Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
>>> पती, पत्नी और वो
>>> पती, पत्नी और वो
हे नाव चलाख आहे. 'वो' एकवचन आहे की अनेकवचन - ती कोणी एकच आहे की 'आठवले, शहाडे'नंतर येते तशी 'आणि कंपनी' आहे हे कळायला मार्ग नाही.
इतक्या काकाबुवा हीरोला अशी कंपनी 'बेड, बाथ अॅन्ड...'च्या बियॉन्ड सेक्शनमध्ये सापडत असेल का?
बेड बाथ चा संदर्भ समजून घेतोय
बेड बाथ चा संदर्भ समजून घेतोय तोपर्यंत "काकाबुवा"ला
फटाकडी गर्लफ्रेंड असेल तर
फटाकडी गर्लफ्रेंड असेल तर पिळण्याला लिमिट येते, तिला सरळ डिच करता येते नंतर. बायकोच फटाकडी निघाली तर संपूर्ण संस्कृती पणाला लावता येते >>>
ते पान पुन्हा वाचले म्हणून सापडले. हे नंतर अॅड केले आहेस असे दिसते.
मै तुलसी तेरे आंगनकी आई,
मै तुलसी तेरे आंगनकी आई, शेजारच्या भाभी मलाही घेऊन गेलेल्या. आईला वाटलेलं विष्णू तुळशी कथेवर आहे
हा वेगळ्याच विष्णू तुळशी कथेवर होता. आई बाबा आम्हाला देवाचे पिक्चर दाखवायलाच न्यायचे. रामायण, महाभारत, विजयी हनुमान, सती अनुसुया, ध्रुव (याचं नाव नाही आठवत, हिंदी होता) वगैरे. जय संतोषी मा विसरून कसं चालेल, आई आणि शेजारच्या काकू वगैरे घेऊन गेलेल्या मलाही.
आमच्या लहानपणी बाबांकडे
आमच्या लहानपणी बाबांकडे पिक्चरचे डिपार्टमेंट होते. रेडीओपेक्षा टेप वापरण्यावर भर असल्याने याच सिच्युएशनवर पण शंकर जयकिशनच्या पेप्पी संगीताने नटलेली हरियाली और रास्ता वगैरे गाणी वाजायची. शिवाय त्यातला मनोजकुमार हॅंडसम दिसायचा. त्यामुळे आयुष्यात मै तुलसी नामक राहूकाल फार उशिरा आला.
पण फारेण्डबरोबर सेमी सहमत आहे. ‘मैं तुलसी’ व त्याच कॅटेगरीतले ‘तुम गगन के चंद्रमा’ गाण्यात लताचा आवाज चांगला पण ओव्हरऑल गाणं क्रीन्ज आहे. ‘तुम गगन के’ला निदान सती सावित्रीची कथा असल्याचा आधार आहे.
सौतनमध्ये बहुतेक राजेश
सौतनमध्ये बहुतेक राजेश-पद्मिनीचे प्रेम वगैरे काही नाहीच. उगीच गप्पा मारायचे. आणि टीना तिच्या आईचे ऐकुन संशयी .. असे काहीसे आठवतेय. मग टीनाला आवडत नाही म्हणुन पद्मिनी त्याग करायच्या मागे वगैरे वगैरे…
मै तुलसी....इन फॅक्ट गाणं
मै तुलसी....इन फॅक्ट गाणं बघितलं होतं तेव्हा मला ते भितीदायक वाटलं होतं. या अश्या संस्कारांमुळेच मी नंतर निर्ढावले असावे असा मला संशय आहे. इतकी की हॉरर्सची पण भीती वाटेनाशी झाली>>> रमड
अस्मिता १ पॅरातच धमाल उडवलीस.. आयुष्य फूटबॉल, काकाफॉ
पण आवाज व संगीत स्वर्गीय आहे.
पण आवाज व संगीत स्वर्गीय आहे. >>> हायला! हे गाणं आवडणारा माझ्याशिवाय कुणी आहे हे बघून टडोपा झालं. संगीत नाही वाटत खास, पण लताचा आवाज सही लागलाय त्यात. तेरे म्हणताना ती ते आणि रे याच्यामध्ये जे काय गाते ते वेड लावते.
बापरे आवडते गाणे आहे हे. माधव
बापरे आवडते गाणे आहे हे. माधव+१११ त्यात बाई दरवेळी तेरे साजनकी हे म्हणतात त्यासाठी लता लता आहे. एकदम काहीतरी वेगळे गाऊन जाते जे मस्त वाटते.
