Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
संजय राऊत फुटणे अवघड आहे कारण
संजय राऊत फुटणे अवघड आहे कारण फुटल्यानंतर त्यांना फारसे राजकीय भविष्य आहे असे वाटत नाही. सुषमा अंधारे यांचीही अशीच समस्या असणार.
पक्षनिष्ठा, आदर्शवाद, विचारधारा वगैरे बाबी थोतांड असतात ह्याच्याशी सहमत! अशोक चव्हाण हे एक मोठे उदाहरण!
आम्ही बोहरी समाजाच्या
आम्ही बोहरी समाजाच्या कार्यक्रमात जाऊन स्कल कॅप मस्तकी धारण करू शकतो, अजमेर च्या दर्ग्यावर चादर चढवू शकता, पण इतर कुणी जनाब शब्द वापरु शकत नाही बरे....ही जी सोईस्कर नियम स्वतःच ठरवायची जी एनटायटलमेंट आहे ना मी त्याच मानसिकते बद्द्ल बोलत होतो.... या मध्ययुगीन मानसिकतेतून बाहेर या आता तरी...सुधरा..
आमची ती चाणक्यनीती तुमचा तो
आमची ती चाणक्यनीती तुमचा तो हिंदुद्रोह/देशद्रोह.
मी पाठवलेले व्हिडीओ दुसऱ्या
मी पाठवलेले व्हिडीओ दुसऱ्या तिसऱ्या कुणाचे नसून श्री बाळासाहेब ठाकरे आणि श्री राज ठाकरे यांचे आहेत.
बाकी मी कशाला काही सिद्ध करू.
श्री उद्धव ठाकरे आणि श्री शरद पवार यांच्या पक्षांची वाताहत का कशी आणि कुणी केली हे जनतेला माहिती आहे.
ईडी सी बी आय ची भीती काँग्रेसच्या खासदारांना आमदारांना नाही का ? ते कसे काय बुवा फुटले नाहीत?
चूक बरोबर जे असेल ते असो पण काँग्रेस पक्षाची एक विचारधारा आहे आणि त्याला त्यांचे आमदार खासदार चिकटून आहेत.
शिवसेना आपल्या मूळ विचारधारेपासूनच वेगळी झाली म्हणून ही स्थिती आली हे स्पष्ट आहे.
मग तुम्ही कशाचेही काहीही समर्थन करा! मोदी शाह फडणवीस यांना शिवीगाळ करा, हवं ते करा वस्तुस्थिती बदलणार नाही.
हम को मालूम है जन्नत की हक़ीक़त !
लेकिन दिल के ख़ुश रखने को 'ग़ालिब' ये ख़याल अच्छा है!
चालू द्या!
बाय द वे या फोडाफोडीत आता
बाय द वे या फोडाफोडीत आता उठाचे उरलेले लोक पळवणे हा प्राथमिक उद्देश नसून लोकसभेत २/३ बहुमताकरता इकडून तिकडून लोक जमवणे हा असेल याबद्दल इथे आले का? बघितल्याचे आठवत नाही.
शिवसेना आपल्या मूळ
शिवसेना आपल्या मूळ विचारधारेपासूनच वेगळी झाली म्हणून ही स्थिती आली हे स्पष्ट आहे.## हे सिद्ध करा म्हणून सांगतोय तर जनाब का घेऊन आलेत
सुषमा अंधारे आज दोन
सुषमा अंधारे आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी जाहीरपणे रडताना दाखवल्या वाहिन्यांनी! कारण कळले नाही. उबाठा गटाचा ऱ्हास होताना बघून रडत असाव्यात.
'Operation तुडवा' launch केले आहे. फुटणाऱ्या खासदारांना तुडवणार आहेत.
आज उबाठा गटातर्फे संजय दिना पाटील की ओमराजे निंबाळकर यांच्यापैकी कोणाचेतरी त्यांच्याच गावात श्राद्ध घालण्यात आले. एकजण अभद्र सुरांत विलाप करत होता व चौघे श्राद्धाचे जेवण जेवत होते. संजय दिना पाटील व ओमराजे निंबाळकर दोघेही व्यवस्थित असल्याचे नंतर दिसून आले. गडबडीत टीव्ही बघितल्याने नक्की कोणाचे श्राद्ध घातले हे आठवत नाही. ही दोनच नावे सतत बातम्यांत येत होती त्यामुळे गोंधळ झाला.
