Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
भूल चूक माफ अर्धा पाहिला.
भूल चूक माफ अर्धा पाहिला. पिक्चर जरासा रटाळ आहे खरा. पण मुख्य म्हणजे ज्या पिक्चरवरून याचं कथानक उचललं आहे तो Groundhog Day नावाचा पिक्चरच उचलणार्याला समजला नाहीये असं वाटतंय. Groundhog Day ची गंमत त्यातल्या प्रसंगांच्या रिपीटेशन्स मधे आहे. कथानायक रोज तोच एक दिवस जगतो, त्यात तो जेवढं वेगळा वागेल त्यानुरूप बदल त्या दिवसात होतात. पण जोपर्यंत त्याच्या स्वभावात बदल होत नाही तोपर्यंत त्याच्या मागचा हा चकवा सुटत नाही.
इथे पहिल्या दिवशी बॅचलर पार्टीबद्दल काही येतच नाही. दुसर्या दिवशी मधेच उपटते पार्टी. असं कसं चालेल?
शिवाय सतत थोड्या थोड्या वेळाने गाणी येत राहतात. गाणी मला तरी कंटाळवाणी वाटली. आणि या गाण्यांमुळे प्रसंग रिपीट होतायत हे पण नीट लक्षात येत नाहीये असं वाटलं.
बघूया उरलेल्या अर्ध्या भागात तरी ही मजा नीट साकारली आहे का. तसं नसेल तर मात्र अगदीच बंडल, सामान्य पिक्चर आहे असं म्हणावं लागेल.
र्म्ड चे वाचुन पुढचे जे काय
र्म्ड चे वाचुन पुढचे जे काय एक दिड तास आहेत ते बघावे का हा प्रश्न पडलाय…
बघून बघ गं. आम्ही पण बघणार
सिकंदर पाहिला तर कुठलाही
सिकंदर पाहिला तर कुठलाही पिक्चर सहन करू शकू एव्हढी ताकद आहे त्यात.
आणि तरीही सहनशक्ती कमी पडत असेल तर जाट बघाच.
सिकंदर आणि जाट दोन्ही लिस्ट
सिकंदर आणि जाट दोन्ही लिस्ट मध्ये ठेवलेले आहेत. कधी अगदी मूड झाला तर बघण्यात येईल
त्या आधी हे वाचा
त्या आधी हे वाचा
नंतर वाचून फायदा नाही
भूचूमा पाहिला. मला चित्रपट
भूचूमा पाहिला. मला चित्रपट कंटाळवाणा नाही वाटला , रारा आणि वामिका दोघेही काही खास नाही वाटले.
रारा टक्कल पडल्यासारखी hairstyle आणि chiseled चेहरा त्याच्यामुळे म्हातारा दिसतो. वामिका Jubilee मध्ये जास्त आवडली होती. खूप बारीक झालीयं , इथे मलातरी irritating वाटलीयं.
धमाल movie बनला असता , ok okie झालाय
रमड, ग्राऊंडहॉग डे मी अनेक
रमड, 'ग्राऊंडहॉग डे' मी अनेक वर्षांपूर्वी पाहिला आहे पण 'भूल चूक माफ' इतका टुकार आहे की मला हा पाहताना तो आठवला नाही. हळदीचे सीन जितके रीपीट झालेत तितके इतर होत नाहीत. गाणी सगळी बंडल आणि विस्मरणीय आहेत. हल्लीच राजकुमार रावचा 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' तृप्ती दिमरी सोबत आला होता, तोही मला बंडल वाटला होता. हा त्याच्यापेक्षा बंडल आहे. मी संपूर्ण पाहिला, लोकहो पाहू नका. दुसरं काही पाहा.
शेवटी तर सर्वधर्मसमभाव आणून पिळलेय. मला भयंकर बोअर आणि कालबाह्य वाटते ती कल्पना. हिंदी चित्रपटातील इतिहासात त्याच्याइतकं 'ईनऑरगॅनिक' काही नाही. येथे सगळा पिक्चरच बंडल असल्याने ते तितके खुपत नाही.
रारा इतका नालायक बॉयफ्रेंड आहे की त्याची गर्लफ्रेंड त्याला तीनचार वर्षांपासून आईवडिलांकडून पैसे घेऊन/ चोरून पोसत असते. त्याला नोकरीचे काही नाही पण लग्न करायचं आहे वर तेही पळून जाऊन करायचं नाही. का नाही करायचं पळून जाऊन? असाही गर्लफ्रेंडच्या आईचे दागिने गहाण टाकणाऱ्याला अचानक सेलेक्टिव्ह स्वाभिमान कुठून आला. तो सरकारी नोकरी सुद्धा लग्न होण्याची अट म्हणून करणार असतो. मला हिरो आणि हिरोईन दोघांचेही कॅरेक्टर्स मुळात एथिकली रॉन्ग आणि नंतर अचानक तत्त्वनिष्ठ झालेलेच पटले नाहीत. मला रारा आणि वामिकात केमिस्ट्री दिसली नाही. जेव्हा बघावं भांडतच होते. तरी लग्न मात्र करायचं होतं. मला वामिकाचा अभिनय आवडला नाही, रारा आणि इतरांचा लाऊड वाटला अधूनमधून. कथा, गाणी, संवाद काहीही चांगले नाही.
