Submitted by मानव पृथ्वीकर on 2 April, 2025 - 05:31
कायप्पावर, फेसबुक किंवा इतरत्र अनेकदा काहीच्या काही वाटावे असे निनावी लिखाण फिरत असते.
त्यातील काही खास वाटले तर आणि निनावी असले तरच शेअर करण्यास हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सांबरशिःग डोकेदुखी वर वापरतात
सांबरशिःग डोकेदुखी वर वापरतात. तू एक अचाट पोस्ट लिहून टाक अन ती वाचून डोक दुखायला लागल की मला सांबरशिंग दे.
https://inis.iaea.org/records
https://inis.iaea.org/records/me8j5-p8c42
<<
रेडिएशन शोषून घेण्याबद्दल एकही शब्द नाहि त्या अभ्यासात. झाड कोणती मूलद्रव्ये इ. जमा करते त्याबद्दल आहे.
Studies conducted by Institute of Woods Science and Technology shows that red sanders heartwood accumulates strategically important light Rare Earth Elements and also, there is consistent enrichment pattern in terms of elements like La, Ce, Gd along with other elements like Cu, Zn, Co, U and Pd. In continuation of the above, absorption studies of Red Sandal wood with actinides and fission products was studied in different pH range to correlate the stripping and extraction of different actinides and fission products
Additional details
माझ्या लहाणपणी घरात
माझ्या लहाणपणी घरात रक्तचण्दनाची बाहुली होती. आपला जो अवयव दुखेल त्यावर बाहुलीचा तोच अवयव उगाळुन लावला तर बरे वाटते ही श्रद्धा होती. मला तर ती बाहुली वशीकरण करते वगैरे वाटुन भितीने मी कधीही तिला उगाळुन लावायचे प्रकार केले नाहीत. माझा पाय मुरगळल्यावर तिचा पाय उगाळुन लावला तर दुखायचे थांबेल पण डोके उगाळुन लावले तर थांबणार नाही हा भुताटकीचा प्रकार वाटायचा
मागे एका शेतीविषयक कार्यक्रमाला गेले होते. तिथे एकजण कडक कागदावर शेणाचा लेप देऊन, सुकवुन ते विकत होता. हे मोबाईलच्या मागच्या बाजुस कव्हरच्या आत ठेवायचे. म्हणजे मोबाईलचे रेडियेशन आपल्याला त्रास देत नाही
वरचे वाचुन या विषयावर नवे फॉर्वर्ड कोणी ए आय प्रेमी बनवणार नाही आणि ते फिरत फिरत या बाफवर येणार नाहीत ही एक प्रार्थना करु शकते.
रक्तचंदन गुणकारी असतं, पाय
रक्तचंदन गुणकारी असतं, पाय मुरगळला वगैरे तर लावायचे, सूज उतरते.त्याची बाहुलीच बघितली आहे जास्त, आमच्याकडे होती, हरवली.
साधना तू म्हणतेस तो व्हिडीओ फिरत होता (शेण, मोबाईल) मी बघितला नाही, फॉरवर्ड पण निघेल.
Addressing a press conference
Addressing a press conference Monday, Rashtriya Kamdhenu Aayog chief Vallabhbhai Kathiria said that cow dung has been scientifically proven to counter radiation and protect everyone from future diseases. Kathiria also unveiled a cow dung chip which can be used in mobile phones to reduce radiation.
https://www.youtube.com/watch?v=wesGvynvFs8
नावात राष्ट्रीय आहे म्हणजे सरकारी संस्था आहे. मागच्या भिंतीवर PIB लिहिलं आहे. म्हणजे पत्रकार परिषद शासकीय मंचावरून होते आहे.
*स. न. वि. वि.*
*स. न. वि. वि.*
सुरुवातीला स. न. वि. वि. असे लिहिल्यामुळे मी काही सांगतेय किंवा कशाबद्दल तरी आमंत्रण देतेय, असे कदाचित वाटू शकेल.
पण अशी सुरुवात करुन लिहिण्याचा मोह आवरला गेला नाही.
हल्ली लग्नपत्रिका, आमंत्रण पत्रिका यावरच असे लिहिलेले बघायला मिळते. एरवी असे शब्द लिहिले जात होते, हे सुध्दा विसरायला झाले आहे.
उतारवयात स्मरणशक्ती कमी होते म्हणून काही गोष्टी विसरायला होतात. पण आता असे शब्द वाचण्यात आणि लिहिण्यात येत नसल्याने विसरायला झाले आहेत.
