चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशा भोसले यांच्या बद्दलचं प्रकरण वाचलंय. पन बिल्कुल लक्षात नाही.
त्यांचा चॅनल आहे हे आत्ता सर्च देतांना सापडलं. काहीच नसेल ऐकायला तेव्हां हरकत नाही बघायला Wink

रामगढ के शोले कुणी पाहिलाय का ?
आत्ता ड्युप्लिकेट अमिताभबद्दल ऐकलं त्यात उल्लेख आहे.

दोन्ही बाजुने प्रेम असते तेव्हा प्रेम प्रकरण म्हणतात ना? दादांनी कुठेही त्यांचे आशावर प्रेम होते असे म्हटले नाहीय. आशा दादांना सगळीकडे घेऊन फिरत होती, सर्व जगती हा आशाचा माणुस म्हणुन दादांची ख्याती/रुबाब्/ओळख निर्माण झाली होती, सर्व दरवाजे त्यांच्यासाठी आशामुळे उघडले जात होते. शेवटी आशाने सरळ लग्नाचा प्रस्ताव समोर ठेवला. दादाना काय करावे सुचेना. नेमके तेव्हा दादा कोल्हापुरला भालजी पेंढारकरांच्या स्टुडिओत होते, त्यांनी भालजींकडे सल्ला विचारला. भालजींनी अजिबात लग्न करु नकोस म्हणुन सांगितले आणि किस्सा संपला. आशाबरोबर गरागरा फिरत असतानाही एका बाजुला ते रौप्यमहोत्सवी चित्रपट बनवत होते, त्यातली गाणी लिहित होते. त्यांच्या गळ्यात पडु इच्छीत असलेल्या आशाकडुन फुकटात गाणी गाऊन घ्यावीत असे त्यांना काही सुचले नाही, लता आशाने दादांची गाणी गायलेली मला आठवत नाहीत. पण मंगेशकर भगिनींशिवाय चालतही नाही. उषा मंगेशकरकडुन बहुतांश गाणी गाऊन घेतलीत.

त्यांचा चॅनल आहे हे आत्ता सर्च देतांना सापडलं>>>

बापरे, म्हणजे पुस्तकात जे अ आणि अ छापलंय ते आता बाई यु ट्युबवर साण्गत बसल्यात?? पुस्तक प्रदर्शित झाले तेव्हा त्यातले बरेच लिखाण लोकांना अ आणि अ वाटले पण दादा हयात नसल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले गेले. अपवाद फक्त उषा चव्हाणचा. मला ‘शाहिर’ दादा कोंडके कसे घडले हे जाणुन घ्यायची इच्छा होती म्हणुन मी वाचायला घेतले खरे पण ते फिल्मी मॅगझिनसारखे वाटले. नुसते गॉसिप.

'एकटा जीव ' ह्या दादांच्या आत्मवृत्तात 'आशा- निराशा' ह्या प्रकरणात लिहिलेले असं वाचलं होतं की, दादांचं ' विच्छा माझी पुरी करा' हे नाटक पाहून आशा भोसले दादांच्या अभिनयाच्या प्रेमात पडल्या. पुढे दोघांची मैत्री झाली. संबंध वाढत गेले. भालजी पेंढारकरांशी दादांची गाठ आशाजींनीच घालून दिली होती. ' तांबडी माती' हा दादांचा पहिला चित्रपट भालजी पेंढारकरांनी दिग्दर्शित केला. दादा स्वतःला भालजी पेंढारकरांचे ' मानसपुत्र' म्हणत. ते त्यांना आशाजींसारखेच ' बाबा' म्हणत. पुढे आशा भोसलेनीं दादांपुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र दादांशी लग्न केल्यानंतर त्या कोंडके आडनाव लावणार नाही तर भोसले आडनावच कायम ठेवणार तसेच दादांनी लग्नानंतर आशांजींच्या घरी राहण्यास यावे .. अशी त्यांची अट होती. तेव्हा दादा भालजी पेंढारकरांचा सल्ला घेण्यास गेले.. तेव्हा त्यांनी आशाशी बिलकुल लग्न करू नकोस हा सल्ला दिला. त्यानंतर एकदा आशाजींचा आणि दादांचा कशावरून तरी वाद झाला तेव्हा दादा त्यांना म्हणाले की, मी तुम्हांला गाणं गाऊ नका म्हटलं तरं तुम्हांला चालेल का..? त्यांच्या बोलण्याने आशाजी नाराज झाल्या मग दादांनी पण त्यांच्या घरी जाण्याचे टाळण्यास सुरुवात केली आणि नंतर दुरावा वाढून दोघांचं नातं तुटलं. पुढे आशा भोसलेंनी संगीतकार आर् . डी. बर्मन सोबत लग्न केले. दादांचं आत्मकथन वाचून खूप धक्के बसले होते. पुस्तकावर काही वर्षे बंदी होती.

