खाऊगल्ली - आजचा मेनू - (६)

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ Happy

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415

तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्यात नारळ दूध, लेमनग्रास वगैरे घातलेस ना अल्पना?>>> हो. मी लाक्सा पेस्ट न बनवता शॉर्ट कट घेतला रेड करी पेस्ट वापरून.
लिहिते १-२ दिवसात रेसिपी.

मखाने मस्त.. कितीही खा.. मन भरत नाही.

आमचे कालचे डिनर
बेसन गट्टे की सब्जी

IMG-20250223-WA0000.jpg

@ mrunali.samad खूप दिवसांनी खाऊगल्लीत दिसलात.

ड्रायफ्रूट्स वडीत Sweetener + Binder म्हणून खजूर वापरले की अंजीर ?

Happy
खजूर वापरले.. बाकी घरात जे सापडलं ते काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, तीळ..
मागच्या वेळी मेलन सीड्स, जवस पण घातले होते..

@ mrunali.samad खूप दिवसांनी खाऊगल्लीत दिसलात.
>>>>

त्या धाऊगल्लीत असतात.
या मेनूवर सुद्धा तिथलाच प्रभाव आहे Happy

हो, लिंबू आहे त्या पोह्यात.. पिळलेल्या स्वरूपात.
थोडा सुकलेला होता म्हणून फोटोत घेतला नाही त्याला Happy
भले आपण रुखेसुखे खावे पण फोटो बघणाऱ्याच्या तोंडातून लाळ गळेल हे पहावे.

कांदेपोहे मध्ये कांदा आणि पोहे इतकाच लिंबू सुद्धा महत्वाचा आहे माझ्यासाठी. लिंबू नसेल तर मी पोहे खात नाही. हे माहीत असल्याने आई सुद्धा कधी घरात लिंबू नसेल तर पोहे करायची नाही.

वरून आलेले खोबरे देखील तितकाच महत्वाचा घटक. पण ते आईच्या राज्यात. ती कोकणातली विळी एक्स्पर्ट होती. खोबरे किसने रोजचे काम. पोहे असले की लिंबू, खोबरे आणि कोथिंबीर याचे वेगळे ताट सजायचे.

बायकोकडे शेंगदाणे असतात. पण मला त्रास होतो म्हणून घालत नाहीत. अगदीच प्लेन पोहे नको म्हणून वरून थोडीशी शेव घालतो इतकेच.

बाकी ते बटाटा मटार टमाटर वगैरे पोह्यात कधीच आवडले नाहीत. उगाच पोह्याचा पुलाव बिर्याणी मसालेभात होतो असे वाटते.

Pages