Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2025 - 20:14
आज मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे..
ग्रेट..!
हिच पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली.
ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा अगदी समर्पक वाटले.
केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे अचानक इतके घाईगडबडीत, पण तेव्हाच खरे तर शंका आली होती. यावेळी काहीतरी घडणार आहे. घडणे गरजेचे आहे.
भारत-पाक युद्ध घडामोडी जाणून घ्यायला आणि वैयक्तिक हेवेदावे तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून साधकबाधक चर्चा, माहितीची देवाणघेवाण करायला हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
">>परंतु रावळपिंडि जवळील नूर
">>परंतु रावळपिंडि जवळील नूर खान एयरबेस, सरगोधा एयरबेस ज्या ठिकाणी नुक्लियर आर्सनलचा मोठा साठा आहे, तिथे आपण केलेल्या हवाई हल्ल्यामुळे रेडिएशन लिकेजचा धोका निर्माण झालेला आहे. पुढे परिस्थिती अजुन चिघळु नये म्हणुन अमेरिकेने मध्यस्थि करण्याचा प्रयत्न केला>>"
+१ ०००
रेडिएशन लिकेज झाले असल्याची माहिती बाहेर येत आहे. भारताने केलेल्या परवाच्या कारवाईत न्युक्लीअर स्टोरेजेसना लक्ष्य केल्यावर ४.० रिक्टर स्केलच्या भुकंपासारख्या कंपनांची नोंद झाली असल्याच्या आणि त्यानंतर त्वरीत अमेरिकेच्या रेडीएशन स्निफर विमानाने त्या परिसरात घिरट्या घातल्याच्या बातम्या बर्यापैकी विश्वसनिय मानता येतील अशा स्त्रोतांकडुन येत आहेत.
पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठ्याला त्यांच्याच भुप्रदेशात पिन पॉईंट टार्गेट करुन उध्वस्त करण्याचा जो भिमपराक्रम आपल्या हवाई दलाने करुन दाखवला तोच फार मोठा टर्नींग पॉईंट ठरल्याचे जगभरातील संरक्षण तज्ञ म्हणत आहेत. ह्या गोष्टीचे गांभीर्य समजत असलेल्या फक्त अमेरिकाच नाही तर जग्भरातल्या जवळपास तीस देशांनी (ह्यात युरोप आणि मध्यपुर्वेतल्या देशांचाही समावेश आहे) तुर्तास कारवाई थांबवण्यासाठी भारताची मनधरणी केल्याचेही सांगितले जात आहे, पण त्यात कितपत तथ्य आहे हे समजायला अजुन थोडा अवधी लागेल.
एकंदरीत पहाता (अजुनही सुरु असलेल्या) 'ऑपरेशन सिंदुर' अंतर्गत भारताने अत्तापर्यंत केलेल्या लष्करी कारवाईत पाकिस्तानचे कल्पनेपलीकडे नुकसान झाले आहे असे मानण्यास वाव आहे!
बाकी कालची DGMO ची पत्रकार परिषद मस्तच झाली 👍
दिवाळीच्या रॉकेटप्रमाणे सहज
दिवाळीच्या रॉकेटप्रमाणे सहज उडविता येत नसतील पण अशी घटना ब्रह्मोस क्षेपणास्त्राबाबत ९ मार्च २०२२ रोजी घडलेली आहे आणि तिघांना शिक्षा मिळाली आहे. technical malfunction, maintenance अशी कारणे दिली आहेत.
मिसरी त्यांचे काम चोखपणे बजावत आहे. त्यांच्या कुटुंबाला ट्रोल करणे चिड आणणारे आहे
>>>> १००++
एकेकाळी भारताचा डेप्युटी NSA असलेल्या माणसाला कुटुंबावरून त्यांना ट्रोल करणे किंवा त्यांच्या देशभक्तीवर शंका घेणे केवळ मूर्खपणाचेच नाही तर गुन्हेगारी स्वरूपाचे आहे. विक्रम मिश्री यांचे निवेदन अतिशय डिप्लोमॅटिक आणि मॅटर ऑफ फॅक्ट होते. त्यांच्याकडून पाकिस्तानी जनरल्ससारखे बिनबुडाचे क्लेम किंवा मीडियासारख्या कंठाळी निवेदनाची मागणी करणाऱ्या लोकांच्या एकंदर वकुबाविषयी शंका आहे.