सगळी कथाच काशीत घडते. वाराणशीची शंकराची पिंड निदान खऱ्या देवळासारखी घ्यावी, तेथेही मालिकेतल्यासारखी बी ग्रेड पिंड आहे. काशी विश्वेश्वराच्या शूटिंगची मूभा नाही हे माहीत आहे पण समोर गंगा आणि इकडे प्लास्टिकचा वार्निश केलेला महादेव. अनेकवेळा आला आहे तोही सीन. लूप मधे सूसुत्रता नाही, एकच लूप एक्झॅट रीपीट होत नाही. असो.
अस्मिताची लेटेस्ट पोस्ट
अस्मिताची लेटेस्ट पोस्ट आवडली.
एकच लूप एक्झॅट रीपीट होत नाही
एकच लूप एक्झॅट रीपीट होत नाही >>> येस. हेच म्हणत होते मी. पुढे अजून पकवले आहे असं दिसतंय. त्या दोघांच्यात काही केमिस्ट्री दिसत नाही याला मम.
ट्रेलर पाहूनच तो groundhog day वर बेतलाय हे दिसत होतं. पण किती ढिसाळ आणि बंडल!
रारा इतका नालायक बॉयफ्रेंड आहे >>> तो तसा रागिणी MMS पासूनच आहे
पण मुख्य म्हणजे ज्या
पण मुख्य म्हणजे ज्या पिक्चरवरून याचं कथानक उचललं आहे तो Groundhog Day .>> रियली? ग्राउण्डहॉग डे फार सुंदर पिक्चर आहे.
पण जोपर्यंत त्याच्या स्वभावात बदल होत नाही तोपर्यंत त्याच्या मागचा हा चकवा सुटत नाही. >>> हा भाग वापरणे फार सोपे असायला हवे खरेतर.
राजकुमार रावचा 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' तृप्ती दिमरी सोबत आला होता, तोही मला बंडल वाटला होता >>> हा मी सुमारे अर्धा तास पाहिला होता फक्त. फार बोअर झाला. राजकुमार राव चा पिक्चर अर्धवट सोडून दिल्याचे हे पहिले उदाहरण. नाहीतर त्याचा चॉईस आत्तापर्यंत सहसा चांगला असावा. त्याचे मी पाहिलेले बहुतांश पिक्चर्स चांगले निघालेत.
शेवटी तर सर्वधर्मसमभाव आणून पिळलेय. मला भयंकर बोअर आणि कालबाह्य वाटते ती कल्पना. हिंदी चित्रपटातील इतिहासात त्याच्याइतकं 'ईनऑरगॅनिक' काही नाही >>> हे इंटरेस्टिंग आहे. मोठा विषय आहे. पण इनऑरगॅनिक बरोबर आहे.
रियली? >>> हो, हे ट्रेलर
रियली? >>> हो, हे ट्रेलर मधेच समजलं होतं. पण त्यांना ती कल्पना नीट एक्झिक्युट नाही करता आलेली.
ग्राउण्डहॉग डे फार सुंदर पिक्चर आहे >>> टोटली! माझा आवडता पिक्चर आहे तो. खूप वेळा पाहिलाय.
मागच्या पानावर इराणी पिक्चरचं
मागच्या पानावर इराणी पिक्चरचं नाव लिहीलेलं. आता संपत आलाय.
अनएस्पेटेडली आवडला. प्राईम माझ्याकडे फक्त फोनवर आहे आणि त्यावरून पिचर बघणे शिक्षा आहे.
दुसरा एक जुगाड लावून लॅपटॉपवर चालू केलाय पण सबटायटल्स आणि डायलॉग्जचा वेग काही जमत नाही.
हा एकट्याने बघण्याचा पिक्चर नाही. नेहमीचा अनुभव देणार नाही. चर्चाच घडून येईल.
एक तर पुरस्कार मिळूनही दिग्दर्शकाला देश सोडून पळून जावं लागलं कारण या पिक्चरसाठी देहदंडाची शिक्षा मिळाली.
दोन अभिनेत्री आहेत त्यांनाही त्याने पळून जायला मदत केली. त्याचं शूटींग वेब कॅमेरे आणि अन्य लपवता येणार्या साहित्याने केलंय.
आपापल्या घरात बसून त्यांनी शूट केलंय.
