खाऊगल्ली - आजचा मेनू - (६)

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ Happy

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415

तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पालक वडी मस्त खमन्ग दिसतेय, ओले काजुची भाजी मस्त कधिच खाल्लि नाहिये त्यासाठी तरी कोकण वारी करावि वाटतेय..मोरोबा आनी म्रू दोन्ही थाळ्या मस्त!

ओले हरभरे आमटी IMG_5465.jpeg
पानिनि आणी चिकन ट्रॉटिला सुपIMG_5515.jpeg
आलु पराठे आणी काकडीच रायतIMG_5518.jpeg

ओल्या काजूची उसळ इज अ डिफरंट स्टोरी. उसको सुके काजू के काजू मसाला भाजी के साथ कन्फ्यूज करने की जुर्र्त मत करो मायबोलीकर्स! Proud

वाह जुई.. थेट कोकणातून पदार्थ येत आहेत.
दोन्ही पदार्थांना बॅकग्राऊंड मुळे एक वेगळीच aesthetic value आली आहे.

ओले काजू भाजी/उसळ आणि सुके काजू मसाला/ग्रेव्ही या दोन्ही पदार्थांमध्ये साधारणपणे फोडणीचा भात आणि शेजवान फ्राईड राईस इतका फरक असतो.

काकडीचे रायते फार आवडते. एक थंडावा असतो त्यात.
शेंगदाणे मी खात नाही पण यात शेंगदाण्याचे कूट असेल तर ते मात्र आवडीने खातो

प्रज्ञा९>>> +1111
वाह जुई.. थेट कोकणातून पदार्थ येत आहेत.
दोन्ही पदार्थांना बॅकग्राऊंड मुळे एक वेगळीच aesthetic value आली आहे.>>>> थॅन्क्स Happy
गावी अंगणात, चुली जवळ बसून खायला मस्त वाटत..

ओल्या काजूच्या भाजीबद्दल अनुमोदन आणि धन्यवाद, ज्याअर्थी आईने कधीही सुक्या काजूची भाजी केली नाही त्याअर्थी त्यात दम नसावा असाच मलाही वाटत होत, मीही आता त्या वाटेला जाणार नाही. तसाही फर्माईश करणाऱ्याची जीभ खूपच sensitive आहे, तो ओल्या खोबऱ्याच्या वड्या- मालवणी पद्धतीच्या व मनीं मोहोर ताईच्या पद्धतीने नारळाचं बर्फी मध्ये पण न सांगता फरक ओळखू शकतो, त्यामुळे मी सुके काजू सरळ खायचे सोडून भाजी वगैरेचे कष्ट घेणार नाही. पुन्हा धन्यवाद

ओले काजु ३०० रुपये ला ३०० असे आहेत सध्या. पण त्याची चव काही करून सुक्या काजुंना येणं शक्य नाही. हे म्हणजे, हळदीच्या पानात उकडलेले मोदक आणि केळीच्या पानात इतका फरक आहे.
अगदीच रहावत नसेल तर, रात्रभर सुके काजु भिजत घालून केलीय मी उसळ. ठिक लागते. मस्त वाटण लावून करायची.
पण चुलीजवळ बसून, घरचेच ओले काजु उसळ म्हणजे मज्जा असते.

वरचे सगळेच पदार्थ एकदम लाळ गaळणारे आहेत. त्यातही घावणे तर अहाहा! चहा पीत नसल्याने कपात नारळाचं रस आहे असा समजते

जुईके, गाव मालवण का? ते कोरी चहा आणि घावणे पाहून उगीच चौकश्या म्हणून हा प्रश्ण. )

दोन्ही पदार्थांमध्ये साधारणपणे फोडणीचा भात आणि शेजवान फ्राईड राईस इतका फरक असतो.>>>अर्र हो का.. ओले काजू मिळवायला पाहिजेत..
jui मस्त फोटो...

