खाऊगल्ली - आजचा मेनू - (६)

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ Happy

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415

तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसतेय डिश जाई...
आज गुढी पाडवा त्यामुळे बटाट्याची भाजी, वरण भात तूप लिंबू, कैरीची आंबा डाळ,पन्हं, पापड चिकवड्या तळण, घरी केलेली बासुंदी , मुलाचा मुलगा बासुंदी खात नाही म्हणून त्याच्यासाठी गव्हले खीर आणि घरात सगळ्यांना खोकला आहे म्हणून पुऱ्या न करता पोळ्या असा साग्रसंगीत बेत होता. बाईची वाट बघून शेवट पोळ्या स्वतःच केल्या त्यामुळे खूप उशीर झाला आणि गडबडीत फोटो काढायचा राहिला. बासुंदी अप्रतिम झाली आहे.

वाह प्रज्ञा मस्त ताट !
आणि ममो ताई मस्त मेनू !

थोड्या फार फरकाने आज सर्वांकडे असाच मेनू असावा.
मी सुद्धा आज माहेरी आहे. त्यामुळे आईच्या हातचे जेवण मिळते हेच स्पेशल वाटते Happy

आमचा मेनू - पुरणपोळी (या एका बाईंकडून बनवून घेतल्या होत्या, कारण आई आता तब्येतीमुळे मोठे घाट घालत नाही)
पुरी, बटाटा भाजी, काळया वाटाण्याचे सांबर (जे काल रात्री केले होते) आणि आपल्या चितळेंचे श्रीखंड
गोडे वरण, भात, साजूक तूप आणि दही
पापड आणि सुक्या तळलेल्या ताकातल्या मिरच्या
पुरणपोळी आणि श्रीखंड हे गोड पदार्थ असले तरी घरचा काहीतरी गोड पदार्थ हवा म्हणून थोडीशी शेवयांची खीर.

या गोडधोड वर उतारा म्हणून मी आता संध्याकाळी भेळपुरी आणि शेवपुरी हाडदले ज्यात रात्रीचे निम्मे जेवण झाले. आणि पोराने आताच भुर्जी चपाती फर्माईश केली आहे. माझे शिल्लक निम्मे जेवण आता त्याच्यासोबत होईल. आमच्याकडे एक बरे असते सध्या की सकाळी सण झाल्यावर संध्याकाळी ज्याला नॉनव्हेज खायचे असेल त्याला खाऊ देतात Happy

जाई पनीर टिक्का मस्त दिसतोय बघून भूक लागली..
आमचा आजचा गुढीपाडवा मेनू
श्रीखंड पुरी, पापड, कुरडई, वरण भात, कच्च्या केळ्याची भाजी, भजी
Screenshot_2025-03-30-23-11-06-69_4949498873baccbde9dc7a221b759985.jpg

हा माझाही झब्बू जुई च्या ताटाला, फक्त केळ्याची भाजी ऐवजी बटाट्याची भाजी आणि भजी गायब ,बाकी सेम ,पण आज मान श्रीखंड पुरीचा.
IMG_20250330_232918.jpg

आमच्याकडे एक बरे असते सध्या की सकाळी सण झाल्यावर संध्याकाळी ज्याला नॉनव्हेज खायचे असेल त्याला खाऊ देतात Happy>> आमच्यकडेही एक घरात भाऊ आहे जो संकष्टीला माझे मोदक खाऊन ऑम्लेट मागू शकतो आणि त्याला ते देण्यात येतं किंवा तो स्वतः करून खातो. Happy

प्रज्ञा मस्तच दिसतय ताट. थँक्यु... माझा जो फोटो द्यायचा आहे तो तू दिलास... फक्त पुरणा ऐवजी खीर ...
आमच्याकडे पूर्वी नेहमी आमरस नसेल तर आम्रखंड असे पाडव्याला पण सुनबाईना एवढ आवडत नाही म्हणून हल्ली बासुंदी करतो.

जुई तुमच्या पदार्थाचे फोटो पार कोकणात घेऊन जात आहेत Happy
यापेक्षा आणखी कौतुकाच्या शब्दांची गरज नाही.

सगळ्यांचेच पाडवा मेन्यू मस्त ! नेहमीप्रमाणे जेवण झाल्यावर फोटो काढायला हवा …. पश्चात बुध्दी…. उरलेल्या बासुंदी म्हणजे खाणारे म्हणाले म्हणून …
करायला घेतली रबडी! कॅास्टरोचं होल मिल्क आणि हाफ न हाफ दीड तास उकळंल पण घट्ट काही होईना झालं कोजागिरीचं दूध! मिल्क पावडर घातलं तरी त्याची बासुंदी काही होईना…. मग थोडा रवा भाजून घातला. मग ती झाली खीर! पाहुण्यांना बेत काही माहीत त्यातले एक पाहुणे सिख व दुसरे भाची… भाची म्हणे बासुंदी छान झाली मावशी! आम्ही हसायला लागलो. तासभर अमेरिका विरूध्द भारत दूध चर्चा रंगली. BD42247B-BF92-422F-A801-04B183BF6E68.jpeg
मेन्यू सांगायचाच राहिला. लिंबाच्या रसातली मिरची, मेथांबा, बटाट्याची कांदालसूण विरहित तुपातली रस्सा भाजी, काळे चणे, कोबीच्या वड्या वरण भात व खीर/बासुंदी!

रायलसीमा रुचिलु

075c80e9-86cc-4917-9072-eb9ab3c3e513.jpeg

उगादी (गुढीपाडव्याचे तेलुगु नाव) स्पेशल भोज. मोस्टली तिखट्ट Happy

यंदा भर पाडवा, त्यात रविवार असूनही कामामुळे घरी राहता आले नाही, तस्मात् जैसा देस वैसा भेस.

जुई यांचं ताट मस्तच ताक उसळ आणि नाचणीची भाकरी ऑल टाइम फेवरीट आणि ती तोंडाला पाणी सुटणारी कैरीची फोड मला आताच्या आता हवीय तीही कोकणातल्या घरच्या आंब्याची Happy
फणसाची भाजी खाल्ली नाहीये पण मस्त दिसतेय.

मंजुताई, अनिंद्य मस्त मेन्यू ,उगादी थाळी मध्ये काय काय असतं ?भाज्या पदार्थ वेगळेच दिसतायत .

ईद स्पेशल शेवयाची खीर

IMG_20250401_102610.jpg

कालचा दिवसही खास होता श्री स्वामी समर्थ प्रकट दिन होता त्यानिमित्त नैवेद्याला केलेला शिरा

IMG_20250401_102452.jpg

ओले काजु ३०० रुपये ला ३०० असे आहेत सध्या>>>>
३०० ला १०० ओ ताई… एक रु ला एक काजु १० वर्षापुर्वी असेल. ३ आहे हे नशिब. मला वाटले होते यंदा ५ वर जाईल. शुक्रवारी खाली वाडीत जाणार. तेव्हा आणेन.

>>>> ३०० ला १०० ओ ताई… एक रु ला एक काजु १० वर्षापुर्वी असेल.<<<<<
काजूचा गोव्याचा सॉईथ मधल्या गावातला भाव सांगितला ओ.
पणजीत खुप महाग आहेत.

Pages