हिमांशी नरवाल यांनाही ट्रोल्सचा सामना करावा लागला होता. >>>
हिमांशी नरवाल यांच्या वक्तव्याविषयी मतभेद असू शकतात. वैयक्तिकरित्या मला ते वावगे वाटले नाही. पण त्या मुलीला सावरायला वेळ द्यायच्याऐवजी तिला गलिच्छ भाषेत ट्रोल करणाऱ्या माणसांना चाबकाने फोडले पाहिजे.
तसेच प्रसार माध्यमांनी कोणत्या वेळी कुणाच्या प्रतिक्रिया घ्यायच्या याचेही भान ठेवले पाहिजे. तुमचा टी आर पी वाढवण्यासाठी गिधाडासारख्या जखमा टोचू नका प्लीज. त्यांनी स्वतःहून निवेदन केले तर गोष्ट वेगळी.
भारताने अत्तापर्यंत केलेल्या
भारताने अत्तापर्यंत केलेल्या लष्करी कारवाईत पाकिस्तानचे कल्पनेपलीकडे नुकसान झाले आहे असे मानण्यास वाव आहे!
>>
असे असेल तर चांगलेच आहे.
पण असे असताना पाक कुठल्या तोंडाने विजय साजरा करतोय? आम्ही मुतोड जवाब दिला असून भारताचे भारी नुकसान केले हे पाक चे अधिकारी प्रेस कॉन्फरन्स मधे सांगताहेत. विजय त्यांचाच झाला हे सांगताहेत. हे नाही म्हंटलं तरी मनाला अस्वस्थ करणारे आहे.
भारताने अधिकृतपणे अमेरिकेचा हस्तक्षेप / फोनकॉल्स अजूनही मान्य केले नाहीत. ते सिजफायर दोन्ही डिजी एम ओ च्या बोलण्या नंतर ( पाकच्या कॉल आल्या नंतर) झाले असेच सांगताहेत. खखो दे जा.
>>"पण असे असताना पाक कुठल्या
>>"पण असे असताना पाक कुठल्या तोंडाने विजय साजरा करतोय? आम्ही मुतोड जवाब दिला असून भारताचे भारी नुकसान केले हे पाक चे अधिकारी प्रेस कॉन्फरन्स मधे सांगताहेत. विजय त्यांचाच झाला हे सांगताहेत.">>
ह्यावरुन काल वाचलेला एक विनोद खाली देत आहे... (ह्याकडे राजकिय दृष्टीकोनातुन नं पहाता केवळ विनोद म्हणुन पहावे)
"There are strong ties between Rahul Gandhi and Pakistan, both declares victory after a loss 😀"
पाक ने कारगिल मध्ये तरी कुठे
पाक ने कारगिल मध्ये तरी कुठे मान्य केलं होत. एका अर्थाने ते बरंही आहे. नाहीतर त्यांच्या लोकांचा त्यांच्या मिलिटरी वर दबाव आला असता.
युद्धस्य कथा रम्या साठी एक
युद्धस्य कथा रम्या साठी एक वेगळा धागा असावा, इथे अधिकृत माहितीच्या आधारावर चर्चा व्हावी असे सुचवतो.
मानव +१
मानव +१
ट्रम्प ने मध्यस्ती केली नाही
ट्रम्प ने मध्यस्ती केली नाही पण आम्ही मध्यस्ती करतोय हे त्यांना दाखवायचेआहे . कारण ट्रम्प ने इलेकशन जिंकल्यावर एक दिवसात युक्रेन वॉर संपवेन असे सांगितले होते. ते करता आले नाही म्हणून आता उगीच सीझफायर माझ्यामुळे झाला हे दाखवायचा प्रयत्न केला. सीझफायर झाल्यावर लगेच Truth Social वर कमेंट द्यायची काही गरजच न्हवती
पर्णिका, आज सकाळच्या
पर्णिका, आज सकाळच्या रेडिओवरच्या बातम्यात कालच्या ६.३० च्या प्रेस मिटचा उल्लेख होता. मी काल ऐकला नव्हता तो भाग आजच्या बातम्यात ऐकला. त्यात स्पष्ट म्हटले गेले की पहिली चर्चा पाक dgmo चा भारतीय dgmo ला फोन आला, युद्धबंदीचा प्रस्ताव समोर ठेवण्यासाठी तेव्हा झाली. दुसरी चर्चा आज १२ वाजता होणार होती, आता सुरु असेल किण्वा झाली असावी.
