चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<^गुण, बुद्धी, रूप, प्रतिभा, सुडौल बांधा, काहीकाही नाही पण शून्य आत्मभान व त्यामुळे येणाऱ्या दुर्दम्य आत्मविश्वासाचे साक्षात दैवी रूप म्हणजे राकु> हे महान आहे.

साधनाचे लूक्स आवडतात. बाय द वे, ‘आजकल तेरे मेरे प्यार के’ चर्चेमधल्या मुमताजच्या साडीची फॅशन ऍक्चुअली साधनाने आणलीय बरं का.>>>>>

दोन्हीकडे कपडेपट भानू अथैय्याने सांभाळलाय. वक्तने बरेच ट्रेंड्स आणले. त्यातला कपडेपटही पहिल्यांदाच तसा डिजाईन केला गेला. टाईट चुडीदार आणि वर कुर्ता/कुर्ती पहिल्यांदा ह्या चित्रपटात दिसले आणि आजही फॅशनमध्ये आहेत.

भानू अथैयाने चित्रपटांसाठी आयकॉनिक ड्रेसेस डिजाईन केले. यश चोप्राच्या जुन्या हिरोईनीनचे कपडे तिनेच डिजाईन केले.
तिने आम्रपालीचे जे ड्रेस्सेस बनवले त्यांची भ्रष्ट नक्कल अजुनही होते. आम्रपालीचे ड्रेस तिने अजंठा मधल्या चित्रांवरुन बनवले होते.

टाईट चुडीदार आणि वर कुर्ता/कुर्ती पहिल्यांदा ह्या चित्रपटात दिसले आणि आजही फॅशनमध्ये आहेत.
>>>
मी कुठेतरी वाचलंय की चुडीदार आणि फिटेड स्लीवलेस कुर्ती ही साधनाची आयडीआ होती आणि चोप्रा स्कॅंडलाईझ्ड झाले होते. पण साधनाच्या चवळीची शेंग फिगरला ती स्टाईल सुट झाली. बाकी हिरॉईन्स ओसंडून वहायच्या त्यात.

तिचा जनरल फॅशन सेन्स चांगला होता. आप आये बहार आई सारख्या टुकार पिक्चरमध्ये तिने ब्लॅक लॉंग स्लीव टॉप, हाउंडस् टूथ शॉर्ट स्कर्ट व तसाच मफलर छान कॅरी केलाय.

आम्रपाली ड्रेस भानु अथय्यांचं क्रिएशन हे माहित नव्हतं. ‘नील गगन की छांव मे’मधला वैजयंती मालाचा लूक कसला कातिल आहे.

वक्त, आम्रपाली दोन्ही १९६६ चे. वैजयंतीमाला काय प्रचंड सुंदर दिसते यात. चार पाच ड्रेसेस आहेत पण जबरदस्त बनलेत. तुम्हे याद करते करतेचा ड्रेसही सुण्दर आहे. सुरवातीच्या एका दृश्यात रस्ट कलर कॉटनचा ड्रेस आहे, अगदी साधा. पण जबरदस्त शोभतो तिला.

“ असल्या "एण्ट्र्या" बच्चनला लागत नसत.” - इथवर येईपर्यंत सुरूवातीच्या अंदाजाचं खात्रीत रुपांतर झालं - ही पोस्ट फा ची च असणार. Happy बच्चन आणि फ्रेंड्सवर इतक्या तन्मयतेनं माबो वर तरी इतर कुणीही लिहीत नाही. सगळ्या पोस्टला +१

राकु विषयीचं ऑब्झर्वेशन कमाल आहे!! Happy

काला पत्थर प्रचंड आवडलेला . एकेक सीन, डायलॉग पैसा वसूल ! पण त्यावेळी हे सिनेमे थिएटर मधेच असल्याने २ /३ वेळा पहिले पण नंतर विस्मरणात गेले .. आता परत पहावासा वाटतोय . एक डायलॉग अजूनही आठवतो . अमिताभला बरेच लागलेले असते आणि डॉक्टर राखी बेहोषीचे (बहुदा लोकल ऍनास्थेशिया ) इंजेकशन देईन म्हणतो आणि अमिताभ म्हणतो पेन इज माय डेस्टिनी. त्यावेळी अगदी बदाम बदाम झाले होते .
https://www.youtube.com/watch?v=xboG7NcQssg

