चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाट ची अस्मिताची पोस्ट वाचली. मागे एकदा ही चिंता व्यक्त केली होती.

कांतारा चित्रपटाबद्दल मी इथे लिहिलेले. त्यातील कॉपी पेस्ट करतो.
कांतारा
https://www.maayboli.com/node/82580

३) मला चित्रपट पाहताना तुंबाड नाही पण पुष्पा जरूर आठवला. कारण यातलाही नायक वर्तनाने एक गुंडच दाखवला आहे. अश्या नायकाला थोड्याफार दृश्यात मनाने चांगले दाखवले की त्याच्या ईतर कैक दुर्गुणांचे समर्थनच नाही तर उदात्तीकरणही होते. त्यापेक्षा दुर्गुण हे नेहमी दुर्गुण म्हणूनच आलेले चांगले.

४) पुष्पामध्ये जसे हिरोईन पटवायला जे आचरट प्रकार दिसले तेच ईथेही आढळले. हिरोईनशी पहिलेच ईंटरअ‍ॅक्शन तिच्या कंबरेला चिमटा काढून होते. तर पुढच्या सीनमध्ये या कृत्याचा पांचट विनोदनिर्मितीसाठी वापर केला जातो.
ज्याला आपल्याकडे "हाऊ चीप" म्हटले जाते त्याला दक्षिणेत "हाऊ क्यूट" म्हटले जाते का हा प्रश्न पडतो कधीकधी.
हे कल्चर आधीही काही साऊथच्या चित्रपटांमध्ये पाहिले आहे. ते या चित्रपटांच्या निमित्ताने ईथे रुजायला नको असे वाटते


-----------------

आणि हा अजून एक धागा होता.
भडक बटबटीत दाक्षिणात्य सिनेमे
https://www.maayboli.com/node/82562

जर जाट याच पठडीतील असेल तर बघितला जाणार नाही.

सामान्यजनांना अवतारी पुरुषांचे महत्त्व असेही फार उशिरा कळते त्यामुळे अर्धा सिनेमा झाला तरी मला 'तीन इडल्यांसाठी कशाला हिंसा' वाटते आहे >>>
"इडली - सॉरी" हायरार्की >>>
खोलीचे दार उघडेही असेल कदाचित पण लीला म्हणजे लीला >>>
एकदा तर वरचा पंखा दांड्यासहित उखडून तो मिसाईल प्रमाणे लीलया हातात धरून मारले आहे. आम्हाला पंखा बदलून घ्यायला माणूस मिळेना म्हणून वर्ष लागलं होतं. पण लीला म्हणजे लीला >>> Lol

धमाल आहे हे.

साऊथच्या सिनेमात स्त्री प्रेक्षकांना ऑकवर्ड करणारे पण सन्मान देतोय असं भासवणारे सीन्स देण्याची पद्धत आहे. हिरोला महानायक करण्यासाठी त्यांनी त्याची परंपरा केली आहे. जी किळसवाणी वाटते >>> पूर्ण सहमत. या सिनेमांमधे स्त्रियांबद्दलचे सीन्स बघताना नेहमी काहीतरी क्रीपी वाटते. बहुतांश पिक्चर्स मधे स्त्रियांचा आदर वाले सीन्स हे एक व्यक्ती म्हणून हक्क, स्वातंत्र्य याबद्दल बेसिकमधेच लोचा असलेले वाटतात.

हिट - थर्ड केस पाहिल्यानंतर जाट नॉर्मल वाटू लागेल.
बीभत्स तेचा कहर आहे.
इतक्या तपशिलात जाऊन हिंसा दाखवायची काय गरज ?
शेवटी तर हे किती टोकाला जाऊ शकतात हे पहायचं म्हणून पूर्ण पाहिला.
कुठलाही संवेदनशील दिग्दर्शक नऊ महिन्याच्या बाळाची सार्वजनिक हत्या असणारा सीन सिनेमात घालणार नाही.
असे सीन्स समाजाला हिंसक बनवत नाहीत असे ज्यांचे मत असेल त्यांना प्रणाम !
कुठे तरी आळा घातला पाहीजे अशा दृश्यांना.
स्वातंत्र्य असावं पण विवेक पण शाबूत हवा.
साऊथचं हे वेड आता बॉलीवूडमधे पण रुजलंय.

