Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
हे तर काहीच नाही..
हे तर काहीच नाही..
एका मुलाखतीत म्हगुरू म्हणाले की अमितजी जया जी ना म्हणतात की सचिन काय तुझ्या माहेरून आलाय का... एकत्र काम न करताही माझ्यापेक्षा तो तुझ्या जवळचा आहे...
link सापडली तर देते
https://youtu.be/BgWNKnVGFro
https://youtu.be/BgWNKnVGFro?si=ls7MDSoZmVnDbh8a
ही link...
शोलेच्या निर्मिती च्या वेळी
शोलेच्या निर्मिती च्या वेळी अमजद ३५ आणि सचिन १७ वर्षाचा होता. अमजदचे वडिल जयंत हे सुद्धा सिने-कलाकार होते. अमजदने ११ व्या वर्षी बालकलाकार म्हणून एका सिनेमात काम केलं होतं. मुंबईत कॉलेज जीवनात (फिलॉसॉफी आणि पर्शियन लिटरेचर अशी दोन मास्टर्स) थिएटरमधे तो अॅक्टिव्ह होता. अभिनय आणि दिग्दर्शनाची बक्षिसं मिळवत होता. शोले च्या आधी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं होतं. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि इतक्या महत्वाच्या रोलसाठी अमजदला मदत करायला इतर अनुभवी मंडळी हजर असताना सचिन ने सांगितलेला किस्सा मला तरी पटत नाही.
फेफ +१
फेफ +१
संजीवकुमार चित्रपटांत
संजीवकुमार चित्रपटांत यायच्या आधी नाटकांत होता तेही IPTA , INT च्या. ए के हंगलसारखे लोक त्याच्यासोबत होते. त्याच्यासोबतची आठवण सांगताना आपण त्याचा एखाद्या शब्दाचा उच्चार सुधारला हे आवर्जून सांगणं ही आत्मप्रौढीच झाली.
काल कुणाल विजयकर - सचिन यांचा खाने में क्या है हा चॅट शो पाहिला. कुणाल अगदी भक्तीभावाने प्रश्न विचारत होता आणि ऐकत होता. तिथे महागुरूंनी हृषिकेश मुखर्जी, एडिटिंग , शोले मधला एक फाइट सिक्वेन्स सुपरवाइज करणं असं काय काय सांगितलं.
यावरून आठवलं. लता गेल्यावर इंडियन एक्स्प्रेसमध्ये हेमामालिनी आणि शर्मिला टागोर यांनी श्रद्धांजलीपर लेख लिहिले. त्यात हेमामालिनीने तिच्यावर चित्रित झालेल्या गाण्यांबद्दल तेवढं लिहिलं. शर्मिलाने लता आणि लताच्या गाण्याबद्दल लिहिलं.
महागुरूंना बालकलाकार म्हणून
महागुरूंना बालकलाकार म्हणून मिळालेळं यश युवावस्थेत मिळालं नाही ; त्याची खंत असेल. >>>>
ती खंत आहेच, त्याने ती बोलुनही दाखवलेली आहे.
आज कालीचरण पाहिला. सुरवातीचा प्लॉट डॉन सारखा आहे. पहिला शत्रु मेला व त्याच्याजागी दुसरा उभा केला. एंगेजिंग चित्रपट. सारा शहर मुझे लायन के नाम से जानता है हा संवाद यातलाच. (नंतर तो खुप चित्रपटात रिपिट झालाय काय??) फरक इतकाच की तोंडाने लायन म्हटलेय आणि फोटोत टायगर दाखवलाय.
शत्रु व अजित एकत्र असल्यामुळे संवादांची आतिशबाजी आहे.
शोले मधला एक फाइट सिक्वेन्स
शोले मधला एक फाइट सिक्वेन्स सुपरवाइज करणं असं काय काय सांगितलं>>>>
त्याची एक जुनी मुलाखत आहे त्यातही त्याने शोलेचे काही सिन्स जे आधी अमजद मॅनेज करत होता ते सिप्पीने आपला डिरेक्शनमधला रस पाहुन आपल्याला दिल्याचे सांगितलेय. ट्रेनने का गाडीने लाकडे उडवायच्या सिनचा उल्लेख केला होता.
लता गेली तेव्हा सुरेश वाडकर कुठल्यातरी चॅनेलवर विग लाऊन आलेला. पुर्ण अर्धा की एक तास तो मुख्य व लता त्याच्यासोबत या प्रकारच्या आठवणींवरच बोलला. नंतर लोकांनी यथायोग्य ट्रोल् केले.
एंगेजिंग चित्रपट. >>> टोटली!