जिथे शूटींगची जागा होती तिथे पोलिसांना चकवण्यासाठी बनावट स्क्रीप्ट ठेवली होती.
एव्हढे दिव्य करून बनवलाय सिनेमा.
विषय सांगितला तर मजा जाईल कदाचित.
“ पण मुख्य म्हणजे ज्या
“ पण मुख्य म्हणजे ज्या पिक्चरवरून याचं कथानक उचललं आहे तो Groundhog Day” - हे पहिल्या अर्ध्या तासात स्पष्ट सुद्धा होत नाही. (तेव्हढाच पाहू शकलोय). बाकी अस्मिताच्या पोस्टला अनुमोदन.
फा, 'अमर अकबर अँथनी' च्या
फा, 'अमर अकबर अँथनी' किंवा समकालीन चित्रपटांच्या वेळी कथेतील सर्वधर्मसमभावाचे नाविन्य तरी होते/ असेल. पण ते कायम 'ईनऑरगॅनिक' पद्धतीने मांडलेलंच वाटत आलेलं आहे. यात ('भूल चूक माफ' मधे) ते सटली येते इतकाच काय तो फरक. कदाचित कुणाच्या लक्षातही येणार नाही इतके 'सटल' आहे. जुन्या काळी त्याची मांडणी भाबडी वाटायची, आता तेच 'अजेंडा' रेटणं वाटतं हेही आहेच.
हल्ली फक्त मला 'आत्मपॅम्प्लेट' या मराठी चित्रपटात सर्वधर्मसमभाव याअंतर्गत जे काही दाखवलं होतं तेवढं सगळं मनापासून आवडलं होतं. अकृत्रिम वाटलं होतं, मांडणी सहज होती. बाकी ईन-जनरल बोलायचं झालं तर 'क्रिएटिव्हिटी डेडएन्ड' आला आहे. शोलेचे जसे हजारो 'स्पूफ' बनून त्यात आता नाविन्यपूर्ण काही वाटत नाही तसे. चित्रपटात नाही, 'स्पूफ' मधे.
नुकताच विकी कौशल आणि मानुषी छिल्लरचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली ' येऊन गेला आहे. बहुतेक मी एकटीनेच पाहिला आहे. त्याने तर सर्वधर्मसमभाव फेकून मारला आहे, संपूर्ण चित्रपटच पिळून काढतो. तुम्ही एक प्रेक्षक म्हणून या संकल्पना 'आऊटग्रो' झाला असाल तर फारच बोअर होते.
तुमच्यामुळे पुन्हा 'ग्राऊंडहॉग डे' बघेन असे वाटतेय.
तू एकटी नाहीयेस मी पण पाहिलाय
तू एकटी नाहीयेस मी पण पाहिलाय "द ग्रेट इंडियन फॅमिली" विकी कौशल चा एकही चित्रपट चुकवायचा नाही या नादात .
<<<त्याने तर सर्वधर्मसमभाव फेकून मारला आहे, संपूर्ण चित्रपटच पिळून काढतो. >>+100
द ग्रेट इंडियन फॅमिली मी
द ग्रेट इंडियन फॅमिली मी सुद्धा पाहिला आहे. काही भाग रोचक, काही आचरट, काही धाडसी तर शेवट आणखी आचरट असे काहीतरी मिक्स फिलिंग आलेले. नेमके आठवत नाही. पण मी चित्रपट पूर्ण बघितलेला म्हणजे अगदीच बंडल वाटला नसावा. कारण मला चित्रपट बंडल वाटायला सुरुवात झाली तर मी तिथेच सोडून देतो. तासभर वेळ इन्व्हेस्ट केल्यामुळे अजून तासभर फुकट घालवा आणि काहीतरी चांगले घडायची वाट बघा असे करत नाही. काहीतरी आवडले असणार (कदाचित चार चौघांपेक्षा हटके कथानक किंवा विकी कौशलचे कॅरेक्टर) म्हणून पूर्ण बघितला असणार.
नुकताच विकी कौशल आणि मानुषी
नुकताच विकी कौशल आणि मानुषी छिल्लरचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली ' येऊन गेला आहे. बहुतेक मी एकटीनेच पाहिला आहे. त्याने तर सर्वधर्मसमभाव फेकून मारला आहे, संपूर्ण चित्रपटच पिळून काढतो.
>>
याचा डायरेक्टर विजय कृष्ण आचार्य (उर्फ व्हिक्टर) होता.
या साहेबांच्या खात्यावर टशन, ठग्ज ऑफ हिंदुस्तान, धूम 3 वगैरे रत्ने जमा असल्याने हा सिनेमा इग्नोर मारला होता...
'ग्राऊंडहॉग डे' - हा सिनेमा
'ग्राऊंडहॉग डे' - हा सिनेमा माहिती नव्हता. (तरी मी सिनेमाप्रेमी आहे... माझं पॅकेज काढू नका
)
आता बघणार, प्राइमवर आहे असं गूगल सांगतंय.
