असूनही फार आवडला चित्रपट
स्वचा शोध लागण्याची प्रोसेस असे म्हणता येईल
ऍक्टर्स सगळेच चांगले आहेत.
सान्या मल्होत्रा लीड ऍक्टर
थँक्स झरा.
थँक्स झरा.
बघायचा निर्णय होत नव्हता. बघेन.
पगलेट मलाही आवडला होता.
पगलेट मलाही आवडला होता.
छान होता. वेगळा होता.
तशी पोस्ट लिहिली असेल कुठेतरी.
कधी विस्मरणात जाईल तेव्हा पुन्हा बघायलाही आवडेल.
कारण शेवट बघितल्यावर एक समाधान मिळते त्या कॅटेगिरी मधील आहे.
जिम मध्ये गाणी ऐकताना सावन वर
जिम मध्ये गाणी ऐकताना सावन वर 90 डान्स हिट्स गाणी लावलेली

तेव्हा बादशाह आणि मै खिलाडी तू अनाडी चित्रपट आठवले.
पाहिलेत तेव्हा आवडलेले आणि इंटरटेनिंग होते.
खलनायक देखील पाहिला नाहीये हे जाणवले.
मागच्या आठवड्यात मोकळ्या वेळेत बादशाह लावला.
शारुखचे फार कमी चित्रपट आवडलेले त्यातला हा एक मॅड कॉमेडी म्हणून. पहिल्या वेळी इतका फार भारी वाटला नाही पण आवडलाच.
Vfx नाही, अचाट अतर्क्य मारामारी नाही.
कॉमेडी साठी बरंच काही केलंय ते अतर्क्य आहे पण ते आवडते.
मै खिलाडी तू अनाडी आणि खलनायक बघायचा आहे आता
वेळ manage करून बघणार.
घरचे ज्युनियर पोस्टर बघून हा नकोच बघायला असे ठरवतात.
बादशाह मी थिएटरमधे पाहिला
बादशाह मी थिएटरमधे पाहिला होता. मस्त होता. मै खिलाडी तू अनाडी सुद्धा थिएटरमधेच पाहिला होता. तो आवडला होता का ते लक्षात नाही.
"चायना गेट' परत पाहिला. काही प्रसंग आता बाळबोध वाटले तरी पिक्चर अजूनही एंगेज करतो. फौजी लोकांची कामे चांगली आहेत. परेश रावळही मस्त आहे. मात्र मुकेश तिवारीचे काम तेव्हाही आवडले होते आणि आता पुन्हा बघतानाही आवडले. त्याच्या संवादफेकीत एक "नाद" आहे.
हा पिक्चर भारतात नक्की कोठे घडतो हा मात्र सस्पेन्स आहे. यातला परिसर शोलेसारखाच बंगलोरजवळचा वाटतो - हिमालयाजवळचा वाटत नाही. पोलिसही कर्नाटक पोलिस जसे हॅट्स घालतात तसेच दिसतात. सुरूवातीचे सीन्स हिमाचल मधले वाटतात. मुकेश तिवारीची भाषा उत्तरेकडची लगान मधल्यासारखी आहे. बाकी गावकरी वेगळेच हिंदी बोलतात. हे सगळे फौजी लोक सुरूवातीला साउथ मधे कोठेतरी जमून पुणे-मुंबई रेल्वेने देवदुर्गला जातात.
यावर शोलेचा (व शोलेवर ज्यांचा आहे त्या पिक्चर्सचा) प्रभाव होता हे कॉमन नॉलेज आहेच. पण शोलेशी साम्य असलेली आणखी एक गोष्ट सापडली - यातही विजू खोटे एका सीनमधे त्याच्याबरोबरचे इतर लोक हसू लागल्यावर मग हसू लागतो
राजकुमार संतोषी खरंच खूप
राजकुमार संतोषी खरंच खूप चांगला दिग्दर्शक होता, आता त्याचा फॉर्म गेलाय. घायल, दामिनी, घातक, चायना गेट, अंदाज अपना अपना, खाकी, पुकार,.Legend of Bhagat Singh अजूनही चांगले वाटतात
राजकुमार संतोषी, राजकुमार
राजकुमार संतोषी, राजकुमार हिरानी, राजकुमार राव आणि नुसता (जानी) राजकुमार हे सगळेच यशस्वी आहेत.