संजय राऊत यांनी चांगली भाषा योजली असती तर एक, दोन खासदार फुटले नसते असे काहींचे मत आहे.
सुनेत्रा पवार व अमित शहा यांच्या भेटीमुळे बारामतीत काहीशी राजकीय अस्थिरता आहे.
पत्रकार परिषदेत आया बहिणीच्या
पत्रकार परिषदेत आया बहिणीच्या शिव्या देऊन रस्त्यावरील मवाल्याची भाषा पत्रकार परिषदेत आणल्याबद्दल संज्या राऊतला कुणीतरी तुडवायला हवे.
किती दिवस त्याची मुजोरी सहन करायची? त्याची रोजची वांती झेलायला इतके वार्ताहर का बरे सज्ज असतात?
कोव्हीडबद्दल, महाराष्ट्राची
कोव्हीडबद्दल, महाराष्ट्राची कामगिरी, फडणवीस, भाजप यांनी घातलेला गोंधळ यावर बरेच वेळा चर्चा झाली आहे. रेमडीसेविर तेव्हा उपयोगी आहे असे जगभरात मत असताना आणि तुटवडा होत असताना एका कंपनीने ६०००० युनिट्स साठवले , ते एक्स्पोर्ट होण्याची शक्यता म्हणुन पोलिसांनी चौकशी केली बोलावून. (पण इथे कर नाही त्याला डर कशाला लागु होत नाही.) तेव्हाचे विरोधी पक्षनेते धावुन गेले आणि आम्हीच तो साठा करायला सांगितला, भाजपतर्फे, आम्ही तुम्हालाच देणार होतो असे फडणवीस म्हणाले. विरोधी पक्ष परस्पर एका कंपनीला सांगून साठा करवतो, काहीही गाजावाजा न करता. मग एखादा चांगला मुहूर्त पाहुन अचानक सरप्राईज गिफ्ट देणार होता सरकारला. याशिवाय वॅक्सिन्सध्ये दुजाभाव. स्लॉट्स मिळून कॅन्सल होणे, केंद्रात जाऊन स्टॉक न आल्याने अर्ध्या लोकांना परत यावे लागणे सुरू होते. त्याबद्दल बोललं की केंद्रीय आरोग्य मंत्री गप्प बसणार, दोन रात्रींनंतर काही स्टॉक पाठवून दुसऱ्या दिवशी म्हणणार महाराष्ट्र सरकार खोटे बोलतेय आम्ही इतका पाठवलाय आणि त्यांनी इतकाच वापरलाय, इतके (हे काल रात्री पाठवलेले असतात) त्यांच्याकडे अजून शिल्लक आहेत आधी ते वापरा मग मागणी करा. हा प्रकार अविरत सुरू. आणखीही प्रकार आहेत. सगळी चर्चा काहीवेळा झाली आहे. महाराष्ट्राची कामगिरी या सगळ्या भाजपने अशी अडवणुक करून सुद्धा आहे.
मी कुठल्याही शिवसेनेचा/मनसेचा समर्थक नाही, भाजप युती असतानाही नाही नंतरही नाही, भाजपविरोधी झाल्यावरही नाही. तुडवा वगैरे भाषा वापरण्याच्या तर विरोधातच आहे. राणे आणि राणा मंडळी अशी भाषा नेहमी करतात त्याच्याही विरोध करतो. त्यांची काही वक्तव्ये तर भयंकर द्वेषयुक्त आणि भडकावू आहेत.
या सगळ्यांनाच यांच्या वरीष्ठांनी, त्यांना जमत नसेल तर त्या त्या पक्षश्रेष्ठींनी आवरले पाहिजे (खरं तर केव्हाच व्हायला हवे होते) आणि तरीही ऐकत नसल्यास पक्षातुन काढले पाहिजे. काही वक्तव्ये अशी आहेत त्यानुसार कायदेशीर कारवाई होऊ शकली असती.
