Submitted by हेमंतकुमार on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे
मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
“असिलता/असिल्लता” हा शब्द
“असिलता/असिल्लता” हा शब्द राजस्थानी-मारवाड़ी भाषिक भागातून आला आहे आणि त्याची शब्द-फोड **असि + लता** अशी आहे.
१. शब्द-रचना:
- **असि** = संस्कृत/प्राकृत/मराठी-राजस्थानी मध्ये **तलवार** (असि → हिंदवी → खांदा/खड्ग)
- **लता** = वेल, लताना, वेली (जो वस्तूला गुंडाळून, चिकटून राहते किंवा जो पसरणारा असतो)
### २. “लता” येथे नेमका कोणता संदर्भ आहे?
यातील “लता” चा अर्थ **फक्त साधी वनस्पतीची वेल नाही**, तर तो **एक संस्कृत-प्राकृत अलंकारिक/ध्वनीय वापर** आहे जो **“काही गोष्टीचे खूप घट्ट, अविभाज्य, नैसर्गिक चिकटणे”** दर्शवतो.
राजपूत-क्षत्रिय संस्कृतीत “असि” (तलवार) हे कुलाच्या/व्यक्तीच्या रोम-रोमात भिनलेले असते असे मानले जाते. म्हणजे **तलवार हे कुलीन व्यक्तीचे नैसर्गिक अविभाज्य अंग आहे**, जसे वेल झाडाला चिकटलेली असते.
म्हणून:
**असि + लता = असिलता** → ज्याच्यात तलवार ही स्वभावातच, रक्तातच, रोम-रोमातच गुंफलेली/चिकटलेली आहे असा कुलीन माणूस.
### ३. अधिक गहन संदर्भ (लोक-मानसातला):
- राजपूतांच्या लोककथांमध्ये असे वर्णन येते की **खऱ्या राजपूताच्या हातात तलवार ही वेगळी वस्तू नसते, ती त्याची लता (प्राकृतिक वाढ) असते**. म्हणजे जसे हात-पाय हे शरीराचे अवयव असतात, तसे खऱ्या क्षत्रियाचे हत्यार हे त्याचे अवयवच असते.
- जन्मतःच त्याच्यात संरक्षण-युद्ध-वीरता ही “लता” (वेल) प्रमाणे पसरलेली असते.
### ४. त्यामुळेच “असिलता तलवार परजणे” चे रूपक:
- खरी असिलता (ज्यात तलवार ही लता आहे) ही **परजणे** (परीक्षेत उतरने) वरच खरी दिसते.
- पण ती लता कधी कुंद होत नाही, कारण ती नैसर्गिक आहे, बनावट नाही.
### थोडक्यात उत्तर:
“लता” हा शब्द येथे **“नैसर्गिकरीत्या चिकटलेली, अविभाज्य झालेली, रक्तात भिनलेली”** ही कल्पना दर्शवण्यासाठी वापरला आहे.
म्हणून **असिलता = ज्याच्यात तलवार ही जन्मतःच लता बनून गुंफलेली आहे** असा खरा कुलीन/वीर पुरुष.
हा शब्द संस्कृत “असि” + “लता” यांचा संधि आणि नंतर प्राकृत-मराठी-राजस्थानी बोलीतल्या ध्वनी-बदलातून तयार झाला, पण त्यामागची कल्पना अतिशय सुंदर आणि खोल आहे.
साभार ग्रोक
* साभार ग्रोक >>> अतिशय
* साभार ग्रोक >>> अतिशय रोचक माहिती आहे. बऱ्याच संकल्पना समजल्या.
धन्यवाद !
जबरी माहिती रानभूली.
जबरी माहिती रानभूली.
असिधारा (व्रत) = edge of the
असिधारा (व्रत) घेणे = edge of the sword = अवघड काम
“ एकदा का तुमचा बावळा उखडला
“ एकदा का तुमचा बावळा उखडला की जन्मभर ते लिगाड तुमच्या मागे लागलंच म्हणून समजा”.
वरील वाक्य रवींद्र पिंगे यांच्या लेखनात वाचले. संदर्भावरून अर्थ समजला, परंतु बावळा या शब्दाचा नेहमीचा अर्थ वगळता खांदा हा देखील दुसरा अर्थ आहे हे प्रथमच समजले !
मोल्सवर्थनुसार मूळ शब्द बाव्हळा हा आहे. म्हणजे 'बावळा' अप. दिसतोय.
. .
लिगाड= लचांड;
‘लिंग’वरून हा शब्द आला असावा, इति मोल्सवर्थ.
