चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधना तो काडीमोड जैत रे जैत मध्येही दाखवलेला, कातकरी समाजात, स्मिता पाटील पहिल्या नवऱ्यापासून घेते.

माझ्या ओळखीच्या काही गुजराथी समाजात त्यांच्या पंचासमोर div घेण्याची प्रथा आहे.

Happy सौदागरच्या पोस्टी मस्त आहेत. वाचत आहे. विसरल्या सारखा झाला होता पण वाचून आठवत आहे. चिकवावर मधेच मागचे- पुढचे कुठलेही सिनेमे चर्चिले जातात आणि पुन्हा नव्याने त्याकडे पाहिले जाते, ही खिचडी/ भेळपुरी आवडते मला. संयुक्त धाग्यांचा एक मोठा फायदा म्हणजे धागा मोनोटोनस राहत नाही. Happy

चिकवावर मधेच मागचे- पुढचे कुठलेही सिनेमे चर्चिले जातात >>> Lol
अमिताभ बच्चन, नूतन आणि राजश्री प्रॉडक्शन्स अशी नावं एकत्र असल्याने आपोआप झाली चर्चा Happy

सौदागर पाहिला होता, साधना & रानभुली छान पोस्ट्स. सर्व डीटेल्स आठवले.. अमिताभ बेरकी, निर्लज्ज भुमिका पण अगदी सहजतेने करतो.
नुतन चा चेहराच मायाळू आहे, तिला शशिकला टाईप रोल शोभेल का असा विचार पडतो. Happy
संयुक्त धाग्यांचा एक मोठा फायदा म्हणजे धागा मोनोटोनस राहत नाही>>> आणि ह्या चर्चेतून प्रेरणा मिळून अस्मिता तू, रमड, माझेमन मस्त पिसं वाला धागा काढता Lol हा पण अमुल्य फायदा आहे.

चिकवावर मधेच मागचे- पुढचे कुठलेही सिनेमे चर्चिले जातात आणि पुन्हा नव्याने त्याकडे पाहिले जाते, ही खिचडी/ भेळपुरी आवडते मला. >>>
सेम! Happy

सौदागरबद्दल साधनाने लिहिलंय तसं शाळेत असताना दूरदर्शनवर पाहिला तेव्हा बोअर झाला. काही वर्षांपूर्वी पुन्हा पाहिला तेव्हा खूप आवडला. नूतन, अमिताभ आहेत म्हणजे कुछ तो होगा म्हणून पुन्हा पाहायचा होताच.

पूर्वीच्या सचिनबद्दलही मम. 'हाच माझा मार्ग' पुस्तक वाचतानाही हे जाणवतं, की या माणसाकडे सिनेइंडस्ट्रीसाठी लागणारं सर्व प्रकारचं नैसर्गिक टॅलेण्ट आहे. त्याची जडणघडणही तशी होत गेली. खूप आश्चर्य आणि कौतुक वाटतं.
पण पुस्तकातही मी-मी आहेच. Uhoh

नुतन चा चेहराच मायाळू आहे, तिला शशिकला टाईप रोल शोभेल का असा विचार पडतो
<<<<<
मग तू 'साजन की सहेली' पहाच! Proud

आशु २९, खूप खूप आभार Happy

साजन कि सहेली Proud

ठग लाईफ दहा मिनिटात बंद केला. काही कळायच्या आतच हिंसाचार सुरू.
जरा आम्हाला मेंटली प्रिपेअर तरी होऊ द्या. कोण कुणाचा कोण हे समजू द्या. भावनिक इन्व्हॉल्वमेंट करू द्या.
उघडला पडदा कि उडाला बार ठो ठो ??

कमल हसन तरूण दाखवलाय. त्याचं विशेष वाटलं नाही. ए आय टूल्स वापरत असतील.

कमल हासन तरूण(*) असताना म्हातार्‍याचे रोल करायचा. आता तरूणाचे करतोय असे दिसते Happy

* वेल, बर्‍यापैकी तरूण. हिंदुस्थानी, मेयर साब ई. पण एकूणच त्याला तो त्या त्या वेळेस जसा दिसतो त्यापेक्षा काहीतरी मेकओव्हर करून वेगळाच लुक तयार करायचे फॅसिनेशन दिसते.

