Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
जियो अस्मिता
जियो अस्मिता
मी बघितलेला नाहीये पण वाईट शशीचं कसं चांगलं होतं आणि चांगल्या शशीचं वाईट कसं होतं हे दाखवून दिलयाने.
एकंदरीत बबिता लकी आहे, माबोकर आठवून आठवून तिच्या वर कसं का होईना लिहितायेत, वाचून डोळे भरून येतील तिचे.
बबितावर चिकवाची गाडी कशी
बबितावर चिकवाची गाडी कशी घसरली नीट कळाले नाही पण मला आता कोणत्याही चालत्या गाडीत उडी मारता येत आहे.
ह मा जा मीही पाहिलाय पण हा
ह मा जा मीही पाहिलाय पण हा फौजी उत्तरार्ध आठवत नाहीय अजिबात. माझ्या लाडक्या शशीबाबासाठी परत पाहिनही. ओ दिलबर जानीये हे शशीचे गोड गाणेही बर्यापैकी गाजले. बेखुदी मे सनम तर बेस्टच आहे.
जुळे नसतानाही सारखे दिसायला असलेले दोघे असलेला ह मा जा पहिला व शेवटचा.
आयी मिलनकी बेला हा जुळे असलेले पण सारखे दिसत नसलेले भाउ असलेला पहिला व शेवटचा. नाहीतर जुळे म्हणजे डबल रोलच.
बेखुदीमे सनम सुदैवाने फक्त
बेखुदीमे सनम सुदैवाने फक्त ऐकलेय. तुम जियो हजारो साल मधलं तिचं हसु कृत्रिम आहे. आणि तिचा कुठलाही पिक्चर तिच्यासाठी पाहिल्याचं आठवत नाही.
मला कुठल्याही पिक्चर च्या
मला कुठल्याही पिक्चर च्या हिरॉईन्स कधी लक्शात राहिल्या नाहीत. माझ्यासाठी बाईने ड्रेस बदलला की बाई बदलली असेच असायचे. त्यामुळे कसे लक्शात्र राहणार? त्यातल्या त्यात हेमा मालिनी ओळखू यायची
हसीना मान जायेगी देव साधना
हसीना मान जायेगी देव साधना नंदाच्या हम दोनोवर सूड उगवण्यासाठी काढला का?
बेखुदीमें सनम मला भयंकर बोअर वाटतं. पाय ओढत ओढत म्हटल्यासारखं.
हसीना मान जायेगी ची स्टोरी
हसीना मान जायेगी ची स्टोरी देव आनंदच्या हम दोनो आणि राजीव कपूरच्या आसमान सारखी वाटतेय.
असाच आणखी एक होता, पण सर्च देण्यासाठी कुठलंच नाव लक्षात नाही.
प्रेम रतन धन पायो ची पण बहुतेक हीच स्टोरी आहे.
पण मला आता कोणत्याही चालत्या
पण मला आता कोणत्याही चालत्या गाडीत उडी मारता येत आहे. >>>
बेखुदी में सनम - या गाण्यात लताने सुमन क.स्टाइल गायन केलंय असं मला कायम वाटतं.
पाय ओढत ओढत म्हटल्यासारखं. >>>
तसं 'हजार राहें मुड के देखी' या गाण्यात 'हजार राहें'नंतरचा म्युझिक पीस आहे तो होडी वल्हवल्यासारखा वाटतो असा आमच्या घरात विनोद व्हायचा.
हजार राहे मुडके देखी….. खेचत
हजार राहे मुडके देखी….. खेचत खेचत गायलेय… आणि पुढे ती किशोरची एपिक ओळ आली की माझे नेहमी डोके फिरते
उन्हे ये जिद थी के हम बुलाये
हमे ये उम्मिद के वो पुकारे…
तीची जिद, ह्याची मात्र उम्मिद… गुलझार पण ना…
बेखुदीमे सनम रफीचं आहे ना? का
बेखुदीमे सनम रफीचं आहे ना? का माझे कान वाजत होते? हजार राहे पण आवडायचं. मग शबाना आझमीचा आंबट चेहरा बघितल्यावर हिरमोड झाला. आणि आता तुम्ही लोकांनी पिसं काढली. त्रिवार णिषेद !!!
