सखेचा सीन अनावश्यक म्हणायचं तर सगळा सिनेमाच अनावश्यक म्हणावा लागेल. विस्कळीत विचित्र होतं. सखेचा सीन was the most थरार offered , कोणी उलथून पडेल अशा आशेने पाहिले तर.
पण बघा, कधी नव्हे ते आपल्या सगळ्यांचे एकमत झाले आहे. 'हिंदी चिनी भाई भाई' इतकं टेम्पररी का असेना.
Submitted by अस्मिता. on 8 September, 2025 - 12:05
वाचल्याच पोस्टी टेम्प्ट होउन मला ते "सखे" वाचताना सारखी "काढ सखे तुझे गळ्यातील चांदण्याचे हात" ही ओळ आठवत आहे. बहुतेक कुसुमाग्रजांची कविता आहे. मला कविताही माहीत नाही आणि ही ओळही काय भारी वगैरे वाटत नाही. पण मराठी साहित्यात तिचा उल्लेख इतका वाचला आहे की सखे म्हंटल्यावर एखादी क्रश आठवायच्या आधी ही ओळ आठवते
सिद्धार्थ कपूरचे फॅन्स ( असं कुणी असतं का ? ) >>> राभू, इतक्या वेळात कोणी हे नाव करेक्ट करायला सांगितले नाही यावरून कंसातील प्रश्नाचे उत्तर मिळेल
काढ सखे तुझे गळ्यातील चांदण्याचे हात" ही ओळ आठवत आहे. बहुतेक कुसुमाग्रजांची कविता आहे. मला कविताही माहीत नाही आणि ही ओळही काय भारी वगैरे वाटत नाही. पण मराठी साहित्यात तिचा उल्लेख इतका वाचला आहे की सखे म्हंटल्यावर एखादी क्रश आठवायच्या आधी ही ओळ आठवते
>>>> ह्या ट्रॉमातून तू नक्कीच बाहेर येशील, झेंडे पाहून झाल्यावर. आणि 'सायकल' आज जातोय तो बघायचा सोडून 'नका पाहू' म्हटलेला झेंडे पाहाणार. घ्या आता.
Submitted by अस्मिता. on 8 September, 2025 - 12:46
मेट्रो इन दिनो बघितला. पण त्यात काहीच बघण्यासारखे नसल्याने, लक्ष सिनेमांच्या फ्रेम्सकडेच जास्त गेले. मोठमोठ्या खिडक्या , बाल्कनी आणी त्यातून बाहेरची दिसणारी रहदारी, फ्लायओव्हर्स हे सगळ्या कथांमध्ये काॅमन होते.
Submitted by निल्स_23 on 8 September, 2025 - 12:46
पण शक्ती कपूर ने यावर एक धमाल स्पूफ असलेला रोल विनोद खन्नाच्या इन्साफ मधे केला होता. ऑल इण्डिया इन्स्पेक्टर भेंडे
<<<<<<<
हाएला, भेंडे हे शक्ती कपूरचं फेव्ह आडनाव दिसतंय. 'बोल राधा बोल'मध्येही तो इन्स्पेक्टर भेंडे आहे.
'आला रे आला, इन्स्पेक्टर भेंडे आला
हाथ मे लेके, कानून का ताला...'
बाकी, मेट्रो-इन दिनों'ची चर्चा मनोरंजक! मी अजून पाहिला नाही.
जुना मेट्रो म्हणजे life in a metro आवडलेला पण विमान प्रवासात एकदा शेजारील प्रवाश्याने १९६० मधला The Apartment रेको केला आणि मग लक्षात आलं कि life in a metro मधील कंगना , शर्मन आणि के के चा जो प्लॉट आहे तो या The Apartment ची फ्रेम तो फ्रेम नक्कल आहे,
झेंडे पाहिला मीही. शेवटपर्यन्त पाहिला इतकेच. बाकी वरच्या रीव्ह्यूज शी सहमत. चांगली कास्ट होती, कथा नीट डेवलप केली असती तर संधी होती चांगला सिनेमा बनवण्याची- पण वाया घालवली असे वाटले.