उघडला पडदा कि उडाला बार ठो ठो ?? >>> Lol

वरती सचिनबद्दल वाचून त्याची २-३ गाणी परत पाहिली. फार सहज वावर वाटतो त्याचा. मी त्याचे ते महागुरू टाइप शोज पाहिले नसल्याने त्याच्या मिडियातील आत्मप्रौढीची ओळख फक्त मीम्स मधून आहे. माझ्या डोक्यातील त्याची इमेज एक अभिनेता म्हणूनच आहे, आणि ती चांगली आहे. बाय द वे "हाच माझा मार्ग" हा "हा माझा मार्ग एकला" वरचा टेक असावा. तो त्याचा पहिला पिक्चर होता का?

महागुरू व्हायच्या आधी आत्मप्रौढी सुरू झाली. आता चौखूर धावते आहे.

संजीवकुमारला एका शब्दाचा उच्चार बरोबर येत नव्हता. मी शिकवलं.
शोले मध्ये गब्बरचा आवाज कसा हवा ते मी अमजद खानला सांगितलं.
अशी ही बनवाबनवीची पटकथा मीच लिहिली. श्रेयनामावलीत वसंत सबनीस आहे. आणि हा चित्रपट हृषिकेश मुखर्जींच्या बीवी और मकान पासून प्रेरित आहे.

>>> मी त्याचे ते महागुरू टाइप शोज पाहिले नसल्याने त्याच्या मिडियातील आत्मप्रौढीची ओळख फक्त मीम्स मधून आहे. माझ्या डोक्यातील त्याची इमेज एक अभिनेता म्हणूनच आहे, आणि ती चांगली आहे.
सेम हिअर!

भरत Lol

“ आता चौखूर धावते आहे.” - Happy

आज गुरूपौर्णिमेनिमित्त महागुरूंची आणखी काही मौक्तिकं:

“मी सात वर्षाचा असताना थिएटरमधे प्यासा चे सलग तीन शोज पाहिले आणि वडिलांना सांगितलं कि मला सिने-दिग्दर्शक व्हायचंय.”

“वडिलांची इच्छा होती कि मी राजकपूर व्हावं. मी त्याहीपेक्षा पुढे गेलो.”

“मी धर्मेंद्र, अमिताभ, माझे वडिल - ह्या सगळ्यांपेक्षा इंडस्ट्रीत सिनियर आहे.”

तो ‘घरातला कर्ता पुरुष सायकलवर जाऊन माझ्या सिनेमाची तिकिटं काढून आणायचा‘ वाला संपूर्ण इंटरव्ह्यू

Lol
कसल्या इनसिक्युरिटीमधून येत असतील असले डायलॉग्ज कोण जाणे.
तसं (राज कपूरपेक्षा जास्त नसलं तरी) बरं - आणि अष्टपैलू - काम करून ठेवलं आहे त्याने, त्यात समाधान का नसेल? की ही 'आऊट ऑफ कॉन्टेक्स्ट' उचलली गेलेली वाक्यं आहेत?
म्हणजे चाइल्ड अ‍ॅक्टर असल्यामुळे कारकीर्द मोठी हे गमतीने म्हणाला आणि फक्त चुकीचा भाग हायलाइट झाला, असं?

सन्जिव कुमार व गब्बरबद्दल जे म्हणाला ते खरेही असु शकते. अमजदचा शोले हा मोठी महत्वाची भुमिका असलेला पहिलाच चित्रपट होता. संजीवकुमार त्याचा मित्र्/स्नेही होता. तो गेला तेव्हा सचिन त्याच्या घरी होता असे तेव्हा वाचल्याचे आठवतेय. गुज्जु संजीवला एखादा शब्द सांगितला असेलही. संजीवने त्याला अभिनयात खुप मदत केली असेही सचिन म्हणालेला आहे. ते कोण हायलाईट करत नाही. मी मी पणा आहेच त्याच्यात, पण आपले ढोलके आपण वाजवले नाही तर कोणी वाजवणार नाही असे त्याला वाटत असेल. इतके भरपुर व चांगले काम केल्यावर आता ह्या टप्प्यावर त्याला इन्सेक्युरिटी असेल असे वाटत नाही. सगळे करुन झालेय त्याचे.

