चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागच्या पानात सेक्युलॅरिजम बद्दलची चर्चा वाचली. सेक्युलॅरिजम हे तत्त्व उदात्त आहे. पुढच्या पानात चित्रपटातल्या सेक्युलॅरिजम बद्दल चर्चा आहे हे समजलं आणि त्याला सहमती.

पठाण आणि टायगर ( अजून एक सैफ अली खानचा ) यात भारत आणि पाकिस्तान हे जवळपास जॉईण्ट ऑपरेशन राबवतात ( असाच एक आणखी होता अदे चा, ज्यात पाक पंतप्रधानाची मुंबईत हत्या होणार असते) आणि संकट दूर करतात अशा कवीकल्पना दाखवल्या जातात. आता पण जर ऑपरेशन सिंदूर वर या गँगचा पिक्चर आला तर त्यात मोदी आणि शरीफ यांनी आधीच फोन कॉलवर चर्चा केलेली असते आणि ते आपापल्या क्षेत्रात निर्मनुष्य भागात बाँब टाकू देतात, यामागे त्यांचा डाव असतो, त्यांना चीन आणि अमेरिकेला हुलकावणी द्यायची असते असा काही तरी प्लॉट दाखवतील. नेहमीप्रमाणे यात कॅट आणि दीपिका पाकिस्तानच्या एजंट्स तर पठाण आणि टायगर हे भारताच्या बाजूने एक खुफिया मिशन राबवतात (ज्यात कॅटने दगा दिला असा टायगरचा समज होणार आणि मग पठाण त्याला सत्य सांगणार) आणि जगाला संकटातून वाचवतात असा संदेश दिलेला असेल.

हा पिक्चर दिवाळीच्या दरम्यान जास्तीत जास्त स्क्रीन्सवर जास्तीत जास्त शोज घेऊन रिलीज झाला कि लोकांना ऑप्शनच न उरल्याने तो तीनच दिवसात दोनशे कोटीच्या वर जाणार. त्यातले सव्वाशे कोटी ओटीटीचे हक्क असणार. पिक्चर बघून आल्यावर आपल्याला आवडला कि नाही हे सांगताच येणार नाही, कारण लोकांना आवडतोय तर आपलंच चुकत असेल म्हणून गप्प बसा असंच जो तो स्वतःला बजावेल.

राभु Happy

लोकाना आवडतेय् ते आपल्याला नावडतेय हे सांगायची सोय राहिली नाही Happy

लोकाना आवडतेय् ते आपल्याला नावडतेय हे सांगायची सोय राहिली नाही >>> लोकांना नावडते ते आपल्याला आवडते याबाबत सुद्धा हे म्हणू शकतो.

पण सोय राहिली नाही असे काही नसते. आपण आपली आवड नावड मांडायची आणि पुढे जायचे असते. ती बहुसंख्य लोकांशी मिळतीजुळती असावी हा हट्ट नसेल तर कोण अडवतेय. पण लोक स्वतःच बरेचदा हे करायला टाळतात आणि आपल्या समान आवडीनिवडीचे ग्रूप शोधून त्यात रमतात

देशाच्या पंतप्रधानांनी सिनेमा हॉल मधे जाऊन सितारे जमीं पर पाहिला. त्यांनी या निमित्ताने संवेदनशील मत व्यक्त केले . त्यामुळं आता थिएटरमधेच पाहणार.

मोदीजी मोठं व्यक्तीमत्व आहे. माझ्या आईला पण खूप आवडला सिनेमा. तिच्या नजरेने पाहिला तर मलाही आवडेल.
ती अजूनही ९० -२००० च्या दशकातच आहे. हसता हसता रडवणारा सिनेमा असेल तर तो चांगला असतो.

