Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
माबो वाचक
माबो वाचक
काय योगायोग पहा. मी आत्ताच OLIVER SACKS चे Awakenings हे पुस्तक वाचायला घेतले आहे. तुमचा प्रतिसाद वाचून मग सरळ ह्या film बद्दलचा धडा वाचायला घेतला. OLIVER SACKS हेच ह्या सिनेमाचे सल्लागार होते. त्यांनी पुस्तकात अनेक रुग्णांचा इतिहास लिहिला आहे. त्यातल्या एका रुग्णावरवर हा सिनेमा आणि त्यातला डॉक्टर Robin Williams हे पात्र OLIVER SACKS ह्यांच्यावरुन बेतले आहे.
मात्र मी हा सिनेमा बघू शकणार नाही. नाही, माझ्याचाने बघवणार नाही.
मात्र मी हा सिनेमा बघू शकणार
मात्र मी हा सिनेमा बघू शकणार नाही. नाही, माझ्याचाने बघवणार नाही. >>>> असे करू नका. एका चांगल्या कलाकृतीला मुकाल. चित्रपटात कोठेही उगाचच भावनेला हात घालणारे प्रसंग नाहीत. म्हणजे भावनिक त्रास होईल असे काही नाही. कलाकृती म्हणून सुद्धा चित्रपट खूप उत्तम आहे. डेनीरो आणि इतरांचा अभिनय खूप छान आहे.
चित्रपट पाहून त्याची पुस्तकाशी तुलना करा येथे मायबोलीवर. मीही पुस्तक पाहतो. धन्यवाद.
Robert De Niro’s passion to
Robert De Niro’s passion to understand what he is going to portray, to research it in the minutest, most microscopic detail, is legendary among actors; and now I was to see this for myself. I had never before witnessed, much less played any part in, an actor’s investigation of his subject – the investigation which would finally culminate (as Tom Conti once said to me) in the actor’s becoming his subject, knowing him, knowing it, in his own body, from the inside...
हे त्या पुस्तकातून घेतले आहे.
पुस्तकात खूप मोठा विषय कवर केला आहे. हे पुस्तक त्या सिनेमाचे स्क्रिप्ट नाही, मला वाटते की त्यातील एक केस घेऊन त्याच्या भोवती सिनेमा गुंफला आहे. पण त्या भूमिकेसाठी Robert De Niro किती कष्ट असतील त्याचे वर्णन त्यात आहे.
अॅक्सिडेंटल स्पाय ज्यांनी
अॅक्सिडेंटल स्पाय ज्यांनी पाहिलेला नाही त्यांनी नक्की बघा.
जॅकीचॅनिजम आहेच यात. अनाथ असलेल्या जॅकी चॅनला एक दिवस दक्षिण कोरियातल्या एका माणसाने ते त्याचे वडील असल्याचे सांगून संपूर्ण इस्टेट त्याच्या नावावर करण्याचे ठरवलेले असते. पण मरताना त्याचे वडील त्याला कोडी घालतात. त्या कोड्यांची उकल करताना एका रहस्याचा पर्दाफाश होतो. या प्रवासात तो इस्तंबूल मधे पोहोचतो आणि त्याच्या मागे दोन गँग्ज लागतात. ही स्क्रीप्टच खूप वेगवान आहे. साऊथच्या फाईट्सचा मरताना त्याचे वडील नॉशिया आल्याने सध्या जॅकी चॅन सुरू केलंय. अचाट असले तरी function at() { [native code] }अर्क्य वाटत नाहीत. हाच युएसपी असावा त्याचा.
काय बघावं कळत नाहीये
काय बघावं कळत नाहीये
>>
इमर्जन्सी मधे काय बघावं वाटत असेल तर श्रेयस तळपदे चं वाजपेयींचं व्हर्जन बघ
मैं अटल हूं च्या पंकज त्रिपाठी पेक्षा सुसह्य आहे
श्रेयस तळपदे आवडतोच. त्याचं
श्रेयस तळपदे आवडतोच. त्याचं काम बघायला आवडलं असतं.
पण सुरूवातीलाच अजेण्डा आहे असं वाटल्याने थांबवला.
रॅश ड्रायव्हिंग बघा. डोक्याला ताप नाही.
https://www.youtube.com/watch?v=aqLkZqnscWY
जॅकी चेनचे सिनेमे फार मस्त
जॅकी चेनचे सिनेमे फार मस्त असायचे. खूपदा पाहिलेत.