फेफ, क्वोट्स आहेत ही. Lol Lol वडीलांपेक्षा सिनिअर कसं होऊ शकतं, टाईम ट्रॅव्हलचा शोध लागलाय बहुतेक.

मीही रिॲलिटी शो पाहात नाही, ते अनरिअल वाटतात. त्यामुळे महागुरूंबद्दल माबोवर आणि "माझीच लाल" नावाचे इन्स्टारील्स येतात त्यावर कळाले. Proud

इनसिक्युरिटीज असतीलही पण नटनट्या डिल्युजनल होत जातात बरेचदा. वय वाढेल तसे जास्तच.

“ की ही 'आऊट ऑफ कॉन्टेक्स्ट' उचलली गेलेली वाक्यं आहेत?” - इंटरव्ह्यू (व्हिडिओ) मधे ऐकलेली वाक्य आहेत ही.

“ वडीलांपेक्षा सिनिअर कसं होऊ शकतं” - तो आधी बाल-कलाकार म्हणून आला (सद्ध्या बालिश कलाकार झालाय) आणि त्यानंतर वडिलांनी सिनेमा प्रोड्यूस केला असं काहीतरी लॉजिक आहे.

त्याचे शब्द बदलून, मोडून, तोडून ट्रॉलिंगच्याच हेतूने बनवलेली वाक्यं वाटत आहेत.
आता वरचच उदा पाहा ना.
वडिलांची इच्छा होती कि मी राजकपूर व्हावं. मी त्याहीपेक्षा पुढे गेलो.”
असं तो म्हणाला च नाही. Actual वाक्य... वडिलांची इच्छा होती कि मी राजकपूर व्हावं. मी राज कपूर होऊ शकलो नाही, पण त्याला जमलं नाही ( म्युझिक डायरेक्टर ) ते करू शकलो.(आता हे खरं का खोटं मला माहित नाही)
मी सगळी मुलाखत पाहिली नाही.
लोकांना शहानिशा करायला वेळ नसतो. कोणी सामुदायिक ट्रोल होत असला तर आपणही यात धुवून घ्यायचे.
मागे सुधा मूर्ती नाही का अकारण ट्रॉल झालेल्या.

एकदा सचिनच्या मुलाखतीत त्याची आई दूरदर्शनवर बालसंगोपनाच्या कार्यक्रमाची संचालिका असताना त्यात सचिन तेंडुलकरची आईही आली होती आणि तिचा सचिन फेवरेट नट होता म्हणून आपल्या मुलाचे नाव 'सचिन' ठेवले असे महागुरूंनी सांगितलेले पाहिले होते. तेव्हा "बघा बरं, गेला की नाही कुठल्याकुठे" अशी "राकु- चमक" डोळ्यात आणि देहबोलीतून दिसली होती.

सुप्रियाही होती तेव्हा, त्यांना जोडीने सगळीकडे जावे लागते तेव्हा किती बोअर होत असेल तिला "तेच तेच" गुऱ्हाळ ऐकून असं वाटतं आहे. ती त्याच्यापेक्षा कलाकार म्हणून गुणी आणि मोकळ्या मनाची वाटते नेहमी. रिलॅक्स दिसते ती, हा मात्र आढ्यता घेऊन वावरतो.

>>> वडीलांपेक्षा सिनिअर कसं होऊ शकतं
तेच म्हणते आहे, सीनियर म्हणजे त्यांच्यापेक्षा दीर्घ कारकीर्द अशा अर्थी म्हणाला असेल का - हा चाइल्ड अ‍ॅक्टर आणि ते अकाली गेले त्यामुळे त्यांची कारकीर्द लहानच असणार ना?

>>> असं तो म्हणाला च नाही. Actual वाक्य... वडिलांची इच्छा होती कि मी राजकपूर व्हावं. मी राज कपूर होऊ शकलो नाही, पण त्याला जमलं नाही ( म्युझिक डायरेक्टर ) ते करू शकलो.
दॅट मेक्स सेन्स.

