सध्या आपण सक्तीने घरात डांबल्या गेलो आहोत. पहिला आठवडा वेगवेगळे उपक्रम (अंताक्षरी, जुने अल्बम चाळणे, कोडी सोडवणे, सिनेमे नाटकं बघणे, कॅरम, पत्ते खेळणे,आॅनलाईन गेटटूगेदर, फॅमिली टाईम ....इत्यादी इत्यादी) करण्यात मजेत गेला. दुसरा आठवडा मागच्या पानावरुन पुढे करत असता हेही जाणवत होतं की पुढचा आठवडा नक्कीच काऊंट डाऊनवाला नाहीये..... नव्हताच ..... अजून वाढलाय ! कधी संपणार? ह्या प्रश्नाचं उत्तर खरंच कोणाजवळच नाहीये! आता तर ह्या आयुष्याची सवय झालीये ..... कंफर्ट झोन तयार झालाय.तर अश्या ह्या परिस्थीतीत तिन्ही त्रिकाळ रोज काय स्वयंपाक करावा यक्षप्रश्न झालाय..... तर आपल्यासाठी घेऊन आलेय सोपी पाककृती! वन डिश मील वैदर्भीय 'गोळाभात'
विदर्भ प्रसिध्द आहे तो तिथल्या असह्य उकाड्यासाठी व चमचमीत जेवणासाठी. वडाभात,गोळाभात, भरडाभात हे इथले पारंपारिक पदार्थ. महालक्ष्म्यांना (गौरी) व कुळाचाराला वडे करावेच लागतात कारण शास्त्र (भाडिपावालं नाही खरोखरच) असतं ते. पहिला वरण भात झाला की येतो पांढरा भात व गरमागरम खुसखुशीत वडे. ते वडे भातात कुस्करूल्या गेले की येतं कढईतलं उकळतं तेल.... अस्सल खवय्यांसाठी तेल टाकल्यावर चर्र आवाज आलाच पाहिजे बरं का! पंगतीत बसलेला कितीही डायटवाला असला तरी त्याला खायची इच्छा नाही झाली तर नवलच!
वडे काही लोकं डाळींचा भरडा दळून आणून करतात किंवा काहीजण डाळी भिजत घालून भरड वाटून करतात.
वैदर्भीय कामं कसं ऐसपैस! इथे पानं मोजायची पध्दतच नाही. कमीअधिक पाचदहा वै नाहीच..... कमीची तर बातच नाही! अधिकच अधिक! किती पायल्याचा भात? किती पायल्याचा भरडा? मोजायला वाट्या पेले आपल्याकरिता पण विदर्भात अाजही मोजायला पायलीच लागते हं. तुमच्या लक्षात आलंच असेल व प्रश्न पडला असेल की उरलेल्याचं काय करतात? हा उरलेला भरडा फोडणीला द्यायचा व त्यात भात टाकून परतला की झाला भरडा भात!
गोळाभात: ह्याला मान मिळतो नवरात्रात! देवी, बालाजी, खंडोबा किंवा रामाच्या नवरात्रात! धान्यफराळाच्या दिवसात!
बरंच लांबलं भात पुराण! आता जाऊ प्रत्यक्ष कृतीकडे!
साहित्य:
1. तांदूळ : दोन वाट्या (चिकट/मऊ भात होणारा तांदूळ नको)
2. मिश्र डाळी : पाऊण वाटी (हरभरा,मूग,मसूर,तूर किंवा फक्त हरभरा डाळही डाळही चालेल)
3. धनेपूड - एक मोठा चमचा, जिरे पूड अर्धा चमचा, हिंग एक छोटा चमचा,मीठ चवीनुसार, पाचसहा सुक्या लाल मिरच्या/कुटाच्या मिरच्या व हळद
4. तेल : एक वाटी
5. फोडणीचे साहित्
कृती: तांदूळ धुवून निथळून ठेवा.सगळ्या डाळी अगदी थोड्याश्या भाजून घेऊन भरड दळून घ्या. त्यात धनेजिरे पूड, हिंग, हळद, मीठ व दोन चमचे तेल घालून सैलसर भिजवून ठेवा एक तास. एका कुकरमध्ये दोन चमचे तेल टाकून मोहरी जिरे हिंग (जरा जास्त) फोडणी करायची व त्यात तांदूळ टाकून परतायचे. अडीचपट पाणी टाकून मीठ टाकायला विसरायचं नाही अर्थात चवीनुसार! पाण्याला उकळी येईपर्यत भरड्याचे गोळे करायला घ्यायचे. डाळी पाणी खूप प्यायल्या असतील तर आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं. पीठ सैलसर हवं. चांगली उकळी आली की गोळे त्यात सोडायचे. शिटी होण्याआधी गॅस कमी करून पाच मिनीटांनी गॅस बंद करायचा. पंधरा मिनीटानी/पूर्ण वाफ दबली की कुकरचे झाकण उघडायचे. भात मऊ पण मोकळा व्हायला हवा. एका छोट्या कढल्यात फोडणी करायची लाल मिरच्या किंवा कुटाच्या मिरच्या टाकून!
ह्या सोबत चिंचेच सार किंवा ताक घेतात. मी ताज्या ताकाला हिंग जिऱ्याची फोडणी दिली.