ब्रिक अर्धा पाहिला. भारी आहे.
एका रात्री ते आपल्या फ्लॅट मधे झोपतात. उठतात तर त्यांच्या घराभोवती एक भिंत असते. दरवाजा, खिडक्या सगळं बंद. भिंतीतून ड्रील बाहेर नेलं तर तिथेही ही लोखंडी भिंत. इंटरनेट, मोबाईल सिग्नल, पाणी सगळं बंद झालेलं असतं. त्या इमारतीत सगळ्यांची हीच स्थिती असते...

दादा कोंडके आणि आशा भोसले? Uhoh
हे अजिबातच माहित नव्हते
>>>>>

मलाही Happy
तसे मला गॉसिपमध्ये इंटरेस्ट नसतो. वरच्या पोस्ट सुद्धा स्किप केलेल्या. या पोस्टमुळे पुन्हा वर जाऊन वाचले. पण याआधी कधी हे कानावर सुद्धा आले नव्हते.

इंटरेस्टिंग आहे पण हे. माझ्या डोक्यात दादा कोंडके ग्रामीण सुपरस्टार आणि आशा भोसले या बिनधास्त आणि मॉडर्न विचारांच्या अश्या दोघांच्या नॉट एक दुसरे का टाईप इमेज होत्या. त्यामुळे कोणी सांगितले असते तर विश्वास सुद्धा ठेवला नसता..

किंवा ठेवलाही असता. कारण प्रत्यक्षात प्रेम ही फार कमाल गोष्ट असते. कुठल्या फॉर्म्युलात ती अडकवता येत नाही.

मंडळी आशा भोसले -दादा कोंडके प्रकरण फक्त एकटा जीव.. मध्येच वाचायला मिळाले. एकटा जीव… दादांच्या मृत्युनंतर प्रकाशित झाले, त्याण्च्या मुलाखती घेऊन त्यावरुन पुस्तक लिहिलेले असे लेखिकेचे मत होते. पुस्तक प्रदर्शित झाले तेव्हा त्यावर भरपुर टिका झाली. अजुन बर्‍याच लोकांच्या बर्‍याच गोष्टी त्यात होत्या. कित्येकांनी दुर्लक्ष केले. फक्त उषा चव्हाण यांनी कोर्टात जायची धमकी दिली/कोर्टात गेल्या असाव्यात.

त्या पुस्तकातले सगळे खरेच असे मानण्यात फारसा अर्थ नाही.

नेटफ्लिक्सवर ब्रिक नुकताच रिलीज झाला आहे.
एक चांगला साय फाय बनवायची संधी दवडली गेली आहे. पहिला हाफ मस्त घेतला आहे. पुढच्या हाफ मधेही उत्सुकता कायम राहते.
घराच्या सर्व भिंतींना एका मॅग्नेटच्या विटांनी वेढलेले असते. त्यावर फेकलेले चमचे, काटे, सुर्‍या हे थोड्या वेळाने बंदूकीच्या गोळीच्या वेगाने परत येत असते. त्यामुळे नायकजखमी होतो.

शेजारच्या फ्लॅटमधे मधल्या भिंतीला भोक पाडून ते जातात. थोडी सोबत मिळते. बाहेरच्या भिंती त्यांच्याही अशाच बंद झालेल्या असतात. सुटकेचा रस्ता नसल्याने आता खाली ड्रिल करून खालच्या फ्लॅटमधे, मग त्याच्या खालच्या असं करत करत बेसमेंटला एक भुयार असतं त्यात उतरण्याचा प्लान बनवतात. पण त्यात काय काय अडचणी येतात हे सांगणे बरोबर होणार नाही.

पुढे सरधोपट कथा आणि शेवट खूपच क्लिशे, सॅडिस्ट झाल्याने पुढचा भाग कदाचित जास्त इंटरेस्टिंग होईल.

कोणताही आवडलेला/न आवडलेला सिनेमा, त्यातले कलाकार, त्यांचा अभिनय, स्क्रिप्ट, (हिंदी, मराठी सिनेमा असेल तर गाणी) - यापलिकडे सहसा जावंसं वाटत नाही. गॉसिपमध्ये तर अजिबात रस नाही. त्यामुळे दादा कोंडके पोस्टी सगळ्या न वाचता स्क्रोल केल्या. 'एकटा जीव' पुस्तक वाचलेलं नाही.