रफी व लताचेच आहे आणि खुप
रफी व लताचेच आहे आणि खुप सुंदर आहे.
माम, मी शशीबाबासाठी तिला सहन
माम, मी शशीबाबासाठी तिला सहन करते बेखुदी मे सनम गाण्यात. तो खुप स्मार्ट दिसतो. ती एकदा सांता बनावे की नाईट सुट घालावा ह्या प्रश्नात अडकुन दोन्ही करते, गुलमर्गला झिरमिळ्याची ओढणी घेते. जाऊदे करुदे कायते, कोण बघतंय तिला….
काला पथ्थर पाहिला. वर कोणी लेमन सोडा व ओन्गे पोन्गे लिहिलेय त्याला सा. न. काय मेमरी आहे.
राखीचे नाव सुधा सेन. जबरदस्त सुंदर कोलकाता कॉटन साड्या नेसलीय. पांढर्याच आहेत जास्त करुन पण एका प्रसंगात फिकट पोपटी नेसलीय ऊसने मेरा दिल छिन लिया….
ती एकदा सांता बनावे की नाईट
ती एकदा सांता बनावे की नाईट सुट घालावा ह्या प्रश्नात अडकुन दोन्ही करते,
>>> मग बघितलंय हे गाणं मी. काय घातलंय या बयेने असं थक्क पण झालेय.
मला चेक करावसं वाटलेलं की प्लेबॉयच्या बनीसारखं पाठी एखादं गुबगुबीत शेपूट लावलंय का.
>>>>>>>>>>>>तीची जिद, ह्याची
>>>>>>>>>>>>तीची जिद, ह्याची मात्र उम्मिद… गुलझार पण ना…
वाह!! छान नीरीक्षण.
अस्मिताने 'ह मा जा' ची स्टोरी लिहीलेली आहे त्यामुळे बघावासा वाटतोय. शशी हे दुसरे आकर्षण.
काल कब क्यु और कहा बघायला
काल कब क्यु और कहा बघायला सुरवात केली आणि पाच मिनिटात सोडुन दिला. हा मी घराच्या गॅलरीत उभे राहुन गणेशित्सवात बघितला होता. अर्थात नंतर विसरले हे सांगायला नकोच. पण हल्ली पाच सहा महिन्यांपुर्वी पाहिलेला हे आठवले आणि रस संपला. धरमचे एक गाणे पाहिले - दिल तो दिल है… त्याच्याआधीचा सिन म्हणजे आचरटपणाचा कळस आहे.
धर्मेंद्रने या गाण्यात जो उभ्या जाड पट्ट्याण्चा शॉर्ट शर्ट घातलाय तो दुसर्या चित्रपटातही पाहिलाय असा शक आहे.
धर्मेंद्रचा कपडेपट विलोभनिय असे. तो खुप वेळा सिल्कचे प्रिंटेड शर्ट घाली जे त्याला खुप शोभत. शशी कपुरही सकट सगळ्या कपुरांचे कपडे उत्तम असत.
राजेश खन्ना दिसयला हँडसम पण कपडेपट तितका खास नाही. तो त्याची एकच स्टाईल सगळ्या चित्रपटात वापरे, त्याला शोभायची पण वैविध्य हवे ना बाबा. त्याने चेहरा सोडुन बाकी स्वतःकडे दुर्लक्ष केले, खुप लवकर बेढब झाला. कब क्यु और कहा मध्ये धरम ३८ चा आहे पण उत्तम फिट्नेस. त्या वेळच्या फॅशनप्रमाणे पोटाच्या ढेरीवर चढवलेली पँट आताच्या डोळ्यांना खटकते पण बाकी ठिक.
कब क्यु… सोडुन दिला आणि मजबुर पाहिला. अमिताभचे काम किर्तीला साजेसेच पण ते सोडता nothing to write home about असे वाटले. कपडेपट, लोकेशन कशातही काही खास वाटले नाही. दोन गाणी बरी आहेत. टिवीवर पाहिला तेव्हा रडुन रडुन डोळे सुजले होते. आता काही वाटत नाही.