जुना १९७३ चा The Exorcist अजुनही पाहिला नाहीये. उद्या amazon वरुन जातोय. आता आवडेल का पाहिला तर?
रेड (१) चक्क आवडला. दुसरा
रेड (१) चक्क आवडला. दुसरा भाग काहीच्या काही आहे.
Poster मध्ये श्रेयस तळपदे
Poster मध्ये श्रेयस तळपदे वाजपेयी कमी राज ठाकरे जास्त वाटतोय
नेटफ्लिक्सवर स्ट्रॉ बघितला.
नेटफ्लिक्सवर स्ट्रॉ बघितला. वाईट वाटत राहिलं शेवटपर्यंत मेन कॅरेक्टर जेनायाचं. परिस्थिती माणसाला फार हताश करून सोडते काही वेळा. त्या विकल अवस्थेत जे काही बरोबर वाटतं ते माणूस करत सुटतो. जेनाया जे काही करते ते तिच्या नजरेतून पाहिलं तर ठिकच वाटत राहातं.
मधे मधे बॅकेतले सीन्स थोडे बोर झाले पण बघितला संपूर्ण. बँकेतल्या महिला अधिकार्याचं पण काम चांगलं आहे.
रेड२ (Raid) पाहिला. बरा वाटला
रेड २ (Raid) नेटफ्लिक्सवर पाहिला. बरा वाटला. अपेक्षेचा बार खाली जात- जात नरकात गेला आहे. त्यामुळे आश्चर्य सुद्धा वाटले. सगळ्यांची कामं जिथल्या तिथे. रितेश देशमुख (दादाभाई) नावाचा व्हिलन साकारला आहे. 'दादाभाई' ऐकलं की मनात पुढे 'नौरोजी' येऊ लागले त्याकडे वेळोवेळी दुर्लक्ष केले. रितेश देशमुख एकदम जनमानसात धुतल्या तांदळासारखी प्रतिमा असणारा पाताळयंत्री बिझनेसमन/ नेता/ तारणहार आहे. ह्या उलट समाजात प्रतिमा चांगली नसलेले, भ्रष्टाचाराचा आरोप असलेली अशी हिरो व हिरोची गॅंग आहे. ते त्याला व त्याच्या काळ्या धनाला कसं पकडून देतात अशी कथा आहे. चांगली कामं आहेत, फार आव्हानात्मकही नाहीत. पण बोअर होत नाही. अजय देवगण साठी काही नवीन नाही. वाणी कपूर नसती तरी चाललं असतं, असून नसल्यासारखीच आहे.
काहीही पाहावे हाकानाका म्हणून टिव्हीवर दुसऱ्या दिवशी 'सौतन' पाहिला थोडा वेळ. राजेश खन्ना, टीना मुनिम, पद्मिनी कोल्हापुरे व श्रीराम लागू, प्राण, प्रेम चोप्रा, शशिकला. एकदम पाणचटपणाचा कळस आहे. काकाचे वय दिसते यात. त्याचे नाव श्याम, टीनाचे नाव रुक्मिणी पण श्रीमंत आणि लाडावलेली म्हणून रुकू, पद्मिनी कोल्हापुरे - राधा. पाणचटपणाचे बिल्ड अप आहे. रुकू श्यामला शशिकलाचे सल्ले घेऊन खूप त्रास देत असते. एकेदिवशी मर्सिडीज सुद्धा घेते. मग श्याम राधेकडे जाऊन "बायको लैच त्रासदायक" अर्थाचे सुस्कारे सोडतो. तर राधा "जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिलको...." गात असते. हे ह्यातलं गाणं आहे हे मला माहीत नव्हतं. हे गाणं छुपं शर्करावगुंठित फॉरवर्डच आहे.
श्रीराम लागूला गरीब म्हणून काळं फासलं आहे तोंडाला, ते सुद्धा रंगपंचमीतल्या सारखे uneven आहे. टीना मुनिम त्याचा उठसूठ जातीवरून तुच्छ लेखत पाणउतारा करत असते. हे सगळेच राहतात मॉरिशस मधल्या आपापल्या अवाढव्य बंगल्यात. एकेदिवशी अचानक "हे काय काका, मै तर आपल्या बेटीसारखी हूं" म्हणून घरी पार्टीचे आमंत्रण देते. मला तेव्हाच शंका आली होती पण श्रीला पडला भोळसट, तेथे लेकीला घेऊन जातो व शंभर लोकांसमोर मोठ्या स्केलवर अपमान करवून घेतो.
