Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ 
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या 
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जुईके,
जुईके,
असं काही बघितलं की वाटतं, गेले ते क्षण, राहिल्या त्या आठवणी.
आम्ही मागच्या पडवतली चुल पाणी तापवायला वापरायचो व मासांहार शिजवायला.
साधना खरयं ओले काजू फार महाग
साधना खरयं ओले काजू फार महाग झाले आहेत.. विकत घेऊन नाहीच परवडत... भाजी केली की फक्त वाटी भर होते..
झंपी आता गावी पण गॅस असला तरी मुद्दाम अशी चूल आम्ही राखून ठेवली आहे... सकाळ सकाळी उठल्यावर तिथे जाऊन बसलं की छान वाटतं बाजूला पाणी तापत असतं चुलीच्या उबेला मांजर येऊन बसलेले असतात.. समोर अंगणात पक्षी दिसतात खूप..
(No subject)
पालेभाजी आणि भाकरी मी
पालेभाजी आणि भाकरी
मी लहानपणी (वय वर्षे बारा वगैरे) गावी कोकणात जाऊनच खायला शिकलो. अन्यथा कधी चव सुद्धा बघायचो नाही. एकदा आईच्या गावाला (कणकवली) गणपतीला गेलो असताना गौरीची काहीतरी पूजा वगैरे होती. सगळ्या बायका विहिरीकाठी जमून पूजा करत होत्या. प्रत्येकाचे नैवेद्याचे ताट होते ज्यात पालेभाजी आणि भाकरी हा मुख्य मेनू होता. मी नाही नाही म्हणत असताना मला जबरदस्ती प्रसाद म्हणून खायला भाग पाडले आणि मला इतकी आवडली की मी पोट भरेपर्यंत खाल्ली. त्यानंतर मी पालेभाजी खायला लागलो ते कायमचे. पण सुरुवातीला कित्येक वर्षे पालेभाजी फक्त भाकरी सोबतच खायचो. अर्थात आमच्याकडे तेव्हा चपाती क्वचित आणि भाकरीच जास्त थापली जायची..
पण एक आहे,. गावच्या पाण्याची चव वेगळीच असतें त्यामुळे तिथल्या भाजीची चव इथल्या भाजीला येऊ शकत नाही.
गावाच्या मिरची लसणाची चव
गावाच्या मिरची लसणाची चव देखिल तुफान असते, बाकी काही माल मसाला लागत नाही विशेष.
जुई, कच्च्या केळ्याची भाजी कशी केलीत? इथे मिळतात, करू शकेन.
गावच्या पाण्याची चव वेगळीच
गावच्या पाण्याची चव वेगळीच असतें त्यामुळे तिथल्या भाजीची चव इथल्या भाजीला येऊ शकत नाही.
Submitted by ऋन्मेऽऽष on 3 April, 2025 - 12:10>>>>> +1
aashu कच्च्या केळ्याची साल काढून ते थोडे मऊ होईपर्यंत वाफवून घेतले.. नंतर त्याचा बटाट्याच्या करतो तश्या फोडी करायच्या.. एक पॅन मधे तेलात फोडणीला मोहरी, कडीपत्ता, हिरवी मिरची कांदा परतून चिमूटभर हळद टाकायची नंतर या फोडी, मिठ टाकून हलवून १ मिनिट झाकण ठेवायचं मग कोथिंबीर आणि किसलेल ओलं खोबरं टाकून सर्व करायची.. ओलं खोबरं कोथिंबीर हवंच आहे नाहीतर चव बदलेल..
वड्या आणि थाळी मस्त. कोथिंबीर
आज मंगलकार्यातल्या काकू टाईप हे एवढा चिवडा केला, काल ओल्या नारळाच्या वड्या केल्या.


कालच खोबऱ्याच्या वड्यांची
कालच खोबऱ्याच्या वड्यांची आठवण झाली होती आणि मंगल कार्यालयातल्या काकू चिवडा मस्त दिसतोय
जुई धन्यवाद साली काढून फोडी
जुई धन्यवाद
साली काढून फोडी उकडताना, नुसत्या कुकरात खाली पाणी & त्यात स्टील डब्यात अशा वाफवल्या की सरळ पाण्यात घालून वाफवल्या?