ट्रंप किंवा अमेरिकेचा जराही उल्लेख केलेला नाही. ट्रंपने पाकशी चर्चा केली असेल किंवा त्याला भास झाला असेल
भारताने अद्याप असे काही म्हटले नाही.
युद्धबंदीचा प्रस्ताव पाककडुन आला. युद्ध नको ही भारताची भुमिका होती. या चर्चेत भारताने हरण्यासारखे काय होते हे कळत नाही. युद्धबंदी स्विकारायची नव्हती असे लोकांना म्हणायचे असेल तर भारताला मुळात युद्ध सुरु करावे लागले असते. ट्रंपने मध्ये तोंड घातले नसते तर एवढी धुळ उडालीही नसती. त्याने पाकमध्ये तोंड घातले, भारताने त्याचे ऐकायचा प्रश्नच येत नाही. ऑप सिंदूर आजही सुरुच आहे हे काल प्रेस मिटमध्ते ऐकवले आर्मीने.
दोन अ तिरेकी ताब्यात द्या ही मागणी प्रेस मिटमध्ये तरी ऐकली नव्हती पण मी वाचली होती. ती मिडियाने उडबलेली हवाही असु शकते.
>>> आवरा या ट्रोल करणार्
>>> आवरा या ट्रोल करणार्यांना.
हो सर, नक्की प्रयत्न करतो
ज्या बातम्या वाचायला मिळताहेत
ज्या बातम्या वाचायला मिळताहेत आणि पाकिस्तानात ज्या हालचाली होताहेत त्यावरुन जग हा निष्कर्ष काढतेय की भारतीय हल्ल्यात पाकचे न्युक्लिअर वॉर्हेड्स डॅमेज झाले, लिकिंग सुरु झाले, न्युक सेंसर्सनी हे लिकेज कॅप्चर केले आणि अमेरिकेला युद्धपातळीवर पाकशी बोलुन त्याला युद्धबंदी करायला भाग पाडावे लागले.
हे भारतीय सैन्याचे मोठे यश आहे. पुढचे दहशतवादी हल्ले थांबवायचे असतील तर पाकचे मिलिटरी तळ उध्वस्त करावेत असे मी काल बोलत होते ते भारतीय सैन्याने आधीच केले होते. ग्रेट आहे आपली आर्मी.
परवापासुन मोदीना शिव्या घालणार्या मोदीभक्तांनी आता
परत हातात आरत्या घ्यायला सुरवात केली असेल.
या धाग्यावर वेगवेळी न्यूज
या धाग्यावर वेगवेळी न्यूज चॅनेल्स येऊन तीच तीच बातमी आपापल्या शब्दांत, आपला मसाला घालून देत आहेत, असे वाटू लागले आहे.
एकमेकांची चॅनेल्स बघायला बंदी नसावी. प्रेक्षकही आपणच आहोत. आधीच कुणीतरी दिलेली बातमी आपण पुन्हा नव्याने की नवा प्रेक्षक तयार होणार आहे का?
पण असे असताना पाक कुठल्या
पण असे असताना पाक कुठल्या तोंडाने विजय साजरा करतोय? >>>>
त्यांच्या गांजलेल्या जनतेच्या तोंडावर हे गाजर नेहमी फेकले जाते. १९७१ पासुन पाक एकही युद्ध हरलेला नाही, त्याची आर्मी खान्द्यावर ढिगानी पदके व स्टार्स लाऊन फिरत असते ती सगळी

युद्धात पराक्रम गाजवुन मिळवलेली आहेत हा तिथल्या जनतेचा समज आहे. पाक प्रत्येक युद्ध हरलाय आणि ती पदके व स्टार्स भारतीय कबाडीवाल्यांकडुन आर्मीने विकत घेतलीत हे जनतेला कळले तर आर्मीचे लिंचिंग होईल.
मागचे प्रतिसाद कोण वाचेल? जे
मागचे प्रतिसाद कोण वाचेल? जे आपल्याला कळले ते ज्ञानवाटप करावे.
सबसे पहले , सबसे तेज.
सबसे पहले , सबसे तेज.
सगळेच. पुढचं विशेषण आपल्या आवडीचं घ्यावं.
तीच तर घाई.
तीच तर घाई.