नरसिंह अनिमेशन चित्रपट कोणी पाहिला आहे का?
मला ट्रेलर बघून काही विशेष असे वाटले नाही. लहान मुलांसाठी ठीक वगैरे वाटला. पण बघून आलेले लोकं भारावून लिहीत आहेत आणि VFX स्पेशल इफेक्ट कौतुक चालू आहे जे ट्रेलर मध्ये काही जाणवले नाही. कोणी पाहिला का इथे? कलाकृती म्हणून खरेच चांगला आहे की लोकांची श्रद्धा इफेक्ट आहे?

नरसिंह अनिमेशन चित्रपट कोणी पाहिला आहे का?
मला ट्रेलर बघून काही विशेष असे वाटले नाही. लहान मुलांसाठी ठीक वगैरे वाटला. पण बघून आलेले लोकं भारावून लिहीत आहेत आणि VFX स्पेशल इफेक्ट कौतुक चालू आहे जे ट्रेलर मध्ये काही जाणवले नाही. कोणी पाहिला का इथे? कलाकृती म्हणून खरेच चांगला आहे की लोकांची श्रद्धा इफेक्ट आहे?

>> प्रतिसाद एडिट करून अनुमोदन मागे घेते आहे. मी सिनेमा बघायला गेलेल्या मैत्रिणीने काही सेकंदाचे रेकॉर्डिंग करून ते व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवले होते ते विशेष वाटले नाही. पण युट्यूबवर जाऊन ट्रेलर बघितला तो व्हॉट्सॲप स्टेटसपेक्षा नक्कीच प्रभावी वाटला.

श्रद्धा इफेक्ट खूपच जास्त आहे.. युट्यूबवर जेवढे रिव्ह्युज बघितले त्यांच्या आणि वैयक्तिक माझ्याही बाबतीत. पण मी हा सिनेमा न रडता आणि हात न जोडता बघेन असं वाटत नाही. मुलाला स्पायडरमॅन आणि सिंबा दाखवतो तर हे तर नक्कीच दाखवलेच पाहिजे असे आतून वाटले.

माझ्या आवडत्या युट्यूबरने घेतलेली दिग्दर्शक / निर्मात्याची मुलाखत पण पहिली. हा सिनेमा परदेशी भाषांमध्ये सुद्धा प्रदर्शित होणार असून पुढे जाऊन विष्णूच्या २४ही अवतारांवर सिनेमा काढायचा त्यांचा मानस आहे. Thor वगैरे प्रमाणे गेमिफाय ही करणार आहेत हे अवतार जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे अवतार पोचतील.

तसे मला गॉसिपमध्ये इंटरेस्ट नसतो. >> खोटं नका बोलू बरं ऋन्मेष..! कितीही नाकारलं तरी माणसाचा निसर्गतः जरासा तरी स्वभावगुण आहे तसा.. 'एकटा जीव ' वाचणारे गॉसिपखोर नाहीत बरं..!

बरं ते जाऊ द्या.. थोडं अवांतर होत्येयं पण लिहितेच..

चित्रपटसृष्टी ही तारांकित रंग-बेरंगी दुनिया आहे. नाती जुळणं, तुटणं त्यांच्यासाठी नवीन नाही. काही नाती स्वार्थी, मतलबी तर काही गंभीरसुद्धा असतीलच.. तशी ती सगळीकडेच असतात.

कलाकारांच्या आयुष्यात काय घडत्येयं हे त्यांच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना जाणून घेण्यात इंटरेस्ट असतोच. त्यांच्या आयुष्यातले किस्से, गोष्टी कलाकार काही आपल्याला स्वतः सांगायला येत नाहीत.. कुठेतरी बातम्यात छापून आलेलं असतं.. कलाकारांच्या मुलाखती असतात. लोकांना त्यांच्या आयुष्यात इंटरेस्ट नसता तर Filmy magzine निघाली नसती आणि वृत्तपत्रात रोज पेज थ्री पुरवण्या छापल्या गेल्या नसत्या.