राधा आणि श्याम श्यामचे नैराश्य दूर करून "दिल बहलवायला" फुटबॉल बघायला जातात तेथे काका "इस फुटबॉल की भी क्या किस्मत है, सब येताजाता इसकोही लाथ मारते है. " असे आयुष्याचंही फुटबॉल सारखं असत असं शीघ्र - काकाफॉ रचतो. काकाचे "काका"फॉ स्वगत. पुन्हा रुकूची नाचगाणी- काकाची रडगाणी आहेत. बंद केला.
मी हा चित्रपट थेटरात जाऊन
मी हा चित्रपट थेटरात जाऊन पाहिलेला
त्यात राजेश खन्ना टीना
त्यात राजेश खन्ना टीना मुनीमचं " शायद मेरी शादी का खयाल .... मम्मीने चाय पे बुलाया है" हे गाणं पण आहे ना ?
जिंदगी प्यार का गीत है, इसे
जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिलको...." गात असते
>>>
मला हे आणि ‘शायद मेरी शादी का खयाल’ हे गाणं आहे म्हणूनच हा पिक्चर माहिती होता.
अस्मिता एवढी पिसं काढलीच आहेस तर पूर्ण बघून उरलेली पण काढ.
टूरिस्ट फॅमिली .
टूरिस्ट फॅमिली .
इथे रेको वाचला आणि सुरू केलाय. चार पाच दिवसत संपेल.
मी मधूनच सुरू केला व मधेच बंद
मी मधूनच सुरू केला व मधेच बंद केला म्हणून ते "शादी का खयाल" गाणं गेलं माझं. घरचे बाळगोपाळ स्क्विड गेम्स पाहायला आले व थोड्या वेळ "सौतन" पाहून "what the hell- what the hell" म्हणून गेले.
what the hell- what the hell
what the hell- what the hell >>>
ते गाणं जरठविवाहच वाटतं.
मुलींनो, असा एक पिक्चर नाही.
मुलींनो, असा एक पिक्चर नाही. अशी कथा - विचारधारा असलेले अनेक चित्रपट आहेत. "दुष्मन न करे दोस्तने वो काम किया है" कॅटेगरीत येणारे अनेक चित्रपट आहेत. राधा, मीरा, रूक्मिणी तर फारच सोयिस्करपणे येतात म्हणजे काका कृष्ण झाले. इतकं जस्टिफाय करतात लफडं की बास. हिरोची ईमेज अजिबात ढळू देत नाही, दुसरी औरत की/ बायकोची इमेज पार रसातळाला नेतील. पेट्रियार्कीचे शिरोमणी..!
what the hell- what the hell
what the hell- what the hell
>>>
इतकं जस्टिफाय करतात लफडं की बास. हिरोची ईमेज अजिबात ढळू देत नाही
>>> अगदी अगदी
मैं तेरी छोटी बेहेना हू समझ
मैं तेरी छोटी बेहेना हू समझ ना मुझको सौतन हे विव्हळगीत ही यातलेच.
हिंदी सिनेमात पुरुषांचा पाय घसरायला बाथरूम मधल्या साबणाचही निमित्त पुरतं.
काहीही पाहावे हाकानाका म्हणून
काहीही पाहावे हाकानाका म्हणून टिव्हीवर दुसऱ्या दिवशी 'सौतन' पाहिला थोडा वेळ. >>> का?
याच कॅटेगरी मधे मैं तुलसी तेरे आंगन की पण येतो का?
रेड २ पाहायला चालू केला आहे. वाणी आवडत नाही. रितेश आवडतो. पिक्चर त्याच्यासाठी पाहतेय. बराचसा त्याच्या बाबांसारखा दिसायला लागलाय आता असं वाटलं.
हिंदी सिनेमात पुरुषांचा पाय
हिंदी सिनेमात पुरुषांचा पाय घसरायला बाथरूम मधल्या साबणाचही निमित्त पुरतं.
>>>>>
तो फेमस सीन मी पाहिलाय. साऊथच्या फिल्म्समध्ये जितेंद्रची मास्टरी होती दोन लग्नं, एक लग्न एक अफेअर प्रकरणात.
हे गाणं बहुतेक ‘मैं तुलसी तेरे आंगन की, कोई नही मैं तेरे साजन की’ या आद्य विव्हळगीतावरून घेतलं असावं. परत हिरो नारायणच, त्याची चूक नाहीच.