थॅंक्यू सर्वांना. Happy
'काला पत्थर' फॅन्सनो पाहायचा असेल तर प्राईमवर आहे. प्राईम नसेल तर यूट्यूब वर 'कालीचरण' बघायचे ठरले आहे. पण दोन्ही पैकी एक तरी बघाच, नैतर तुम्ही चिकवा प्रेमी नै म्हणे. Happy

मी उगा आप्लं पॅसेंजर, ब्लड डायमंड, ट्रान्सेन्डन्स बघत बसले. खरी मजा तर 'काला पत्थर' बघतानाच आली. शेवटी हॉलिवूडच्या पिझ्झा बर्गरला हिंदी सिनेमाच्या ठेचा भाकरीची सर नाही. Wink Happy

माझेमन आणि साधना, कपडेपट माझ्यासाठी अजिबात कुकातकुका नाही. माझं हिरवनीच्या कपड्यांकडे लहानपणापासून लक्ष असायचं. वाचतेय. Happy
वैजयंतीमालाच्या आम्रपाली लूक ला मम , शिवाय अतिशय सुंदर व कमनीय दिसते ह्यालाही अनुमोदन. साधना शेलाटी होती, तिला सलवार कमीज छान दिसायचे ह्यालाही मम. नुसतीच शेलाटी नाही तर उंचही होती. मुमताजची भगवी साडीही आठवली व तिने आणलेला ट्रेंडही.

मुमताज खुप सुरेख कपडे घालायची. तिच्या उजव्या हातावर काळ्या पट्ट्याचे घड्याळ कायम असे.

बबिता भयंकर ड्रेस घालायची. ती स्वतःच ड्रेसेस बनवायची असा मला शक आहे. Happy

आशा पारेखचे काही कपडे, विषेशतः नृत्याचे, तिच्या बहिणीने का अजुन कोणी नातलगाने डिजाईन केलेले असत. ते भयंकर असायचे. एरवी तिचे कपडे बर्‍यापैकी असत.

शर्मिला कायम पाठीवर बो असलेले ब्लाऊज घालायची तिच्या साड्या खुप सुंदर असायच्या. नटवी बाहुली होती.

“ बबिता भयंकर ड्रेस घालायची” - ऑब्जेक्शन मायलॉर्ड!! बबिताच्या बाबतीत ‘भयंकर’ हे विशेषण फक्त ड्रेसपुरता मर्यादित नाहीये. Happy Wink

>>>>> बबिताच्या बाबतीत ‘भयंकर’ हे विशेषण फक्त ड्रेसपुरता मर्यादित नाहीये. Happy Wink
होय मेक अप ही.
>>>>>>अमिताभ म्हणतो पेन इज माय डेस्टिनी. त्यावेळी अगदी बदाम बदाम झाले होते .
टॉल डार्क ब्रुडी हिरो? Happy
>>>>>>आम्रपाली ड्रेस भानु अथय्यांचं क्रिएशन हे माहित नव्हतं.
सुंदर. वैजयंती माला व्हॉलप्शस दिसते.
>>>>>>>शेवटी हॉलिवूडच्या पिझ्झा बर्गरला हिंदी सिनेमाच्या ठेचा भाकरीची सर नाही. Wink Happy
हाहाहा

बबिता भयंकर ड्रेस घालायची.
>>> बबिता बरेचदा कपडेपटासाठी साधनाची कॉपी करायची. पण ती निर्गुण, निराकार असल्याने साधनावर उठून दिसणाऱ्या लुक्सची माती करायची. तिचे विभ्रम वेडगळ वाटायचे.

शर्मिला कायम पाठीवर बो असलेले ब्लाऊज घालायची तिच्या साड्या खुप सुंदर असायच्या.
>>> तिचा ‘रात के हमसफर’ गाण्यातला मिडनाईट ब्लू साडी, स्लीव्हलेस ब्लाऊज, नेकलेसवाला लूक भारतिय तरीही ग्लॅम वाटतो.

मुमताज खुप सुरेख कपडे घालायची.....
बबिता भयंकर ड्रेस घालायची......
आशा पारेखचे काही कपडे, विषेशतः .......
शर्मिला कायम पाठीवर बो असलेले .....