अस्मिता, सौतनचा रिव्ह्यू भारी
अस्मिता, सौतनचा रिव्ह्यू भारी आहे. काल कौतुक करायचं राहून गेलं होतं
अॅक्चुअली नंतर घाबरवणारे विषय निघाले त्यामुळे राहिलं ते 
काल झोपताना राजेश खन्ना,
काल झोपताना राजेश खन्ना, टीना मुनीम, राजेंद्र कुमार असा सर्च दिल्यावर बरेच पिक्चर्स आले.
त्यातल्या
साजन कि सहेली, फिफ्टी फिफ्टी, सौतन, मै तुलसी तेरे आंगन कि या नावांमुळे कुठलं गाणं कशात आहे हा गोंधळ उडाला.
अज्ञान प्रदर्शन होईल म्हणून टाळलंच.
अस्मिता
सौतनचा रिव्ह्यू काल पूर्ण वाचला नाही. आता वाचला.
धमाल आहे. पण आटोपता घेतलाय.
काका फॉ ही कोटी सॉलीड आहे.
मजा आली
आईला वाटलेलं विष्णू तुळशी कथेवर आहे >>>
आता बघावा लागेल.
रमड, राभु आणि आशु,
रमड, राभु आणि आशु - सौतनपटांमधे खूप क्षमता आहे, पण आपणच कुठेतरी कमी पडतो.
आईला वाटलेलं विष्णू तुळशी कथेवर आहे >>>
अस्मिता
अस्मिता

साजन कि सहेली नावच किती बोलकं आहे. पण कधी कुणी याबद्दल बोललेलं नाही.
लाल रंगाचा दरवाजा उघडायचा नाही असं एका गोष्टीत असायचं तशी उत्सुकता वाटू लागलीय.
@ फारेण्ड , गाणं छानच आहे, पण शब्द पण हवेतच.
माई री कितीही वेळा ऐकलं तरी शब्द, चाल, वाद्यमेळा सगळंच छान वाटतं,
धमाल चालली आहे.
धमाल चालली आहे.
साजन की सहेली - मुलगी आपल्या सावत्र बापाशी अफेअर करते. राजेंद्रकुमार , नूतन , रेखा. विनोद मेहरा - याला सोडून रेखा राजेंद्रकुमारकडे गेली म्हणून त्याच्या तोंडी ते गाणं आहे.
यापेक्षा जास्त कॉम्प्लिकेशन्स
एक नयी पहेली - Can a man become his own son's son-in-law? And a woman, her own daughter's daughter-in-law?
राज कुमार, हेमा मालिनी, कमल हासन , पद्मिनी कोल्हापुरे
अशी आहे का साजन की सहेली ची
अशी आहे का साजन की सहेली ची स्टोरी? मला शाळेत असताना ते गाणं आवडलं होतं - काही अर्थ कळला नव्हता तरीही!
जिस के लिये सब को छोडा उसीने मेरे दिल को तोडा
वो बेवफा -वो बेवफा किसी और के साजन की सहेली हो गयी.
भयंकर स्टोरी आहे भारतात तरी.
भयंकर स्टोरी आहे भारतात तरी.
CAT परिक्षेतल्या प्रश्नासारखं
CAT परिक्षेतल्या प्रश्नासारखं झालं हे. अ या पुरुषाने व त्याच्या ब या मुलाने अनुक्रमे क या मुलीशी व ड या तिच्या आईशी लग्न केले तर अ व क यांचे नाते काय ?
या प्रश्नाचे उत्तर दिले
या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन ......
घाबरवणारे विषय निघाले >>>
घाबरवणारे विषय निघाले >>>
साजन की सहेली - फार पकाऊ गाणे आहे ते. स्टोरीही पकाऊ दिसते.
माधव, लंपन, माझेमन आणि रानभुली - धन्यवाद. लताचा यातला आवाज हा मुख्य भाग पण चाल व संगीतही पूरक वाटते. मात्र चित्रीकरण बोअर आहे. विजय आनंद दिग्दर्शक म्हणून थोर आहे पण इथे अगदीच काहीतरी वाटतो. झाडांमधून चालताना एक रॅण्डम काडी इकडून तिकडे उडवलीच पाहिजे या स्कूल ऑफ सरधोपट अॅक्टिंग मधलाही एक सीन आहे त्याचा.