अस्मिता, १ल्या ओळीतच कळतं गं की तूझीच पोस्ट आहे ते
खमंग दिसतोय चिवडा. वड्या पण भारी, वड्यात केसर का घातलं नाहीस?
सिमरन, थॅंक्यू.
सिमरन, थॅंक्यू.
खोड्या फार करते बहुतेक, लोक आधीच ओळखतात.
१ल्या ओळीतच कळतं गं की तूझीच पोस्ट आहे >>>
रन्ग तर पिवळाच दिसतोय फोटोत.
रन्ग तर पिवळाच दिसतोय फोटोत..मला वाटल आमरस घातलायस..आमरस घालुन पण फार भारी होतात खोबर्याच्या वड्या.
aashu29 खाली पाणी आणि वर केळी
aashu29 खाली पाणी आणि वर केळी असं इडली ढोकळा स्टीमर मधे वाफवल मी.. त्यात चेक करता येतं अध्येमधे किती मऊ हवेत ते..
तसं केळी direct फोडणीत घालून पॅन वर झाकणात थोडे पाणी घालून वाफेवर पण शिजवता येते पण मी कधी करून नाही पाहिली तशी.. चवीत फरक पडत असावा थोडा..
केल्यावर सांगा कशी झाली ते..
झंपी आता गावी पण गॅस असला तरी
झंपी आता गावी पण गॅस असला तरी मुद्दाम अशी चूल आम्ही राखून ठेवली आहे...>>> आमच्या कडे पण गावी दोन चुली होत्या हौदाजवळची चुल राखुन ठेवलिये...उत्सव असतो तेव्हा त्याच्यावरच पाणी तापवतो पण स्वयपाकातली वापरत नाहित.
चिवडा आणि वड्या मस्तच.... वडी
चिवडा आणि वड्या मस्तच.... वडी कातिल
आमरस घालुन पण फार भारी होतात खोबर्याच्या वड्या.>>>> मस्त करून बघायला हवं.
झूम करून डावीकडची पहिली वडी बघ, एक बारीक काडी दिसतेय. भिंग द्यायची वेळ आहे>>>>>
मोनिशा बेटा,
उजवीकडे डावीकडे is so middle class, please say नैऋत्य ईशान्य
चिवडा मस्त.. नारळाच्या
चिवडा मस्त.. नारळाच्या वड्यांना चिवड्याचा रंग लागला आहे का? त्या पांढऱ्या असायच्या ना पहिल्या? नाव दिले नसते तर आता ढोकळा समजूनच खाणार होतो..
अरे, वरचा लाईट पिवळा आहे.
आमरसाची आयडिया आवडली आहे.
उजवीकडे डावीकडे is so middle class, please say नैऋत्य ईशान्य >>>
वायव्येस बघा.
उजवीकडे डावीकडे is so middle
उजवीकडे डावीकडे is so middle class, please say नैऋत्य ईशान्य >>>
विकेंडची सुरुवात अफलातून
विकेंडची सुरुवात अफलातून
कलाकंद आहे का?
कलाकंद आहे का?
जे काय आहे ते यम्म दिसतय!
जे काय आहे ते यम्म दिसतय!
थँक्यु जुई. नक्की सांगते केली
थँक्यु जुई. नक्की सांगते केली की.
उजवीकडे डावीकडे is so middle class, please say नैऋत्य ईशान्य >>> हे मजेशिर आहे, भुतास्वलाचा महिमा अपार
एक बारीक काडी दिसतेय. भिंग द्यायची वेळ आहे>> होय की गं
आमरस घालून खो वड्या..कधी ऐकले नाही, छाने आयडिया.
कलाकंद आहे का ?>>>नाही कलाकंद
कलाकंद आहे का ?>>>नाही कलाकंद पेक्षा भारी प्रकार असतो अफलातून.मुस्लिम एरियातील मिठाई च्या दुकानांमध्ये मिळतो .माहीम, काळबादेवी मधल्या जवेरी बाजार अश्या ठिकाणी बेस्ट मिळतो. एकदा विचारलं होत, किससे बनता है तर ,खवा, ड्रायफ्रूटस, खूप सारं तूप असं उत्तर मिळालं होतं पण टेस्ट कलाकंद पेक्षा नक्कीच वेगळी लागते. कधी गेलात तिथे तर अफलातून खाऊन बघा मग कळेल किती टेस्टी प्रकार आहे ते.