काही प्रमाणात ट्रोलिन्ग आहेच, सदर्भ सोडून वाक्यही असतिल पण माझा सिनेमा पाहायला जायच म्हणजे मध्यमवर्गिय घरात सोहळा असायचा ही मुलाखत मी एकली आहे आणी त्यात फारच आत्मस्तुती चालली होती.
रादर आत्ताच्या सगळ्याच मुलाखतित तो "मी कसा ग्रेट आहे "हा सुर कायम आहे.
अभिनय कौशल्य चान्गल होतच पण प्रचन्ड गाजावाजा झालेला नवरा माझा नवसाचा पार्ट २ बघायला घेतला तर अत्यत बन्डल मुव्ही होता, १५ मिनिटातच कन्टाळा आला.
अशोक सराफ याना पद्द्मश्री मिळाल्यापासुन जरा जास्तच चालु आहे अशी सोमिवर चर्चा आहे.

महागुरू चर्चेत टाईमप्लीज --- Happy
काल इरादा (Irada) नावाचा सुंदर चित्रपट पाहिला. यूट्यूब वर Iraada नावाचा शत्रुघ्न सिन्हाचा एक सिनेमा आहे , तो हा नाही. यात नसिरुद्दीन शाह, अर्शद वारसी, दिव्या दत्ता आणि शरद केळकर, सागरिका घाटगे आहेत. सर्वांची कामं फारच भारी झालेली आहेत. पर्फॉर्मन्ससाठी पहावेत असे सिनेमे हल्ली निघत नाहीत, हाही २०१७ चा आहे. खऱ्या घटनेवर बेतलेली कथा आहे. भटिंडा येथील थर्मल- पावर प्लॅन्ट मुळे तेथील कनाल, नदी यात सोडल्याजाणाऱ्या कार्सिनोजेनिक केमिकल्स मुळे प्रत्येक घरात कॅन्सरचे रुग्ण सापडायचे. यावर काही वर्षांपूर्वी पेपरमध्ये छापून आले होते. युरेनियमने होणारी विषबाधा, रिव्हर्स बोअरिंग, फर्टिलायझर मधून होणारी विषबाधा - या सगळ्यामुळे होणारे "इको - टेरेरिझम" यावर कथानक बेतलेय.

थ्रिलर सिनेमा आहे. नसिरुद्दीन शाह एक रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहे, मुलीला सुद्धा एअरफोर्स मधे पायलट करायचं स्वप्न आहे. त्यासाठी तिला रोज कॅनालमधे पोहण्याच्या सरावासाठी घेऊन जातो जेथे हे केमिकल्स सोडलेले असतात. ते पाणी नाकातोंडात जाऊन ती तडकाफडकी कॅन्सरने मरून जाते. तेथूनच सगळा प्रतिशोध सुरू होतो. शरद केळकर या थर्मल प्लान्टचा मालक/ खलनायक आहे. त्याने पॉलिटिशियन्सना आणि मिडीयाला विकत घेतलं आहे. दिव्या दत्ता एक क्रूर आणि उद्धट पंजाबी पॉलिटिशयन आहे. अर्शद वारसी पोलिस निरीक्षक आहे. पावर हाऊस पर्फॉर्मन्सेस आहेत. शरद केळकर एकदम टॉल, डार्क, हॅन्डसम+ व्हाईट शर्ट घालावे तर यानेच असा व्हिलन दिसलाय. सहसा प्रतिमा जपण्यासाठी लोक पांढऱ्याशुभ्र रंगाचे कपडे घालतात. त्यामुळे याला बहुतेक कपडे तसेच दिलेत.