लायब्ररीत गेल्यावर टेबलवर दादांचं ' एकटा जीव ' पुस्तक नेहमी पडलेले दिसायचे. खरंतर आता कादंबऱ्या आणि मोठ - मोठाली जड पुस्तकं वाचून डोक्याला जास्त ताण द्यावासा वाटत नाही. लघुकथा वाचण्यावर जास्त भर असतो. पण इथेच मायबोलीवर कुठेतरी ' एकटा जीव' बद्दल वाचले होते.. मग मी टेबलवरून पुस्तक उचलले. दादांनी कुठलाही आड - पडदा न ठेवता पुस्तकात आपला प्रवास सांगितला आहे. चित्रपट सृष्टीतल्या लोकांपासून ते राजकारणातल्या लोकांबरोबर तसेच अंडरवर्ल्डच्या डॉन सोबत त्याचे संबंध कसे होते ते त्यांनी सगळं लिहिलयं.. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची जन्मकथा त्यांनी पुस्तकात सांगितली आहे .. पुस्तकात त्यांनी फक्त आपल्या प्रेमसंबंधांचा उल्लेख केलेला नाही तर त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास त्यात मांडलायं.. पुस्तकातलं सगळं खरं की खोटं करण्याच्या भानगडीत आपण पडायचं नाही.

चिकवाला नेहमी चकवा लागलेला असतो. Lol
आधी जे लोक परेशान मामा बनत ते मग सरावतात .आणि पूर्वीचे चकवाकार खेळाडू आता परेशान चाचा बनतात. Proud

>>>>>>कितीही नाकारलं तरी माणसाचा निसर्गतः जरासा तरी स्वभावगुण आहे तसा..
म्हणुनच काही स्वभावगुणांच्या वरती जावे लागते ... बलपूर्वक. उपर उठना पडता है!

पेंडिंग लिस्ट वरचा लकी भास्कर पाहिला
रिव्ह्यू अन् रेको मुळे फारच जास्त अपेक्षा ठेवल्या गेल्या बहुतेक
बरा होता पण आउटस्टँडिंग नव्हता...

कितीही नाकारलं तरी माणसाचा निसर्गतः जरासा तरी स्वभावगुण आहे तसा..
म्हणुनच काही स्वभावगुणांच्या वरती जावे लागते ... बलपूर्वक. उपर उठना पडता है!
>>>>

सामो +७८६

सहा रिपु कमी अधिक प्रमाणात प्रत्येकात असतात त्यावरच तर मात करायच्या प्रयत्नात आयुष्य जगायचे असते.

पण यात मला वाटते स्वभावापेक्षा मला आवडच नाही असे जाणून घ्यायची. मागे कोणीतरी म्हणाले की आमिरने तिसरे लग्न केले. मी दुसरे कधी झाले म्हणून चमकलो होतो Happy
क्रिकेटचे अफाट वेड म्हणून बायको मध्येच क्रिकेटरच्या अफेअर आणि गर्लफ्रेंडबद्दल मला विचारते, पण तिला माहीत असते ते ही मला माहीत नसते Happy

आशा भोसले दादांच्या अभिनयाच्या प्रेमात पडल्या>>>> हे वाचून मला चक्कर यायची बाकी.

आशा भोसले दादांच्या अभिनयाच्या प्रेमात पडल्या>>>> हे वाचून मला चक्कर यायची बाकी.

Biggrin

दादांचे नाटक 'विच्छा माझी पुरी करा.' हे वगनाट्य त्याकाळी प्रचंड लोकप्रिय होते. पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे दौरे होत होते.. मी पुस्तकात जे वाचलंय तेच लिहिलयं .. दादा कोंडकेचा मी एकही चित्रपट पाहिलेला नाही.. पण ते महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेचे आवडते नायक होते. लोकप्रिय व्यक्तिमत्व होते. सामान्य लोकांची घटकाभर करमणूक त्यांनी केली. लोकांना जे आवडत होतं तेचं त्यांनी पडद्यावरच्या दाखवलं. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. चित्रपट सृष्टीतल्या अश्या अनेक गोष्टी / अफवा / किस्से आपण ऐकत वाचत असतो.. वाचून प्रत्येक वेळी चक्कर आली तर कसं व्हायचं बरं..!

नेकेड गन थिएट्रात पाहीला. आचरट जॉनरचा सिनेमा. हे असे जोक्स माझ्या तरी पचनी पडत नाहीत. उदा - टेक अ चेर तो म्हणतो तर पामेला म्हणत "नो आय हॅव्ह अ चेअर अ‍ॅट माय होम" आणि मग थोड्या वेळाने तिच्या निर्णयाचा पुर्विचार करुन ती खुर्ची घेउन जाते. हे असलेच जोक्स संपूर्ण सिनेमाभर. पण लोक हसत होते खो खो. या विनोदांचाही एक टाइप आहे.

हा एक रिव्ह्यु - The Naked Gun is one of the most consistently and even exhaustingly funny movies in a long time, the kind of outrageous, outlandish comedy that multiplexes have been missing for years. It's truly a revelation to have a movie where the laughs come so fast and furious.

मात्र पामेला अँडरसन, वयाने मोठी पण आता सुसह्य दिसते.

Pages