अर्थात यासारख्या शब्दांचे मूळ अनिश्चित असल्याचेही तिथे म्हटले आहे
मॅक्डोनेल संस्कृत शब्दकोशातून
मॅक्डोनेल संस्कृत शब्दकोशातून:
लता [Printed book page 260-2]
लता latā, f. creeping plant, creeper (ord. mg.:
often —° with words meaning brow, arm,
locks, slender, body, sword-blade, lightning,
to express beauty, thinness, tenderness etc.);
branch; N. of the Mādhavī creeper (Gaertnera
racemosa); lash of a whip; pearl necklace;
slender woman; woman: -gṛha, n.
bower of creepers, arbour; -anta, n. (?)
flower: -bāṇa, m. (flower-arrowed), god of
love; -pāśa, m. festoon of creepers; -maṇḍapa, m. bower of creepers, arbour; -mādhavī,
f. the Mādhavī creeper (Gaertnera racemosa);
-ālaya, m. dwelling of creepers (of an owl);
-valaya, m. n. arbour of creepers: -vat, a.
provided with arbours; -veṣṭita-ka, n. embrace
of a creeper.15490 [ID=15490 ]
विद्युल्लता , भ्रूलता हे शब्द यात दिलेल्या अर्थाप्रमाणे (to express beauty, thinness, tenderness etc.) वाटतात.
कर्मधारय?
वेली सारखी (दिसणारी) वीज, वेली सारखी बारीक/कोरीव भुवई.
आणि वेली सारखे तीक्ष्ण ( to express thinness) तलवारीचे पाते / असे तलवारीचे पाते असलेली तलवार?
* वेली सारखे तीक्ष्ण ( to
* वेली सारखे तीक्ष्ण ( to express thinness) तलवारीचे पाते
>>> समजले. छान.
लिगाड= लचांड, कटकट
लिगाड= लचांड, कटकट
लचांड जास्त प्रचलित आहे.
लिगाड हा शन्यष्टक स्तोत्रात वाचला आहे.
जगीं मान्य ते लौकिकी द्वेष वाढे॥ कुडें पावडें येति अंगी लिगाडें॥
बावळा = खांदा नवीन माहिती.
वेली सारखे तीक्ष्ण ( to express thinness) तलवारीचे पाते>>>>>> छान उकल
वेली सारखे तीक्ष्ण ( to
तीक्ष्ण ( to express thinness)
हे पटेबल आहे. विद्युल्लतामधेही सेम बोध होतो.
* विद्युल्लता >>> विजेसाठी
* विद्युल्लता >>> विजेसाठी चपला शब्द सुद्धा मला खूप आवडतो.
मागे एका पत्रलेखनात एका माणसाने खूप काळ वीज बंद असल्याचे लिहीताना
"त्या 'चपलारहित' अवस्थेत . . . " असे वर्णन करून श्लेष साधला होता
. . .
* जगीं मान्य ते लौकिकी द्वेष वाढे॥ कुडें पावडें येति अंगी लिगाडें॥ >>>> वा, उत्तम !
चपलारहित>>>>>>
चपलारहित>>>>>>
चपलारहित मानव, छान उकल.
चपलारहित
मानव, छान उकल.
**तलवार हे कुलीन व्यक्तीचे
**तलवार हे कुलीन व्यक्तीचे नैसर्गिक अविभाज्य अंग आहे** >>>> हे भारी आहे! सॅम्प्रस की कोणातरी प्रसिद्ध टेनिसपटूने टेनिस रॅकेट हा त्याच्या शरीराचा भाग असल्याचे म्हंटले होते, ती दिवसातील बहुतांश वेळ त्याच्या हातातच असते - असे काहीतरी, त्याचीच आठवण झाली.
पारिलगी
पारिलगी
हा शब्द इथल्या https://www.loksatta.com/lokrang/loksatta-abhijaat-litfest-literature-lo... मजकुरात तीनदा आलेला आहे.
गुगलनुसार त्याचा अर्थ 'पारलिंगी' (Transgender) असा आहे. हा समजायला सोपा असताना त्याचे पारिलगी असे अवघड रूप का केले आहे ते समजले नाही
अवघड रूप का केले आहे ते समजले
अवघड रूप का केले आहे ते समजले नाही >>
तसे नाही केले तर शब्दकोश निम्म्यावर येईल.
या शब्दांच्या अर्थात काय फरक
या शब्दांच्या अर्थात काय फरक आहे.
