पुणे गटग - १८ मे, रविवार, फोटो आणि वृ सहित

Submitted by किल्ली on 12 May, 2025 - 07:18

पुणेकर : महत्वाची सूचना
गटग आहे
18 मे रविवार
वेळ सकाळी 9.0, ब्रेफाला,
अमितव भारतात आलेत त्यांना भेटायला.
.
जागा
Glen's bakehouse, Pune
Madhav Nivas, 34/6, Prabhat Rd, Abhiman Society, Kachare Colony, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra 411004

गरवारे मेट्रो स्टेशन पासून जवळ आहे.
दुचाकी, चारचाकी parking ची सोय आहे

https://maps.app.goo.gl/vuVqW5VJhCkMPYRm7
.
कृपया कोण कोण येणार सांगा.
.
गटगला येणारे सभासद :
आलेले सभासद- हजेरी
Edited list
:
०.अमितव- हजर
१. Resham dor - हजर
२. धनवंती - हजर
३.किल्ली - हजर
४. हर्पेन - हजर
५.रिया
६.झकासराव - हजर
७.अनया - हजर
८.एवीता +२
९.कृष्णा- हजर
१०.प्रज्ञा
११.अश्विनी ११- हजर
१२.तेजो - सुंदर सुगंधी फुले पोचली Happy
१३. अश्विनी ९९- हजर
१४. आबा
१५.वावे - हजर
१६. Csj
१७. पियू
१८.आशुडी - हजर
१९.vb- हजर

..
यादीत नसूनही हजर असलेले माबोकर
Sharadg
बिपीन सांगळे
साजिरा
आशुडी
महिंद्र गोडबोले
सिम्बा
यक्ष
.
व्हर्चुअलांची हजेरी:
अस्मिता
फा र एन्ड
अवल
प्रज्ञा
मुग्धा केदार
धनी
Rmd
.
.

.
सेल्फि १
IMG-20250518-WA0011.jpg
.
सेल्फि २
IMG-20250518-WA0025.jpg
.
पिकासो चित्र
एक्स्प्रेशन्स बघा Happy
IMG-20250518-WA0014.jpg
.
सर्वात लवकर पोचलेले सभासद Happy
IMG-20250518-WA0032.jpg
.
खास क्षण
IMG-20250518-WA0083.jpg
.
IMG-20250518-WA0071.jpg
.
IMG-20250518-WA0085.jpg
.
IMG-20250518-WA0034.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मिसला गटग आणि गटगने मिसळ मिसली. आता पुन्हा मात्र नाही मिसणार मिसळ गटग झाला तर.

११-१२ मी हैदराबादेत आहे. पण कितपत वेळ मिळेल ठाऊक नाही मिटिंगा खेळत बसावे लागणार आहे!