Submitted by maitreyee on 8 September, 2025 - 13:01
त्या सीनच्या जस्ट आधी इंटरपोल वाला स्वामी काहीतरी आपका बेस्ट बेस्ट नही था वगैरे म्हणतो आणि नेक्स्ट सीनमधे हा लगेच कोई दुसरा मेरे कपडे उतारे मुझे अच्छा नही लगता म्हणत डायरेक्ट पुल मधे याखेरीज काही संबंध नाही वाटत.
Submitted by अंजली_१२ on 8 September, 2025 - 13:54
'आला रे आला, इन्स्पेक्टर भेंडे आला
हाथ मे लेके, कानून का ताला...' >>>
ही ओळही काय भारी वगैरे वाटत नाही
तुला तीच शिक्षा >>> खुलासा खुलासा - ज्यांनी मूळ संजीवकुमार न पाहता फक्त त्याची मिमिक्री पाहिली असेल त्यांच्या डोक्यात त्याची इमेज जशी असेल तशी या ओळींची इमेज माझ्या डोक्यात आहे. ती पूर्ण कविता मी वाचलेली नाही. कुसुमाग्रजांची आहे इतकेच माहीत आहे.
आणि 'सायकल' आज जातोय तो बघायचा सोडून 'नका पाहू' म्हटलेला झेंडे पाहाणार. घ्या आता >>> हो पुन्हा भूतनी व्हर्सेस करीब करीब सिंगल स्टोरी होणार असे दिसते.
माझ्यासाठी एवढ्या गंभीर गुन्हेगाराची - पोलिसांनी त्याला कसे पकडले याची कथा - त्याचा गाभाच ते विनोदी केल्याने हरवून गेला. मग विनोदाची भट्टी जमली असती तरी तत्त्वतः पटलं नसतं. इथे सगळेच गेले हे फार बरे झाले. जशा भावना आहेत तशा पोचवायला हव्यात, जसं तथ्य आहे तसं पोचवायला हवं. आणि आपल्याला प्रेक्षक म्हणून ते सगळं पाहता यायला हवे. आम्ही सत्य सहन करू शकतो. तेवढा विश्वास दाखवा असा अप्रोच बरा वाटतो. प्रेक्षक म्हणून आपण कधी इवॉल्व होणार ! नाही तर संपूर्ण खोटी कथा रचून ती तरी खणखणीतपणे मांडा. कलाकृती ऑथेंटिक हवी. ज्या गोष्टी गंभीर आहेत त्या तशाच असायला हव्यात. भावनांची धार बोथट करायला नको आणि विनोदांवर तलवारी काढायला नको. उलटं झालं की खुपतं.
Submitted by अस्मिता. on 8 September, 2025 - 14:04
>>> विनोदाची भट्टी जमली असती तरी तत्त्वतः पटलं नसतं.
नॉट शुअर अबाउट दॅट. उदा. 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' सिनेमा हलकी फुलकी ट्रीटमेन्ट असूनही फाळक्यांचा 'स्ट्रगल' आणि पॅशन पोहोचवण्यात यशस्वी झाला होता. तो फार अवघड बॅलन्स आहे मात्र.
आणखी एक पटकन आठवणारा स्पीलबर्गचा 'कॅच मी इफ यू कॅन'. एन्टरटेनिंग असूनही गुन्ह्यांचं आणि तपासाचं गांभीर्य नेमकं पोर्ट्रे करतो तो त्यात.
Submitted by स्वाती_आंबोळे on 8 September, 2025 - 14:09
ल्युडो आणि मोनिका ओ माय डार्लिंग सारखी ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न केलाय चिमांजीं ने.
ल्युडो छान जमला होता. इंट्रिकेट स्टोरीटेलिंग हा तारेवरची कसरत असावा तसा डेलिकेट प्रकार आहे. त्याला पाश्टिश बॅकग्राउंड स्कोअर ने उठाव आलाय. प्रीतमने चोरलेला नसेल तर मग लाईक बनता है. ही भट्टी मोनिका मधे फसलीय तरीही रिअल स्टोरी नसल्याने चालून जाते. रिअल स्टोरीला ही ट्रीटमेंट का ?
चिन्मय मांडलेकर म्हणतो कि मला इन्स्पेक्टर झेंडेची स्टोरी दाखवायची होती, चार्ल्स शोभराजची नाही.