खरेच मोबाईलसारख्या सहज संभाषण करता येणाऱ्या वस्तू उपलब्ध झाल्यामुळे, नवनवीन शोधामुळे, काही गोष्टी सोप्या झाल्या असल्या, तरीही पत्रलेखन मात्र जवळपास बंदच झाल्यामुळे पत्रात लिहिले जाणारे काही शब्द लुप्त झाल्यासारखे वाटतात.
आज सहज अशा काही शब्दांची आठवण झाली.......
*•||• श्री •||•* लिहून पत्राची सुरुवात.
*श्री. रा. रा. - श्रीमान राजमान्य राजश्री.
*स. न. वि. वि. - सप्रेम नमस्कार विनंती विशेष.
*तीर्थरुप* आई / बाबा.
*शि. सा. न. - शिर साष्टांग नमस्कार.
या सारखे शब्द वाचायलाच मिळेनासे झाले आहेत.
*कळविण्यास आनंद होतो की.....* असे लिहून पत्राची सुरुवात झाली, तर पुढे आनंदाची बातमी आहे, म्हणून पत्र अक्षरशः अधिरतेने वाचले जायचे. (दोन वेळेस)
पत्राच्या शेवटी लिहिले जाणारे.......
- कळावे, लोभ असावा.
- आपला.
- तुझाच/ तुझीच (किती रोमँटिक!)
- आपला आज्ञाधारक
- मो. न.
- ल. अ. उ. आ.
- छो. गो. पा.
- मोठ्यांना नमस्कार,
- लहानांना अनेक उत्तम आशिर्वाद
- छोट्यांना गोड पापा, असे लिहून तान्हुल्यांची सुध्दा आवर्जून आठवण ठेवली जायची. यात गोड पापा असे वाचताना सुध्दा खरेच लहानांचा गोड पापा घेतला जातोय असा भास व्हायचा.
हे आणि या सारखे शब्द शाईच्या पेनासारखेच झाकण (टोपण) लावून जवळपास कायमचे बंद झाले आहेत असे वाटते.
त्यामुळेच असे आपलेपणा जपणारे शब्द पेनने कागदावर उतरण्याचे थांबलेच नाहीत, तर बंद झाले आहेत.
पत्र लिहून संपविताना एखादी गोष्ट आठवली तर *ता. क.* (ताजा कलम) असे लिहून उरलेल्या जागेत ती मावेल अशा अक्षरात लिहिली जायची. त्यात सुध्दा गंमत वाटायची.
कदाचित शाईमुळेच त्या शब्दात आपलेपणाचा ओलावा येत असावा. नंतर बॅाल पॅाईंट पेनमुळे तो ओलावा कमी होत गेल्याचे जाणवले.
आता तर मोबाईलवरच टाईप केल्याने ओलावा सुध्दा काही वेळा कृत्रिम वाटायला लागतो. खरेच या शाईने लिहिलेल्या अशा शब्दात एक आपलेपणाचा गोडवा होता.
पत्राची सुरुवात यापैकी कशानेही झाली, तरीही ते सुद्धा वाचलेच जायचे. आजच्या ई मेल, व्हॅाटसअप, फेसबुक च्या जमान्यात या शब्दांची मजा हरवली आहे.
पत्रांच्या ऐवजी आता ई-मेल येतात. यात सुध्दा, Dear, Sir/Madam, Respected Sir/Madam अशी सुरुवात आणि Regards, Yours असे लिहून शेवट होतो. यात आपलेपणा जाणवतच नाही. कार्यालयीन आणि कोरडे वाटतात हे शब्द. त्यात नात्यातला ओलावा नाहीच. Yours faithfully यापैकी फेथफुली वर तर मला फुलीच (X) माराविशी वाटते.
यातही स. न. वि. वि. सारखेच नुसतेच GM, GN असे लिहिण्याची सवय आहे. पण सुप्रभात, शुभ रात्री, शुभ रजनीची मजा GM (गम) GN (गन) मध्ये नाही.
आजकाल फोनवरच बोलणे (त्यातही काही वेळा व्हिडिओ काॅल) होत असल्याने साष्टांग नमस्कार, आशिर्वाद, गोड पापा अशा शब्दांच्या ऐवजी मग "काय? कसे काय? बाकी सगळे ठिक आहेत ना?" असे बाकी (चे) विचारुनच नात्यांची शिल्लक (बाकी) विचारली जाते किंवा पाहिली जाते.
