Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53        
      
    नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
भरत
भरत
लोक पण मस्त हसताहेत. ही आपली पातळी आहे.
वरची (राभुची) लिंक पहिले दोन
वरची (राभुची) लिंक पहिले दोन मिनिटे पाहिली. सेन्सरची भर/ ढवळाढवळ - मोदींचा संदेश जोडा वगैरे काही पटलं नाही. कशाला जोडायचा, त्यांचा काय संबंध! 'जोडता का ?' विचारणं सुद्धा अस्थानी आहे. उद्या 'बम बम बोले' गाण्यात दिसतील मधेच. बेजबाबदार आणि पूर्ण हक्कदार - ही म्हण आठवली.
ते ट्रेलरवरून फक्त ऑटिस्टिक मुलांवर आहे असे वाटले नाही, (इन्टेलेक्चुअली) न्यूरोडायव्हर्जंट - मेंदूभिन्नता असलेल्या मुलांवर आहे असे वाटले. त्यात काहींना डाऊन सिंड्रोम दिसला. मला फार माहिती नाही, फक्त ट्रेलर पाहिला आहे.
बायदवे - हल्लीच आमिर खान कपिल शर्माच्या नेटफ्लिक्सवरच्या एपिसोड मधे दिसला. तो कुठेही मिसळत नाही एरवी. पण मला आवडल्या ह्या गप्पा. त्याच्या दोन मोठ्या बहिणीही आल्या होत्या. त्याही इतक्या हसऱ्या, सुंदर आणि elegant आहेत की त्यांच्याकडे बघून मला माझ्या मावश्यांची आठवण आली.
हॉटस्टार वर केसरी २ पहिला.
हॉटस्टार वर केसरी २ पहिला..छान आहे..जालियनवाला बाग हत्याकांड घडवून आणणाऱ्या जनरल डायर च्या विरोधात भारतीय वकील सुंदरन नायर यांनी कोर्ट केस लढवली होती त्यावर आहे...अभिनय सगळ्यांचाच छान...माझ्यासाठी अनन्या पांडे सरप्राइज होती...चांगलं काम करते ती...
सेन्सरची भर/ ढवळाढवळ -
सेन्सरची भर/ ढवळाढवळ - मोदींचा संदेश जोडा वगैरे काही पटलं नाही. कशाला जोडायचा, त्यांचा काय संबंध! 'जोडता का ?' विचारणं सुद्धा अस्थानी आहे. >>> बरोबर. हेच म्हणायचंय.
मी नाही पाहिला कपिल शर्माचा तो एपिसोड.
अनलॉक्ड नावाचा कोरियन पिक्चर संपत आलाय. एका फोनमुळं त्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त कसं होतं अशी थीम आहे. साऊथला पण असे पिक्च्र असतात पण त्यांची हाताळणी बटबटीत असते. गेली काही वर्षे अनेकदा फोनशिवाय राहण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचा निश्चय केला पण दिवसेंदिवस फोनशिवाय जगणं अशक्य होत चाललंय. आय मीन सरकारच फोन नंबर मागतंय रेशनकार्डसारखं. ती स्पर्धा तरी चालू आहे कि बंद पडली >
सितारें जमी पर पाहिला. बात
सितारें जमी पर पाहिला. बात कुछ़ जमी नहीं… खूप प्रेडिक्टेबल सीन्स आहेत. सगळा सिनेमा सुपरफिशियल वाटतो. कुठलंच कॅरेक्टर नीट एस्टॅब्लिश होत नाही, कुणाचा संघर्ष पोहोचत नाही. जेनेलिया छान दिसते.
एकंदरीत सिनेमा नावडत नाही, पण आवडण्यासारखंही काही नाही.
सिकंदर का मुकद्दर पाहिला.
सिकंदर का मुकद्दर पाहिला.
सुरूवातीची दहा मिनिटं वेगवान आहे. क्राईम थ्रिलर असावा अशी ट्रीटमेंट आहे. पण अचानक संथ होत वैचारिक बनत जातो.
नंतर तर चोरीचा काहीच संबंध नसेल असे वाटत असताना शेवटी ट्रॅकवर येतो. वेगळ्या वाटेवरचा सिनेमा. आवडला.
फेफ, सितारे जमी पर बद्दल छान लिहीलंय तुम्ही.
घरच्यांपैकी एक रिपोर्ट चांगला मिळाला.