एकदमच उर्वशी रौटेलाचे आयटम नृत्य आहे त्यातही - 'दिल तुझकोही दुंगी पहले सॉरी बोल' अशा ओळी आहेत
>>
तेरी इडली गिरी तो मैं क्या करुं
असं आयटम साँग हवं होतं

रच्याकने, १३ वर्षांपूर्वी हीच उर्वशी १८ वर्षांची असताना पहिल्या सिनेमात तिप्पट वयाच्या (५४) सनीची हिर्वीण होती. आता आयटम गर्ल पर्यंत तिच्या करियर ची प्रगती झालेली असताना सन्नी पाजी मात्र सत्तरीच्या उंबरठ्यावर ही हीरोच आहेत
१३ वर्षांपूर्वी सिंग साब द ग्रेट होते, आज जाट आहेत...

अस्मिता, धमाल लिहिलंय Lol हे असलं काहीतरी असेल याचा अंदाज आल्यानेच मी फक्त सनीचे मारामारीचे सीन तेवढे पाहिले. पिक्चर नाही.

हिट केस ३ सुरूवात केली होती. व्हिलनची एन्ट्री आणि त्याने मांडलेलं लॉजिक पाहून पिक्चर पुढे पळवला , शेवट पहिला आणि बंद केला.

गेल्या शुक्रवारी १३ तारीख आल्याने फ्रायडे द थर्टींथ पाहिला. मौका दस्तुर वगैरे सगळंच जुळून आलं होतं. पिक्चर पाहताना समजलं की ती कथा १३ जूनलाच घडते, त्यामुळे अगदीच creepy coincidence वगैरे झाला. मज्जा आली. असे जुने, भाबडे हॉरर पाहायला मजा येते. त्यातला केविन बेकनचा खून भारी दाखवला आहे. असो. हिट पेक्षा मला हा पिक्चर पाहायला जास्त आवडला असे म्हणेन.

थॅंक्यू मित्रमैत्रिणींनो. Happy
माझ्या इथल्या सगळ्या मोठ्या पोस्टी एकत्र राहाव्यात म्हणून ब्लॉगवरही ठेवल्या आहेत.

संपूर्ण पाहिला सुनिधी. Happy
उर्वशी फारच उग्र दिसतेय आता, तेव्हा तारुण्यसुलभ गोडवा तरी असेल. मला काही तिचा तो सिनेमा आठवत नाही तरीही.
---------------
जाट कंटिन्यूड-
पुढेही रक्तपात वाढत जाऊन बिभत्स होत गेला आहे. अवतारी पुरुष साधासुधा नसून जाट रेजिमेंटचा सर्वेसर्वा होता म्हणे, त्याला या कार्यासाठी खास नियोजित केले होते. कारण अख्ख्या बटालियनची जागा घेऊ शकेल असा पूर्ण भारतीय आर्मीत नव्हे त्रिखंडात फक्त हाच होता. मी तर म्हटलंच होतं लीला आहेत या, पामरांना महिमा काय कळणार. पण माझ्या सारख्या भाबड्या प्रेक्षकांसाठी सन्नीमहिन्मस्तोत्र दाखवलं आहे, त्याच्या पूर्वायुष्यात संपूर्ण पाकिस्तान थरथर कापायचे ह्या कारणे त्याला दंडकारण्यात राक्षसांचा समूळ नायनाट करण्यासाठी पाठवण्यात आले होते.