सर्व प्रकारचे कपडे उत्तम
सर्व प्रकारचे कपडे उत्तम carry करु शकणार्या ज्या काही मोजक्या अभिनेत्री होत्या त्यात साधना नक्कीच येते. साध्या साड्या, बंजारा लूक, राजकुमारी लूक, ग्लमरस लूक, वेस्टर्न कपडे सगळं काही तिला छान शोभायचं. अजून मुमताज आणि शर्मिला टागोर त्यात येतील. मधुबाला ही अजून एक
साधनाला वक्त स्टाईल कुर्ती चुडीदार चांगला दिसायचा. आशा पारेख आणि नंदाने तिची कॉपी केली पण त्यांच्यावर ते तंग कपडे अजिबात शोभायचे नाहीत.
साधनाच्या दुर्दैवाने तिच्या थायऱोईडच्या दुखण्याने तिच्या चेहर्यात आणि डोळ्यांवर जाणवेल इतका बदल झाला त्यामुळे कारकीर्द पटकन संपली.
१९६७ नंतरच्या सर्व चित्रपटांमधे तिचा चेहरा आधीपेक्षा खूप वेगळा दिसतो.
नेटफ्लिक्स वर सिकंदर आलाय.
नेटफ्लिक्स वर सिकंदर आलाय. आधी वाटलं थेट ओटीटी रिलीज , ते ही सलमानचा सिनेमा कसं काय ?
गुगळल्यावर मार्च मधे येऊन आपटलाय हे समजलं. का आपटला हे पहिल्या पाचच मिनिटात समजलं. विमानात हाणामारी कोण करतं ?
हाणामारी चालू झाल्यावर एअर होस्टेस टर्ब्युलन्स येणार आहे , बेल्ट बांधा सांगते. हाणामारी संपल्यावर बेल्ट सोडा ही सूचनाही करते.
अतर्क्य च्या पुढे काही शब्द असेल तर तो ही फिका पडेल. सलमानचं दगडी शरीर, त्याहून दगडी अभिनय आणि चिंपाझी सारखा आवाज काढून केलेली डायलॉगबाजी हे सहन करणार्या त्याच्या फॅन्सचा सत्कार करण्यासाठी एक गटग ठेवलं पाहीजे. जागा शोभेल अशी सजेस्ट करा.
ओ मेरी जोहराजबी गाण्यात रश्मिका काळ्या ड्रेस मधे छान दिसली आहे.
रेडीओ वर हे गाणं यायचं तेव्हां इरीटेट करायचं. यातल आहे हे माहिती नव्हतं.
सलमानचं दगडी शरीर, त्याहून
सलमानचं दगडी शरीर, त्याहून दगडी अभिनय आणि चिंपाझी सारखा आवाज काढून केलेली डायलॉगबाजी हे सहन करणार्या त्याच्या फॅन्सचा सत्कार करण्यासाठी एक गटग ठेवलं पाहीजे.

>>>>>
जागा शोभेल अशी सजेस्ट करा.
जागा शोभेल अशी सजेस्ट करा.
>>
पनवेल चं फार्म हाऊस
रानभुली
रानभुली
हे पाहून आता हा पिक्चर पाहायची हुक्की आली आहे. गेले ३-४ दिवस जे यूट्यूबमंथन केले त्यात अशी साइड-रत्ने निघाली. इतक्या अंधारात इतका अचूक नेम साधायला काय अभ्यास असेल फिजिक्सचा!
https://www.youtube.com/watch?v=GZaqY21JDEk&t=1579s
लिंक उघडल्यावर 'द ट्रेन'
लिंक उघडल्यावर 'द ट्रेन' पाहिलं आणि तू कशाचा रेफ देत असशील ते कळलंच
आम्ही मध्यंतरी पाहिला होता हा पिक्चर. पुन्हा बघायला हवा 

मी अजूनही आँखे गुलाबी का असतील हे कोडं सोडवू शकले नाहीये
मी अजूनही आँखे गुलाबी का
मी अजूनही आँखे गुलाबी का असतील हे कोडं सोडवू शकले नाहीये
>>> डोळे आले असतील गं…
डोळे आले असतील गं >> बरोबरे
डोळे आले असतील गं >>
बरोबरे
माझेमन अगं मग त्याचं दिल
माझेमन
अगं मग त्याचं दिल शराबी कशापायी? त्याची पण आँखें गुलाबी व्हायला हवीत!
प्रेमात सगळं जग गुलाबी दिसतं
प्रेमात सगळं जग गुलाबी दिसतं म्हणे
ज्जे ब्बात..
