खाऊगल्ली - आजचा मेनू - (६)

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ Happy

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415

तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थँक्यू जुई Happy
पीठ विकतचं आहे. पुण्याहून आणलंय .
आंबोळी साठी पीठ भिजवताना त्यात पाणी, थोडं दही, मीठ, लाल तिखट आणि चमचाभर तेल घालून पातळसर केलं. १० मिनिटं भिजवलं . मग त्यात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि हिरवी मिरची बारीक कापून मिक्स केले आणि आंबोळ्या घातल्या.

त्या विकतच्या पीठात सोडा असतो का, rmd?
मी आंबोळीचे पीठ कसे करावे याचा एक व्हिडिओ पाहिला. त्यात तिने म्हटलंय की तांदुळ, उडीद, मेथी, मीठ आणि अर्धा चमचा सोडा घालुन दळून आणायचं.

पिठचं मेन असते मी एकदा रेडी पीठ आणलं होतं त्याचा काय प्रॉब्लेम झाला होता माहीत नाही पण पीठ चिकटत होतं आणि जाळीही पडली नाही . उलट रव्याच्या घरी वरच्या रेसिपीने केलेल्या मस्त जाळीदार झाल्या होत्या .
मानव तुम्ही सांगितलेलं पीठाचा व्हिडीओ युट्यूब वर मीपण पाहिलाय पण ट्राय नाही केलाय दळून आणण्याचा.कोणी ट्राय केलय का ? नीट होतात का जाळीदार ?
पण आयत्यावेळेस दहा मिनिटात तयार होणाऱ्या या आंबोळ्या भुकेच्या वेळी सोयीच्या पडतात आणि तितक्याच टेस्टी.

इथे जागू- प्राजक्ता म्हात्रे यांची आंबोळ्यांच्या पिठाच्या कृतीसह रेसिपी आहे.

टेस्ट फॉर लाइफवाले घावण पीठ म्हणून जे विकतात, ते खरं तर आंबोळ्यांचं पीठ आहे. हे मी वापरलं आहे. लुसलुशीत , जाळीदार आंबोळ्या होतात.

मला पिठातले तर काही कळत नाही पण घावणे आणि आंबोळ्या आमचे राष्ट्रीय खाद्य आहे. किंवा आईच्या राज्यात होते. चहासोबत घावणे चटणी आणि मटणासोबत आंबोळ्या किंवा घावणे दोन्ही. पीठ अर्थात घरीच बनवायचो. त्याचे तांदूळ बहुधा वेगळे असायचे. अजून त्यात काही काही असायचे जे आईला विचारावे लागेल. पण बीडाचा तवा आणि कांदा खुपसलेला चाकू हे किचनमध्ये कायम रेडी असायचे..

त्या विकतच्या पीठात सोडा असतो का, rmd?>>>>
नसतो.
पीठ भिजवताना चमचाभर तेल घालायचं. आंबोळी टाकताना तवा चांगला तापवून घ्यायचा आणि त्यातही तेल नीट पसरवून घ्यायचं . आंबोळी टाकल्यावर मधे दोन थेंब तेल घालून पहा. नाही चिकटत आंबोळी.

IMG_5634.jpeg
रामनवमीचया शुभेच्छा!

aflatoon_1.jpeg.
इथलं वर्णन वाचून राहावलंच नाही.
प्रत्येक तुकडा बटरपेपरमध्ये गुंडाळलाय आणि त्यालाही इतकं तूप आहे!
खव्याची चव जास्त आहे. पण जे काही आहे ते अ हा हा आहे.

@ भरत,

इसकू बोलते passion for food !!

डब्यावर “आमची कुठेही शाखा नाही” वाचून फिस्सकन हसायला आले मात्र 😀

@ प्राजक्ता, balanced diet उपासातही. फळं, ताक, काकडी सकट. 👍

फारच छान.

नाहीतर जनरली बटाटा-साबुदाणा ओव्हरडोज होतो.

सगळेच फोटो मस्त.. अफलातून एवढ आवडत नाही नाव मात्र आवडत. उपास थाळी मस्तच.