ओह आल लक्षात, मला वाटत डोदा
ओह आल लक्षात, मला वाटत डोदा/दोडा बर्फी किवा तस काहितरी असाव, ही बर्फी इथे मिळते त्यात भरपुर तुपात खमन्ग भाजलेला खवा, भरपुर ड्रायफुट असतात गोडीला जरा कमिच असते
सिमरन +786 सर्वच लिहिलेत
सिमरन +786 सर्वच लिहिलेत माझे कष्ट वाचवले
विकेंडची सुरुवात अफलातून असे शीर्षकात नाव दिले होते खरे तर
मुंबईला मित्रपरिवार शेजारी पाजारी यात काही मुस्लिम असल्याने रमजान आणि बकरी ईद निमित्त चिकन बिर्याणी, पोसलेला बोकड, इतर नॉनव्हेज प्रकार स्पेशली कबाब, गोडात शिरखुर्मा, शरबत, फालुदा, आणि अफलातून वगैरे मिठाई सगळे कमी अधिक प्रमाणात फराळाचे ताट यावे तसे घरी येते. काल आई आली तर ती ही मिठाई आणि शिरखुर्मा घेऊन आली.
गंमत म्हणजे आईने दोघांची ताटे परत करताना त्यात पुरणपोळ्या दिल्या ज्या पाडव्यानिमित्त केलेल्या.. खाद्यसंस्कृतीचे आदानप्रदान
तुम्ही म्हणताय ती डोदा बर्फी
प्राजक्ता ,तुम्ही म्हणताय ती डोदा बर्फी सर्च केली, हरयाणवी डेलिकसी आहे त्याची रेसिपी पाहिली त्या बर्फीत कोको पावडर ही घातलीय .पण बरीचशी सेमच वाटतेय .खाल्ली नसल्याने टेस्ट मधलं फरक नाही सांगता येणार.पण अफलातून व्यवस्थित गोड असतो जास्तही नाही कमीही नाही.
माऊ ला पण द्यावा लागतो
माऊ ला पण द्यावा लागतो
संध्याकाळी बसून खायला खाऊ
आता त्याच चवीची मिळते का
आता त्याच चवीची मिळते का अफलातून?
बाबा मुंबईला गेले की खास जात व घेवून येत. इदच्या दिवसात तर मजाच.
ते एक खास दुकान आहे मोहम्म्द अली रोडवर.. नावच विसरले.
कायच्या काय कॅलरीज आहेत.. आता तर खाय्चा प्रश्णच नाही.
दोडा वेगळी आनि हि वेगळी चव आसते.
जिन्नस जवळपास सारखे असले तरी… प्रोसेस वेगळी आहे. मावा, रवा, पाक वगैरे….
… जिन्नस जवळपास सारखे असले
… जिन्नस जवळपास सारखे असले तरी… प्रोसेस वेगळी आहे.…
Biggest differentiator is use of egg in aflatoon. That renders it a taste distinct from kalakand, malai cake or say Doda barfi
Same with Malpua. अंडी वापरल्याने त्यांचे मालपुए सुद्धा जास्त फ्लफी होतात आणि मोठ्या आकाराचे करता येतात. हे तेलातच तळतात, तुपात नाही.
मोहम्म्द अली रोडवर.. नावच विसरले. …
सुलेमान उस्मान. बोहरी.
ताटे परत करताना त्यात
ताटे परत करताना त्यात पुरणपोळ्या दिल्या .. ❤
सुलेमान.उस्मान मुंबईत फेमस
सुलेमान उस्मान मिठाईवाला मुंबईत फेमस आहे ,त्याच्या शाखाही आहेत.माझ्या वडिलांना त्यांचा माहीमचा मित्र आणून द्यायचा . कॅलरीज बद्दल बोलायचं तर दबाके कॅलरीज असतात अफलातून मध्ये. कधितरीच खायला ठीक आहे.
Pages