आज आमच्या घरचे जातील सितारे
आज आमच्या घरचे जातील सितारे जमी पर.. मला नेत नाहीयेत. कारण मी गेल्या महिन्याभरात चार मराठी चित्रपट पाहिल्याने माझा कोटा संपला आहे.
एकंदरीत सोशल मीडिया पब्लिक रिव्ह्यू वाचून असे सूर आहे की तारे जमी पर सारखा मनाला भिडत नाही पण बघायला चांगला आहे. त्यामुळे घरच्यांना आवडेल अशी अपेक्षा वाटते.
तारे जमीन पर बॉक्स ऑफिसवर हिट होता का हे शोधायला हवे. कारण आपल्याकडे अश्या चित्रपटांचे नंतर कौतुक करायची पद्धत आहे पण थेटरला जाऊन कोणी बघत नाही. म्हणून एखाद्या आमीर खान सारख्या लोकप्रिय कलाकाराचे चित्रपटाशी जोडले जाणे गरजेचे असते.
काल रात्री 'सितारे जमी पर'
काल रात्री 'सितारे जमी पर' बघून आलो.
आमिर बेदरकार, पण नात्यांतील तणावाना घाबरून आधीच दूर जाणारा पण पराकोटीचा माज दाखवणारा असा कॅरीकेचरिष आहे. इतरांत वैगुण्ये शोधून त्यांना यथेच्च नावं ठेवणारा, पण आपण बुटके आहोत त्यावरून कोणी बोललं की ठोसे वगैरे लगावून देतो. तो बास्केटबॉल कोच सुद्धा आहे. नंतर तो स्पेशल/ स्पेक्ट्रम वरील मुलांची बास्केटबॉल टीम करतो आणि ते देशपातळीवर अंतिम सामन्यापर्यंत अर्थातच जातात पण आमिर नेट सोडा बास्केटबॉल ला एकदाही स्पर्श करत नाही. पण ती स्पेक्ट्रमवरची मुलं तीन महिन्यांत, (तीन महिने सिनेमात सांगतात म्हणून, प्रत्यक्षात आपल्याला एकही सराव, त्यात ओतलेली मेहेनत काहीकाही दिसत नाही,) बॉल ड्रीबल ही करू न शकणारी, दुसऱ्या क्षणी थ्री पॉईंटर शॉट सर्रास घ्यायला लागतात. पण त्यांना फक्त कायम २ पॉईंट, कायम २ च मिळतात, ते सोडून देऊ!
स्पेक्ट्रमवर आहेत तर त्यांना हिणवू नका... देसी लोक इतकी मंद आणि चक्रम आहेत की आमच्या शो मध्ये आमिर जेव्हा स्पेक्ट्रम वरील मुलांना शेलकी विशेषणे वापरतो तेव्हा हे लोक जोरजोरात हसत होते.... त्या अर्थी असा वरवरचा, सगळं सोप्पं तर असतं स्कूलने समस्या सोडवणारा चित्रपट हवा हे ही सत्य आहेच... पण या एका लाईन शिवाय चित्रपटात काहीही नाही. स्पेक्ट्रम वर काय काय समस्या येतात, त्यातून काय संघर्ष करावा लागू शकतो... तर कामाचे तास आणि कामाच्या ठिकाणी अमाप भांडी घासायची सक्ती! ... झालं. नवा सिनेमा आहे त्यामुळे आणखी काही लिहित नाही.
मूळ समस्या ट्रिव्हियलाईझ, त्यावरचे उपाय उत्तरं सुपर ट्रिव्हियलाईझ! सामान्य लोकांच्या जीवनातील समस्याही शेवटी चुटकी सरशी सुटतात. जेनेलिया पोटुशी दिसते.
इतका दिखावा आणि काहीही सबस्टन्स नसलेला, वरवरचा चित्रपट आमिरने का काढला असेल? खूप दिवसांनंतर काही अपेक्षा घेऊन गेल्यावर अगदीच वेळ फुकट गेल्याचे वाटले.
ह्म्म, का कुणास ठाऊक ट्रेलर
ह्म्म, का कुणास ठाऊक ट्रेलर बघून असेच काहीसे फीलिंग होते.
बायदवे, तारे जमीन पर आमीर ने डायरेक्ट केला होता. पण या सिनेमाचा डायरेक्टर आमीर नाही, आर एस प्रसन्ना कुणीतरी साउथ चा डिरेक्टर दिसतो आहे. अर्थात प्रोड्यूस्ड बाय आमीर खान प्रॉडक्शन आहे त्यामुळे बर्या-वाइटाचे श्रेय त्याचेही आहेच.