ही मोठी चूक आहे. झेंडेंनी कुणाला पकडलंय हे हायलाईट करण्यासाठी शोभराजची स्टोरी मस्ट होती. आत्ताच्या पिढीला पण ती अनुभवता आली असती. इथे म्हणजे एक गुन्हेगार जेलमधून पळाला त्याला झेंडे पकडतात. मग ही स्टोरी दोन तास कशी खेचायची म्हणून विनोद पेरायचा प्रयत्न केला. पण चिमांचा चेहराच तो गंभीर प्रकृतीचा असल्याचं सांगतो. त्याच्या आजूबाजूला विनोद नावाची माणसं सुद्धा उभी राहत नसतील.
अजून एक . जर झेंडेंचं नाव खरं वापरलंय तर चार्ल्सचा कार्ल का केलाय ? तो काय अब्रूनुकसानीची केस टाकणार होता का ?
वरकरणी विनोदी पिक्चरही मूळ विषय इफेक्टीव्हली पोहोचवू शकतात. द ग्रेट डिक्टेटर किंवा साशा बॅरन कोहेनचा डिक्टेटर. ओम राऊत आणि चिन्मय मांडलेकरकडून त्या अपेक्षा ठेवणे जरा जास्तीच होईल.
तसा बॅलन्स साधला असता तर आवडलाही असता स्वाती. पूर्ण वेगळं ठेवलं असतं तर. सगळेच रस असू शकतात की एखाद्या कलाकृतीत पण इथे मांडणी उलटी झाली आहे. तू पाहा म्हणजे तुझ्या जिभेवर सरस्वती नृत्य करेल आणि आमची करमणूक होईल.
ते दोन्ही पाहिले आहेत आणि आवडले आहेत. तेहतीस खून (नोंद झालेले) तरीही गंभीर गोष्ट नाही का, या वरच्या तुलनेत. हे एक्स्ट्रीम होते. ती तीव्रताच नाही कुठे! चोरपोलिस खेळताहेत असं वाटतं.
फा, सखे ईज द न्यू मंदाकिनी ! तुलाही ते जास्त होईल की नाही बघंच.
Submitted by अस्मिता. on 8 September, 2025 - 14:19
>>> तू पाहा म्हणजे तुझ्या जिभेवर सरस्वती नृत्य करेल आणि आमची करमणूक होईल.
नाही, ती तुम्हाला कोणाला सिनेमा आवडला तरच नृत्य करते. आपल्याला सगळ्यांनाच बोअर झाला तर कशाला एनर्जी घालवेल!
Submitted by स्वाती_आंबोळे on 8 September, 2025 - 14:32
हरिश्चंद्राची फॅक्टरी' सिनेमा हलकी फुलकी ट्रीटमेन्ट असूनही फाळक्यांचा 'स्ट्रगल' आणि पॅशन पोहोचवण्यात यशस्वी झाला होता. >>> मला पण झेंडे बघताना 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' आठवत होता. कदाचीत चिमापुढे तोच आदर्श असावा पण झेंडे त्यापासून अगदीच भरकटला आहे. ना धड विनोदी ना अॅक्शन ना चरीत्रात्मक. कशाचा कशाला पायपोसच नाहीये.
सखेचे पोट दिसलं सगळ्यांना. पण मनोज वाजपेइ (तरुण झेंडे) एका गुंडाचा पाठलाग करत असतो तेंव्हा किती थकलेला वाटतो. मला वाटत होते की चक्कर येऊन पडतोय की काय! असा माणूस गुंडाला पकडतो हे स्वप्नातही खरे वाटणार नाही.
भाऊ कदमला टिममधून काढून टाकल्यावर दुसर्या वेळेला मवा त्याला टिममध्ये परत घ्यायला नकार देतो. पण शेवटी तिसर्या वेळेला असाच येऊ देतो. का? त्या का ला काही कारणच नाहीये.
सचिन खेडेकरला असं दाखवावं असं दिग्दर्शकाला का वाटलं असेल? >>> चिमाने 'आप जैसा कोई' पाहिला असावा. त्यातही माधवनचे असेकाही क्लोझप्स आहेत की त्याच्या तेलकट स्किनवरची लहानसहान खाचखळगे पण स्पष्ट दिसतात. माणूस ओंगळवाणा दाखवणे ही 'इन' बाब असावी.