राजकारण्यांची, त्यांच्या पक्षाशी निगडीत लोकांची अशी पब्लिकली केलेली वक्तव्ये आणि त्यातील कुठल्या वक्तव्यावर कारवाई झाली कुठल्या नाही अशी यादी काढली तर कारवाई न झालेल्या वक्तव्यांत कोण वर असेल काही अंदाज?
मी कशाला काही सिद्ध करू.
मी कशाला काही सिद्ध करू.
श्री उद्धव ठाकरे आणि श्री शरद पवार यांच्या पक्षांची वाताहत का कशी आणि कुणी केली हे जनतेला माहिती आहे.
ईडी सी बी आय ची भीती काँग्रेसच्या खासदारांना आमदारांना नाही का ? ते कसे काय बुवा फुटले नाहीत?
इथले तेच आठ दहा "शिमग्याचे शिलेदार" कोणताही साधा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नसल्याने प्रश्नांना फाटे फोडणे, भाजपच्या कुठल्यातरी चुका दाखवणे इतकेच करत आले आहेत. आत्मपरीक्षण करत नाहीत.
जनतेने का नाकारले याचे उत्तर परत परत ईडी, सिबीआय, आयकर, निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय यांच्या कडे बोट दाखवणे होते.
शिंदे गट सोडून गेल्यावर उरलेली सेना सुद्धा एकसंध का राहत नाही याचे उत्तर नाही म्हणून परत परत ईडी सीबीआय आयकर चं तुणतुणं वाजवत राहतात.
त्यातील काही लोकांची भाषा सुद्धा श्री संजय राऊत यांच्या पेक्षा ज~राशीच बरी असते.
वैफल्यग्रस्त होत चालल्याची लक्षणे आहेत.
चालायचंच
ईडी सी बी आय ची भीती
ईडी सी बी आय ची भीती काँग्रेसच्या खासदारांना आमदारांना नाही का ? ते कसे काय बुवा फुटले नाहीत? >> अशोक चव्हाणला कुशीत कुणी घेतले ? कृपाशंकर सिंग कुठल्या पक्षात होता? हेमंता बिसवसारमा आठवतो का? मिलिन्द देवरा?
संज्या राऊतला कुणीतरी तुडवायला हवे. >> कुणितरी का, तुम्ही येताय का? मी घेऊन जातो त्यांच्याकडे.
जनतेने का नाकारले याचे उत्तर
जनतेने का नाकारले याचे उत्तर परत परत ईडी, सिबीआय, आयकर, निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय यांच्या कडे बोट दाखवणे होते.
वेंगुर्ला /सावंतवाडी सारख्या छोट्या गावात एवढुश्या नगरपालिका निवडणुकीत १०/१०,१५/१५ हजार रुपये पर माणशी वाटलेत भाजपने ,कसला तो लोकशाही आणि नैतिकतेचा आव आणायचा तो..
आणि बाकीच्यांनी आत्मपरीक्षण करायचं वगैरे थोर आहे .
In February 2024, Ashok
In February 2024, Ashok Shankarrao Chavan was nominated for Rajya Sabha from Maharashtra by the BJP.
कृपाशंकर सिंग On 7 July 2021, Singh joined the Bharatiya Janata Party. He had quit the Indian National Congress in 2019 over its decision to oppose the NDA government’s policy on Jammu and Kashmir, and leadership issues in Congress.
Himanta Biswa Sarma After political disagreements with the former chief minister Tarun Gogoi, Sarma resigned from all positions on 21 July 2014. He was a Member of the Legislative Assembly of the Jalukbari constituency until his resignation from the Assembly on 15 September 2015.
हे सर्व लोक त्यांच्या पक्षातून राजीनामा देऊन विधानसभा/ लोकसभा सदस्यत्व सोडून भाजप मध्ये आलेले आहेत.
तेंव्हा त्यांचे मूळ पक्ष त्यांनी पक्षाचा फायदा घेऊन निवडून आलेले आहेत असा दावा करू शकत नाहीत.
ते नंतर भाजपच्या तटिकीटावर निवडून आलेले आहेत किंवा भाजपने त्यांना राज्यसभेचे सदस्यत्व आपल्या बळावर दिलेले आहे.