एंगेजिंग चित्रपट. >>> टोटली! मला आवडला कालीचरण
सुरवातीचा प्लॉट डॉन सारखा आहे
सुरवातीचा प्लॉट डॉन सारखा आहे >>> हो. डॉन बद्दल हे वाचले होते की तो "तोतया" वाला प्लॉट कालिचरण मधे आधी होता. कालिचरण आधीचा आहे. सुभाष घईचा आहे ना? एंगेजिंग असेलच.
तोंडाने लायन म्हटलेय आणि फोटोत टायगर दाखवलाय >>>
तोंडाने लायन म्हटलेय आणि
तोंडाने लायन म्हटलेय आणि फोटोत टायगर दाखवलाय >> त्या वेळच्या हिंदी पिक्चरमधे जोपर्यंत लायन म्हणून झेब्रा दाखवत नाहीत तोपर्यंत नॉर्मल समजायचं.
(No subject)
तोंडाने लायन म्हटलेय आणि
तोंडाने लायन म्हटलेय आणि फोटोत टायगर दाखवलाय >>

हिंदी पिक्चरमधे जोपर्यंत लायन म्हणून झेब्रा दाखवत नाहीत तोपर्यंत नॉर्मल समजायचं>>
फा >> कालिचरण सुभाष घाईचा आहे
फा >> कालिचरण सुभाष घाईचा आहे. मस्त आहे एकदम. डॉन च्या उलट प्लॉट आहे इथे. डॉन मध्ये तो गुंड बनतो इथे तो पोलिस बनतो.
आता तो बघून विश्वनाथ पण पाहिला. हा इतका उत्कंठावर्धक वाटत नाही. विश्वनाथ मध्ये डायलॉग चांगले असले तरी स्क्रिप्ट जरा गोंधळ झालेला आहे. कदाचित एका सज्जन माणसाला वाईट झालेले कसे दाखवायचे असा घाईला प्रश्न पडला असेल.
फा >> कालिचरण सुभाष घाईचा आहे
फा >> कालिचरण सुभाष घाईचा आहे. मस्त आहे एकदम. डॉन च्या उलट प्लॉट आहे इथे. डॉन मध्ये तो गुंड बनतो इथे तो पोलिस बनतो. >>> थँक्स.
हिंदी पिक्चरमधे जोपर्यंत लायन म्हणून झेब्रा दाखवत नाहीत तोपर्यंत नॉर्मल समजायचं >>>
तोंडाने लायन म्हटलेय आणि
तोंडाने लायन म्हटलेय आणि फोटोत टायगर >>>
जोपर्यंत लायन म्हणून झेब्रा दाखवत नाहीत तोपर्यंत नॉर्मल >>>
लायन, टायगर, झेब्रा….
लायन, टायगर, झेब्रा….
😂
तोंडाने लायन म्हटलेय आणि
तोंडाने लायन म्हटलेय आणि फोटोत टायगर >>>
जोपर्यंत लायन म्हणून झेब्रा दाखवत नाहीत तोपर्यंत नॉर्मल >>>
आता तर सीजीआयच्या कृपेने प्लास्टिकची शेळी दाखवून सिंह म्हणतील अशी गत आहे.
लायन, टायगर, झेब्रा…. >>>
लायन, टायगर, झेब्रा…. >>> फोनवर एअरलाइनशी बोलताना कन्फर्मेशन कोड सांगतोय असे वाटले
सुभाष घई नामावलीत पाहुन
सुभाष घई नामावलीत पाहुन आश्चर्य वाटले होते. नंतर विकिवर कळले की त्याचा हा पहिलाच चित्रपट. गायिकांमध्ये कंचन व अनुराधा ही नावेही होती. असिस्टंट म्युझिक बाबलाचे त्यामुळे कंचनला संधी.
खुप चर्चेमुळे सौदागर परत
इथलल्य चर्चेमुळे सौदागर परत बघितला, फार पुर्वी कधितरी बघितला असेल. एका गाण्यात (तेरा मेरा साथ रहे)नुतनने टिकली लावलेली बघितली ते एकदम वेगळच वाटल.मुस्लिम समाजात गन्ध्,टिकली लावत नाही ना? मी कुठेच नाही बघितलय. मन्गळ सुत्र घातलेल बघितलय.
कथेला बंगाली बॅकग्राऊंड आहे.
कथेला बंगाली बॅकग्राऊंड आहे. पद्मा खन्नाही कित्येक दृष्यात टिकली लावलेली आहे.
बंगालात आणि बांगला देशात धर्माने मुस्लिम असणारे लोक चालीरिती, वेषभुषा, नावे हिंदुच ठेवत होती. तस्लिमा नसरीनचे पुस्तक वाचले त्यात तिच्या नवर्याचे नाव रुद्र वाचुन आश्चर्य वाटले होते. त्यातच तिने हिंदु नावे व वेषभुषेबद्दल लिहिलेय बहुधा.
