Submitted by हेमंतकुमार on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे
मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.. हिंग लावला की साधारण
.. हिंग लावला की साधारण पदार्थदेखील चविष्ट लागतो/आवडू शकतो अशी त्यामागची कल्पना.…
हे नव्हते माहित. जय हो
कधीपासून मलाही हे समजून घ्यायचे होते की हिंगच का? मिरे लावून कुणी विचारतात का मग?
हातावर “तुरी” देऊन फरार होणे हे असेच मला थकवणारे expression. म्हणजे तुरीऐवजी वाटाणे हातावर दिले तर फ़रार होण्यात काही अडचणी येतात का? मूग गिळून गप्प बसण्याऐवजी चवळी गिळली तर तोंडातून शब्द भडाभडा बाहेर पडतील का? या आणि अशाच प्रश्नांनी माझे बालपण व्यापून गेल्याचे आठवते. 😀
डोक्यावर मिरे वाटतात.
डोक्यावर मिरे वाटतात.
स्थानमहात्म्य इथेही
स्थानमहात्म्य इथेही 😀
अच्छा. थँक्यू स्वाती.
अच्छा.
थँक्यू स्वाती.

मला वाटायचे, की अंगाला हिंग फासून गेले तरी ( वासानेही) कुणी लक्ष देणार नाही ( इतका तो माणूस सर्वसाधारण आहे!)
हातावर तुरी देऊन म्हणजे - तुरी सोलायला महाकठीण असतात, तर त्या कुणाच्या हातावर ठेवून, त्याला म्हणायचे सोल, आणि त्याचे लक्ष विचलित करून स्वतः पसार व्हायचे, असे काही असेल !
कोरडे ( शिजवलेले अर्थात) मूग गिळल्याने, जो दोठरा बसतो, त्याने आपोआपच बोलती बंद होत असणार !
>>>स्थानमहात्म्य इथेही
>>>स्थानमहात्म्य इथेही

चांगली स्वादिष्ट चर्चा !
चांगली स्वादिष्ट चर्चा !
मूग उच्चाराने ‘मूक’च्या जवळ
मूग उच्चाराने ‘मूक’च्या जवळ जात असल्याने चवळीऐवजी त्यांची वर्णी लागली असावी.
चवळीच्या शेंगेला दुसरा आणि बेटर रोल मिळाल्यामुळे तिनेही हरकत घेतली नसावी.
त्यावरून सहज हे आठवलं:
त्यावरून सहज हे आठवलं:

मस्त चर्चा. अनिंद्य यांचे
मस्त चर्चा. अनिंद्य यांचे प्रश्न पण उत्तम. तुरी झाल्या, मूग झाले, मिरे झाले, हिंग झालं, वाटाणे राहिले. वाटाण्याच्या अक्षता लावणे
मला वाटायचे, की अंगाला हिंग
मला वाटायचे, की अंगाला हिंग फासून गेले तरी ( वासानेही) कुणी लक्ष देणार नाही ( इतका तो माणूस सर्वसाधारण आहे!) >>
डोळ्यासमोर दृश्य आलं
हर्पा, आणि राईचा पर्वत.
हर्पा, आणि राईचा पर्वत. आणि दात असताना नसणारे चणे. आणि उडदातले काळे-गोरे.

आणि काहींना ज्याचं निमित्त मिळतं ते पावटे.
सुंठी वाचून खोकला गेला.
सुंठी वाचून खोकला गेला.
अरे धमाल इथे
अरे धमाल इथे 😀
हिंग, मूग, चवळी, मिरे, सुंठ, वाटाणे, चणे, उडीद, पावटे झाले, मग ते तोंडात न भिजणारे तीळ का मागे रहावेत?
मित्रांनो, बालपणीचे प्रश्न सतावत होतेच, तुम्हीं हे नवीन दालन उघडले आणि रिनोवेट केले 😀
@स्वाती, coffee, tea idioms
@स्वाती, coffee, tea idioms मधले Cup of Joe मी Cup of Joy वाचले.
एकुण एकच 🙂
स्वाती
स्वाती
स्वाती
स्वाती

चवळीच्या शेंगेला बेटर रोल मिळाल्याने....
भंड्( = कलह करणे)
भंड् ( = कलह करणे)
या संस्कृत मूळरूपाशी संबंधित विविध शब्द आणि त्यांचे अर्थ रोचक आहेत :
भांड =
5. वरच्या ओठास जन्मतः पडलेली भेग
. . .
कु + भांड = कुभांड = खोटा आरोप
कुभांड >>> अभांडकुभांड ही द्विरुक्ती देखील वापरतात.
(बृहद्कोश)
ते “ कुभांड” आहे होय ?
ते “ कुभांड” आहे होय ?
मी आजवर हा शब्द “कुंभाड “ रचले असाच वाचत होतो !
🤦
अभांडकुभांड कधी वाचला / ऐकला
अभांडकुभांड कधी वाचला / ऐकला नव्हता.
"भांडकुदळ" का म्हणत असावेत?
कुदळीचा काय संबंध आहे?
कुदळाने जमीन/माती उकरून
कुदळाने जमीन/माती उकरून काढतात तसे भांडण उकरून काढणारा म्हणून भांडकुदळ म्हणत असावेत
कुदळ =
कुदळ =
(लाक्षणिक) दांडगा; भांडखोर. [क. गुद्दलि, हिं. कुंदालि]
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
>>> भांड + कुदळ मध्ये दुप्पट अर्थवृद्धी झाली.
अहि/ही व महि/ही
अहि/ही व
महि/ही
यावरून तयार झालेले विविध शब्द आणि त्यांचे विभिन्न अर्थ पाहणे रंजक आहे :
अहि= सूर्य; सर्प, नाग.
मही = पृथ्वी; एक नदी.
(महीसुत = मंगळ,
महीतल = पाताळ)
. .
अही = विस्तवाची– अग्नीची धग
आहिताग्नी = अग्निहोत्री, होम करणारा.
अग्निहोत्री = (ल.) एकसारखे धूम्रपान करणारा, हा पण लाक्षणिक अर्थ !
. .
अहिरावण व महिरावण = रावणाचे सावत्र भाऊ
अग्निहोत्री = (ल.) एकसारखे
अग्निहोत्री = (ल.) एकसारखे धूम्रपान करणारा, हा पण लाक्षणिक अर्थ !>>>>>> ही नवीन माहिती.
अहि-मही
अहि-मही = 👌
महिन्द्र, महिपाल (राजा) आणि महिसुत (राजपुत्र) हे शब्द चटकन आठवले.
म्हणजे महिषासुराला महीशासुर
म्हणजे महिषासुराला महीशासुर म्हटले तरी चालले पाहिजे (त्याने सगळी पृथ्वी जिंकली होती या अर्थाने तो महीश (कॉलींग हर्पा टू चेक संधी) होतो)
माधव चांगला होता
माधव
चांगला होता
भिरंगत
भिरंगत
हा शब्द किंवा त्याचे मूळ क्रियापद कोशात काही सापडले नाही. ना धों महानोर यांच्या लेखनात वाचलेला हा शब्द मोठा गोड वाटला :
“पक्षी भिरंगत रानभर चिवचिव करत गाणी गात होते”.
भिर बिर+ तरंगत?
भिर भिर+ तरंगत?
...महीशासुर... माधव
...महीशासुर... माधव
माधव
माधव
>>> भिर भिर+ तरंगत?
हो, मलाही तरंगत असंच वाटलं.
Pages