पिंचि गटग वृतांत - लेट पण थेट

मागच्या पुण्याच्या "ग्लेन" गटगला मला येता आले नाही. अगदी इच्छा असूनही.त्यावेळी आदल्याच रविवारी अमितव ठाणे गटग झालं होत.
त्यानंतर "हा सगळ्याच गटगला कसा असतो" अश्या वावड्या देखील उठल्या होत्या तेव्हा. असो. मेलेलं कोंबडं आगीला भीत नसतं.
दरम्यान आमच्या शत्रुपक्षाच्या माहेरी म्हणजेच माझ्या सासरी जाण्याचा बेत ठरला त्यातच हे पिंचि गटग ठरलं. श्रावण शुद्ध मधुस्रवा तृतीया, २७ जुलै. मग मी सुद्धा नाव नोंदवलं. आदल्या दिवशी चिंचवडला पोचलो. मग रात्री चेहऱ्यावर अष्टसात्विक भाव आणत "मी उद्या सकाळी सात ते दुपारी बारा पर्यंत गटगला जाणार आहे" अशी घोषणा केली. "गटग?" इति सासूबाई. "अगं, त्यांचं मायबोलीचं गेट-टूगेदर का काय असतं गं ते" "अस्स होय" यावर मायलेकींनी हसून घेतलं. मी त्याकडे दुर्लक्ष केलं. स्थळ दुर्गा टेकडी पायथा, वेळ सकाळी ७.३० अशी ठरली होती. मुंबईच्या सवयीप्रमाणे मी वेळेआधी पोचलो. इथंच अप्पूघर आहे. तिथे अगदी लहान असताना गेलो होतो. ते आठवले. मी पोचलो तेव्हा तिथे नदी स्वच्छता अभियानाचे पथनाट्य चालू होते. तेवढ्यात वर्तुळ फेम विशाल कुलकर्णी आले. मग नमस्कार चमत्कार झाला आणि मस्त गप्पा चालू झाल्या. तितक्यात रेशम डोर आल्या. पावसाची भुरभुर चालू होतीच. काही वेळाने किल्ली आणि झकासराव देखील आले. आता सकाळच्या स्लॉट मध्ये फक्त आमच्या संयोजक बाई म्हणजे धनवंती आल्या नव्हत्या. आमच्या गप्पा चालू होत्याच. त्या चालू असताना धनवंती रेनकोट घालून अगदी तयारीनिशी आल्या. आता आम्ही सगळे दुर्गा टेकडी चढू लागलो. बऱ्यापैकी गर्दी होती. पाऊस पडत होता. छत्र्या रेनकोट सांभाळत आम्ही चालत होतो मोठ्या आवाजात गप्पा मारत जाणारे फक्त आम्हीच होतो बहुतेक. तसंही इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला आपल्या मायबोलीकरांना काही विषयाचे बंधन नसते. पावसामुळे टेकडी अगदी सुस्नात, हिरवीगार झाली होती. बऱ्यापैकी स्वच्छता देखील होती. मी आपला माझा निसर्गाच्या गप्पा मोड बंद ठेवला होता. तितक्यात मला कृष्णवड दिसला. मग न राहवून सगळ्यांना दाखवला. तिथे "मोतीफूल" हे एक नवीन झाड पाहिलं. इथून तिथून करत करत आम्ही पार टोकावर पोचलो. तिथून छान विहंगम दृश्य दिसत होते. हिरवे जंगल कमी होऊन सिमेंटचे जंगल उभे राहत असल्याची खंत सगळ्यांच्या तोंडून ऐकायला मिळत होती. मग सेल्फी, फोटो काढले. तिथून त्यांनी मला ट्रेन दाखवली. हायवे दाखवला. माझ्यासारख्या मुंबईकराला पुणेकरांनी ट्रेन आणि हायवे दाखवला ही पाहून माझे मन भरून आले. Lol मग आपण एवढी चढाई करून आलो म्हणून कॅडबरीचा प्रसाद वाटला. आता सगळ्यांनी विशालदादाला घेराव घालून वर्तुळ पूर्ण करा अशी आर्जवं केली. वर्तुळ नाही तर नाही मग बुटांचे वर्तुळ करून तो फोटो काढण्यात आला. सगळे ठेवणीतले किस्से सांगत होते. गप्पांना उधाण आले होते. आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. येताना दुर्गा देवीच्या मंदिरात दर्शन घेतले. हा परिसर छान सुशोभित करण्यात आला आहे, कृत्रिम धबधबा, वॉटर लिलींच तळं, छोट्या बागा. सगळीकडे पाणी खेळवले आहे. यावरून "झुळझुळ वाणी खेळवा पाणी.. " हि जाहिरात पण सुरात म्हणून झाली. येताना खाणीच्या खड्ड्यात झालेल्या तलावाचे फोटो काढले. तिथे बदके आणि इतर बरेच पक्षी होते. आता आमच्या पोटातील पक्ष्यांनी ओरडायला चालू केले. तोवर अतरंगी, हर्पेन आणि ००१ हे पण "श्रीकृष्णा" (खादाडीचे ठिकाण) येथे पोहोचत होते. खाली उतरून पायथ्याशी असलेल्या स्टॉल वरून बरीच खरेदी झाली आणि आम्ही श्रीकृष्णाला पोचलो.
टेबल धरून त्रिकुट बसलं होतं. ब्रेकफास्ट बफे/ बुफे (पेट पीव्हची भीती) ची रांग पाहून तिथे उभे न राहता आम्ही आपआपल्या ऑर्डर दिल्या. ऑर्डर येई पर्यंत रेशम यांनी पेरू कापून दिले. आता सगळ्यांना "भुका" लागल्या होत्या. आबा आणि मल्लिनाथ यांच्यासाठी एक टेबल अडवून ठेवला होता. त्यावर इतर सगळ्या लोकांचा डोळा. मला ती बफे/ बुफेची भुताळी रांग आत जाऊन कुठे गायब होत होती याचे फार नवल वाटत होते. मल्लिनाथ आणि आबा आल्यावर पुन्हा ऑर्डरी गेल्या. गप्पा, थट्टा, मस्करींना नुसता ऊत आला होता. बऱ्याच मायबोलीकरांच्या आणि खास वाड्यावरच्या मायबोलीकरांच्या खूप आठवणी काढल्या. तेवढ्यात rmd आणि धनि यांचा विडिओ कॉल आला. त्यांचे काहीही बोलणे ऐकू येत नव्हते. त्यांच्यांशी आम्ही खाणाखुणा करूनच बोलत होतो. त्यानंतर कविन आणि अभिरीना यांचा विडिओ कॉल आला. या दोघी आमच्याशी सोडून एकमेकींशी विडिओ कॉल वर बोलत बसल्या. शेवटी हो नाही करत आम्ही उठलो आणि बाहेर आलो. तितक्यात तिथे जुनी मायबोलीकर योगिता भेटली. त्यांच्याशी भर रस्त्यातच गप्पा मारायला सुरुवात केली. इतक्यात पावसाची सर आली म्हणून एका आडोश्याला उभे राहून जवळ जवळ पाऊण तास गप्पा मारल्या. गप्पांच्या विषयांची रेंज भारी होती. इथले मायबोलीकर ते इमॅजिन करू शकतात. गप्पा मारून घश्याला कोरड पडली म्हणून मग आम्ही जवळच शर्मा काकांच्या दुकानात गेलो. तिथे पुन्हा यथेच्छ गप्पा मारून आईसक्रीम खाऊन बाहेर पडलो. अजूनही गप्पा संपल्या नव्हत्या. आता जवळजवळ दुपारचा एक वाजला होता. त्यामुळे सगळे एकमेकांचा निरोप घेऊन चारी दिशांना पांगले. पुणे नाही तर नाही, पण वेशीवरचं पिंचि गटग मी पदरात पाडून घेतलं. सगळयांना भेटून खूप छान वाटलं. ताजतवानं झाल्यासारखं वाटलं. नेहमीप्रमाणे कोणाशीच पहिल्यांदा बोलतोय असे अजिबात वाटले नाही. सगळ्याशी जो एक स्नेहबंध आहे तो असाच वृद्धिंगत होत राहो.