काल नूतन चा वाढदिवस होता.
.
भूचूमा बद्दल अनुमोदन अस्मिता.
भूचूमा बद्दल अनुमोदन अस्मिता..किती रटाळ आहे सिनेमा....वैताग नुसता..
ललिता-प्रीति
...
ग्राऊंडहॉग डे' - हा सिनेमा
ग्राऊंडहॉग डे' - हा सिनेमा माहिती नव्हता. (तरी मी सिनेमाप्रेमी आहे... माझं पॅकेज काढू नका Lol ) >>
नक्की बघ! मस्त आहे. बिल मरे ने भारी काम केले आहे. आणि त्यात त्यांनी स्पेसिफिक ग्राऊंडहॉग डे घेतला आहे त्यामुळे रिपिटेशन ची मजा येते.
ग्राऊंडहॉग प्राईमवर रेंट करा
ग्राऊंडहॉग प्राईमवर रेंट करा सांगताहेत. मग नाद सोडला.
त्या बदली डर्टी रॉटन स्काऊंड्रल्स पाहिला. एका शब्दात - मजा आली.
मीही विकी कौशल मुळेच पाहिला
मीही विकी कौशल मुळेच पाहिला होता. मानुषी छिल्लर लक्षात राहत नाही. हा व्हिक्टर म्हणजे 'हात लावीन तेथे सोने' दिसतोय. चित्रपटातील सर्वधर्मसमभाव हा जोवर पात्रांमधून ऑरगॅनिकली, सहज किंवा अकृत्रिमपणे मांडला जात नाही तोवर त्या मागचा दृष्टिकोन उदात्तीकरण, व्हिलनायझेशन, आऊटसायडर ट्रिटमेंट- एकुणात कुणाला तरी कमी/उच्च लेखणारा राहील, जो खरेतर सर्वधर्मसमभावाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासणारा असेल. असो. 'भूल चूक माफ' मधे दुसऱ्याही शेकडो कंटाळवाण्या गोष्टी आहेत. त्यापैकी हेही एक..!
व्हिक्टर म्हणजे 'हात लावीन
व्हिक्टर म्हणजे 'हात लावीन तेथे सोने' दिसतोय
>>
धूम 1 आणि 2 चा लेखक होता तिथपर्यंत ठीक होता
पुढे काही काळ यशराज मधे मेन डिसिजन मेकिंग पॅनल वर होता (सोबत हबीब फैजल अन् मनीष शर्मा पण होते) या काळातच यशराज ची मेजर अधोगती झाली...
धूम 1 आणि 2 चा लेखक होता
धूम 1 आणि 2 चा लेखक होता तिथपर्यंत ठीक होता >> हेच म्हणणार होतो.
पण त्यात कदाचित संजय गढवीचा हात अधिक असेल.
या काळातच यशराज ची मेजर अधोगती झाली...
काय अभ्यास काय अभ्यास !! +१
भूचुमा अर्धा झालाय.
भूचुमा अर्धा झालाय.
फारच टिपिकल टेम्प्लेट आहे.
एक निमशहरी गाव असतं, त्यात एक रारा किंवा आखु असतात. त्यांची एक छावि असते. मग त्यांच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम होतो. वाटेत एक आयटम साँग होतं. शेवटी प्रॉब्लेम सॉल्व होतो.
गाव, छावी, प्रॉब्लेम, आयटम गर्ल अन् सोल्युशन याची परम्युटेशन कॉम्बिनेशन करून काढतात पिक्चर...
अँकी, मस्त पोस्टस्..
अँकी, मस्त पोस्टस्..
जाट पूर्ण केला. बरेच दिवसांनी
जाट पूर्ण केला. बरेच दिवसांनी सनी देओलचा मस्त मारधाड पट पाहिला. जो पर्यंत सनी पडद्यावर आहे तोपर्यंत पिक्चर भारी चालू असतो. विलन म्हणून हुडा ला घेतले आहे. तो शोभला आहे जाफना टायगरचा सैनिक आणि मग भारतात येऊन झालेला गुंड. काही काही प्रसंग ज्यात त्याने केलेला अत्याचार दाखवलेला आहे ते बटबटीत झालेले आहेत. मला काय फार तेलुगू पिक्चर ची सवय नाही त्यामुळे मी फॉरवर्ड केले ते.
पण सनीचे सीन्स आणि त्याची मारामारी भारी आहे. त्याला काही टाळ्याखाऊ डायलॉग पण आहेत. मधला १५-२० मिनिटे फॉरवर्ड केले तर मला आवडला.
जर फार स्टोरी हवी असेल, मारधाड आवडत नसेल, सुजाण प्रेक्षक असाल तर या चित्रपटाच्या वाटे जाऊ नका.
Pages