भारतीय हल्ल्यात पाकचे
भारतीय हल्ल्यात पाकचे न्युक्लिअर वॉर्हेड्स डॅमेज झाले, लिकिंग सुरु झाले, न्युक सेंसर्सनी हे लिकेज कॅप्चर केले >>>
पाकिस्तान बरोबर सीझफायर नक्की
पाकिस्तान बरोबर सीझफायर नक्की का केला गेला याच्या उलटसुलट चर्चा आपल्या देशात सुरू आहेत. लोकशाही देशात व्हायला देखील हव्यात. जनतेला अधिकार आहे जाणून घेण्याचा.
पण युद्ध दीर्घकाळ सुरू राहिले असते तर पाकिस्तानची आधीच वाकलेली अर्थव्यवस्था मोडकळीस आली असती हे नक्की. युद्ध थांबले असले तरी पाकिस्तानवरील मोठे अरिष्ट येऊ घातले आहे ते परकीय चलनाचे.
कदाचित म्हणूनच परवा नाणेनिधीकडून एक बिलियन डॉलर मिळवण्यासाठी पाकिस्तान डेस्परेट असावा. पाकिस्ताचे राज्यकर्ते, लष्करशहा सतत भारतापेक्षा प्रगत शस्त्रास्त्रे मिळवण्याच्या मागे असतात. त्यासाठी परकीय चलन लागते.
हे गेली अनेक दशके सुरू आहे. त्यात पाकिस्तान अडकत चालला आहे. पाकिस्तानचे संरक्षण बजेट आहे १० ते १५ बिलियन डॉलर्स.
पाकिस्तान कडे परकीय चलन आहे १५ का १६ बिलियन डॉलर्स. जे फक्त दोन ते महिन्याचा महिन्याच्या आयातीसाठी पुरे पडू शकेल.
त्याच्या डोक्यावर १३० बिलियन डॉलर्सचे परकीय कर्ज आहे. त्यातील जवळपास २२ बिलियन डॉलर्स, या वर्षात डिसेंबर अखेर फेडायचे आहे.
पाकिस्तान जे निर्यात करतो त्याचे बास्केट अतिशय संकुचित आहे. तांदूळ, गहू, कापूस, तयार कपडे. त्यात फार मूल्यवृद्धी नसते. भारताने नद्यांच्या अडवलेल्या पाण्यामुळे या नगदी पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे.
ट्रम्प युगात आंतरराष्ट्रीय व्यापाराची घडी विस्कटत आहे. त्यामुळं पाकिस्तानच्या निर्यातीवर देखील विपरीत परिणाम होणे अटळ आहे.
चार दिवसांच्या युद्धात कराची शेयर बाजार दहा टक्के कोसळला. आता किती सावरेल माहित नाही. पण परकीय गुंतवणूकदार (एफ आय आय) कमकुवत अर्थव्यवस्थामध्ये एकूणच कमी डॉलर्स गुंतवणार हे नक्की.
आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था पाकिस्तानचे पतमानांकन कमी करू शकतात. कराची शेयर मार्केट निर्देशांक कोसळत आहे. त्याचा परिणाम नवीन परकीय भांडवलाचा ओघ आटण्यात होऊ शकतो.
आताच पाकिस्तान एका डॉलरला २८० रुपये मोजतो. तो अजून घसरू शकतो.
गेल्या ३५ वर्षात पाकिस्तानने नाणेनिधी/ आय एम एफ कडून आतापर्यंत २८ वेळा मदत घेतली आहे. गेल्या पाच वर्षात चार वेळा. सर्वात अलीकडचे जुलै २०२४ मधील. ज्याचा दुसरा हप्ता नाणेनिधीने परवा दिला.
परकीय चलन खडखडाट झाल्यामुळे, देशाचे चलन घसरल्यामुळे श्रीलंकेत काय झाले ते आपण बघितले आहे आहे. औषधे, खते, पेट्रोल, डिझेल यांची टंचाई लगेच होऊ लागेल.
पाकिस्तानला एकच त्राता आहे. चीन. तो चीनच्या अजून कह्यात जाऊ शकतो. भारतासाठी ती चांगली बातमी नसेल.
संजीव चांदोरकर (१२ मे २०२५)
“Only the dead have seen the
“Only the dead have seen the end of war.”
>>"पाक ने कारगिल मध्ये तरी
>>"पाक ने कारगिल मध्ये तरी कुठे मान्य केलं होत. एका अर्थाने ते बरंही आहे. नाहीतर त्यांच्या लोकांचा त्यांच्या मिलिटरी वर दबाव आला असता.">>
पाकिस्तान सरकारने आणि लष्कराने सद्यपरिस्थिती मान्य केली काय किंवा नाकारली काय त्याने काही फरक पडत नाही कारण आंतरराष्ट्रीय माध्यमांतुन प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि छायाचित्रे जगाने आणि पाकिस्तानी नागरिकांनीही पाहिली आहेत.