पत्र आले की आनंद व्हायचाच, पण मोठे पत्र (अंतर्देशीय) आले की ते व्यवस्थित उघडून (खरेतर फोडून) रविवारच्या पुरवणीसारखे त्याचे वाचन व्हायचे. पण आता हे सगळे हरवले आहे असे वाटते.
अधिक काय लिहू?
कळावे.......
आपला नम्र
आम्हीं त्या पुराणकाळातले आहोत
आम्हीं त्या पुराणकाळातले आहोत जेव्हा पत्रलेखन हा मराठी पेपरमध्ये काहीतरी 7-8 मार्कांचा भाग असायचा आणि मथळा (तेच म्हणायचे ना?) चुकीचा लिहिला तर मार्क कापले जायचे त्यामुळे भयंकर राग यायचा. आयुष्यात कधी पत्रं लिहायची वेळ आली नाही. पण लहानपणी नातेवाईकांनी पाठवलेली पत्रं वाचली आहेत. चांगली बातमी असेल तर विशेष प्रस्तावना नसायची. पण पत्रावर श्री किंवा काहीतरी देवाचे नाव आहे की नाही ते पाहिले जायचे. तसं नसेल तर वाईट बातमी आहे असा संकेत होता, जो शाळेत कधीही शिकवला गेला नाही.
बाय द वे एक जुनं गाणं आहे सप्रेम नमस्कार विनंती विशेष .
आणखी जुने आणखी जुने त्याहून
आणखी जुने आणखी जुने त्याहून जुने लोक म्हणतील की विद्यापना लेखनसीमा लिहायची मजा चि बाळकुशास गोड गोड पापा मध्ये नाही.
जुन्या मंडळींचा नॉस्टॅल्जिया
जुन्या मंडळींचा नॉस्टॅल्जिया आणि ते संस्कृतीप्रमाणे टिकवण्याची त्यांची क्षीण अपेक्षा क्युट वाटतं. ( सक्ती होत नाही तोपर्यंत).
चुकीचा लिहिला तर मार्क कापले
चुकीचा लिहिला तर मार्क कापले जायचे त्यामुळे भयंकर राग यायचा >>> अगदी अगदी! मला तर आजपण धड पत्रं लिहिता येत नाहीत. गप्पा मारल्यासारखी पत्रं/मेल्स लिहिते
ओलावा मिळत नसेल तर पत्रं ओली करून पाठवत चला. हाकानाका
असेही थुंकी लावून चिकटवतात की
असेही थुंकी लावून चिकटवतात की आंतरदेशीय पत्रं. तोच ओलावा.
अस्मिता तो ओलावा इमेल
अस्मिता
तो ओलावा इमेल लिहिताना कसा काय आणतील लोकं याचा विचार करून बेकार हसतेय
त्यात काय, प्रत्येक इमेलच्या
त्यात काय, प्रत्येक इमेलच्या शेवटी O लावा.
*आषाढ तळावा..., श्रावण भाजावा
*आषाढ तळावा..., श्रावण भाजावा..., भाद्रपद उकडावा...!*
*पण हे असंच का ??*
पाऊस म्हणजे भारतीय परंपरेचा खाद्य-योग ! पावसाळा हा केवळ ऋतू नसून, निसर्गाच्या रसपूर्ण लीला अनुभवण्याचा एक सु-काळ होय. "तळणं, भाजणं आणि उकडणं.." या एकाच पावसाच्या तीन रुपांतरामागे लपलेलं आहे.. आयुर्वेदिय तत्वज्ञान, शरीराची गरज आणि चविष्ट आनंदाचा मंत्र! पण असं खाणं कितपत सुरक्षित आहे ? असं खाणं म्हणजे नेमकं काय खाणं ??
१) *आषाढ* म्हणजे पावसाचा श्रीगणेशा. आतून कोरडेपणा व बाहेरून गारवा अशा विचित्र परिस्थितीत सापडल्याने शरीर सर्वत्र आखडते. परिणामी सांधे- गुडघेदुखी, सर्दी- फडसे, थंडीताप, infections अशा वाताच्या समस्या वाढतात. जमिनीखालची उष्णता व पहिला मुसळधार पाऊस, यामुळे एकाच वेळी पित्त वाढते अन् वात सर्वत्र अडकून बसतो. या दोन्हींना तंतोतंत बॅलन्स करायचं असेल तर *आषाढात "तळलेलं" खाणं हा अफलातून उपाय आहे !*
विशेषत: कोलेस्टेरॉल जराही वाढू न देता, तळलेले व गरम पदार्थ शरीराला आतून गरम व बाहेरून नरम ठेवण्याचे काम अचूकपणे करतात. तळलेलं अन्न हेच त्यावेळी "औषध" बनते. आणि हे केवळ आषाढ महिन्यातच घडते !