सितारे जमीन पर मुलगी बघून आली
सितारे जमीन पर मुलगी बघून आली. छान होता रे पिक्चर एवढेच म्हणून खेळायला पळाली पण ते न विचारताच सांगितले. म्हणजे पिक्चर कलाकृती म्हणून त्या लेव्हलवर जमलेला नसला तरी मनोरंजनाच्या स्केलवर तरी नक्कीच जमलेला असणार. किमान वन टाईम वॉच नक्कीच असणार. तसेच बिग बॅनर आमिरचा असल्याने लोकं ओटीटीसाठी न थांबता थेटरमध्ये बघून येणार. बॉक्स ऑफिस कमाई होणार आणि ती होतेय म्हणजे पिक्चर चांगला असणार म्हणत अजून होणार. येत्या आठवड्यात याचे त्याचे रेकॉर्ड तोडले पोस्ट सुद्धा सुरू होतील. वर कोणीतरी म्हटले तसे मोदी सेन्सॉर वाद झाला असेल तर याचा फायदाच होतो असा आजवरचा अनुभव. थोडक्यात, आमिरला तारे जमीन पर सारखा पिक्चर बनवायचाच नव्हता. हा कमर्शियली सेफ गेम आहे. आणि आमिरचे गेले एक दोन पिक्चर पाहता त्याला याची गरज होती असे वाटते.
अॅडीशन टू अबोव पोस्ट - खेळून आल्यावर ती म्हणाली "तारे जमीन पर" पेक्षाही हा चांगला आहे. अर्थात लहान मुलांच्या आवडी अश्याच असतात. वर्तमानात आवडलेले त्यांच्यासाठी सर्वोत्तम असते. मोठे झालो की उलटे होते. भूतकाळातले सर्वोत्तम वाटू लागते. बाकी तारे जमीन पर सुद्धा तिच्या फार आवडीचा आहे आणि तो सुद्धा तिने तीन-चार वेळा पाहिला आहे.
पण या सिनेमाचा डायरेक्टर आमीर
पण या सिनेमाचा डायरेक्टर आमीर नाही, आर एस प्रसन्ना कुणीतरी साउथ चा डिरेक्टर दिसतो आहे. अर्थात प्रोड्यूस्ड बाय आमीर खान प्रॉडक्शन आहे त्यामुळे बर्या-वाइटाचे श्रेय त्याचेही आहेच.>>>> पण त्याचा हस्तक्षेप खुपच असतो अस वाचलेले आणी एकल आहे त्यामुळे हिट झाल तर माझा नाहितर डायरेक्टर आहेच बाहुली म्हणून.
ह्म्म, का कुणास ठाऊक ट्रेलर बघून असेच काहीसे फीलिंग होते>>> +१
असा निघाला का 'सितारे जमीनपर'
असा निघाला का 'सितारे जमीनपर'..! हल्ली बहुतेक हिंदी चित्रपट सुपरफिशियल /फेक वाटतात. ॲक्टिंगची ॲक्टिंग करत आहेत असे वाटते.
दिग्दर्शन राहुदे, मला मूळ कथा
दिग्दर्शन राहुदे, मला मूळ कथा आणि पटकथेत आणि संवादात काहीच दम वाटला नाही. जे बघतोय ते काहीतरी गरीब, उत्तेजनार्थ असं बघतोय वाटत होतं. पार्श्वसंगीत, जी काही दोन गाणी आहेत ती पण लक्षात रहात नाहीत. असो.
“ जे बघतोय ते काहीतरी गरीब,
“ जे बघतोय ते काहीतरी गरीब, उत्तेजनार्थ असं बघतोय वाटत होतं.” +१ काहीतरी वरवरचं, उथळ पाहिलं असं वाटलं. काही रिव्ह्यूअर्सनी जे हसता हसता डोळे पाणावतात / रडता रडता हसू फुलतं वगैरे लिहिलंय तो कुठला तरी वेगळा सिनेमा असावा.
सितारें जमीं पर स्पॅनिश
सितारें जमीं पर स्पॅनिश मूव्ही चँपियनवरून बेतलेला आहे.
इंग्लीश मधे ही चँपियन या नावाने त्याचा रीमेक बनला होता.
The Intern कसला मस्त सिनेमा
The Intern कसला मस्त सिनेमा आहे! २०१५ चा असुनही पाहिला नव्हता.