खाण्याची पध्दत: ताटात भात घ्यायचा त्यावर फोडणी टाकायची आपल्या डायटनुसार. त्यातले गोळे फोडून व मिरची कुस्करून करायची सुरुवात खायला.
टीप: मुलांना पदार्थाला नाविन्यपूर्ण नांव दिलं तर खाऊन पहातात. बाॅल पुलाव /कोफ्ता पुलाव ही मला सुचलेली नांवे
वर दिलेल्याप्रमाणे! काही शंका असल्यास विचाराव्या! भिजवण्याचा वेळ धरला नाहीये.
मला आवडतो गोळा भात.
मला आवडतो गोळा भात.
मी फॉलो करतो त्या रुचिरातल्या रेसिपीत बेसनाचे गोळे आहेत. कुकरची गरज नाही आणि भात मोकळा व्हायला त्यात शिजताना लिंबू पिळायचं आहे.
डाळी भिजवून नागपुरी वडा भात होतो असा माझा समज आहे. अर्थात तुम्हीच नक्की सांगू शकाल. वड्याला जास्त खटाटोप म्हणून कधी केला नाही.
(No subject)
फोटो वर टाकलेत.
Awesome photo! हे करायला जमेल
Awesome photo! हे करायला जमेल असं वाटतंय कुकरमधली रेसिपी दिलीत, नक्की करून बघता येईल.
सध्या उपलब्ध साहित्यात
सध्या उपलब्ध साहित्यात होण्यासारखी आहे. आत्तापर्यंत भाताचे इतर प्रकार करून झाले, हा प्रकार केला नसल्याने नक्की करून पाहीन.
वैदर्भीय कामं कसं ऐसपैस! इथे
वैदर्भीय कामं कसं ऐसपैस! इथे पानं मोजायची पध्दतच नाही. +111
मस्तच रेसिपी. वडाभात, गोळाभात दोन्ही आवडतेच. आम्ही गोळे बेसनाचे करतो.
डाळी भिजवून नागपुरी वडा भात
डाळी भिजवून नागपुरी वडा भात होतो असा माझा समज आहे.>> आम्ही पण डाळी भिजवूनच करतो वडे. त्यात लाखोळी ची डाळ पण असते.
सोपी वाटतेय पाकृ. करून बघायला
सोपी वाटतेय पाकृ. करून बघायला हवी. गोळे फुटत नाहीत का भात शिजताना?
हो आठवण आली आपण केलेल्या गेट
हो आठवण आली आपण केलेल्या गेट टुगेदर ची.मी पण करते
प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद!
प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद! आताच्या दिवसात घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातून होणारी पाकृ!
वावे, पाण्याला चांगली उकळी फुटली की गोळे टाकायचे म्हणजे फुटत नाही.
भरडा काढून किंवा डाळी भिजत घालून दोन्ही प्रकारे करतात.
श्रध्दा, हो नुसते बेसन किंवा फक्त चना डाळीचेही करतात.
डाळी भिजवून कसं करायचं?
डाळी भिजवून कसं करायचं?
जबरदस्त आहे ही रेसिपी.
जबरदस्त आहे ही रेसिपी.
करायचा आहे पण चणाडाळ नाहीये घरात . एक वस्तू दुकानदार आणून देणार नाही ,मी बाहेर जाणार नाही तर मूग डाळ मसूर डाळ तूरडाळ घेऊन जमेल का ?
भारी
भारी
भारी रेसिपी.
भारी रेसिपी.
घरात असलेल्या डाळी घेऊन नक्की करेन.
वडाभाताची पण द्या.
काय भारी रेसिपी आहे ही,
काय भारी रेसिपी आहे ही, मंजूताई. फोटोदेखिल मस्त आहेत.
खूप भारी आणि माझ्यासाठी नवीन
खूप भारी आणि माझ्यासाठी नवीन आहे रेसिपी..करून बघणार नक्की. खिचडी/वरण भात /माडगे मी नेहमीच करते. आता अजून एक पर्याय मिळाला. धन्यवाद मंजूताई .
वडाभाताची पण द्या >> सहमत.
मस्त रेसीपी.
मस्त रेसीपी.
वडाभातात असेच भरड्याचे/ मिक्स डाळिंचे वडे असतात पण तळून असतात. आणि वडाभातात वडे ऑलरेडी तळलेले असल्यानी हिंगाचं पाणी घेतात जरा भात मॉईस्ट व्हावा म्हणून. (अर्थात हिंगाचं पाणी म्हणजे एका सर्व्हिंग ला २/४ लहान चमचे) सोबत कढी इ असतंच.
कढीगोळे हाही एक असाच मस्त प्रकार. असेच गोळे (आधी जरासे निराळे वाफवून) कढीत सोडायचे वरून लाल सुक्या मिरच्यांची फोडणी मस्ट या प्रकारालाही.
हे गोळाभात, वडाभात प्रकरणं पानात वाढून घेताना जपून नेहेमी. आधीच भात जास्त घेतला तर वडे कुस्करल्यावर तो ढीग फार होतो आणि मग संपवताना पुरेवाट होते.
मस्त तों पा सु
मस्त
तों पा सु
वाह भारी एकदम रेसिपी, फोटो
वाह भारी एकदम रेसिपी, फोटो दोन्ही.