गंमत म्हणजे , ही पोस्ट साधना ने लिहीली आहे. Wink

दोघींमधल्या अबोल्याबद्दल युट्यूबवर सर्च दिला तर बरेच व्हिडीओज मिळतील.
६० च्या दशकात असायचे ना सिनेमे, गैर समज झाला कि शेवटच्या रिळातच तो दूर व्हायचा. सेम.

बबिता बरेचदा कपडेपटासाठी साधनाची कॉपी करायची. पण ती निर्गुण, निराकार असल्याने साधनावर उठून दिसणाऱ्या लुक्सची माती करायची. तिचे विभ्रम वेडगळ वाटायचे. >>> अगदी अगदी. साधनाची झाक तिच्या दिसण्यात का दिसते असा लहानपणी प्रश्न पडलेला, अर्थात साधना ती साधनाच पण साम्य होतंच, खूप वर्षांनी समजलं की त्या चुलत बहीणी आहेत, असं उत्तर मिळालं.

इथल्या साधनाची माहीतीपूर्ण पोस्ट वाचून भानु अथ्थैय्याबद्द्लचा आदर अजूनच वाढला. थँक्स साधना.

कपडे पट चर्चा मस्त, बबिताचा एकही उल्लेखनिय सिनेमा आठवत नाही..
आशा पारेखने कुठल्याशा गाण्यात पुर्वी नवर्‍याना लग्नात भुवयाच्या वर डॉट काढत तशा टिकल्या लावल्या होत्या...हॉरिबल दिसत होत ते.
सापडल गाण
आन मिलो सजना https://www.youtube.com/watch?v=yyKkyFYskpo

“ बबिता भयंकर ड्रेस घालायची” - ऑब्जेक्शन मायलॉर्ड!! बबिताच्या बाबतीत ‘भयंकर’ हे विशेषण फक्त ड्रेसपुरता मर्यादित नाहीये. >>> हेहे…पुर्ण सहमत. करिष्माचा कपडेपट सुरवातीला तिने पाहिलेला असा शक आहे. करिष्माच्या सुदैवाने ती लवकर बाहेर पडली त्यातुन व तिला मनिष मल्होत्रा मिळाला.

स्वस्ती Happy Happy

बबिताचा एकही उल्लेखनिय सिनेमा आठवत नाही..>>>>> सुरवातीचे काही असावेत. जे तिच्यामुळे नाहीत तर इतरांमुळे सुसह्य झालेत. कब क्यु कहा मध्ये छान दिसलीय. फर्जमध्ये इन्दिअन जेम्स बाँड जितेंद्रची बाँड गर्ल म्हणुन छान दिसलीय. नंतर स्टार झाल्यावर सगळे बिघडले. Happy

बबिताचा जुना 'हसीना मान जायेगी' आहे. त्यात शशी कपूरचा डबल रोल होता. एक बिघडलेला आणि एक अभ्यासू, सभ्य व देशावर प्रेम असणारा. दोघेही एकाच कॉलेजमधे होते, अभ्यासू अभ्यास करायचा व मनोमन प्रेम करायचा. बिघडलेला फिजिकली मागेमागे जाऊन प्रेम व्यक्त करायचा.

बबिताचे चांगल्या शशीशी लग्न होते व दोघेही शशी फौजी होतात. पण शितलीच्या मालिकेतल्याप्रमाणे 'लाखात एक माझा फौजी' न होता, दोघेही एकाच फौजेत तरफडतात. कोणतातरी एक शहीद होतो. मग तो आल्यावर बबिता जे विव्हळते, विचारू नका. काहीच येत नव्हते तिला. छान तयार होऊन ठुमकत जायची उगाच, नाही तर कांगावा करायची. आता मेलेला तो चांगला असं प्रूव्ह करण्यासाठी बबिताअक्का 'बांगड्या काय फोड, कुंकू काय पुस' सुरू'करतात. पण दोघेही जिवंत- टुणटुणीत आणि हिला कंटाळलेले निघतात. बबिताच बोअर असल्याने खरेतर - वाईट शशीचे चांगले होते, चांगल्या शशीचे वाईट होते. Proud

सारांश - बंडल पिक्चर आहे. मी पाहिला आहे. त्यात 'बेखुदीमें सनम उठ गये जो कदम, आगये आगये आगये पास हम" हे एक बरं गाणं आहे.

Pages