शब्दवेध व शब्दरंग (५)

Submitted by हेमंतकुमार on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे

मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंहकटी आणि गज गती अशी विशेषणे स्त्री साठी वापरलेली वाचली आहेत.

पुलंचा काहीतरी विनोद पण आहे ना की हे उलटे होऊ नये अशा अर्थी.
>>>> लंपन, हो Happy

चामट
१. कातड्यासारखे चिवट; वातड . [सं. चर्म]

. . . बेचव व चामट भोजन . . .
. .
अर्थ २ :
चेंगट, चिकट (माणूस).

हरणकाळजी
= आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल वाटणारी आत्यंतिक काळजी

हा शब्द एक ऋषी आणि हरिण यांच्या संबंधीच्या नीतीकथेतून आलेला आहे असे कोश म्हणतो.
ही कोणती कथा असावी ?

अरेच्चा ! धन्यवाद Happy
पण तिथेही प्रश्नाचे पूर्ण उत्तर मिळालेले दिसत नाही.
हरकत नाही. आता कुणाला काही वेगळे स्पष्टीकरण किंवा कथेसंबंधी माहिती असल्यास जरूर सांगावे.
. . .
'Deer anxiety' अशी एक कथा AI सांगतो आहे. पण ती कितपत विश्वासार्ह आहे माहित नाही

कामाची गर्दी; गडबड; घाई या अर्थी असलेल्या खालील शब्दाचे किती म्हणून ते अप. असावेत !

दबडका, दबडगा,
दबडघा, दबडशा,
धबडगा-शा, रबडगा

“यमन”

हा हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातला राग म्हणून माहिती होता.

दुसरा अर्थ:

यमन = निग्रह; ताब्यात ठेवणे

नियमन शब्द त्यावरूनच तयार झालाय.

योगाभ्यासात यम-नियम ऐकले असतील. अष्टांग राजयोगात यम आणि नियम ही पहिली दोन अंगे आहेत. यम् धातू आहे. रोखणे, नियंत्रित करणे इत्यादी अर्थ. यंत्र हा शब्द याच धातूपासून तयार होतो. यम धातूच्या आधी नि उपसर्ग लावून नियम होतो. त्यापासूनच नियंत्रण वगैरे शब्द तयार होतात.

दमन = दाबून टाकणे

इंद्रिय- दमन, दुष्टदमन, रोगदमन, कामदमन, क्रोधदमन, इ.
. .
यमन = Controlling, restraining
दमन = Taming, subduing.

यमन दमन फरक ✔

BTW, आमचे एक स्नेही आहेत - रिपुदमन सिंह Happy

नाही, त्यांचे आडनाव “भाटी” आहे.

त्यांना भाटी मराठीत she-cat ला म्हणतात हे सांगितले आणि ती “वाघाची मावशी” असते हे सुद्धा 😀

रिपुदमन वरून आठवले. नाव उच्चारायला सोपे करण्याच्या नादात त्याचा अर्थच बदलल्याची इतर उदाहरणे आहेत का? मधे एका कस्टमर की पार्टनर कंपनीशी मीटिंग्ज चालत त्यात एक रिपुदमन होता. बंगाली आहे बहुतेक तो. पण बोलताना त्याला सगळे नुसते "रिपु" म्हणत. त्यांना मला सांगायचे होते की तुम्ही दमन चेच दमन करून त्याच्या नावाचा अर्थच बदलत आहात Happy

दमनचे दमन 😀

नावाचा अर्थच बदलल्याची इतर उदाहरणे ….

हे तर होतच असावे. अर्थ / जेंडर बदलणे. श्यामाचरण ला श्यामा, विद्याधर ला विद्या, देवकीनंदन ला देवकी... मग जेंडर न समजल्याने घडणारे विनोद.

दमनचेच दमन>>>>>>> Lol
बरं झालं तो चिडला नाही. नाहीतर परत रिपुदमन चे शमन करावे लागले असते.

दमन चेच दमन >> Lol

शिवाय दमन "चेच" (चेचणे) हे पण

बनचुकेपणा
हा शब्द कोणत्याच स्वरूपात बृहदकोश किंवा शब्दरत्नाकरमध्ये नाही. त्याचा अर्थ आणि उत्पत्ती गुगल एआयला विचारले असता खालीलप्रमाणे उत्तर मिळाले :
१. अर्थ :
'बनचुकेपणा' म्हणजे धूर्तपणा, लबाडी किंवा चलाखपणा. एखादी व्यक्ती जेव्हा आपले स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याला फसवते किंवा अत्यंत शिताफीने (कावेबाजपणाने) वागते, तेव्हा तिच्या वागण्याला 'बनचुकेपणा' असे म्हटले जाते.

२. व्युत्पत्ती :
हा शब्द 'बनचुक' या शब्दावरून तयार झाला आहे.
हा मूळ शब्द हिंदी भाषेतील 'बन्चुका' किंवा 'बन्चुक' यावरून मराठीत रूढ झाला असावा असे मानले जाते.
काही व्युत्पत्ती कोशांनुसार, 'बनणे' (तयार होणे किंवा सोंग घेणे) आणि 'चुकणे' (चूक करणे किंवा चकवणे) या क्रियापदांच्या छटा यात दडलेल्या आहेत. जो समोरच्याला 'बनवण्यात' (फसवण्यात) कधीच 'चुकत' नाही, तो 'बनचुक'.
. .
हिंदीतील शब्दकोश संदर्भ हा मिळाला : https://www.hindwi.org/hindi-dictionary/meaning-of-banchak
बंचक = धूर्त.

काय वाटते ?

वञ्च् संस्कृत धातु. म्हणजे फसविणे. त्याचे कर्तृवाचक प्रत्यय लागुन वञ्चक. तसेच वञ्चुक सुद्धा आहे. अर्थ : फसवणारा.
याचे अपभ्रंश बंचक, बनचुक असावेत असे वाटते.

बबनवण्यात कधीच चुकत नाही तो बनचुक हे काहीच्याकाही वाटते.

वञ्चुकचा अर्थ लांडगा असाही आहे. किंवा कोल्हा सुद्धा आहे.

धन्स !
* बनवण्यात कधीच चुकत नाही तो बनचुक हे काहीच्याकाही वाटते. >>> +१११

GPT ने दिलेला शब्दार्थ तर काहीच्या काहीच आहे.
पाहू शकता विचारून Happy

“बन चुके” हे “having arrived in life and flaunting it” टाइप वापरतांना बघितले आहे लोकांना.

बनचुके आणि “बनवण्यात कधीच चुकत नाही तो बनचुक” काहीच टोटल लागत नाही. इथे Google AI गंडले आहे सपशेल.

Pages