चोराच्या मनात इंदिनो! >>>
ती तुम्हाला कोणाला सिनेमा आवडला तरच नृत्य करते. >>>>
लेकी बोले सुने लागे अमित.
माधव, मी म्हटलंय- मवा खंगल्यासारखा दिसतोय स्ट्रॉंग आणि फिट वाटत नाही.
Submitted by अस्मिता. on 8 September, 2025 - 15:20
I was laughing while reading
I was laughing while reading the script
https://www.youtube.com/watch?v=cfti7nUiid8
सखेचा सीन अनावश्यक म्हणायचं
सखेचा सीन अनावश्यक म्हणायचं तर सगळा सिनेमाच अनावश्यक म्हणावा लागेल. विस्कळीत विचित्र होतं. सखेचा सीन was the most थरार offered , कोणी उलथून पडेल अशा आशेने पाहिले तर.
पण बघा, कधी नव्हे ते आपल्या सगळ्यांचे एकमत झाले आहे. 'हिंदी चिनी भाई भाई' इतकं टेम्पररी का असेना.
ही झेंडे पिक्चर पाहिल्यावर
ही झेंडे पिक्चर पाहिल्यावर पोस्टी वाचेन.
पण शक्ती कपूर ने यावर एक धमाल स्पूफ असलेला रोल विनोद खन्नाच्या इन्साफ मधे केला होता. ऑल इण्डिया इन्स्पेक्टर भेंडे
https://www.youtube.com/watch?v=O4DY38bWBDg&t=6162s
आपल्या सगळ्यांचे एकमत झाले
आपल्या सगळ्यांचे एकमत झाले आहे >> उद्या चितळेंकडे पाव किलो श्रीखंड आणि पाव किलो पेढ्यांची ऑर्डर द्यावी लागेल, संपूर्ण मायबोलीला वाटायला.
वाचल्याच पोस्टी टेम्प्ट होउन
वाचल्याच पोस्टी टेम्प्ट होउन
मला ते "सखे" वाचताना सारखी "काढ सखे तुझे गळ्यातील चांदण्याचे हात" ही ओळ आठवत आहे. बहुतेक कुसुमाग्रजांची कविता आहे. मला कविताही माहीत नाही आणि ही ओळही काय भारी वगैरे वाटत नाही. पण मराठी साहित्यात तिचा उल्लेख इतका वाचला आहे की सखे म्हंटल्यावर एखादी क्रश आठवायच्या आधी ही ओळ आठवते
सिद्धार्थ कपूरचे फॅन्स ( असं कुणी असतं का ? ) >>>
राभू, इतक्या वेळात कोणी हे नाव करेक्ट करायला सांगितले नाही यावरून कंसातील प्रश्नाचे उत्तर मिळेल 
मलाही आताच समजलं कि मी चूक
मलाही आताच समजलं कि मी चूक केलीये ते
पण इतरांनाही अजून समजलेलं नाही म्हणजे " गधा बोलो गोडा बोलो सब एकही " असं झालंय नक्की
काढ सखे तुझे गळ्यातील
काढ सखे तुझे गळ्यातील चांदण्याचे हात" ही ओळ आठवत आहे. बहुतेक कुसुमाग्रजांची कविता आहे. मला कविताही माहीत नाही आणि ही ओळही काय भारी वगैरे वाटत नाही. पण मराठी साहित्यात तिचा उल्लेख इतका वाचला आहे की सखे म्हंटल्यावर एखादी क्रश आठवायच्या आधी ही ओळ आठवते
>>>>
ह्या ट्रॉमातून तू नक्कीच बाहेर येशील, झेंडे पाहून झाल्यावर. आणि 'सायकल' आज जातोय तो बघायचा सोडून 'नका पाहू' म्हटलेला झेंडे पाहाणार. घ्या आता. 
मेट्रो इन दिनो बघितला. पण
मेट्रो इन दिनो बघितला. पण त्यात काहीच बघण्यासारखे नसल्याने, लक्ष सिनेमांच्या फ्रेम्सकडेच जास्त गेले. मोठमोठ्या खिडक्या , बाल्कनी आणी त्यातून बाहेरची दिसणारी रहदारी, फ्लायओव्हर्स हे सगळ्या कथांमध्ये काॅमन होते.