१. आमंत्रण विरूद्ध निमंत्रण
२. आरंभ विरूद्ध प्रारंभ
* आमंत्रण / निमंत्रण
* आमंत्रण / निमंत्रण
>>>> https://www.maayboli.com/node/7295?page=24
माझा इथला जुना प्रतिसाद पुन्हा एकदा :
सध्या लोकसत्तामध्ये आठवड्यातील पाच दिवस भाषासूत्र सदर चालू असते. त्यातील एका लेखकांना मी या विषयाचा संदर्भ मिळेल का अशी विचारणा केली होती. त्यांचे मला आलेले उत्तर त्यांच्याच शब्दात असे:
"दातेकर्वे कोशात आमंत्रण व निमंत्रण या दोहोंचा अर्थ बोलावणे , असा दिला आहे.
व्युत्पत्ती कोशात आमंत्रण याचा मूळ संस्कृतमधील अर्थ निरोप घेणे असा दिला आहे.
त्यामुळे आपल्याकडे फरक केला जात असावा . वैयक्तिक पातळीवर अगत्यपूर्वक बोलावणे याला निमंत्रण असे म्हणणे रूढ झाले आहे".
Submitted by कुमार१ on 10 December, 2022 - 19:40
* आरंभ विरूद्ध प्रारंभ >>>
* आरंभ/ प्रारंभ >>>>
प्र हा अधिक, विशेष किंवा तीव्र याविषयीचा उपसर्ग आहे
(गोरे एकाक्षरी शब्दकोश)
प्रारंभ = प्रथमारंभ (शब्दकौमुदी)
चु भू )
>>>> ( एखादे काम आपण नित्यनेमाने करणार असू तर सर्वात प्रथम केले त्याला प्रारंभ आणि नंतर केव्हाही पुन्हा पुन्हा करत राहू तेव्हा प्रत्येक वेळी आरंभ होतो, असा आपला माझा तर्क
परंतु मुळात ते दोन्ही समानर्थीच दिसत आहेत.
धन्यवाद कुमार सर.
धन्यवाद कुमार सर.
या दोन्ही शब्दांचे परस्पर विरोधी अर्थ अनेक प्रतिष्ठीत वर्तमानपत्र / माध्यमांच्या पेजवर आहेत. संस्कृत भाषेतले अर्थ असे सांगूनही उलट सुलट अर्थ दिले आहेत. यामुळे गोंधळ झाला.
नमुना म्हणून ही लिंक बघा.
https://www.uttar.co/question/58e0ededcd5cd000ec8f2a1f
आरंभ , प्रारंभ च्या बाबतही असाच गोंधळ आहे.
कोणतीही क्रिया सुरू (स्टार्ट) करणे म्हणजे आरंभ आणि पुन्हा सुरू करणे म्हणजे ( रिस्टार्ट) प्रारंभ असे एका ठिकाणी म्हटलेय.
तर एखादी क्रिया जी सुरू होऊन संपते तिच्या बाबतीत आरंभ
तर एखादी क्रिया दीर्घकाळ किंवा अनंत काळ सुरू राहते तिच्या सुरूवातीसाठी प्रारंभ असाही अर्थ दिला आहे. उदा ब्रह्मांडाची सुरूवात, विश्वाचा प्रारंभ, जीवसृष्टीचा प्रारंभ इ.
खूप गोंधळात टाकणारे आहे.
सुरुवात हा सोपा शब्द असताना
खूप गोंधळात टाकणारे आहे. >>
सुरुवात हा सोपा शब्द असताना प्रारंभ/आरंभ असे शब्द वापरायचेच कशाला?
पण जर सरळ सोपे शब्द वापरले तर मग आमची भाषा किती समृद्ध आहे हे सांगणार कसे, बोजड शब्द न वापरून लेखक आपली विद्वत्ता दाखवणार कशी, चर्चेसाठी असे धागे चालणार कसे?
काही ठिकाणी वापरावा लागतो.
काही ठिकाणी वापरावा लागतो. उदा. प्रारंभी विनती करू गणपती ... या श्लोकात प्रारंभी ऐवजी सुरुवातीला हा शब्द वापरला तर वृत्तात बसत नाही.
गुलाल चित्रपटात "आरंभ है प्रचंड" असं एक अत्यंत वीररसपूर्ण सुंदर गाणं आहे. तिथे "सुरुवात है प्रचंड" असं म्हटलं तर अगदीच बुळबुळीत होऊन जातं ते.
सुरूवात म्हणजे फटाक्यांची वात
सुरूवात म्हणजे फटाक्यांची वात आधी सुरसुरी करते.
श्लोक, कविता, गाणी नीट लिहिता
श्लोक, कविता, गाणी नीट लिहिता यावीत म्हणून नवे शब्द शोधले जात असतील, असे मला तरी वाटत नाही. पण असू शकेल, मी भाषा विषयात इतका पारंगत नाही. पण समजा, क्लिष्ट शब्द नसेल तर मग सोपा शब्द वापरूनच संवाद साधला असता, नाही का?
Simple is smarter.