झाडांमधून चालताना एक रॅण्डम
हो आता ऐकायला पकाऊच वाटते ते गाणे.

चालताना एक रॅण्डम काडी इकडून तिकडे उडवलीच पाहिजे >
एक नयी पहेली - सरळ सरळ साऊथ
एक नयी पहेली - सरळ सरळ साऊथ मधल्या सिनेमाचा रिमेक आहे. बहुधा कमलचाच आहे. दोन्ही सिनेमांची हाताळणी विषय बघता कौतुकास्पद आहे.
अजून एक.
अजून एक.
मै तुलसी तेरे अंगन की हे गाणं जर नायिका देवीच्या मूर्तीसमोर म्हणत असेल तर ते भजनच वाटेल.
माई री सुद्धा भजन वाटते. म्हणूनच कदाचित हे गाणं आठवलं असेल. माई रीचं चित्रीकरण वाईट्ट आहे.
नायिका आद्य बिपाशा बासू वाटतेय.
झाडांमधून चालताना एक रॅण्डम
झाडांमधून चालताना एक रॅण्डम काडी इकडून तिकडे उडवलीच पाहिजे
>> हम्म. त्या गाण्यात नुतन ॲटिट्यूड दाखवते, आशा पारेख आणि विजय आनंद व्हिक्टीम मोडमध्ये वावरतात.
कुठल्याही पिक्चरमधे एक्स्ट्रा मॅरीटल अफेअर दाखवताना आपण कसे इनोसंट, परीस्थितीच कश्शी जबाबदार दाखवलं की मला खटकतं. ढळढळीत अफेअर करून नंतर गिल्ट वाटलेली दाखवली तर निदान खरं वाटेल.
नायिका आद्य बिपाशा बासू वाटतेय.
>>>
नायिकेला त्या चित्रपटासाठी अभिनयाचं नॅशनल अवॉर्ड मिळालं आहे. पण पुढच्या पिक्चरमधे तिने बोल्ड सीन्स दिले व तिच्यावर तसा शिक्का बसला. ‘माई री’ मध्ये तिचा मेंटल स्ट्रगल दाखवलाय (म्हणे) मला पण चित्रीकरण नाही आवडलं.
अशी आहे का साजन की सहेली ची
अशी आहे का साजन की सहेली ची स्टोरी? >>> मला पण आत्ताच समजली
आजवर कधी धीरच झाला नाही हा पिक्चर पहायचा पण.
स्कूल ऑफ सरधोपट अॅक्टिंग >>>
अस्मिता तु कहर आहेस.
अस्मिता तु कहर आहेस.
सच अ जॉय तुझे प्रतिसाद वाचणे
रेड २ चक्क आवडला. बहुतेक
रेड २ चक्क आवडला. बहुतेक अजिबात खराब निघणार अशा अपेक्षेने पाहिला आणि actually बरा निघाला. दोन ट्विस्ट आवडले. रितेश नेहमी शांत विलन प्ले करतो. इथे पण पाताळयंत्री दादाभाई मस्त साकारलाय.
आता तर अजय देवगण पण ऍक्टिंग करायला लागला आहे. सुप्रिया पाठक शेवटच्या सीन मध्ये कमाल करते.
वाणी कपूर नसती तरी चालले असते.
Means a lot Roy, you made my
Means a lot Roy, you made my day..!
नायिकेला त्या चित्रपटासाठी
नायिकेला त्या चित्रपटासाठी अभिनयाचं नॅशनल अवॉर्ड मिळालं आहे. >> ओह !
हे माहिती नव्हतं. धन्यवाद यासाठी. १९७० साल दिसतंय. या काळात काळापांढरा पिक्चर का बनवला असेल ?
फारेण्ड, अगदी!
फारेण्ड, अगदी!
विजय आनंद स्क्रीनवर बघायला कधीच आवडला नाही.
एक नयी पहेली तेव्हा थिएटरला पाहिला होता. आवडला होता. पुन्हा बघावासा वाटायला लागलाय.
सौतन तेव्हा थिएटरला पाहिला होता. कै च्या कै आहे हे शालेय वयातही कळलं होतं.
मुलगी आपल्या सावत्र बापाशी
मुलगी आपल्या सावत्र बापाशी अफेअर करते.
<<<<<<
हे अगदी ऑनलाइन क्लिकबेट न्यूज टाइप झालंय.
Pages