अर्शद वारसी एकदम नॉर्मल पोलिस आहे, सिंघम नाही. सागरिका घाटगे जर्नलिस्ट आहे. नसिरुद्दीन शाहच्या तोंडून येणारी शेरोशायरी व पंजाबी गाणी सुंदर आहेत. पंजाबी असूनही लाऊड नाहीत, लोकगीतांसारखी वाटली व पार्श्वभूमीवर ऐकू येतात. नसिरुद्दीन शाह याच्या मुळाशी कसा जातो व अर्शद वारसी आणि तो वारंवार यामुळे एकत्र येत जातात. नंतरचा ट्विस्टही भारी आहे, येथे लिहीत नाही. Happy या दोघांची केमिस्ट्री इश्किया आणि देढ इश्किया पासून भन्नाट वाटली आहे. अभिनय करतात असे वाटतच नाही. येथेही सिरियस रोल्स असूनही तेच इक्वेशन दिसते. यूट्यूब वर आहे. बघून बघा. अजिबात टिपिकल नाही. नेहमीच्या थ्रिलर सारखा वेगवान नाही पण यात एक 'ठहराव' आहे, ज्यामुळे तो विचारप्रवर्तक वाटतो.

"एरिन ब्रॉकोव्हिच" या ज्युलिया रॉबर्ट्सच्या सिनेमाची आठवण आली पण साम्य असं काही नाही या दोन्हींमधे.

थँक्स रेको बद्दल. इरादा हे पिक्चरचे नाव आधी पाहिल्यासारखे वाटत होते. वरचे वाचून तो शत्रुघ्नचा असावा

इरादा च्या रेको बद्दल धन्यवाद अस्मिता. Happy

कमल हसन च्या फॅसिनेशन बद्दल फारेण्डना +१

महागुरू चर्चा मजेशीर आहे. दुर्दैवाने बरेचसे आत्मप्रौढी असलेले व्हिडीओज पाहिले आहेत.
महागुरू असताना " तुमचा हात ५९ अंशातून वर गेला पण खाली येताना ३३ अंशाच्या कोनातून खाली आला, त्या ऐवजी अमूक एका कोनातून खाली आला असता तर ते ग्रेसफुल दिसलं असतं " वगैरे क्लिप्स अजून येत असतात. Happy

जयाजी माझे लाड करतात हे अमितजींना आवडत नाही

स्वभाव वाली क्लिप पाहिलीय ना ? Lol

इरादा बद्दल माहिती नव्हतं. इंटरेस्टिंग वाटतोय. थँक्स, अस्मिता Happy

नदी यात सोडल्याजाणाऱ्या कार्सिनोजेनिक केमिकल्स >>> यामुळे 'डार्क वॉटर्स' नावाच्या सिनेमाची आठवण आली. तो ही पहायचा राहिलाय. तो असाच काहीसा होता का?

माझ्या डोक्यातील त्याची इमेज एक अभिनेता म्हणूनच आहे, आणि ती चांगली आहे. >>> +१

उघडला पडदा कि उडाला बार ठो ठो ?? >>> Rofl हे असंच काहीतरी असेल असं वाटलं होतं त्यामुळे हा पिक्चर लिस्टमधे लावलाच नाहीये.

इरादाबद्दल वाचताना इरिन…. चीच आठवण झाली. मी इरिन…हल्लीच पाहिला आणि यातली जुलिया आवडली. आधी फक्त रिल्स्/तुकडे पाहिले होते आणि जुलिआ उद्धट्, उथळ वाटली होती पण पुर्ण चित्र बघितले आणि गै स दुर झाला.

लोकहो सचिनने दिग्दर्शित केलेले चित्रपट पाहुन त्याच्याविषयी अंदाज बांधु नका. त्याने बालकलाकार म्हणुन काम केलेले चित्रपट खुप गाजलेत आणि ते चित्रपट त्याचे होते, तो मुख्य कलाकारातला एक असायचा. सुरवातीची चार-पाच मिनिटे हिरोची बालपणाची भुमिका करणारा तो कलाकार नव्हता. त्याचा अजब तुझे सरकार हा सुलोचनासोबतचा चित्रपट प्रचंड गाजलेला आणि त्याला नॅशनल अवॉर्ड देऊन गेला. हा तेव्हा इतका गाजलेला की मला दोन तिनदा पाहायला मिळाला. आमच्या शाळेत दाखवलेला, गणपतीत कॉलनीत आणलेला आणि दु द वर पण पाहिला असणार. रिमांड होममध्ये राहणार्‍या लहान मुलांवर आधारीत कथा आहे. चित्रपट पाहताना ढसाढसा रडण्याचे प्रचंड पोटेंशियल हे गाजण्याचे एक कारण होतेच (तेव्हा चित्रपट पाहताना रडायची पद्धत होती) पण सचिनचे सहजसुंदर नैसर्गिक काम हेही लोकांना त्याचे चित्रपट आवडायचे प्रमुख कारण होते. फार कमी बालकलाकार मोठे झाल्यावर इन्डस्ट्रीत स्थान टिकवुन ठेऊ शकले. बहुतेक सगळे तारुण्यात पदार्पण करताच बाहेर फेकले गेले. सचिनइतका यशस्वी दुसरा बालकलाकार मला आठवत नाही.