ग्रेट माईंडस् थिंक अलाईक रमड
ग्रेट माईंडस् थिंक अलाईक रमड
ग्रेट माईंडस् थिंक अलाईक रमड
ग्रेट माईंडस् थिंक अलाईक रमड >>> टोटली
रेड २ अगदी बाळबोध आहे. अजय
रेड २ अगदी बाळबोध आहे. अजय नि रितेश ला उगाच लार्जर दॅन लाईफ करण्याच्या हट्टापायी पटकथेकडे पूर्ण दुर्लक्ष झालेले आहे. संपूर्ण सिनेमामधे कोणी सरळ बोलतच नाहित, सगळे कूट्प्रश्न सोडवत बसलेले आहेत. वाणीला साडीत पाहून टडोपा होते
वाणी साडीत खूप वेळा सापडेल.
वाणी साडीत खूप वेळा सापडेल. फक्त ती बिकीनी टॉप नसलेला ब्लाऊज आणि साडी या कॉंबिनेशनमध्ये सापडणं कठीण
सौतनची पोस्ट
सौतनची पोस्ट
असे आयुष्याचंही फुटबॉल सारखं असत असं शीघ्र - काकाफॉ रचतो >>>
केवळ या संवादाकरता हा सीन रचला आहे का? नाहीतर हीरो व त्याची बायको नसलेल्या हिरॉइनला दिल बहलावयाला इतर बरेच पर्याय होते. बाय द वे, टीना मुनिम बायको व पद्मिनी कोल्हापुरे ही पती, पत्नी और वो मधली "वो" का? तसे असेल स्टीरीओटाइप उलटा केलेला दिसतो. कारण सहसा अफेअर पिक्चर्स मधे पत्नी काकूबाई व दुसरी जी कोण असते ती एकदम फटाकडी टाइप असते. समंजस स्त्री ही "वो" असेल तर त्यांचे मूळचे प्रेम असते पण लग्न होऊ शकलेले नसते (आशा काळे अंगाई, किंवा होडीतील अजीब दास्तां वाली मीना कुमारी टाइप).
इथे कथा वाचली तर नेहमीसारखीच लॉजिक रानोमाळ लेव्हल आहे.
हे गाणं बहुतेक ‘मैं तुलसी
हे गाणं बहुतेक ‘मैं तुलसी तेरे आंगन की, कोई नही मैं तेरे साजन की’ या आद्य विव्हळगीतावरून घेतलं असावं >>> सेमी-खामोष! हे गाणे बघायला महाक्रिंज आहे. पण ऐकायला प्रचंड श्रवणीय आहे. त्यातील लिरीक्सकडेही दुर्लक्ष करावे कारण ते ही क्रिंज आहे. पण आवाज व संगीत स्वर्गीय आहे.
ऐकायला प्रचंड श्रवणीय आहे >>>
ऐकायला प्रचंड श्रवणीय आहे >>>
मी लहान असताना टिव्हीवरून, रेडिओवरून वगैरे या गाण्याचा इतका मारा झालेला आठवतोय की मला त्यातलं काहीही अपील होत नाही. इन फॅक्ट गाणं बघितलं होतं तेव्हा मला ते भितीदायक वाटलं होतं. या अश्या संस्कारांमुळेच मी नंतर निर्ढावले असावे असा मला संशय आहे. इतकी की हॉरर्सची पण भीती वाटेनाशी झाली 
पण आवाज व संगीत स्वर्गीय आहे.
पण आवाज व संगीत स्वर्गीय आहे. >>>> फुल खामोश.
रमड अगदी. प्रचंड रडकं गाणं आहे. आता तर काटा येतो लहानपणीच्या आघाताने.
इथे फटाकडीचा ओव्हरडोस झाला काकाला, पण वयोमानानुसार म्हणता येईल अशी जोडी दिसली आहे. फटाकडी गर्लफ्रेंड असेल तर पिळण्याला लिमिट येते, तिला सरळ डिच करता येते नंतर. बायकोच फटाकडी निघाली तर संपूर्ण संस्कृती पणाला लावता येते व पळता भुई थोडी होते.
दोघीही समंजस आणि हिरोही समंजस आणि परिस्थितीच मोठी बिकट असेल तर विचारूच नका. आधीच मर्कटा, त्यात मद्य प्याला, वर विंचू चावला - लेव्हलने चढत जाते.
Pages