काढ सखे तुझे गळ्यातील
काढ सखे तुझे गळ्यातील चांदण्याचे हात >> हा चांदण्या कुणीतरी टपोरी असणार आमीर खान सारखा.
कुसुमाग्रजांचीच आहे. 'काढ सखे
'स्वप्नाची समाप्ती' - कुसुमाग्रजांचीच आहे. 'काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत'
>>> ही ओळही काय भारी वगैरे वाटत नाही

तुला तीच शिक्षा.
'इन दिनों' आवडणं, पीएस पहावेसे न वाटणं याही शिक्षाच.
पण शक्ती कपूर ने यावर एक धमाल
पण शक्ती कपूर ने यावर एक धमाल स्पूफ असलेला रोल विनोद खन्नाच्या इन्साफ मधे केला होता. ऑल इण्डिया इन्स्पेक्टर भेंडे
<<<<<<<
हाएला, भेंडे हे शक्ती कपूरचं फेव्ह आडनाव दिसतंय. 'बोल राधा बोल'मध्येही तो इन्स्पेक्टर भेंडे आहे.
'आला रे आला, इन्स्पेक्टर भेंडे आला
हाथ मे लेके, कानून का ताला...'
बाकी, मेट्रो-इन दिनों'ची चर्चा मनोरंजक! मी अजून पाहिला नाही.
जुना मेट्रो म्हणजे life in a
जुना मेट्रो म्हणजे life in a metro आवडलेला पण विमान प्रवासात एकदा शेजारील प्रवाश्याने १९६० मधला The Apartment रेको केला आणि मग लक्षात आलं कि life in a metro मधील कंगना , शर्मन आणि के के चा जो प्लॉट आहे तो या The Apartment ची फ्रेम तो फ्रेम नक्कल आहे,
स्वाती + १ काय सुरेख कविता
स्वाती + १ काय सुरेख कविता आहे ती.
(मेट्रोबद्दल माहिती नाही आणि पीएसबद्दलही )
त्याच प्लॉटवर आधारित मराठी
त्याच प्लॉटवर आधारित मराठी नाटकही आलं होतं एक - 'अर्ध्याच्या शोधात दोन' असं नाव होतं बहुतेक.
झेंडे पाहिला मीही.
झेंडे पाहिला मीही. शेवटपर्यन्त पाहिला इतकेच. बाकी वरच्या रीव्ह्यूज शी सहमत. चांगली कास्ट होती, कथा नीट डेवलप केली असती तर संधी होती चांगला सिनेमा बनवण्याची- पण वाया घालवली असे वाटले.
सखे म्हंटल्यावर एखादी क्रश
सखे म्हंटल्यावर एखादी क्रश आठवायच्या आधी ही ओळ आठवते
>>> काय हे? छे!!!
अस्मिता रिव्ह्यू आवडला.
तसाही मी पिक्चर पाहणार नव्हते. पण सचिन खेडेकरला असं दाखवावं असं दिग्दर्शकाला का वाटलं असेल?
त्या सीनच्या जस्ट आधी इंटरपोल
त्या सीनच्या जस्ट आधी इंटरपोल वाला स्वामी काहीतरी आपका बेस्ट बेस्ट नही था वगैरे म्हणतो आणि नेक्स्ट सीनमधे हा लगेच कोई दुसरा मेरे कपडे उतारे मुझे अच्छा नही लगता म्हणत डायरेक्ट पुल मधे याखेरीज काही संबंध नाही वाटत.
'आला रे आला, इन्स्पेक्टर
'आला रे आला, इन्स्पेक्टर भेंडे आला
हाथ मे लेके, कानून का ताला...' >>>
ही ओळही काय भारी वगैरे वाटत नाही
खुलासा खुलासा - ज्यांनी मूळ संजीवकुमार न पाहता फक्त त्याची मिमिक्री पाहिली असेल त्यांच्या डोक्यात त्याची इमेज जशी असेल तशी या ओळींची इमेज माझ्या डोक्यात आहे. ती पूर्ण कविता मी वाचलेली नाही. कुसुमाग्रजांची आहे इतकेच माहीत आहे.
तुला तीच शिक्षा >>>
आणि 'सायकल' आज जातोय तो बघायचा सोडून 'नका पाहू' म्हटलेला झेंडे पाहाणार. घ्या आता >>>
हो पुन्हा भूतनी व्हर्सेस करीब करीब सिंगल स्टोरी होणार असे दिसते.