पालक वडी खमंग दिसतेय. घावन छान पण त्याच्याबरोबर चटणी हवी. हरभऱ्याची आमटीपण मस्त दिसतेय चिकन टाट्रीला सूप कसं केलं ?रेसिपी मिळेल का
ओले काजू आणि सुके काजू म्हणजे
ओल्या नारळाच्या वड्या आणि सुक्या नारळाच्या वड्या
फोडणीचा भात आणिशेजवान फ्राइड राईस एव्हढा फरक
ओल्या काजूची उसळ इज अ डिफरंट स्टोरी. >>आता तर मिळवावेच लागतील ओले काजू

घाऊकमध्ये पाणीपुरी केली की चटण्या राहतात मग त्याची शेवपुरी केली जाते (यात त्यातल्यात्यात हेल्दी म्हणून बटाट्यासोबत हिरवे मूग शिजवून घातलेत)

IMG-20250327-WA0001.jpg

त्यातून चटण्या शेव राहिली की भेळ

IMG-20250327-WA0000.jpg

ओल्या काजूची उसळ इज अ डिफरंट स्टोरी >>> +१. परवा 'भाजी' असं लिहीतान हात कचरला होता Lol पण उसळ म्हणणारे आहे इथे कोणी Happy

जुई, घावने अप्रतिम दिसतायत. मी गेल्याच आठवड्यात केली होती. Happy तू चिपळूणला असतेस का? कधीतरी भारतवारीत तुझ्याकडे धाड टाकायला हवी मग. ओल्या काजूंचा फोटो भारी एकदम.

@सिमरन,
त्यातल्यात्यात हेल्दी म्हणून बटाट्यासोबत हिरवे मूग >>> छे छे, असे पदार्थ हेल्दी म्हणून थोडेच खायचे असतात? Proud
मस्त दिसतायत चाट आयटम्स

सिमरन शेवपुरी भेळ मस्तच.. वरती पालक वड्या पण टेम्प्टिंग होत्या..
rmd धन्यवाद या कधीही Happy
मम्मी चे घावने छान जाळीदार होतात..

सध्या आमच्या कडे कामाच्या ताई सुट्टीवर असल्याने आमच्या ह्यांना मदत म्हणून माझा किचन सप्ताह चालू आहे. कुठलाही खास पदार्थ करण्यापेक्षा दररोज असेल ती भाजी. म्हणजे मलाही नव्या भाज्या शिकता येतील. या आठवड्यात छोले, दुधी, लाल माठ आणि चवळी करून झालय. सगळ्या भाज्या एकाच वेळेत संपतात. म्हणेजे चांगल्या होतात. त्यातली ही चवळी. (कांद्याची आहे का चवळीची आहे म्हणून विचारू नका. चवळीचीच आहे.) Happy
IMG-20250323-WA0072.jpg

छे छे, असे पदार्थ हेल्दी म्हणून थोडेच खायचे असतात ?>> माझ्यामतेतर कोणतीही पाणीपुरी शेवपुरी हेल्दी च आहेत इम्युनिटी वाढवते Proud आणि मूड एनहांस करते वेगळंच Happy

नदीच्या गोड्या पाण्यातले मासे..
मी शुद्ध शाकाहारी आहे पण घरचे सर्व नॉन वेज खातात..
वास सहन होत नसल्याने बनवल्यानंतरचा फोटो नाही काढला.. Proud
Screenshot_2025-03-27-15-33-44-09_4949498873baccbde9dc7a221b759985.jpg

फिश फ्राय झाल्यानंतरचा वास सहन होत नाही??
हायला!
माझ्यासाठी तर जगातला सगळ्यात भारी वास तळलेल्या माश्याच्या तुकडीचा आहे.

उलट कच्च्या माश्याच्या वास तितका छान नसतो.. मासे साफ केल्यानंतरचा कचरा तर काही तासांनी डोके उठवतो.

सुक्या मच्छीचा वास उग्र असतो..
पण समुद्रकिनारी जेव्हा खाऱ्या वार्‍यांसोबत अगदी हलकासा मिसळून येतो तेव्हा वेगळेच वातावरण तयार होते.

हो ऋन्मेऽऽष मला नॉन वेज चा वास नाही सहन होत.. मासे कच्चे असताना साफ करायच्या आधी तितका नाही वास येत म्हणून तर फोटो काढू शकले जवळून.. Happy
कोकणातली असून घरी मी एकटीच शाकाहारी आहे

हो, जे मासे खात नाही त्यांना हा वास नाही सहन होत याची कल्पना आहे. चिकन मटण वास एकवेळ चालतो, पण फिश असेल तर लोकांना टेबल बदलताना पाहिले आहे. फक्त दरवेळी माझी पहिली रिऍक्शन आश्चर्याचीच असते.

Pages