हसता हसता रडवणारा सिनेमा असेल तर तो चांगला असतो.
>>>>>

मी सुद्धा तुमच्या आईच्या कॅटेगरीचा आहे
मलाही आवडतात असे सिनेमे. Happy
हसता हसता अचानक मनाला भिडून जाणारे..
मुन्नाभाई, थ्री इडियट आणि शाहरुखचे कित्येक..
हळूहळू असे चित्रपट यायचे प्रमाण कमी झाले आहे.
बहुधा लोकांना बघा आणि विसरून जा कॅटेगरी चित्रपट आवडू लागलेत.. रिपीट व्हॅल्यू असलेले चित्रपट हल्ली फार कमी निघतात.. ९०-२००० दशकातले कित्येक पिक्चर मी सात आठ दहा वेळा पाहिले आहेत.

शाहरुख खान.. सितारे जमीन पर सेटवर मुलाना भेटून आला.. छोटासा रीळ एवढा पण धमाल व्हिडिओ आहे.

https://www.facebook.com/share/v/1JZfjMEgDz/

हा बघून चित्रपट बघावा वाटू लागलाय

हसत हसत रडायला आणि रडत रडत हसायला मला पण आवडतं. पण इथे हसू ही येईना आणि रडू ही! म्हटलं ना गरीब असल्याचं फील आला. Lol

व्हॅनगार्ड बघायला सुरूवात केली. सफाईदार अ‍ॅक्शन आहे.
वेगवान आहे.
पण जॅकी चॅन टच हरवलाय असं वाटलं म्हणून दिग्दर्शक कोण आहे ते पाहिलं.
स्टॅनली टाँग नाव दिसल्यावर बंद केला. जॅकी चॅनचे याआधीचे सहा मूव्हीज यानेच डायरेक्ट केलेत आणि नेमके तेच नाही आवडले.
रम्बल , पोलीस स्टोरी ३ हे कंटाळवाणे वाटलेले.
पोलीस स्टोरी १ सर्वात मस्त होता. प्रोजेक्ट ए, आर्मर ऑफ गॉड हे सगळे जॅकी चॅन ने स्वतः डायरेक्ट केलेले मूव्हीज आजही बघायला आवडतात.

नेटफ्लिक्सवर Midnight Run नावाचा पिक्चर पाहिला काल. धमाल पिक्चर. अ‍ॅक्शन कॉमेडी. त्यात तरूण रॉबर्ट डी निरो आहे जो छान दिसतो. त्याने बाऊंटी हंटरचं काम केलं आहे. त्याला एका माणसाला पकडून न्यू यॉर्क मधून एल ए ला आणायचं आहे. सिनेमाभर त्या दोघांचा प्रवास दाखवला आहे आणि तो प्रचंड मजेशीर आहे. पिक्चर कुठेही संथ, कंटाळवाणा होत नाही. शेवट थोडा प्रेडिक्टेबल होतो पण त्याने मनोरंजनात जराही बाधा येत नाही. माझ्याकडून रेको.

भारतात दिसतोय का ?

रेड २ आलाय. अजिबात बघू नका.
जो बघेल त्याला आयटी विभाग चावेल.

नेटफ्लिक्सवर Midnight Run भारतात दिसत नाही. मला प्राईम वर दिसतोय पण भाड्याने.

तिकडे तो मिडडे रन नावाने असेल. १२ तासांचा फरक Happy

पण रेको बद्दल आभार. एकदोनदा दिसला होता. बघावा का विचार करत होतो.

काल "सेकण्डहॅण्ड लायन्स" पाहिला. मायकेल केन आणि रॉबर्ट डुवाल (हे नाव आत्ता लिहीताना टॉम हेगनच आठवत होते) आणि इतर एक दोन परिचित नावे. एकदम क्वर्की पिक्चर आहे. पण या दोघांच्या रोल्स मुळे बघायला मस्त वाटतो. दोघांचेही व्यक्तिमत्त्व पडदा व्यापणारे आहे. हा पिक्चर सध्या कोठे मिळेल माहीत नाही. मी विमानात पाहिला.