पिंचि गटग हे "मिसळ गटग" म्हणून ठरलं होतं. पण प्रत्यक्षात कोणालाही मिसळ मिळाली नाही. याचा तीव्र निषेध. त्यामुळे पिंचिकरांनी पुन्हा एकदा फक्त मिसळ गटग आयोजित करावं असे फर्मान काढण्यात येत आहे. याची अंमलबजावणी २०२५ मधेच करण्यात यावी.

मस्त लिहिलं आहेस! मजा आली वाचायला. Happy
>> मुंबईच्या सवयीप्रमाणे मी वेळेआधी पोचलो. >> इथे सवयीचे सार्वत्रिकरण ते ही पुण्याला (का पिंचि ला? शत्रूपक्षाला दिलास का वाचायला?) हिणवून केल्याने दोन मार्क जास्तीचे.
>>माझ्यासारख्या मुंबईकराला ट्रेन आणि हायवे पाहून खूप आनंद झाला. >> Lol
"भुका" >> इथे कोट -अनकोट भुका वर अडकलोय. हसायचं सुटायला नको Proud

_/\_

माझ्यासारख्या मुंबईकराला पुणेकरांनी ट्रेन आणि हायवे दाखवला
>>>
ट्रेन और हायवे तो बहोत देख लोगे लेकिन वो वाली बात कहांसे लाओगे? Proud

Lol
संबोधनात्मक नाव!!!
मस्त वृत्तांत ऋतुराज!
पण मला हे वर्तुळ काय आहे ते समजलं नाही!

मला वाटतं, माबोकरांच्या भेटी, गटग, सहल इ चे इतिवृत्त, अहवाल, नोंद, वृत्तांत इ लिहावे तो ऋतूराजानेच; चलत् चित्र उभे राहिले डोळ्यांपुढे!

---

अवांतर: पिंचि हे पुण्यात आहे का? मला वाटत होतं पुणे हे पिंचिचा एक भाग आहे!
Wink

वा रा, पिंची हे अतिचशय स्वतंत्र प्रकरण आहे Happy
आमचे गाव, आमची अस्मिता !!!!!
( कोकोनटची आई नव्हे Happy )
फक्त कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी आम्ही धागा युती केली आहे.