PC:
वरिल छायाचित्रे बर्यापैकी बोलकी आहेतच पण ज्या ज्या ठिकाणी हा विध्वंस झाला आहे त्या ठिकाणच्या पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्या सरकार आणि लष्कराला शिव्यांची लखोली वहात सोशल मिडियावर पोस्ट केलेले फोटोज आणि व्हिडिओज (कोणाला मिळाले तर अवश्य बघावेत, चांगली करमणुक होईल) तिथल्या आणि देशाबाहेर असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी बघुन झालेले असल्याने वस्तुस्थिती काय आहे हे त्यांना चांगलेच कळलेले आहे. बाकी पाकिस्तानी सरकार, लष्कर आणि तिथे ढिगाने असलेल्या मदरसाछाप लोकांनी करोनात का आपला पराभवही विजय म्हणुन साजरा... त्याने काही फरक पडेल असे वाटत नाही.
जाता जाता...
ऑपरेशन सिंदुर सुरु झाल्यापासुन काही जवाबदार माजी वरिष्ठ सेनाधिकारी जे सांगत होते त्याचा सारांश...
"सोशल मिडियाच्या उदयानंतर भारताचे नागरिक अशाप्रकारच्या युद्धसदृष्य परिस्थितीला पहिल्यांदाच सामोरे जात आहेत त्यामुळे भारतविरुद्ध फेक नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी त्याचा वापर नक्कीच केला जाईल पण ते प्रयत्न हाणुन पाडण्याची मोठी जवाबदारी त्याच्या भारतीय वापर्कर्त्यांवरही असेल.
आधुनिक युद्धतंत्राचा एक महत्वाचा भाग असलेल्या 'PsyOps' च्या अंतर्गत सोशल मिडियाचा वापरही येत असल्याने भारतीय वापरकर्त्यांनी समाज माध्यमांचा कसा वापर केला ह्याचा अभ्यास करुन भविष्यात युद्धकाळात ह्या माध्यमाच्या हाताळणी बाबतचे नवे धोरण ठरवले जाईल."
मलातरी त्यांचे हे मत योग्य वाटत आहे!
Responding to a query during
Responding to a query during a press conference on Monday, Air Marshal A K Bharti said, “Thank you for telling us that Kirana Hills houses some nuclear installation. We did not know about it. And we have not hit Kirana Hills, whatever is there.”
Thank you for telling us that
Thank you for telling us that Kirana Hills houses some nuclear installation. We did not know about it. And we have not hit Kirana Hills, whatever is there.
>>> ओके म्हणजे हा किराणा हिल्स हा विषय संपलेला आहे.
Pune Youth Beaten over
Pune Youth Beaten over Protest Supporting Palestine: पुण्यातील कर्वेनगर परिसरात काही तरुणांच्या एका ग्रुपवर अन्य एका गटाने पाकिस्तानला पाठिंबा देत असल्याचा आरोप करत हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील डॉमिनोजच्या बाहेर इंडियन पीपल इन सॉलिडॅरिटी विथ पॅलेस्टाईन या गटाने निदर्शने केली होती, ज्यावेळी उपस्थित असलेल्यांनी त्यांच्यावर "पाकिस्तानला पाठिंबा" देण्याचा आरोप करून निषेध करायला सुरुवात केली. अगदी १०- १५ मिनिटांतच या प्रकरणाला अतिशय हिंसक वळण प्राप्त झाले आणि इंडियन पीपल इन सॉलिडॅरिटी विथ पॅलेस्टाईनच्या गटातील तरुणांना भररस्त्यात मारहाण करण्यात आली. नेमकं हे प्रकरण काय व आतापर्यंत यात कोणती तथ्य समोर आली आहेत हे आपण व्हिडीओमध्ये जाणून घेऊया. - लोकसत्ता
https://www.youtube.com/watch?v=LzcKaIeihkg
पण त्या लीकेज आणि भूकंप झाला
पण त्या लीकेज आणि भूकंप झाला होता त्याचे काय झाले?
Top Director Generals of
Top Director Generals of Military Operations (DGMOs) and senior Navy and Air Force officers held a press conference on Monday to provide further details about Operation Sindoor. The operation, which began in the early hours of May 7, targeted nine terrorist camps across Pakistan and Pakistan-occupied-Kashmir. Operation Sindoor also served as the umbrella operation for all subsequent military responses to Pakistan.