त्यातला एक डायनर/बार मधला सीन फेमस आहे - रॉबर्ट डुवाल ४ तरूण पोरांची धुलाई करतो तो. पण एक दुसरा संवाद मला जबरी आवडला. हे दोन म्हातारे अतरंगी दाखवले आहेत. विशेषतः रॉबर्ट डुवाल. आयुष्यभर त्यांनी केलेल्या अफाट करामतींचे किस्से मायकेल केन सांगतो. त्या खर्‍या आहेत की नाही हा धागा मुद्दाम लूज सोडून दिलेला आहे. पिक्चरमधे नंतर येणार्‍या एका संवादात त्याचे कारणही आहे. पण हे लोक करामती आहेत हे त्यांच्या म्हातारपणच्या उद्योगांतूनही जाणवते. एकदा अचानक रॉबर्ट डुवाल विमान तयार करायचे ठरवतो - सुटे पार्ट्स मागवून. आणि ते दोघे ते बनवतातही. पण असले उद्योग आता बंद कर असे जेव्हा मायकेल केन त्याला म्हणतो तेव्हा तो विचारतो "how do you want us to die then, old age?"

बाय द वे, शोले मधे "नोटेबल फीमेल कॅरेक्टर" तब्बल ४० मिनिटांनी येते (बसंती. तोपर्यंत फक्त ती नाणे उभे पडल्यावर पळून जाणारी बाई आहे) असे मी इथे कोठेतरी लिहीले होते. परवा थ्री इडियट्स पाहतानाही जाणवले. त्यात करीनाची एण्ट्री तशीच ४०-४५ मिनिटांनी आहे. तोपर्यंत सगळी मेल कॅरेक्टर्सच आहेत. यात चांगले वाईट काही नाही. फक्त एक निरीक्षण. आणि यातला अली फजल आधी ओळखलाच नाही. तो आता गुड्डूभैय्या शिवाय इतर कोणत्या रोल मधे इमॅजिनच होत नाही.

मिडडे रन >> Lol
इमर्जन्सी पहायचा प्रयत्न केला पण नंतर बंद करून टाकला.
काय बघावं कळत नाहीये. Sad

पोलीस स्टोरी १ सर्वात मस्त होता. प्रोजेक्ट ए, आर्मर ऑफ गॉड हे सगळे जॅकी चॅन ने स्वतः डायरेक्ट केलेले मूव्हीज आजही बघायला आवडतात. >>> ओह हे डिटेल माहीत नव्हते. त्याचे टिपिकल जॅकीचॅनिजम असलेला एखादा पिक्चर परत पाहायला हवा. पोलिस स्टोरी कोठेतरी आहे स्ट्रिमिंगवर.

रश अवर-२ नंतर खूप आवडलेला पिक्चर त्याचा लक्षात नाही. रश अवर-३ खास नव्हता.

तो जेलच्या खिडकीतून पळून जायचा प्रसंग असलेला रश अवर २ ना ?
हे असं फक्त जॅकी चॅन आणि कपिल शर्मालाच सुचू शकतं Lol

जॅकी चॅनीजम >> अचूक शब्द !! शब्दकळा !!!

तो जेलच्या खिडकीतून पळून जायचा प्रसंग असलेला रश अवर २ ना ? >>> कॅसिनोतून बहुतेक, पण हो Happy कपिल शर्माचा असा सीन आहे का कोठे? त्याच्या शो मधे?

ख्रिस टकरला हाँगकाँगच्या बार मधे तेथील सगळ्या आशियाई लोकांत "ब्लेण्ड इन हो" सांगणारा जॅकी चॅन, हॉंगकाँग मधून फिरताना एका चिकनच्या दुकानातील बाई त्याच्या बोलण्याचा अर्थ कोंबडी काप लावून एक जिवंत कोंबडी कापायला बघते, तिने तसे करून नये म्हणून ती जिवंत कोंबडी विकत घेउन फिरणारा ख्रिस टकर. एका सीनमधे व्हिलनने रॅन्समच्या मागण्यांची यादी पूर्ण सांगितल्यावर त्याला नंतर "you want fries with that?" विचारतो Happy