आता ते संपले. आता मुस्लिम आयडेंटिटी जास्त महत्वाची आहे.
ओह अस आहे का, धन्यवाद साधना
ओह अस आहे का, धन्यवाद साधना ह्या सदर्भाबद्दल.
“ फोनवर एअरलाइनशी बोलताना
“ फोनवर एअरलाइनशी बोलताना कन्फर्मेशन कोड सांगतोय असे वाटले” -
फा
शोले च्या आठवणी, खरे-खोटे
शोले च्या आठवणी, खरे-खोटे किस्से, मनोरंजनात्मक सिन्सवरून अर्थाचा अनर्थ करत निर्माण केले जाणारे वाद ह्यावरून आजही कित्येकांचं दुकान चालतं हेच ह्या सिनेमाचं मोठं यश असावं.
नेटफ्लिक्सवर फातिमा सना शेख
नेटफ्लिक्सवर फातिमा सना शेख आणि माधवनचा 'आप जैसा कोई' पाहिला. अतिशय सुंदर, रोमॅन्टिक कथा आहे. नक्की बघा. फार फार आवडला. आत्ताच्या आत्ता बघा.
सविस्तर लिहेन.
आत्ताच्या आत्ता बघा >>
आत्ताच्या आत्ता बघा >>

गनपॉईण्टवर सांगितल्या सारखं वाटतंय.
तू सविस्तर लिहिशील तेव्हा
तू सविस्तर लिहिशील तेव्हा वाचेन.नेफली नाही आमच्या घरा, तुम्ही कहाणी सादर करा.
नेफली नाही आमच्या घरा, तुम्ही
नेफली नाही आमच्या घरा, तुम्ही कहाणी सादर करा.>>>> अनुमोदन.
राभु, साम- दाम- दंड -भेद
राभु, साम- दाम- दंड -भेद

केकू आणि अन्जूताई, आपण सगळेच गोष्टीवेल्हाळ...!
*स्पॉयलर्स असतील.
आप जैसा कोई (नेटफ्लिक्सवर)
माधवन, फातिमा सना शेख, नमित दास, आयेशा रजा, मनिष चौधरी
हा नावावरून क्रिंज आणि ट्रेलरवरून फार काही खास किंवा नाविन्यपूर्ण नसलेला वाटला होता. सहज 'वर्क आऊट' करताना लावला आणि याने खिळवून ठेवले. संपूर्ण पाहूनच उठले. 'आप जैसा कोई' ऐवजी 'आज जाने की जिद ना करो' नाव ह्यातल्या रोमॅन्ससाठी चपखल ठरले असते. इतका vintage आणि हुरहूर लावणारा आहे.
माधवन(श्रीरेणू त्रिपाठी) एक ४२ वर्षे वय असलेला संस्कृतचा शिक्षक आहे. लग्न जमत नाहीये, कुणालाच तो इंटरेस्टिंग वाटत नाही. फातिमा (मधू बोस) एक ३२ वर्षांची फ्रेंचची शिक्षिका आहे. नमित दास मित्राच्या भूमिकेत आहे, फार भारी काम करतो आणि अंडररेटेड वाटतो. आयेशा रजा एकदम गृहकृत्यदक्ष, आई एवढा जीव लावणारी मायाळू वहिनी व मनिष चौधरी इतरांना ताब्यात घेणारा एकदम पुरूषसत्ताक विचारांचा मोठा भाऊ आहे. मधू बोसचे कुटुंब एकदम प्रेमळ आधुनिक विचारांचे कलकत्त्यातील टिपिकल बंगाली कुटुंब आहे. माधवनचे कुटुंब आगरतळा व जमशेदपूरचे दाखवले आहे. मुंबई, दिल्ली, पंजाब, युपीही न दाखविल्याबद्दल टिमचे कौतुक.
श्री प्रचंड एकलकोंडा, लाजाळू व इंट्रोव्हर्ट आणि त्यामुळे व्हर्जिन आहे. ती अनअपोलोजेटिक, निर्भिड आणि आधी रिलेशनशिप मधे असलेली आहे. ती त्याच्या "आऊट ऑफ लीग" म्हणू तशी आहे. पण दोघेही प्रचंड प्रामाणिक आहेत. त्याला एकटेपणा आल्यामुळे गप्पा मारायला नमित एक "आप जैसा कोई" गुदगुल्या हॉटलाईन सुचवतो. याचे विनोद धमाल आहेत, उथळ नाही वाटले. श्रीचा ह्या ॲपवर गप्पा मारताना एकटेपणा बऱ्यापैकी दूर होतो. मग हे मधूचे स्थळ येते. त्याला विश्वास बसत नाही मग तो मित्र आणि एक विद्यार्थी घेऊन तिची सगळी चौकशी करून माहिती काढतो. कलकत्त्याचे घर ठाकूरांच्या कोठी टाईप दाखवले आहे. फातिमा मुळीच बंगाली वाटली नाही पण. सगळ्या बंगाली वातावरणात ठिगळ लावल्यासारखी वाटत होती. साड्या छान आहेत, ब्लाऊज फिल्मीच आहेत पण बिकिनी ब्रा नाही हेच खूप आहे.
