खाऊगल्ली - आजचा मेनू - (६)

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ Happy

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415

तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Wow
Yummy

गुलाबजाम चा कसला कलर आहे.एकदम उचलावासा वाटतोय फोटोतून.खरच पाकिटावर छापून येण्याजोगा.

तिखट पुरणपोळ्या खाल्या नाहीत पण ट्राय करायला पाहिजेत . वरची रेसिपी पण मस्त आहे पण तो प्रॉपर पराठा होईल.

गु जा साठी धन्यवाद.

बरेच वर्षापूर्वी ठाण्याच्या खंडेलवाल कडून घेतलेल्या खव्यामुळे विषबाधा होऊन अनेक माणसे ऐन गणपतीत दगावली होती, तेव्हापासून विकतचा खवा वापरणं बंद केलं आहे.

हे गुजा ही त्यामुळे चितळेच्या रेडीमिक्स चे आहेत. गु जा पाकात टाकले की रंग थोडा कमी होतो त्यांचा त्यामुळे एक शेड डार्क तळायचे म्हणजे पाकात घातले की आपल्याला हवा तो परफेक्ट रंग येतो. असो.

deconstructed pav-bhaji 👌

प्लेटिंग उच्च.

प्लेटिंग उच्च +1 कलरफुल !! ही डिश परदेशात मोठ्या रेस्टॉरंटमध्ये तेव्हड्याच मोठ्या प्राइज मध्ये खपून जाईल.

परीचा बड्डे केक आला नाही अजून..

सिमरन आठवण काढल्याबद्दल धन्यवाद
पण केक आला नाही कारण यंदा पहिल्यांदाच तो घरचा नव्हता. घरचे रंगकाम काढल्याने आम्हा दोघांकडे वेळ आणि ताकद बिलकुल शिल्लक नव्हती.

@ पावभाजी बाईट्स, दिसतेया भारी.. खायचे कसे? त्यात कुठे पाव आहे का? अन्यथा नुसती भाजी खाणे मला अवघड आहे. फोटो मात्र दनादन काढून स्टेट्सला लावेन Proud

तरी विषय निघाला आहे तर केक शेअर करतो.

आलेल्या सर्व मुलांनी बायकोच्या केकची आठवण काढली आणि यापेक्षा तुमचा मस्त लागतो असे म्हटल्याने तिच्या मुठभर मांस चढले आणि केक न खाताच वजन वाढले Happy

IMG-20250321-WA0005.jpg

हो पाहिलेत मागे धाग्यावर तुमच्या बायकोने बनविलेले केक्स चे फोटो मुलांनी इतकं कौतुक केलय म्हणजे खायला यायला हवं !

हे केकही मस्त आहे स्पेशली फुलपाखरं ....फुलपाखरी दिवसांची साक्षीदार.

धनि, deconstructed pav-bhaji मस्त आहे.
केक पण भारी आहे.
नागपुरी गोळाभात आणि कैरीची कढी>>>>>> भारीच की!

नागपुरी गोळाभात म्हणजेच वडा भात का?
आणि ते छोट्या वाटीत काय आहे ? फोडणी?

नागपुरी गोळाभात म्हणजेच वडा भात का?..
नाही, दोन वेगवेगळे पदार्थ आहेत.

आणि ते छोट्या वाटीत काय आहे ? फोडणी?....
Yes.. गोळा भातात कुस्करून त्यात सांडगी मिरची चुरायची, त्यावर फोडणी ओतायची. आणि मस्तपैकी कालवून खायचं m

माझी आई असाच गोळा भात करायची (गोळे वेगळे आणि भात वेगळा शिजवून.
मी हल्ली गोळे भातातच शिजायला सोडते. चांगला लागतो.

@ ऋन्मेष, खूप झणझणीत प्रकार नाही हा . पण गोळा भातातला गोळा थोडाफार स्पायसी करता येतो .
बाकी कैरीची कढी / सार मात्र असते झणझणीत..

मनिम्याऊ, ही कैरीची कढी आहे तशीच चिंचेची वगैरे असते का? त्याची पाकृ आहे का, लिंक वगैरे.
गावी लग्नात असायची अशी कुठली कढी.

मनिम्याऊ, ही कैरीची कढी आहे तशीच चिंचेची वगैरे असते का? ...
असते न
त्याची पाकृ आहे का, लिंक वगैरे.... >>> अशी लिंक नाही कोणती रेफर केलेली. मीच देऊ का इथे रेसिपी? काय म्हणता?

गावी लग्नात असायची अशी कुठली कढी... हीच ती कैरीची कढी.. गावी आंब्याची कढी म्हणतात.

गोळा भात वडा भात चर्चा माझ्या गोळाभात धाग्यावर पण झालीये IMG-20250322-WA0003.jpg काल भाचीने पहिल्यांदाच केला अर्थात माझ्या मार्गदर्शनाखाली
https://www.maayboli.com/node/74215

गोळा भात खाल्ला नाही कधी ,ही पण ऑथेंटीक डिश दिसतेय येऊ द्या रेसिपी

गेल्या आठवड्यात सेलिब्रिटी मास्टरशेफ मध्ये चाट स्पेशल एपिसोड होता तोंडात पाणी येणारी पाणीपुरी आणि चाट बनवले होते सर्वानी त्यात अर्चना आणि गौरव खन्ना( अनुपमा चा हिरो )जिंकले मग काय संडे ला पाणीपुरीचा बेत .
IMG_20250324_202659.jpg
पाणीपुरीचा फोटो काढणं फार कठीण काम आहे प्लेट मध्ये काढलेल्या फोटो काढेपर्यंत भिजून फुटल्या त्यामुळे एकीचाच काढलाय.

पाणीपुरी ऑटाफे 😋

बाहेर हायजीनचा सीन बघता घरी केलेली बेस्ट. शिवाय हाय लेवल कस्टमाइज़ेशन.

टेम्टिंग ! मसालेदार दिसतेय भाजी चव भन्नाट लागतच असणार. वरच्या फोटोतले काजू चॉकलेट कोटिंग केल्यासारखे दिसत आहेत .

मंजूताई,
मस्त दिसतोय करून बघेन.
तो फोडणीचा बोल मस्तै.
सिमरन, पापु ऑल टाईम फेवरेट.
काजू येणार आहेत...भाजी करणार आहे.

Pages