Air Marshal AK Bharti said that while India's primary objective was to dismantle terrorist infrastructure, Pakistan's military chose to protect these elements, forcing India to expand its response. "Our fight was against terror infra, terrorists but Pakistan military chose to support terrorists and widened conflict. It is a pity that the Pakistani military chose to intervene and that for terrorists, and hence we chose to respond," Air Marshal AK Bharti said. Watch the video to know more.
https://www.youtube.com/watch?v=W2vkwd_qcXo
DGMO ची कॉन्फरन्स ऐकताना एक
DGMO ची कॉन्फरन्स ऐकताना एक सट्ल चेंज जाणवला की आपण आता POK म्हणत नाही आहोत PoJK म्हणतो आहोत जे खरं आहे.
फार उलट सुलट बातम्या आहेत,
फार उलट सुलट बातम्या आहेत, आणि फोटोज , व्हिडिओज ना तर काही अर्थ नाही. ए आय जनरेटेड कन्टेन्ट पण खूप येते अहे.
पण पर्णिका ने लिहिले तसे काहीसे फीलिंग मला येते आहे.
पाक मधे भूकंप झाला , लीकेज झाले वगैरे थिअरीजच आहेत. पाक ची इकॉनॉमी खराब आहे हे खरे आहे आणि त्यात असा"भूकंप" आणि न्यूक्लियर लीकेज वगैरे झाले असते तर पाक ची परिस्थिती कोंडीत सापडल्याची असयाला हवी होती, नाक मुठीत धरून सीझफायर करण्याची अणि आपल्या जखमांना मलमपट्टी करण्याची असती. ( जे चित्र मिडिया दाखवतेय)
पण प्रत्यक्ष तसे दिसत नाही. ट्रंप परस्पर सीझफायर अनाउन्स करतो, पाक त्या सीझफायर ला २ तास पण किंमत देत नाही. हे केवळ "पाक असाच आहे , ते मूर्ख आहेत" म्हणुन रफादफा करण्यासारखे मॅटर वाटत नाही. त्त्यांना त्याच वेळी बक्षिस मिळाल्यासारखे घसघशीत लोन मिळते. चायना पा़क ला जाहिर सपोर्ट अनाउन्स करते. (अमेरिका मात्र आपल्या मिडियाने लिहिल्यासारखी कधी थेट भारताला सपोर्ट करत नाही. ते कायम त्यांच्या बोलण्यात "दहशतवादाविरोधात लढ्यात आम्ही नेहमी सपोर्ट करू" असे म्हणतात. आम्ही भारताला सपोर्ट करतो असे सरळ कधीही म्हणत नाहीत. )हे चित्र फार पॉझिटिव वाटत नाही.
इकडे अमेरिका, ट्रंप टेरिफ वरून ३ महिने थैमान घालत असताना अचानक दुसर्याच दिवशी चायनाशी बोलणी करण्याचे स्वतःच ट्वीट करतो आणि आता चायनाशी टेरिफ डील झालेही! बिगर पिक्चर पाहिले तर सगळे टायमिंग क्वेश्चनेबल वाटते.
आपल्याला खूप गोष्टी माहित नाहीत , जे आहे त्यात देअर आर टू मेनी थिंग्ज दॅट डु नॉट मेक सेन्स. अर्थात या सुद्धा थिअरीजच झाल्या . आणि माझे वाचन आणि ज्ञान खूप आहे असे नाही.
आज रात्री 8 वाजता मोदी देशाला
आज रात्री 8 वाजता मोदी देशाला संबोधित करणार आहेत. तेव्हा सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.
विरोधी पक्षांना खरपूस टोमणे
विरोधी पक्षांना खरपूस टोमणे मारले जातील.
मला पाकिस्तानने शस्त्रसंधी घोषीत मान्य करून तीन तासात मोडली तसेच भाजपने विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून काही तासात त्यांना सत्तेत सामील करून घेतले ह्यात खूप साम्य वाटते. दोघेही भारतीय नागरिकांसाठी विश्वासघातकी.
Turkiye, China पाकिस्तानच्या
Turkiye, China पाकिस्तानच्या बाजूने; Russia सारखे मित्र असूनही भारताच्या बाजूने कुणी उभं का नाही ?
https://www.youtube.com/watch?v=h_9A0yL-ZpA
Pages