तो कलकत्त्याला येऊन तिला भेटतो, ती आधीची सगळी नाती सांगून टाकते. तोही सगळं खरंखरं सांगून टाकतो. मग ते एकदम किशोर कुमार, मधुबाला वगैरेचे चित्रपट पहायला जातात. रोज भेटतात, खूप खिदळतात, भरपूर गप्पा मारतात. हळूहळू प्रेमात पडतात. हे फारच छान दाखवलं आहे. उथळ नाही, गंभीर नाही, सखोल नाही किंवा उच्छृंखलही नाही. जसं आहे तसं. कसलाच आव आणला नाही. संवाद पोएटिक आणि अर्थपूर्ण आहेत. सगळेच संवाद व्यवस्थित विचार करून लिहिलेले आहेत. भावनांचे चढ उतार असूनही कसलेच अग्रेशन नाही, सहजरित्या उलगडत जाणारे आहेत. तो वीणा वाजवतो, ती पियानो वाजवून साथ देते. तसेच नंतरचे तीव्र मतभेदही त्याच आलेखात पुढे गेलेत.
त्याला कळतं की तीही त्याच डेटिंग ॲप वर होती, त्याच्या सारखंच सबस्क्रिप्शन तिनेही घेतलेलं असतं. तसा तो लग्न मोडून टाकतो. तिच्या मते तो जसा होता तशीच तीही होती. ती अचानक लूज कॅरेक्टर कशी झाली..! इतका वेळ आधुनिक विचारांचे वाटणारे पात्र हे मात्र पचवू शकत नाही. तिकडे त्याचा भाऊ वहिनीला कंट्रोल करत असतो, स्वयंपाकघरात अडकवून टाकणे, चहात कमी पडलेल्या वेलची वरून चारचौघात पाणउतारा करत असतो. शेवटी कितीही शिकलो तरी घर जोडणाऱ्या स्त्रियांना उत्तम स्वयंपाक येणं आवश्यक, स्त्रियांनी पॉलिटिक्स वर बोलणं, पत्ते खेळणं, पुरुषांसोबत वाद घालणं, गप्पा मारणं वगैरे शोभत नाही. असे male chauvinist pigsचे ( पुरूषसत्ताक डुकरं?) वेगवेगळे प्रकार आहेत. काही तीव्र- काही सौम्य. पण माधवन, नमित, त्याचा भाऊ, एवढाच काय तर त्याचा विद्यार्थी सुद्धा कमीजास्त "पुसडु"(MCP) आहेत. मला खूप मजा येते आहे हे लिहिताना.
तर श्रीला तिच्यावाचून जीव नकोसा होतो तेव्हा तो तिला जाऊन "मी तुला माफ केलं पण पुन्हा थोडी लिमिट मधे राहा" असे म्हणून सगळं अजून बिघडवून टाकतो.
तिकडे वहिनीचा स्वतः चा घरगुती व्यवसाय आहे, पण तो वाढवता येत नाहीये. मुख्य म्हणजे २८ वर्षांच्या या संसारात ती सुखी नाही, तिला प्रेम आणि आदर मिळालेला नाही. वहिनी व मधूचा मामा प्रेमात पडतात व हे सगळं घरात कळतं. ते समोर आल्यावर श्री ला आपण कुठे चुकत होतो हे कळतं. वहिनी भावाला सोडून वेगळी होते. तो वहिनीला सपोर्ट करायचे ठरवतो. प्रत्येकाला सुखी व्हायचा अधिकार आहे, जो समानता नसेल तर कधीही कळणार नाही आणि मिळणार नाही. इतकी साधी गोष्ट आहे, मेलोड्रामा नाही. सतत एक प्रसन्न व्हाईब आहे. ती प्रसन्नता चित्रपटात सगळ्या प्रसंगात टिकून राहते. शेवटी तो म्हणतो तसे - मीही ह्याच वातावरणात वाढलेला पुरुष आहे आणि माझ्या चुका होतीलच पण मी दुरुस्त करत राहीन, शिकत राहीन. बरोबरीचे प्रेम करत राहीन. नक्की बघा.
मला आवडल्यामुळे हे एवढं लिहिलं गेलं.
अस्मिता, रेको नोट केला आहे.
अस्मिता, रेको नोट केला आहे.
स्पॉयलर अॅलर्ट असल्याने पुढे वाचत नाही आत्ता तरी. पाहिल्यावर मागे येऊन वाचता येईल.
Pages