फाटे फोडणे मी म्हणतोय ते हेच आहे.
मूळ मुद्दा काहीही करून भरकटवायचा.
श्री संजय राऊत यांच्याबद्दल मी काहीच म्हणालेलो नाही.
असो
आपल्या पातळीवर येऊन आपल्याशी वितंडवाद घालण्यात मला काहीही रस नाही
उत्तर / दक्षिण भारतातील
उत्तर / दक्षिण भारतातील शाळांमध्ये तीसरी भाषा कोणती?
शिवसेनेच्या अस्ताला संजय राऊत
शिवसेनेच्या अस्ताला संजय राऊत किती जबाबदार ?
हा एक अत्यंत महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे याचे विश्लेषण फारसे झालेले नाही. २०१९ पूर्वी शिवसेना ही भाजपाबरोबर युतीत होती. शिवसेनेच्या आमदारांना आणि मंत्र्यांना भाजपाच्या आमदारांचा आणि मंत्र्यांचा आधार होता, सहकार्य होते. संसदीय डावपेच , निधी मिळवणे या आणि अश्या अनेक बाबीत शिवसेनेचे आमदार आणि मंत्री कमी पडत असत परंतु भाजपा सांभाळून घेत असे. उलट लहान भावाला मोठा घास द्यावा या न्यायाने भाजपाचे मंत्री शिवसेनेच्या आमदारांना अधिक निधी वाटप करताना कचरत नसत. बाळासाहेबांच्या निधनानंतर सुद्धा उद्धवकडे मोदी आणि शहा यांनी बाळासाहेबांचा सुपुत्र म्हणूनच पाहिले आणि त्यामुळे त्याचे सगळे नखरे , निष्क्रियता सहन करत , अपमान गिळत त्यांनी युती कायम ठेवली.
उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात बाळासाहेबांचा मुलगा या सावलीतून बाहेर येण्याचा भुंगा घुसवणारे संजय राऊत. अनेक वेळा बाळासाहेबांचा मुलगा ही ओळख आता उद्धव यांना नकोशी झाली आहे असे वाटत आहे असे त्यांच्या बोलण्यातून जाणवत असे. मला स्वतंत्र अस्तित्व आहे. माझी स्वतंत्र ओळख आहे. मी सुद्धा तितकाच कर्तुत्ववान आहे आणि लोकांनी सुद्धा आता मला बाळासाहेबांचा मुलगा म्हणून ओळखू नये असे त्यांच्या वर्तनातून दिसू लागले होते. याच भूमिकेतून भाजपावाले आपल्याला बाळासाहेबांचा मुलगा म्हणूनच किंमत देत आहेत ही गोष्ट उद्धव यांछया हृदयात एखाद्या शुलासारखी घुसवली गेली.
परिणामी आपण वेगळी राजकीय आघाडी बनवली तर ती माझ्या कर्तुत्वातून निर्माण झालेली असेल आणि त्याचे मला श्रेय मिळेल या भावनेतून उद्धव यांनी भाजपाची साथ सोडली. मुख्यमंत्रीपद ही उद्धवची महत्वाकांक्षा पेटवून संजय राऊत यांनी सगळा खेळ रचला आणि 2019 चे सत्तांतर झाले. भाजपाची , हिंदुत्वाची साथ सोडणे यातूनच आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण होणार आहे या भूमिकेतून उद्धव यांनी हिंदुत्वाला सुद्धा तिलांजली दिली.
शिवसेनेतील समस्त मंडळी बाळासाहेबांच्या संस्कारात आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आलेली होती त्यांना हे रुचले नाही. जोडीला सत्तेतील मुख्यमंत्रीपद वगळता सगळीच मलाई कोंग्रेस आणि राष्ट्रवादी खात होती हे त्यांना उघड दिसत होते. जोडीला मुख्यमंत्रीपद मिळाल्याने उद्धवराव अधिकच उद्धट झाले होते. त्यामुळेच पहिल्या बंडाची ठिणगी पडली. आताचे दुसरे बंड आणि काही काळाने होणारे तिसरे बंड हा या पहिल्या बंडाचा उशिरा ऐकू येणारा प्रतिध्वनी आहे.