म्हणूनच; मे महिन्यात आपल्याकडे घरात पापड, कुरड्या, चकल्या, शेव, तिखट मिठाच्या पुऱ्या इ. आधीच बनवून ठेवायची पद्धत आहे. जेणेकरून पहिल्या पावसात हे पदार्थ तळून खाता येतील आणि पावसाचे आजार टाळता येतील.
शिवाय; पावसाचा पहिला रोमॅंटिक स्पर्श.. कढईतून बाहेर पडणारी कुरकुरीत कांदाभजी.. आणि कपातला उबदार चहा.. यासारखा _Instant Romantic_ अंतर्बाह्य "आषाढ डायट" जगात शोधूनही सापडणार नाही !
२) *श्रावण* म्हणजे सणांचा महिना. जमिनीतली उष्णता संपून चकाकी ऊन पडू लागते. ऊन-पावसाच्या खेळातून गारवा कमी होतो, मात्र दमटपणा वाढतो. वात हळूहळू कमी होऊन शरीरावयावांचे आखडणे, दुखणे इ. तुलनेने कमी होते. मात्र पित्त वाढलेलेच असते. अशावेळी वाताचा फार विचार न करता, केवळ पित्त आटोक्यात ठेवणे महत्त्वाचे, म्हणून *श्रावणात "भाजलेलं" खाणं सर्वोत्तम आहे.*
आगीत भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा, मका, वाटाणा, वांग्याचं सुगंधी भरीत, मातीचा वास घेणारी भाजलेली ज्वारीची भाकरी, भाजलेले पापड, तांदूळ भाजून केलेला भात, भाजलेले लाडू इ. सर्व पित्ताचा राग थोपवतात. परिणामी ऍसिडिटी, मायग्रेन, हाय-बिपी, मुळव्याध ह्या तक्रारींचा जन्म होत नाही.
आणि हो, भाजलेलं खाण्याचा जो स्वर्गानुभव श्रावणात येतो, तो अख्या वर्षभरात कधीच येत नाही. कदाचित म्हणूनच आपल्याकडे _*"श्रावणमासी हर्ष मानसी..."*_ असं म्हंटलेलं आहे.
३) *भाद्रपद* म्हणजे परतीचा पाऊस आणि तीव्र उकाड्याचं आगमन. गारव्याचा लवलेश संपल्याने वात बऱ्यापैकी शांत होतो. मात्र उकाड्यामुळे श्रावणात आधीच वाढलेले पित्त, शरीरात जिथे संधी मिळेल तिथे उद्रेक उत्पन्न करतो (ie पित्ताचा प्रकोप होतो).
हाच तो काळ जिथे जरा चुकीचं खाल्लं, की हार्टअटॅक, पॅरालीसीस, तीव्र ताप, कोणताही शुल्लक आजार अचानक गंभीर होणे इ. गोष्टी घडू लागतात. परिणामी सर्वाधिक वार्षिक मृत्यू ह्याच महिन्यात होताना दिसतात.
अशा अनुचित घटना टाळण्यासाठी भाद्रपद महिन्यात बहुतांश धार्मिक उपवास आलेले आहेत. जेणेकरून अन्न कमी खाल्ले जाईल आणि पित्त प्रकोप व्हायला वाव भेटणार नाही. याचसाठी *भाद्रपदात "उकडलेलं" खाणं अगदी योग्य आहे.*
जसे की, उकडलेल्या शेंगा, कंदमुळं, शेंगदाणे, उकडीचे मोदक, उकडून शिजवलेल्या पालेभाज्या, उकडलेला भात इ. प्रयत्नपूर्वक खाल्ल्याने October HEAT चे रूपांतर आपण October HIT मध्ये नक्की करू शकतो.
कदाचित म्हणूनच गणपती, गौरी, दुर्गा या देवता आपल्याला भेटण्यासाठी मुद्दाम भाद्रपदाचाच आसमंत निवडतात. कारण उकडलेलं अन्न म्हणजे शरीराला दिलेला शुद्धता व शांतीचा स्पर्शच ! नाही का ?