पुढे संपूर्ण गावाला ओलीस धरून रावणाने व त्याच्या राक्षससेनेने बेछूट गोळीबार केला आहे. मग अपु - सन्नी येऊन फिशिंग केल्यागत सगळ्यांना एका तारेत ओवतो, रक्तबंबाळ सीन आहेत. रावणाचे पूर्वायुष्यातील मुंडकी उडवण्याचे सीन्ससुद्धा भरपूर आहेत. धडातून येणाऱ्या रक्ताच्या चिळकांड्यासहित. पुन्हा (?) मारामारी, इतके वेळ तरी दुसरे काय होते. नंतर सगळी आयुधं टाकून हूडा आणि सन्नीची बॉक्सिंग आहे, मेट्रिक्स टाईप हवेतच पंचेस मारलेत. कसं तरी करून शेवटी रावण कह्यात येतो मग सगळे मिळून त्याला फासावर लटकवतात. सगळा पिक्चर दंडकारण्यात पण नाव मात्र 'जाट' असं असल्याने पंजाबी लोक रुसून बसू नयेत म्हणून शेवटी भांगडा सदृश पंजाबी विजयनृत्य आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र..!

मी हा भाग अजिबात मन लावून पाहिला नाही, सतत गोळीबार आणि मारामारीच्या वेळी आवाज वाढून बसू लागला टिव्हीचा, संवांदाच्यावेळी नॉर्मल होता. पण संवाद फारसे नाहीतच. तीन इडल्या लोकहो, तीन इडल्या. नाक्यावरच्या दुकानातून गिट्स रेडीमिक्स इडलीचे पाकीट आणा आणि सुखी व्हा. Happy

Lol काय काय कोट करू असं झालंय. अजिबात बघणार नाही. आय एम लार्निंग Wink
इडली सांडली कशी? सांबार सांडेल ना?
लीला म्हणजे लीला.... हे एकदम ब्रीदवाक्य दिसतंय. Lol

अस्मिता, सुपारी घेतल्याबद्दल धन्यवाद! बेस्ट लिहिलं आहेस परीक्षण. तुझ्या वाक्यावाक्याला मम. लीला म्हणजे लीला हे पण आवडलं.

बाकी तो हाताने जीप अडवतो तो सीन अकरावीत physics परीक्षेला घ्यायला हवा. जीपचे acceleration अमुक आहे, वजन तमुक, तर ते ओढून धरायला सनीचे तळपाय आणि जमीन ह्यात फ्रिक्शन योग्य मिळायला सनीचे वजन किती हवे?

सुपारी म्हणजे काय, पडत्या फळाची आज्ञाच घेतली व तुकड्यातुकड्यात पाहिला. तो एवढे तुकडे पाडतोय आपण का नाही ? ह्याला काही एकाग्रता लागत नाही, बिनधास्त पाहू नका. Happy

सन्नीचे वजन चार टन असावे असे वाटते. इडली सांडली म्हणजे पहिल्या लेव्हलच्या गुंडांनी थाळी उलथवली, इडली- सांबार- चटणी, सगळेच सांडले. तो म्हणाला "मै इडली खा रहा था', आपने मेरी इडली सांडी-------- .

सन्नीचे वजन चार टन असावे असे वाटते >>> सनी आहे की ट्रक Happy बाय द वे तो इडलीवर हलका हात मारत असणार म्हणजे. कारण चार टनांच्या तुलनेत त्याचा ढाई किलो का हाथ हलकाच म्हणायला हवा Happy

तेरी इडली गिरी तो मैं क्या करुं
असं आयटम साँग हवं होतं>>
त्यापेक्षा 'इडली माझी सांडली गं, जाता ट्रेकिंगला' असं साँग खुद्द सन्नीपाजींनी सादर करायला हवं होतं.

फा,
सनी आहे की ट्रक बाय द वे तो इडलीवर हलका हात मारत असणार म्हणजे. कारण चार टनांच्या तुलनेत त्याचा ढाई किलो का हाथ हलकाच म्हणायला हवा.
>>>> Happy इडली तर खाल्लीच नाही शेवटपर्यंत, ती तर सांडून गेली. हे सगळे उपाशीपोटी केले आहे. चित्रपटातील अतिशयोक्तीशी परीक्षणातले सार्काझम मॅच करायचे असेल तर सहा टन म्हणावे लागेल. त्यात 'ढाई किलो का हात' हा संवादही आहेच पण तो तर विनयशीलच झाला एकुण शक्तीपुढे, कारण त्याच हाताने माणूस बसलेली चालती जीप धरून ठेवली होती, अशा चिकित्सा करून त्यांच्या अवतारकार्यात बाधा आणू नका.