ऋतुराजच्या खुसखुशीत शैलीतला वृ खूप आवडला. बरेच जण वृ खूप छान लिहीतात.

पिंचि हे पुण्यात आहे का? मला वाटत होतं पुणे हे पिंचिचा एक भाग आहे! >> ही दोन्ही शहरं अरबडगट्टू नावाच्या महानगराचा भाग आहेत. पण मूळ शहराचं नाव घेण्याची पद्धत नाही. जो कुणी हे नाव घेईल त्याला हैद्राबादला काळ्या पाण्याची सजा ठोठावली जाते म्हणून ते नाव अनेकांना ठाऊक नाही.

'चिंचवड, पुणे १९' असं पत्त्यात असतं. फार वर्षांपुर्वी पिंचिचं 'न्यू पुणे' असं नामांतर करण्याची टूम निघाली होती. स्वाभिमानी पिंचिकरांनी ती हाणून पाडली. ते काहीही असलं तरी, आणि 'महाराष्ट्राची उद्योगनगरी' अशा दणदणीत स्वतंत्र ओळखीसारख्या आणखी काही ओळखी मिळूनही पुण्याच्या सावलीतनं बाहेर पडता न येण्याचं प्रारब्ध आहेच.

अर्थात आता संदर्भ बदलले. हिंजवडी, खराडी सारख्यांनी विद्रोही महानगरं उभी केली. मूळ पुण्याचं महात्म्य कमी करून टाकलं. तळेगाव, शिवापूर, शिक्रापूर, लोणी, म्हाळुंगे, पिरंगुट इ. ठिकाणं आणि त्याकडे जाणार्‍या रस्त्यांनी स्वस्त घरं आणि सेकंड होम्स देऊ केली, आणि पुणं पसरट झालं. शिवाय पीएमआरडीए, पीएम्पीएमएल, महामेट्रो, रिंगरोड अशा एकात्मिक विकासयोजना नि संस्था सुरू झाल्या नि सारं एक झालं. आता जशी भारतातली सारी शहरं सारखीच दिसतात तशीच शहरातली सारी उपनगरंही सारखीच दिसतात. स्वतंत्र ओळखी जपणारं काहीकाही अजून दिसतंच. पण तरी..

महानगरांच्या छायेतनं बाहेर न पडू शकलेली जोड-महानगरं हा एक मोठा ललितलेख होईल. पिंचि, ठाणे, नवी मुंबई, सिकंदराबाद आणि अशी कितीतरी असतील. नवी दिल्लीचा अपवाद. तिची बातच न्यारी.

अरे हा ग्टग बाफ आहे होय. मी वाड्यातल्या गप्पा समजून पोस्ट टाकली..

आता असूदे. इच्छुकांनी ओलांडून जा

स्वतंत्र ओळखी जपणारं काहीकाही अजून दिसतंच. >>>> हो, जसे मूळचे माधव निवास व मराठीपण आता "ग्लेन'स बेकहाउस" व आजूबाजूच्या आधुनिक जागतिक डेकॉरमधे शोधावे लागते Happy जागतिक अशा करता की भिंतींवरचा टोन इटालियन/युरोपियन आहे पण बाजूच्या कुंड्यांमधली(*) झाडे ट्रॉपिकल आहेत.

(*) - प्रमाण मराठी अर्थाने

(*) - प्रमाण मराठी अर्थाने >>>> अशक्य Rofl

मस्त वृत्तांत ऋतुराज. Happy
धनवन्ती, मी पण तुमचीच अस्मिता आहे. Happy
राभु, साजिरा मस्त पोस्टी.
निरू Lol

भारी गटग आणि छान लेपथे वृत्तांत / वृत्तान्त.

रच्याकने, पिंचि बद्दल पिंपवड किंवा चिंचपरी असंही ऐकलय ब्बा !

शिळा झालाय पण लिहिते, वृ:
..