थॅंक्यू माझेमन.
थॅंक्यू माझेमन.
माझ्यासाठी एवढ्या गंभीर गुन्हेगाराची - पोलिसांनी त्याला कसे पकडले याची कथा - त्याचा गाभाच ते विनोदी केल्याने हरवून गेला. मग विनोदाची भट्टी जमली असती तरी तत्त्वतः पटलं नसतं. इथे सगळेच गेले हे फार बरे झाले. जशा भावना आहेत तशा पोचवायला हव्यात, जसं तथ्य आहे तसं पोचवायला हवं. आणि आपल्याला प्रेक्षक म्हणून ते सगळं पाहता यायला हवे. आम्ही सत्य सहन करू शकतो. तेवढा विश्वास दाखवा असा अप्रोच बरा वाटतो. प्रेक्षक म्हणून आपण कधी इवॉल्व होणार ! नाही तर संपूर्ण खोटी कथा रचून ती तरी खणखणीतपणे मांडा. कलाकृती ऑथेंटिक हवी. ज्या गोष्टी गंभीर आहेत त्या तशाच असायला हव्यात. भावनांची धार बोथट करायला नको आणि विनोदांवर तलवारी काढायला नको. उलटं झालं की खुपतं.
>>> विनोदाची भट्टी जमली असती
>>> विनोदाची भट्टी जमली असती तरी तत्त्वतः पटलं नसतं.
नॉट शुअर अबाउट दॅट. उदा. 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' सिनेमा हलकी फुलकी ट्रीटमेन्ट असूनही फाळक्यांचा 'स्ट्रगल' आणि पॅशन पोहोचवण्यात यशस्वी झाला होता. तो फार अवघड बॅलन्स आहे मात्र.
आणखी एक पटकन आठवणारा स्पीलबर्गचा 'कॅच मी इफ यू कॅन'. एन्टरटेनिंग असूनही गुन्ह्यांचं आणि तपासाचं गांभीर्य नेमकं पोर्ट्रे करतो तो त्यात.
ल्युडो आणि मोनिका ओ माय
ल्युडो आणि मोनिका ओ माय डार्लिंग सारखी ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न केलाय चिमांजीं ने.
ल्युडो छान जमला होता. इंट्रिकेट स्टोरीटेलिंग हा तारेवरची कसरत असावा तसा डेलिकेट प्रकार आहे. त्याला पाश्टिश बॅकग्राउंड स्कोअर ने उठाव आलाय. प्रीतमने चोरलेला नसेल तर मग लाईक बनता है. ही भट्टी मोनिका मधे फसलीय तरीही रिअल स्टोरी नसल्याने चालून जाते. रिअल स्टोरीला ही ट्रीटमेंट का ?
चिन्मय मांडलेकर म्हणतो कि मला इन्स्पेक्टर झेंडेची स्टोरी दाखवायची होती, चार्ल्स शोभराजची नाही.
ही मोठी चूक आहे. झेंडेंनी कुणाला पकडलंय हे हायलाईट करण्यासाठी शोभराजची स्टोरी मस्ट होती. आत्ताच्या पिढीला पण ती अनुभवता आली असती. इथे म्हणजे एक गुन्हेगार जेलमधून पळाला त्याला झेंडे पकडतात. मग ही स्टोरी दोन तास कशी खेचायची म्हणून विनोद पेरायचा प्रयत्न केला. पण चिमांचा चेहराच तो गंभीर प्रकृतीचा असल्याचं सांगतो. त्याच्या आजूबाजूला विनोद नावाची माणसं सुद्धा उभी राहत नसतील.
अजून एक . जर झेंडेंचं नाव खरं वापरलंय तर चार्ल्सचा कार्ल का केलाय ? तो काय अब्रूनुकसानीची केस टाकणार होता का ?
वरकरणी विनोदी पिक्चरही मूळ
वरकरणी विनोदी पिक्चरही मूळ विषय इफेक्टीव्हली पोहोचवू शकतात. द ग्रेट डिक्टेटर किंवा साशा बॅरन कोहेनचा डिक्टेटर. ओम राऊत आणि चिन्मय मांडलेकरकडून त्या अपेक्षा ठेवणे जरा जास्तीच होईल.