सुपरमॅनचं वजन काढलं होतं का कुणी ? Proud

एक सुपरमॅन + एक स्पायडरमॅन + एक आयर्न मॅन + एक थॉर यांना मिक्सरमधे एकत्र घोसळून त्यात रजनी सरांचं दोन थेंब रक्त टाकून जो अवतारी पुरूष जन्माला येतो त्याला सनी पाजी म्हणतात. अजून दोन तीन सिनेमे साऊथचे करू द्या.

सनी पाजी डोंगर उचलून फेकतात हा सीन सुद्धा याचि देही याचि डोळा बघायला मिळेल.

इडली माझी सांडली गं >>> Biggrin

एम आय भाग १ पाहिला. स्टोरी चांगली आहे.
तो छोट्याशा ब्रीफकेसमधला लॅपटॉपसदृश कॉम्प आवडला.
डेम व्हेनेसा रेडग्रेव्ह आवडली. तिला ती बोलण्याची स्टाइल मुद्दाम दिली नसती तरी चाललं असतं.

स्टंट्स अ आणि अ आहेत. टनेलमध्ये आख्खं हेलिकॉप्टर Uhoh वार्‍याने कागद उडावा तसा टॉ क्रू एका डब्यावरून पलिकडच्या डब्यावर उडतो.
प्रागचे सेट्स, नेमकी उभी पडणारी सुरी, चष्म्यावरचा थेंब (आधीच टिपून का घेत नाही? दुसरा येण्याची वाट का बघतो दिग्दर्शक? तळव्यावर टुपुक्कन पडताना दाखवलाय, तिथून तो थेंब कुठे जातो? ग्लोव्ह्जमध्ये टिपला जातो का?)

पुढचे भाग इतक्यात तरी बघावे असं वाटलं नाही.

त्या काकूंच्या हंड्यात अजूनही पाचपन्नास इडल्या होत्या पण नाही म्हणजे नाही.
गिट्स रेडीमिक्स इडलीचे पाकीट आणा आणि सुखी व्हा.
तेरी इडली गिरी तो मैं क्या करुं
इडली माझी सांडली गं
>>>> Lol Lol

एक बारीकशी शंका -आयटम सॉन्गच हवं होतं तर ' हाय रामा ये क्या हुआ, क्यों इडली ऐसी गिराने लगे ' चाललं असतं का?

इथे वाचून नवऱ्यासोबत बघायचा ठरवला होता जाट. नशीब बघितला नाही. मी पिक्चरची सालं काढायच्या ऐवजी नवऱ्याने माझी काढली असती.

https://www.maayboli.com/node/86847
मायबोली वर्षाविहार २०२५ मुख्य नावनोंदणीचा धागा आला आहे. पटापट नावनोंदणी करा, लोकहो.

मायबोली वर्षाविहार २०२५ मुख्य नावनोंदणीचा धागा आला आहे.
>>
ब्रेकफास्ट ला इडली ठेऊ नका
उगाच कुणाची सांडली तर प्रॉब्लेम होईल

उर्वशी फारच उग्र दिसतेय आता, तेव्हा तारुण्यसुलभ गोडवा तरी असेल. मला काही तिचा तो सिनेमा आठवत नाही तरीही.
>>
हे बघ...
https://youtu.be/HDWri5cC6hc?feature=shared

शेवटापर्यंत बघ, लॉर्ड बॉबी अन् धरम पाजी पण आहेत...

काकूंच्या हंड्यात अजूनही पाचपन्नास इडल्या होत्या >> त्या मवाली लोकांनी जेवढं नुकसान केलं काकूंचं त्यापेक्षा कित्येक पट जास्त नुकसान पाजीने मारामारी करताना केलेली तोडफोड करून केलं आहे. बट फॉर द ग्रेटर गुड असं समजून काकू पाजीला "सॉरी बोल" म्हणाल्या नाहीत.

बट फॉर द ग्रेटर गुड असं समजून काकू पाजीला "सॉरी बोल" म्हणाल्या नाहीत. >>>> Lol
ॲन्की बघते हं. 'काय अभ्यास काय अभ्यास' आधीच म्हणून ठेवत आहे. Happy

Pages