Robert De Niro व Anne Hathaway नी फार छान काम केलंय. Robert De Niro नी तर कमाल केलीये. साधा सरळ सिनेमा, काहीही नाट्य नाही, भारी जड संवाद, भावना ओसंडुन जाणे नाही, आरडाओरडा नाही .. तरीही पकड शेवटपर्यंत सुटत नाही.
The Intern कसला मस्त सिनेमा
The Intern कसला मस्त सिनेमा आहे >>>>
आमच्याकडे ‘द इंटर्न’ला रिपीट वॅल्यू आहे. Feel Good सिनेमा
The Intern आलेला दिसला. ॲन
The Intern आलेला दिसला. ॲन हॅथवेमुळे पाहायचाच होता. भारीच आवडते ती. स्मार्ट लूक आहे तिचा.
The Intern >> हो फार मस्त आहे
The Intern >> हो फार मस्त आहे. आला होता तेव्हाच पाहिलेला. आता नेफी वर आलेला दिसतोय. कदाचित परत बघेन.
याचा हिंदी रिमेक करणार आहेत म्हणे.
याचा हिंदी रिमेक करणार आहेत
याचा हिंदी रिमेक करणार आहेत म्हणे.
>>
दीपिका अन् बच्चन असणार आहेत
आधी ऋषी कपूर असणार होता...
मला खरं तर ऋषी कपूर ला या रोल मधे बघायला खूप आवडलं असतं. बच्चन टिपिकल बच्चन टाईप करेल असं वाटतं...
याचा हिंदी रिमेक करणार आहेत
याचा हिंदी रिमेक करणार आहेत म्हणे.
>>>
नको. कशाला?
आणि दीपिका तर मुळीच नको. ॲन हॅथवेने स्ट्रॉंग तरीही व्हल्नरेबल अशी भुमिका मस्त केलीय.
ऋषी कपूर आलिया ही जोडी चालली असती.
आधी ऋषी कपूर असणार होता >> तो
आधी ऋषी कपूर असणार होता >> तो फार मस्त वाटला असता. त्याच्या उतारवयातले पिक्चर पण मस्त होते. अग्निपथ, शर्मजी नामकीन, १०२ नॉट आऊट हे सगळे भारी जमलेले होते. तो एक चार्मिंग हिरो होता. नेहमी एकदम प्रसन्न
आणि दीपिका तर मुळीच नको
आणि दीपिका तर मुळीच नको
>>
प्रोड्यूसर आहे ती
ज्याची बॅट त्याची पहिली बॅटिंग...
ज्याची बॅट त्याची पहिली
ज्याची बॅट त्याची पहिली बॅटिंग 
 
मला आवडेल दीपिका ला बघायला. ती असे करिअर वूमनचे रोल चांगले करते.
‘द इंटर्न’ला रिपीट वॅल्यू >>
‘द इंटर्न’ला रिपीट वॅल्यू >> मी पण अजुन एकदा तरी पहाणार आहे.
दिपिका-बच्चन >> आवडेल पहायला. अनिल कपूर पण आवडेल मला. ऋषीकपूरनी फार मस्त केले असते याला अनुमोदन.
ज्याची बॅट त्याची पहिली
ज्याची बॅट त्याची पहिली बॅटिंग >>>
दिपिकाचं पिकु मधलं काम खूप
दिपिकाचं पिकु मधलं काम खूप आवडलं होतं मला. खूपच.
तिला पद्मावत मधल्या अवघडलेल्या अभिनयासाठी माफी देता येईल इतकं.
सितारे बघितला...
सितारे बघितला...
वरती फेरफटका यांनी लिहिलंय तसं - एकंदरीत सिनेमा नावडत नाही, पण आवडण्यासारखंही काही नाही.
काही काही प्रसंग उगीच आणलेत.. विमानाने मुंबईला जाण्यासाठी पैसा कसा उभा होतो ते काहीही हास्यास्पद...
शेवटी उगीच इमोशनल करायचा प्रयत्न केलाय...
सुरुवातीला मोदींचा संदेश येउन गेला...
The Intern 3-4 वेळा बघून
The Intern 3-4 वेळा बघून झालाय आणि प्रत्येक वेळी तितकाच आवडतो. एकदम feel good movie. दोघेही फार आवडले.Anna looks superb !
हिन्दी रिमेकसाठी ऋषी आणि दिपीका एकदम योग्य होते.
मॉन्स्टर युनिव्हर्सिटी पुनस्च
मॉन्स्टर युनिव्हर्सिटी पुनश्च पाहीला. आवडला. एकदम धमाल माईक विझोवव्स्की आणि सलीव्हान.
Pages