*...डॉक्टर्स दिनानिमित्त सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा!...*
शुल्लक कसं लिहू शकतात????
शुल्लक कसं लिहू शकतात???? क्षुल्लक असा शब्द आहे. १०० वेळा लिहून घ्या या माणसांकडून.
मात्र उकाड्यामुळे श्रावणात आधीच वाढलेले पित्त >>> ते श्रावणात खूप जास्त शेंगदाणे, वाटाणा, वांगी खाऊन झालं असेल
भाद्रपदाचा आसमंत म्हणजे काय??
हे वाचून माझे आत्ताच पित्त
हे वाचून माझे आत्ताच पित्त खवळले आहे!
मे महिन्यात आपल्याकडे घरात पापड, कुरड्या, चकल्या, शेव, तिखट मिठाच्या पुऱ्या इ. आधीच बनवून ठेवायची पद्धत आहे.
आं ?
शेव अन् पुऱ्या कोण बनवून ठेवते मे महिन्यापासून??
आषाढ डाएट म्हणे!
आणि दुर्गा आपल्याला भेटायला भाद्रपदाचा आसमंत निवडत नाही...ती अश्विनात येते!!!
एकाच वेळी पित्त वाढते अन् वात
एकाच वेळी पित्त वाढते अन् वात सर्वत्र अडकून बसतो >>> म्हणजे कसं?
पित्त वाढून वात जेथे बाहेर
पित्त वाढून वात जेथे बाहेर पडेल अशा ठिकाणी बूचासारखे जाऊन बसत असेल...मग तो बिचारा वात दिशाहीन पणे आतल्या आत भटकत असेल.
पण भाजलेली कणसं शेंगा खायची आठवण आली जोरदार...
मे महिन्यात आपल्याकडे घरात
मे महिन्यात आपल्याकडे घरात पापड, कुरड्या, चकल्या, शेव, तिखट मिठाच्या पुऱ्या इ. आधीच बनवून ठेवायची पद्धत आहे.
आं ? शेव अन् पुऱ्या कोण बनवून ठेवते मे महिन्यापासून??
>>>
एक्झॅक्ट्ली
फडसे काय असते?
>>> सर्दी पडसे हे कफ प्रवृत्तीचे विकार ना? त्यांना पित्त आणि वात विकारात कसे टाकले
परिणामी सर्वाधिक वार्षिक मृत्यू ह्याच महिन्यात होताना दिसतात.
>>> काहीही
श्रावणात कडबू, भाजणीचे वडे वगैरे करतात ते काय भाजून करतात का? काही पण...
आषाढ तळावा म्हणतात हे मला अलीकडेच समजले. कदाचित देशावर जिथे खूप पाऊस पडत नसेल तिथे असेल. पण मी कोकणात आज्जीकडे वगैरे ही पद्धत पाहिली नाही. पूर्वी साठवणुकीचे पदार्थ करायचे कारण आषाढात भाज्या वगैरे मिळायच्या नाहीत बाजारात, कोकणातल्या धुवांधार पावसात पालेभाज्या टिकायच्या नाहीत. त्यामुळे पापड, कुरडया, सांडगे, सुके मासे वगैरे वापरले जायचे.
वडाची साल पिंपळाला आहे हे
वडाची साल पिंपळाला आहे हे फॉरवर्ड

‼ ऋषि चिंतन ‼
‼ ऋषि चिंतन ‼
वस्तुतः मनुष्य के पास ऐसा बहुत कुछ है जो सदा अप्रकट और अविकसित ही बना रहता है । मस्तिष्कीय क्षेत्र की अनूठी क्षमताएँ और अन्तःकरण की विविध विशिष्टताएँ ऐसी हैं जो हर किसी के पास न्यूनाधिकता में पाई जाती हैं। यदि "आत्म-निरीक्षण" की कला हस्तगत हो सके तो मनुष्य इन दिव्य केन्द्रों का स्थान एवम् स्वरूप समझ सकता है और उन्हें विकसित करने के लिए वह सब कर सकता है जो सुदृढ़ संकल्प शक्ति के सहारे निश्चित रूप से हो सकता है।
पं. श्रीराम शर्मा आचार्य आचार्य गायत्री परिवार
सोमवार ३० जून, आषाढ़ शुक्ल ५,वर्ष २०८२ राम
सदैव प्रसन्न रहिये जो प्राप्त है,पर्याप्त है, मन मस्त रहें।
जय श्रीराम
माझे मन मलाही आषाढ तळतात
माझे मन मलाही आषाढ तळतात माहिती नव्हतं, हल्ली काही वर्षे समजलं, मग लक्षात आलं की आमच्याकडे कांदेनवमीला कांद्याची भजी करायची पद्धत आहे, तेच तळण असावं.