( मॅकडोनाल्ड्स व तत्सम अमेरिकन फास्ट फूड मधल्या ऑर्डर घेणार्‍यांना ऑर्डर घेतल्यावर हा प्रश्न विचारण्याकरता एन्करेज केले जायचे. अजूनही होत असेल)

रेड-२ बघितला ठिकठाक वाटला, अगदी सरधोपटच मान्डणी आहे काहिच नाविन्य नाही .त्यामूळे पुढे काय होणार कस झाल असेल सगळ प्रेक्ष़क आधिच ओळखुन शकतात, रितेशच व्हिलन म्हणून काहिच इम्प्रेशन पडत नाही..

जॅकी चॅनीजम >> त्याचा जुळ्या भावांचा सिनेमा ज्यावरून जुडवा उचलला होता) तोही महान आहे. थेट आर्मर ऑफ गॉड च्या तोडिस तोड आहे. पुढे जेट ली ने पण त्याचे एक व्हर्जन काढलेले.

>>> "how do you want us to die then, old age?"
Haha! Love that! Happy

how do you want us to die then, old age?"
>>> जबरदस्त. मग काय नुसतं म्हातारं होऊन मरू की काय? Happy अमेझॉन वरून विमानाचे पार्ट्स मागवते आता.

तिने तसे करून नये म्हणून ती जिवंत कोंबडी विकत घेउन फिरणारा ख्रिस टकर. >>> Love it ! Happy

कपिल शर्माचा असा सीन आहे का कोठे? त्याच्या शो मधे? >> तसा सीन नाही.त्याची शाब्दीक कॉमेडी. एरव्ही इतर कुणाच्या बाबतीत माझ्याकडून फूतपट्टी लावली गेली असती, पण या दोघांच्या असल्या विनोदाला माफी. Lol

रश अवर मधे दोघांना एका खोलीत बंद करून ठेवलेले असते. तिथे खूप उंचावर एक गज असलेली छोटी खिडकी असते. पुढचं सांगू शकत नाही Lol

जुळ्या भावांचा तो ट्विन ड्रॅगन्स.
माझ्याकडच्या सीडीवर त्याचं नाव ट्विन ब्रदर्स असं होतं. आधी वाटलं सेम टू सेम जुडवा वरून घेतलाय.
पण वर्ष बघितलं आणि सगळंच उलटं झालं Lol

कपिल शर्माचा शो जरी हळूहळू बिघडत गेला असला तरी त्याची उत्स्फूर्तपणे बोलण्याची स्टाईल मलाही ओरिजनल आणि इतरांच्या तुलनेत रिफ्रेशिंग वाटते. एक घाव दोन तुकडे - wit ! Happy

तिकडे तो मिडडे रन नावाने असेल. १२ तासांचा फरक >>> Lol गुड वन, फा!

"how do you want us to die then, old age?" >>> इंटरेस्टिंग! साधारण असंच वाक्य इथन हंटला लुथर म्हणतो MI Final Reckoning मधे.

रितेशच व्हिलन म्हणून काहिच इम्प्रेशन पडत नाही >>> सॅड! एक व्हिलन मधे भारी वाटला होता तो.

अ‍ॅक्सिडेंटल स्पाय आवडला. वेगवान आहे.
कथाही मस्त. जॅकी डायरेक्टर नसूनही आवडला. इस्तंबूल चं शूटींग वेगळं वाटलं.

कपिल शर्माचा शो जरी हळूहळू बिघडत गेला असला तरी त्याची उत्स्फूर्तपणे बोलण्याची स्टाईल >>> खरंच.
शो बिघडलाय केव्हांच. तरी पण त्याचे विनोद अश्लील वाटत नाहीत, खोडकर वाटतात.

Midnight Run पाहिला. छान होता. पण त्यापेक्षा जास्त मला रॉबर्ट डीनीरोचाच Awakenings खूप खूप आवडला होता. त्यामधील त्याचा अभिनय खूप उत्कृष्ट होता.

Pages