दुर्दैवाने मराठीत राजकुमार नाव ठेवत नाहीत.
मै खिलाडी तू अनाडी .. मस्त
मै खिलाडी तू अनाडी .. मस्त आठवण काढली. अक्षय कुमार आणि सैफ जोडीची भारी क्रेझ झालेली तेव्हा. अमिताभ आणि ऋषी कपूर सारखी. अक्षय कुमार या पोलिस इन्स्पेक्टर सोबत सैफ अक्टिंग शिकायला म्हणून त्याच्या सोबत राहणार या सिच्युएशनमध्ये मस्त सीन होते त्यांच्यात. लहानपणीच खूपदा पाहिला होता. पण आता पुन्हा एकदा बघायला हवा.
त्यातले ते लडकी देखी मूह से सिटी बजे हात से ताली ही लाईन आजही मी अध्येमध्ये गुणगुणतो.
यावर शोलेचा (व शोलेवर ज्यांचा
यावर शोलेचा (व शोलेवर ज्यांचा आहे त्या पिक्चर्सचा) प्रभाव होता हे कॉमन नॉलेज आहेच. पण शोलेशी साम्य असलेली आणखी एक गोष्ट सापडली - यातही विजू खोटे एका सीनमधे त्याच्याबरोबरचे इतर लोक हसू लागल्यावर मग हसू लागतो >> मस्त निरीक्षण. चायना गेटवर प्रस्तुती अंगाने शोलेचा प्रभाव फारच आहे, त्यामुळे तो अनेकांना भावला नसणार. पण कथेच्या अंगाने तो सेव्हन समुराईशी, किंवा द मॅग्निफिसण्ट् सेव्हनशी शोलेपेक्षा जास्त (म्हणजे शोले हा सेव्हन समुराईशी जितका जवळ गेलाय त्यापेक्षा जास्त) जवळ जातो. शोले हा द गुड द बॅड ॲंड द अग्लीशी जास्त जवळ आहे हे बहुश्रुत आहेच. अर्थात हे सर्वच पिक्चर सेव्हन समुराईशी नातं सांगत असल्यामुळे "सब मिले हुए हैं जी"चा फील येतो.
यात अक्षय प्रचन्ड हॅन्डसम
यात अक्षय प्रचन्ड हॅन्डसम दिसलाय..या किवा पुर्ण खिलाडी सिरिज मधेच (अपवाद रेखा बरोबरचा खिलाडी ) तेव्हा कॉलेज गोइन्ग मुलिना अक्षय खुप "लाइन मारु" मटेरियल वाटायचा..माझ्या खुप सार्या मैत्रीणिकडे त्याचे पोस्टर्स होते.
'सेव्हन समुराई' आणि 'द
'सेव्हन समुराई' आणि 'द मॅग्निफिसण्ट् सेव्हन' पहाण्याचा प्रयत्न केला.
पण रेंटलवर पण कुठेही उपलब्ध नाहीत.
कुठे पहाता येतील ?
पाहून बरेच महिने/वर्षे झाली.
पाहून बरेच महिने/वर्षे झाली. सेव्हन समुराई यूट्यूबवर होता, आता नाहीये. द मॅग्निफिसण्ट् सेव्हन प्राइमवर होता. त्याचा २०१६ मध्ये रिमेक पण आला होता पण तो मी पाहिला नाही.
चायना गेट पाहिलेला नाहीये.
चायना गेट पाहिलेला नाहीये. Story line माहीत आहे.
पण त्यातील छम्मा छम्मा आणि उर्मिला आठवतेय.
त्यातल्या व्हिलनचा "मेरे मन को भाया " हा डायलॉग आजही आठवतो आणि मित्रमंडळी योग्य ठिकाणी वापरतात.
फा
म्हणतो तसे तेव्हाचे चित्रपट पाहताना काही सिन्स बाळबोध वाटतात पण दुर्लक्ष करून बघतो आपण.
मला तिसरी मंझील चित्रपट पाहायचा आहे.
कुठल्या ott वर आहे?
मला तिसरी मंझील चित्रपट
मला तिसरी मंझील चित्रपट पाहायचा आहे.
>>> मलाही
तिसरी मंझिल मधे सलमानकाकांचे
तिसरी मंझिल मधे सलमानकाकांचे तात आहेत.
Pages