कुठला शब्द वापरायचा यासाठी
कुठला शब्द वापरायचा यासाठी ठिकाण, काळ, व्यक्त होणारा भाव, सवय, ट्रेंड इत्यादी अनेक बाबी महत्त्वाच्या ठरतात. केवळ सोपे असणे हा एक निकष नाही. उदाहरणार्थ, नेहमी, नित्य आणि नित या तीन समानार्थी शब्दांत नित हा सगळ्यात सोपा आहे, पण आपण तितका तो वापरत नाही. काहीजण always हा शब्द मराठी बोलताना वापरतात. माझा काही आक्षेप नाही. ज्याला जो सोयीचा वाटेल त्याने तो वापरावा. सोपाच वापरायला पाहिजे हा हट्ट नको.
सोपे किंवा कठीण शब्द वापरणे
सोपे किंवा कठीण शब्द वापरणे हा चॉइस झाला. मुळात एकाच भावनेचे/ विषयाचे वेगवेगळे शेडस् दाखवणारे एकाधिक शब्द त्या भाषेत “उपलब्ध असणे” हे त्या भाषेची श्रीमंती/ reach दाखवणारे लक्षण आहे असे माझे मत.
उपलब्ध शब्द- शब्दार्थ- शब्दवापराच्या रीतीभाती माहित करून घ्यायच्या किंवा नाही ही व्यक्तिगत आवड निवड.
नाहीतर basic commutation हाच भाषेचा एकमेव उद्देश असेल तर ते काम तर sign language ने सुद्धा होते. सोप्या किंवा कठीण कोणत्याच शब्दांची फारशी गरज नाही.
श्रोते-ऐकणारे-वाचकवाचणारे
श्रोते-ऐकणारे-वाचकवाचणारे आपल्या आवडी निवडीनुसार सोप्या अथवा अलंकारिक लिखाणात रस दाखवतील. यातही स्पेक्ट्रम असेल, आणि अलंकारिक हे बायनरी नव्हे. शिवाय कुठली भाषा आवडेल हे विषयानुसारही ठरेल.यात श्रेष्ठ -हीन, उच्च-नीच असे नाही.
विद्वत्ता पाजळतात हे वैयक्तिक मत झाले, विद्वत्ता पाजळायला क्लिष्ट भाषाच लागते असेही नाही अगदी सोप्या भाषेतही पाजळतात.
(वर खोडलेले शब्द सुध्दा कुणाला क्लिष्ट वाटू शकतात, क्लिष्ट हा शब्दही कुणाला कठीण वाटु शकतो.)
वरील चर्चेत अतिशय चांगले
वरील चर्चेत अतिशय चांगले मुद्दे मांडलेले आहेत. मराठीचे नामवंत प्राध्यापक द दि पुंडे यांचा ‘शब्दांची कडवी अर्थक्षेत्रे’ हा सुंदर लेख आहे. त्यात त्यांनी घोड्याचे पर्यायी शब्द देऊन त्यांचा सुयोग्य वापर आणि अयोग्य वापर कसा असतो ते छान समजावले आहे :
अश्व, हय यांचा अर्थ घोडाच परंतु खालचे शब्द पाहिल्यावर मुद्दा लक्षात येईल
तसेच,
घोडदळाचा प्रमुख हा अश्वपतीच असतो, घोडपती नाही !
सुंदर उदाहरण आहे कुमार.
सुंदर उदाहरण आहे कुमार.
हयवदन
हयवदन = 😂
अवांतर:
आमच्या एका नावडत्या सिनीयरला “घोडमुख्या” न म्हणता “हयवदन” म्हणत असू. त्यांना ते काहीतरी संस्कृतमधले कॉम्प्लिमेंट वाटत असे.
चर्चा रंगली आहे म्हणून वरील
चर्चा रंगली आहे म्हणून वरील मुद्द्यातबाबत दोन चांगले भाषाप्रभू काय म्हणतात त्याची भर घालतो.
1. पुंडे यांचे शालेय शिक्षक शेख तर म्हणायचे की, भाषेत समानार्थी शब्द नसतातच ; समानार्थी शब्द हे एक सफेद झूठ आहे ! समानार्थी वाटणाऱ्या शब्दांच्या अर्थछटा किंचित बदलणाऱ्या असतात आणि म्हणून त्यांची अर्थक्षेत्रे काहीशी वेगवेगळी असतात.
2. अरुण नेरूरकरांनी त्यांच्या भाषा या पुस्तकात thesaurus चे मराठी भाषांतर पर्यायी शब्दकोश किंवा अर्थरूपकोश असे दिलेले आहे. (लोक सामान्य भाषांतर समानार्थी कोश असे करतात).
Pages