उद्धव आणि शिवसेनेच्या या पतनाला सर्वार्थाने संजय राऊत जबाबदार आहेत. त्यांनी उद्धव यांचा स्वभावदोष , अहंकार , एककल्लीपणा आणि काहीही करून बाळासाहेबांचा पुत्र हा शिक्का पुसून काढण्याची तडफड याचा योग्य वापर करत त्यांची वार्यावर वरात काढली आणि आज शिवसेना शेवटचे आचके देत असताना सुद्धा संजय राऊत सोडून जाणार्या प्रत्येकाचे परतीचे दरवाजे बंड करणे आणि समेटाची शक्यता संपुष्टात आणण्याचे काम प्रामाणिकपणाने करत आहेत.
Anil Gaganbhedi Thatte
भौ तोर्सेकराचे पण एखादे
भौ तोर्सेकराचे पण एखादे विश्लेषण असेल तर चिकटवा
संज्या मझारी लग्न करेल तेव्हा
संज्या मझारी लग्न करेल तेव्हा उबाठाने आनंदी होऊन त्याच्या लग्नात नाचू नये.
आदित्यला मुख्यमंत्री करवणे
आदित्यला मुख्यमंत्री करवणे हाच { घराणेशाही विरोधी आवाज उठवणाऱ्या सेनेचा}प्लान होता . आणि भाजपने सतत मातोश्रीवर येऊन नाक घासत सल्ला विचारायला येणे.
पण टांगा पलटी करूनही पवारकाकांनी आदित्यला मुख्यमंत्री बनवायला नकार दिला. तोही प्लान फिसकटलाच.
हायला!! उद्धव साठी पण ही
हायला!! उद्धव साठी पण ही ब्रेकिन्ग न्युज आसेल !!
उद्धव ठाकरे म्हणाले त्यांना
उद्धव ठाकरे म्हणाले त्यांना नेतृत्वाची हाव नाही. कोणत्याही शिवसैनिकाने पक्षप्रमुख व्हावे. हे ऐकल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या डोळ्यांत अश्रू आले.
शिंदे म्हणाले की ते टायगर आहेत.
अमित शहा म्हणाले आता शिंदे गट असा उल्लेख करण्याची गरज नाही. आता एकच शिवसेना आहे म्हणाले.
राष्ट्रवादीचे एक, दोन नेते उद्या बाहेर पडणार असे दाखवले.
बाळासाहेबांनी उद्धवला प्रमूख
बाळासाहेबांनी उद्धवला प्रमूख केल्यावर राज बाहेर पडला तेव्हा त्याच्या पाठीवर हात ठेवून तू जाऊ नकोस हे तेव्हाच सांगायचे होते पण. राजने बाळासाहेबांचा फोटो लावून मतं मागायला सुरुवात केली. तरी तू माझा फोटो लावू नकोस म्हणाले. आता राज परत आले पण वेळ निघून गेली. हे माहीतच आहे. नेतृत्वाची कुणाला हौस नाही हे आहेच. पवारकाका म्हणाले होते की शिवसेनेला पुढे न्यायला दोन वीर आहेतच. राजकीय ज्योतिषीच ते.
शिवसैनिकांनी कुणाच्याकडे पाहावं?
अजून काही महिन्यांत काकरोच पार्टी भाजपला मोठे आव्हान देणार आणि विरोधी पक्षांनाही खाऊन टाकणार, तीन वर्षं वाट पाहावी लागणार हीच अडचण.
अजून काही महिन्यांत काकरोच
अजून काही महिन्यांत काकरोच पार्टी भाजपला मोठे आव्हान देणार आणि विरोधी पक्षांनाही खाऊन टाकणार,>>>> Srd
तुमच्या तोंडात साखर पडो.