इकडे गटग ची सूचना लिहिली, जायचं ठरलं आणि धनवंती ला विचारून घेतलं कुठे यायचं, parking आहे का वगैरे.
पाऊस असणार म्हणून कार नेणार वगैरे विचार करून ठेवला सगळं सेट होतं.
इकडे गाडीची काळजी घे अशा सूचना पण आल्या होत्या.
पण गटग आणि माझी गाडी ह्याचं काहीतरी वाकडं आहे. Tire बसलं होतं, मिकी mouse लगेच ओ toodles म्हणून यंत्र मागवतो आणि दुरुस्त करतो तसं कर असं ॐ म्हणाला, एक क्षण विचार करून तोच म्हणाला खोटं असतं गं ते Lol
मग मला कुणी पिक करेल का ह्या विनंतीला जरा जास्तीच मान देऊन झकासराव बरं म्हणाले, साडेनऊला जाऊया वगैरे चांगलं सांगत होते मी त्यांना, पण टेकडी वरुन ट्रेन बघायची म्हणून सकाळी साडेसात लाच पोचायचं असं ठरलं आणि झकासराव थेट आळंदीला घ्यायला येतो म्हणाले. मग रविवारी पहाटे मीही कधी नाही ते उठून टेकडी चढायला तयार झाले. पिंची रस्ता मार्गदर्शन आणि अनेक विविध विषयांवर बोलत आम्ही पोचलो दुर्गा टेकडी च्या gate पाशी.
रस्त्यात एका भगव्या रेनकोट आणि जांभळ्या scooty वाल्या मॅडम नी हाक मारली, त्या आपल्याला संयोजक ताई धनवंती होत्या. पायथ्याशी विशाल दादा, ऋतुराज आणि रेशम डोर भेटल्या, hi hello झालं.
..
Drizzle आहे अशी पूर्वसूचना मिळाली होती, पण तिकडे जोरदार पाऊस सुरु होता, मग hands free राहावेत म्हणून रेनकोट चढवला, छत्र्या उघडल्या, मुहूर्ताचा selfie निघाला.
मग विविध विषयांवर गप्पा मारत चढलो. वरती ऋतुराज ने लिहिलंय त्याप्रमाणे उत्साह ओसंडूनवाहत होता.
विविध वयोगटाची मंडळी धावत होती त्यांना बघून मी पण जरा (लाज वाटून)पूर्ण टेकडी चढते म्हणाले.
चढण असणारा निसरडा रस्ता टाळून आम्ही घाटाने पक्क्या रस्त्याने जात होतो.
एका point ला थकल्यावर धन्वंती ला विचारलं अजून किती आहे?
तर सराईत संयोजक आणि मोटिवेटर ताई म्हणाल्या आलंच दहा मिनिटात शिखर असं म्हणून ती केवळ धीर देत होती ते कळलं होतं मला.
पण काय करते, इतका intersting group आणि गप्पा सुरु होत्या की मजाच आली.
शेवटी आता हिचे नविन shoes चिखलाने मळाले पाहिजेत अशा हेतूने विशाल दादांनी एक कच्चा रस्ता घेऊ असं म्हणून तिकडून हाकारे करत नेलं गृप ला, मला घसरून पडायचा इतिहास असल्याने जपून जपून जात होतो, एव्हाना पाऊस सुद्धा कमी झाला होता.
पोचलो एकदाचे शिखरावर.
खरं सांगू का मला दाखवली गेलेली ट्रेन काही दिसली नाही Lol एक कावळा दिसला बाकी
View छान होता.

वसंतराव, वृतान्त छान!

माझ्यासारख्या मुंबईकराला पुणेकरांनी ट्रेन आणि हायवे दाखवला ही पाहून माझे मन भरून आले. Lol >>>>

पुण्यासारख्या हिरव्यागार टेकड्यांवरून पाहणे मुंबईकरांच्या नशिबी नाही ना म्हणून दाखविले असावे! Wink

जोड-महानगरं हा एक मोठा ललितलेख होईल.>>>>

साजिरा, लेख लिहूनच काढ आता. खूप काही आहे त्यात लिहायला.

शिळा झालाय पण लिहिते >>> Happy हरकत नाही. आवडला वृ Happy शिखरापर्यंतचे वर्णन आहे म्हणजे पूर्वार्ध आहे का?

ट्रेन दिसली नाही? टेकडीपासून फार लांब नाही ना ट्रेनचा ट्रॅक? आणि त्याकरता सकाळी लौकर कशाला? आता बराच ओघ असतो ना दिवसभर गाड्यांचा?
सराईत संयोजक आणि मोटिवेटर >>> Happy Happy

पिंची रस्ता मार्गदर्शन >> हे काय आहे? सरकारी खात्याचे अधिकारी येउन कार्यालयातील लोकांना मार्गदर्शन करतात तसे काहीतरी वाटले.

Pages