काल रामनवमी निमित्त केलेल्या पू पो.
गुगल ड्राईव्ह वरून इथे फोटो अपलोड करण्याची प्रॅक्टिस पण करतेय.

भरत,
मस्तच.
मी सुद्धा इथली वर्णने वाचून बऱ्याच युट्यूब रेसिपी पाहिल्या.
म्हणजे मुल्कात ह्याची हीच एकमेव शाखा.

प्राजक्ता, मस्त थाळी

कैरी बाजारात दिसली रे दिसली की आणून प्रयोग सुरु होतात आमच्याकडे.

1db2c2e9-6744-4c46-93bb-8fe8fada36b0.jpeg

# कैरी-चना का अचार

हे लोणचं दुसरा दिवस बघेल असे वाटत नाही 😀

जबरी....
असल्या चटपटीत लोणच्याने दुसरा दिवस बघूच नये खरं तर.

I am so glad you enjoyed भरत. Happy
मला ते पॅकिंग व वर लिहिलेले सगळे चार्मिंग वाटले, वाचून काढले. दि स्वीट पीपल Happy

ममोंच्या पोळ्या व अनिंद्यंचे कैरीचे लोणचे मस्त. Happy
मीही कालच कैऱ्या आणल्या. आमच्या घराजवळच्या अमेरिकन दुकानात मिळायला लागल्या आहेत. काल नुसतेच तिखट मीठ लावून खाल्ल्या. आज काहीतरी करेन त्यांचे.

भारीच भरत!!

कैरी चणा आचार पहिल्यांदाच पाहिले. काही वेगळे असते का?

सब कू थँक्यू है !

@ धनि, कैरी चना अचार काही वेगळे असे नाही, पण छान लागते हे कॉंबो. आजोळी मोहरीच्या तेलात करायचे आणि काबुली चणे वापरत. मला दोन्हीं कमीच आवडतात म्हणून सनफ्लॉवर ऑईल आणि काळे चणे
असा थोड़ा बदल करण्यात आलेला आहे.

सेम मसाल्यात ginger chunks / आलं+ चणे + कैरी असेही करतो. भोकरं आली की ती + काळे चणे असे एक होईल, सुपर स्पाइसी वन.

फोटो डकवीन जर केले तर.

अनिंद्य, Happy
चणे शिजवून घेतले का?
वेगवेगळी लोणची हा माझा आवडता प्रांत आहे.
पालकाचे लोणचे पण केले होते मी एकदा.

माझे मन, त्यांच्या वेबसाइटवरून मागवता येतं. मी तेच केलं. >>> ओके. थँक्स.

@ छल्ला

पालकाचे लोणचे ? माझ्यासाठी नवीन. आंध्रावाले गोंगुरा पानांचे करतात ते चाखले आहे. पालक लोणचे नाही ऐकले- खाल्ले आधी.

… चणे शिजवून घेतले का?…

नाही. तसे केले तर १ दिवसही टिकणार नाही. काही तास चणे भिजवून केले तरी लगेच बुरशी येते.

अर्थात ताजेच खायचे झाल्यास अचारी पनीर सारखे अचारी चणे करता येतात, करतो.

या लोणच्यासाठी बहिणीची ट्रिक अशी :

चणे धुवून- पूर्ण वाळवून कैरीच्या तुकड्यांच्या रसात (मीठ हळद लावले की सुटणाऱ्या पाण्यात) २ दिवस मुरवले की मग घालायचे लोणचे. तेल जरा मुक्तहस्ते अर्पायचे.

हे ५-६ दिवसात छान मुरते आणि मग चणे कडक लागत नाहीत. ५-६ दिवस धीर धरणे थोडे कठीणच आहे 😀

करून बघा तुम्ही.

माहीमला एक उस्मान सुलेमान मिठाईवाला आहे. मीरारोडला उस्मान एस मिठाईवाला आहे. आता हे यांचेच भाईबंद आहेत की कॉपीकॅट हा संशोधनाचा विषय आहे. आमची कोठेही शाखा नाही मागे काही कहाणी असावी.

Pages