ह पा...त्यात काय, प्रत्येक
ह पा...
त्यात काय, प्रत्येक इमेलच्या शेवटी O लावा.
खूपच मस्त !
आखाड तळतात की..कापण्या करतात
आखाड तळतात की..कापण्या करतात गोड कणकेच्या. ईथे देशावर जोरात असतो
मी कोकणात आज्जीकडे वगैरे ही
मी कोकणात आज्जीकडे वगैरे ही पद्धत पाहिली नाही. पूर्वी साठवणुकीचे पदार्थ करायचे कारण आषाढात भाज्या वगैरे मिळायच्या नाहीत बाजारात, कोकणातल्या धुवांधार पावसात पालेभाज्या टिकायच्या नाहीत. त्यामुळे पापड, कुरडया, सांडगे, सुके मासे वगैरे वापरले जायचे
>>> +१
फडसे
फडसे ? 😀
देवता “आसमंतात” भेटत असतील तर आपण गचकलेले असू ना ? मग कसला वात अन् कसले पित्त ? चित्त थारावर नै का यांचे?
एकाच वेळी पित्त वाढते अन् वात सर्वत्र अडकून बसतो ????
वात आणला बॉ यांनी 😀
.. कडक कागदावर शेणाचा लेप
.. कडक कागदावर शेणाचा लेप देऊन, सुकवुन ते विकत होता. हे मोबाईलच्या मागच्या बाजुस कव्हरच्या आत ठेवायचे. ….
शेण गाईचे की म्हशीचे चालते ? रेडियेशण ची धास्ती आहे म्हणून माहिती असलेले बरे 😀
…. त्यात काय, प्रत्येक इमेलच्या शेवटी O लावा….
Simply Brilliant! 👏
मथळा (तेच म्हणायचे ना?) >>>
मथळा (तेच म्हणायचे ना?) >>> मायना
कोकणात आखाड बिखाड काही तळत
कोकणात आखाड बिखाड काही तळत नाहीत. सगळे महिने तळतात. श्रावणात भाजायला काही शिल्लक राहात नाही. शेंगा वगैरे कोकणात कोण करत नाहीत, भाजतात काजी (म्हणजे काजु, कोकणात काजी) व फणसाच्या आठळ्या. त्या मे च्या शेवटपर्याम्त भाजुन फन्ना उडवलेला असतो. भाद्रपदात मोदक उकडतात. तेवढेच उकडणे. तेही गणपतीसाठी. भाद्रपदाला उकडत नाहीत.
सोशल मिडिया अवतरल्यावर आखाड तळणे कळले, त्यातही कापण्या हा शब्द कळला. सो मि अवतरल्यावर कळले माझ्या आईबाबांनी मला अगदीच असांस्कृतिक गावात जन्माला घातले.
आखाडात तळुनही मेले पित्त तसेच राहते, श्रावणात त्याच्या जोडीला वातही येऊन बसतो. दोघांना मिळुन भाजले तरी शांती नाहीच. म्हणुन भाद्रपदात उकडल्यावर तरी दोघे शांत होतात का?? नसतील होत तर आश्विनाला आटवा (संदर्भः कोजागीरीचे दुध). त्यानेही दमन होत नसेल तर पुढे कार्तिक आहेच. त्यात तळा, भाजा, उकडा, आटवा… सगळेच करा आणि आम्ही आम्हला दिवाळी फराळाला बोलवा.
"सो मि अवतरल्यावर कळले माझ्या
"सो मि अवतरल्यावर कळले माझ्या आईबाबांनी मला अगदीच असांस्कृतिक गावात जन्माला घातले" - सोसल मिड्या आणि अमेरिकेतल्या हिंदू असोसिएशन्स / चिन्मय मिशन वगैरे संस्थांमुळे माझ्यावर कुठलेही संस्कार झाले नसल्याचा, मला माझ्या धर्माविषयी ज्ञान / जाज्वल्य अभिमान नसल्याचा, तसंच विविधतेनं नटलेल्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी नसल्याचा शोध लागून बराच काळ लोटलाय. उरलेल्या आयुष्यात काय काय पदरात पडेल ते बघतोय.
Pages