त्याने दिग्दर्शित केलेले चित्रपट मला आवडले, काही ठिकठाक वाटले. पण कुठल्याही चित्रपटात ओरिजिनॅलिटी नव्हती.

तरीही गाजलेले, लोकांच्या स्मृतीत असलेले हिंदी चित्रपट मराठीत बनवुन तेही गाजवायचे ह्यात कौशल्य आहे हे नाकारता येणार नाही. त्याने बनवलेला आत्मविश्वास हा कदाचित ओरिजिनल असेल पण तो तितकासा चालला नाही. मराठीत तेव्हा कॉमेडीचे दिवस होते.

हल्ली स्फोटक हेडलाईन असलेले रिल बनवुन व्हुज मिळवायचा धंदा लोक करतात. सचिनची मुलाखत असे रिल बनवले तर कोणी बघणार नाही पण अमजदला शिकवणारा दिडशहाणा सचिन हे रिल बघितले जाते. सचिनने अमजदला शिकवले तेव्हा अमजद अमजद बनला नव्हता हे कोणी लक्षात घेत नाही.

तरी असल्या ट्रोलिंगला तोंड देऊन कलाकार उभे राहतात. कदाचित त्यांनाही हे ट्रोलिंग आवडत असेल/पथ्यावर पडत असेल. त्या निमित्ते तेसुद्धा परत चर्चेत येतात. नाहीतर कोण विचारतेय.

जाताजाता, आज व्ही शांताराम व संध्या ही जोडी त्यांचे चित्रपट प्रसुत करत राहिली असती तर काय ट्रोलिंग झाले असते!! शांतारामांनी स्टुडिओच बंद केला असता. त्या काळातही त्यांचे ट्रोलिंग व्हायचे पण लिमिटेड.

शोले मध्ये गब्बरचा आवाज कसा हवा ते मी अमजद खानला सांगितलं.>>>> भरत मी पाहिलेय ही मीम. ह्या चित्रपटा दरम्यान सचिन फक्त १७-२० वर्षाचा कोवळा मुलगा होता, त्याला अमजद खान ला बेस, आवाज पट्टी शिकवता यावी & त्याच्याकडे गांभिर्याने पाहिलं जावं हा विचार पण हास्यास्पद आहे.

साधना तै, त्याचा अभिनय & यशस्वी काराकिर्द कोणी नाकारत नाही पण किती ते मी मी मी मी करायचं??? ह्या आत्मप्रौढी च्या नशेत राजेश खन्ना बुडाला.. राकु पण असावा असा, पण त्याची मुलाखत पाहिली नाही.

महागुरूंना बालकलाकार म्हणून मिळालेळं यश युवावस्थेत मिळालं नाही ; त्याची खंत असेल. बालकलाकार म्हणून दोन राष्ट्रीय पुरस्कार आहेत.
गीत गाता चल हिट झाला, पण राजश्रीचे आंखियों के झरोखोंसे आणि नंतर नदियां के पार हे दोन चित्रपट आणि बालिका वधू हा शक्ती सामंतांचा एवढेच नायक म्हणून. हिंदीत सहकलाकार म्हणूनच कामं मिळाली. आता वाचलं की ते ब्रह्मचारी मध्ये सुद्धा होते. त्यातला मला ज्युनियर मेहमूद तेवढा आठवतोय. डेझी इराणीच्या जास्त भूमिका आठवतील. हिंदीत दिग्दर्शन म्हणूनही फार काही करता आलं नाही.
दिग्दर्शक म्हणून तू तू मैं मैं ही मालिका सगळ्यात जास्त आवडली.

Pages