निसर्गाच्या गप्पा (भाग ३५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 March, 2025 - 08:10

Screenshot_20250330_173724_Photos.jpg

नमस्कार, मायबोलीच्या निसर्गाच्या गप्पांच्या ३५ व्या भागात आपले स्वागत आहे.

सर्वप्रथम गुढीपाढव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

नेहमीप्रमाणेच आपण आपल्याला माहित असलेली निसर्गातील घटकांची माहिती, अनुभव या धाग्यावर शेयर करुन या धाग्याचा एक माहितीपूर्ण संच तयार करुया.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

थँक यु स्निग्धा आणि अनिंद्य मी तुमच्या लग्नात मिळालेल्या पारिजातकाच्या अत्तराचा सुगंध इमॅजिन करतेय माझी पण खूप आवडती फुलं आहेत .

आपल्याकडे प्राजक्त आणि पारिजात, पारिजातक. मराठीत “फुले का पडती शेजारी” प्रसिद्धच आहे.

पारिजातकाला हिंदीत “हरसिंगार” म्हणतात, बंगालीत “शेफालिका”. एक नाव “रजनीहास” असेही वाचले आहे.

इंग्रजीत मात्र Tree-of-Sorrow. हे नाव काही आवडत नाहीं. पहाट होण्यापूर्वी अश्रुरूपी फुले गाळणारा वृक्ष अशी त्यांची कल्पना.

मला तर प्राजक्त श्रीमंत योगी वाटतो… आपल्याजवळचे सर्वात्तम ते सहज उधळून दररोज निष्कांचन होणारा. पुन्हा फिरून उमलण्यासाठी.

अनिंद्य, सुरेख फोटो !! Blooms बघू खुर्ची, टिपॉय असे झाले !!!......
+१.
छंदीफंदी, प्राजक्ता मस्त क्लिक्स! ❤️

रजनीहास >>>> सुंदर नाव.
पारिजातकाची नालकुंकुमा , खरपत्रक ही आणखी आवडलेली नावे.
Upcycling the cookie jars>>>>Great.
भायखळ्याच्या बोन्साय प्रदर्शनातील बहुरंगी बहुढंगी बोगनवेल.
@अनिंद्य, flor de papel for you.
Screenshot_20251130_120501_Gallery.jpg

आज जवळच्या ट्रेलवर चालायला गेले होते तेव्हा दिसलेले स्क्रब जे पक्षी:

आणि नंतर एके ठिकाणी एक हरीण मरुन पडले होते आणि त्यामुळे तिथे खूप टर्की व्हल्चर्स दिसली. निदान १०-१५ तरी.

लांबूनसुद्धा भितीदायक दिसत होती. त्यांचा पंखविस्तार ६ फूट असतो.

मला तर प्राजक्त श्रीमंत योगी वाटतो… आपल्याजवळचे सर्वात्तम ते सहज उधळून दररोज निष्कांचन होणारा. पुन्हा फिरून उमलण्यासाठी. >>> वाह, किती सुरेख लिहिलंय.

इंग्रजी नाव मलाही नाही आवडत.

इथले नवीन फुलांचे, फळांचे सर्व फोटो मस्त, मस्त.

टर्कीने टरकवले.

हा एक टिपलेला पक्षी..
दोन कोनातून प्रयत्न केला पण उन्हात आणि कॅमेऱ्याच्या मर्यादेमुळे एव्हढाच नीट निघाला

PXL_20251126_201635278.jpg

वर्षा तू खरी पक्षीमित्र आहेस.
ही त्या दिवशी त्याच नाव लिस्ट मध्ये होतं.

Western Blue Bird समोरून उडत पलिकडच्या झाडावर बसला , बघितला पण फोटो नाही मिळाला. खूप सुंदर दिसत होता.

Screenshot_20251202-191737.png

तुमच Merlin app एकदम. हिट आहे.
नुसतेच आवाज ऐकू यायचे, आता थोड काही सापडायला लागल्यासारखं वाटतं.

वर्षा तू खरी पक्षीमित्र आहेस. +1 तुमच्या मुळे वेगळे एक दोन पक्षी ओळखता येतील.
अनिंद्य शेवंती सुंदर आणि टेबलही Happy
IMG_20251204_084823.jpg
ही कमळ विकतची आहेत आज त्यांचे रेट पाहून असं वाटतंय कमळाची शेती करावी.
पण खरंच जागा मिळाली तर कमळ लावून बघणार आहे.

@ सिमरन.

थँक्यू.

“गुल का रंग गुलाबी” तुमच्याकडेही 🩷

So nice.

आज माझ्याकडच्या flor de papel ला गडद गुलाबी फुले आली आहेत.

हे गुलाबी हार्ट कसं आणलं…

Pink heart साठी हा कोड छापा &#128150 ;

आणि

ते एकदा जमले की 🪷 ची शेती करा
🪷 🪷 🪷 🪷 🪷

हाकानाका

💖 💗 💘 💙 💚 💛 💜 💝 💞
💖 💗 💘 💙 💚 💛 💜 💝 💞
💖 💗 💘 💙 💚 💛 💜 💝 💞
💖 💗 💘 💙 💚 💛 💜 💝 💞
💖 💗 💘 💙 💚 💛 💜 💝 💞
💖 💗 💘 💙 💚 💛 💜 💝 💞
💖 💗 💘 💙 💚 💛 💜 💝 💞
💖 💗 💘 💙 💚 💛 💜 💝 💞
💖 💗 💘 💙 💚 💛 💜 💝 💞
💖 💗 💘 💙 💚 💛 💜 💝 💞

💖 आलं माझं पण पिंक हार्ट आलं 💖

Pages