तसा बॅलन्स साधला असता तर
तसा बॅलन्स साधला असता तर आवडलाही असता स्वाती. पूर्ण वेगळं ठेवलं असतं तर. सगळेच रस असू शकतात की एखाद्या कलाकृतीत पण इथे मांडणी उलटी झाली आहे. तू पाहा म्हणजे तुझ्या जिभेवर सरस्वती नृत्य करेल आणि आमची करमणूक होईल.
ते दोन्ही पाहिले आहेत आणि आवडले आहेत. तेहतीस खून (नोंद झालेले) तरीही गंभीर गोष्ट नाही का, या वरच्या तुलनेत. हे एक्स्ट्रीम होते. ती तीव्रताच नाही कुठे! चोरपोलिस खेळताहेत असं वाटतं.
फा, सखे ईज द न्यू मंदाकिनी !
तुलाही ते जास्त होईल की नाही बघंच.
>>> तू पाहा म्हणजे तुझ्या
>>> तू पाहा म्हणजे तुझ्या जिभेवर सरस्वती नृत्य करेल आणि आमची करमणूक होईल.

नाही, ती तुम्हाला कोणाला सिनेमा आवडला तरच नृत्य करते. आपल्याला सगळ्यांनाच बोअर झाला तर कशाला एनर्जी घालवेल!
सखे ईज द न्यू मंदाकिनी शुरा
सखे ईज द न्यू मंदाकिनी
शुरा
हरिश्चंद्राची फॅक्टरी' सिनेमा
हरिश्चंद्राची फॅक्टरी' सिनेमा हलकी फुलकी ट्रीटमेन्ट असूनही फाळक्यांचा 'स्ट्रगल' आणि पॅशन पोहोचवण्यात यशस्वी झाला होता. >>> मला पण झेंडे बघताना 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' आठवत होता. कदाचीत चिमापुढे तोच आदर्श असावा पण झेंडे त्यापासून अगदीच भरकटला आहे. ना धड विनोदी ना अॅक्शन ना चरीत्रात्मक. कशाचा कशाला पायपोसच नाहीये.
सखेचे पोट दिसलं सगळ्यांना. पण मनोज वाजपेइ (तरुण झेंडे) एका गुंडाचा पाठलाग करत असतो तेंव्हा किती थकलेला वाटतो. मला वाटत होते की चक्कर येऊन पडतोय की काय! असा माणूस गुंडाला पकडतो हे स्वप्नातही खरे वाटणार नाही.
भाऊ कदमला टिममधून काढून टाकल्यावर दुसर्या वेळेला मवा त्याला टिममध्ये परत घ्यायला नकार देतो. पण शेवटी तिसर्या वेळेला असाच येऊ देतो. का? त्या का ला काही कारणच नाहीये.
सचिन खेडेकरला असं दाखवावं असं दिग्दर्शकाला का वाटलं असेल? >>> चिमाने 'आप जैसा कोई' पाहिला असावा. त्यातही माधवनचे असेकाही क्लोझप्स आहेत की त्याच्या तेलकट स्किनवरची लहानसहान खाचखळगे पण स्पष्ट दिसतात. माणूस ओंगळवाणा दाखवणे ही 'इन' बाब असावी.
>> प्रेक्षक म्हणून आपण कधी
>> प्रेक्षक म्हणून आपण कधी इवॉल्व होणार ! >> इथल्या लोकांना अजुन 'मेट्रो इन दिनो' आवडतो हे पण तू न लिहिलेलं वाचलं मी.
चोराच्या मनात इंदिनो!
चोराच्या मनात इंदिनो!
चोराच्या मनात इंदिनो! >>>
चोराच्या मनात इंदिनो! >>>

ती तुम्हाला कोणाला सिनेमा आवडला तरच नृत्य करते. >>>>
लेकी बोले सुने लागे अमित.
माधव, मी म्हटलंय- मवा खंगल्यासारखा दिसतोय स्ट्रॉंग आणि फिट वाटत नाही.
इंदिनो >>>
इंदिनो >>>
लेकी बोले सुने लागे अमित >>>
मंदाकिनीचा संदर्भ मीच आठवायचा प्रयत्न करतोय
Pages