ओमराजे माघारी फिरले आणि
ओमराजे माघारी फिरले आणि ठाकरेंसोबतच राहिले तर या पाचही खासदारांची खासदारकी जाऊ शकते, असं सूत्रांनी सांगितलं. ठाकरे गटाचे एकूण 9 खासदार आहेत. वेगळा गट स्थापन करण्यासाठी 6 खासदार हवेत. म्हणजे दोन तृतियांश खासदार फुटले पाहिजे. त्यातील एक खासदार जरी कमी असेल तर वेगळा गट स्थापन केला जाऊ शकत नाही. आता ओमराजे माघारी फिरले. तर पाचच खासदार उरतात. आणि ठाकरे गटाने बजावलेल्या व्हीपनुसार ठाकरे गट या पाचही खासदारांना बडतर्फ करण्याची शिफारस लोकसभा अध्यक्षांना करू शकतो आणि या खासदारांची खासदारकी जाऊ शकते, असं सूत्रांनी सांगितलं. शरद यादव केसचा दाखला देऊन ठाकरे गट या खासदारांना घरी पाठवू शकतो, असं सांगितलं जात आहे. मात्र, आता ओमराजे काय निर्णय घेतात यावर सर्व काही अवलंबून आहे.
व्हीप हा घरच्या हळदी
व्हीप हा घरच्या हळदी कुंकवासाठी नसतो तर सभागृहात होणाऱ्या कामकाज आणि मतदान यासाठी असतो हे काही लोकांना समजतच नाहीये!
The Tenth Schedule: Added by the 52nd Amendment Act in 1985, Paragraph 2(1)(b) states that a legislator is disqualified from the House if they vote or abstain from voting contrary to any directive issued by their political party.
Exceptions to Defection: A legislator cannot be disqualified for violating a whip if they have obtained prior permission from the party, or if at least two-thirds of the party's legislators decide to merge with or form a new political party.
बाकी चालू द्या!
निवडून आलेला खासदार कुठल्याही
निवडून आलेला खासदार कुठल्याही पक्षाचा असला तरी तो भाजप चा म्हणून declare करावे.
नीट किंवा आणखीन कोणत्याही परीक्षेचा फॉर्म भरल्याबरोबर त्यांना उत्तीर्ण म्हणून घोषित करावे...
अशा दोन चार अत्यावश्यक गोष्टी करून टाकल्या की निदान बाकी कामं करायला वेळ आणि पैसा उपलब्ध होईल.
भाजप पक्ष हा अतिशय कपटी आहे,
भाजप पक्ष हा अतिशय कपटी आहे, पक्ष वाढवायचा होता तेव्हा मातोश्रीवर येऊन पाय चाटायचे, नंतर ज्यांच्याब्जीवर वाढले त्या ठाकरेंवरच उलटले! ज्या ज्या राज्यात ज्या ज्या पक्षांच्या जिवावर वाढला त्या सगळ्यांना भाजपने संपवले, उदा, महाराष्ट्र गोमानाटक पार्टी, आसाम गण परिषद, अकाली दल, संयुक्त जनता दल! अश्या कपटी लोकाना ओळखून उद्धव ठाकरे बाजुले झाले म्हणून शिवसेना आज वाचून आहे, संजय राऊत ह्यांची नोंद कठीण काळात शिवसेना वाचवणारे अशी राहील, बाकी राऊतांच्या नावाने कितीही भुंकू द्या!
म्हणजे भाजपा हा अस्तीनाचा साप
म्हणजे भाजपा हा अस्तीनाचा साप आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला?
हो! आणि त्याच बरोबर
हो! आणि त्याच बरोबर सापाची पिलावळ ही अनीतिमत्तावन असते.
कुरुळकर नावाचा देशद्रोही
कुरुळकर नावाचा देशद्रोही संघोटा दोषी ठरला आहे म्हणे. फार हुशार होता म्हणतात, संघाच्या कुसंस्कारात जाऊन देशद्रोही झाला असावा.
शिवसेनेच्या जीवावर भाजप वाढला
शिवसेनेच्या जीवावर भाजप वाढला असे म्हणणार्यांनी इतिहास नीट वाचून पहावा!
भारतीय जनसंघाचे 1951 च्या पहिल्या निवडणुकीत तीन खासदार निवडून आले होते
शिवसेनेचा पहिला खासदार 1989 मध्ये निवडून आला होता.
महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेना नगण्य आहे.
आणि
आता हिंदुत्व सोडल्यामुळे शिवसेना उबाठा महाराष्ट्रात सुद्धा नगण्य होण्याच्या मार्गावर आहे.
Pages