ज्जे ब्बात..
strawberry आंखे पण असतात
strawberry आंखे पण असतात म्हणे!
सपने मधले 'strawberry आंखे सोचती क्या है?' किंवा हमसे है मुकाबला मधलं 'लैला strawberry जैसी आंखे'
strawberry ची उपमा रंगाला आहे का आकाराला आहे हा प्रश्न आहे कारण दोन्हीही नॉर्मल डोळ्यांना लागू होत नाहीत
आज धर्मेंद्र व मीनाकुमारीचा
आज धर्मेंद्र व मीनाकुमारीचा ‘फुल और पथ्थर’ पाहिला
(१९६६). तेव्हा कथेत नाविन्य वाटले असेल पण नंतर अजुन हजार चित्रपट याच कथेवर आल्यामुळे आज चित्रपट बोअर वाटला. गाणी छान आहेत पण गाजली नाहीत बहुधा. एकही गाणे ऐकलेले नाही. आईवडलांचे प्रेमळ छत्र जन्मापासुनच नसल्याने वाममार्गाला लागलेला हिरो, सदगुणांचा पुतळा असलेली हिरोईन जिच्या प्रेमामुळे तो उजव्या मार्गाला लागायच्या प्रयत्नात आणि यात खोडा घालणारे त्याचे वाममार्गावरचे जुने साथीदार असा सगळा मसाला. फॉर अ चेंज, इफ्तिखार यात विलन लोकांच्या बाजुने आहे. पण विलनगिरी करायला त्याने नकार दिला असावा. त्यामुळे बॉसच्या हॉटेलात खुर्ची उबवत बसायचे आणि बॉस, ये आ गया, वो आ गया असले गेट किपर डायलॉग्स मारायचे इतकेच काम आहे. मला शेवटपर्यंत आशा होती की हा खुफिया पोलिस असेल म्हणुन. पण हाय रे दैवा….
पुर्ण चित्रपट स्टुडिओत चित्रित केलाय त्यामुळे त्या बाजुने बोलण्यासारखे काहीही नाही. रात्रीच्या वेळी घराबाहेर जायची हिरोची वाट धन्य आहे. दरवाजातुन बाहेर पडला असता तरी कोणी हटकले नसते. कपडेपटावर जास्त खर्च केलाच नाहीय. मीनाकुमारी विधवा असल्याने सुरबातीपासुन शेवटपर्यंत एकाच अतीपारदर्शक पांढर्या साडीत. शशिकलेने वेस्टर्न गाऊन्स बगैरे घातलेत, त्यात फारसे नेत्रदिपक काहीही नाही. बाकी जनतेने घरचेच कपडे घातलेत बहुतेक. इतका बजेटचा अंधार असुनही चित्रपटाने भरपुर कमाई केली.
फुल और पथ्थरबद्दल खुप काही वाचले होते. धर्मेन्द्रने स्टारडम मिळवण्यासाठी मीनाकुमारीचा वापर करुन नंतर डिच केले हेही खुपदा वाचले होते. आणि मीनाकुमारीचे एकुण बोजडत्व पाहता ती धर्मेंद्राच्या दुप्पट वयाची असेल आणि त्याने योग्य वेळ येताच म्हातारीला डिच केले असणार असा मी समज करुन घेतला होता.
पण ती त्याच्यापेक्षा फक्त २ बर्षांनीच मोठी आहे.
पन्चविशीतच ती चाळीशीची दिसायला लागली होती तरी लिड रोल्स मिळत होते. कसे काय देव जाणे. मला तिचे सुरवातीचे चित्रपट सोडल्यास नंतर कधीही आवडली नाही.
ते असो. धर्मेन्द्रला या चित्रपटाने स्टारडम दिले असे विकि म्हणतोय. १९६६ खुप लकी ठरले त्याच्यासाठी. त्याचे ९ चित्रपट त्या वर्षी आले आणि जवळपास सगळेच हिट.
१९६८ मध्ये या दोघांचा बहारोंकी मंझिल आला होता. त्यात ती बरीच बरी दिसलीय. बहुतेक डायटिंग वगैरे केले असेल, थोडीफार शेपमध्ये दिसते आणि मेकप खुप चांगला आहे. फु औ प मध्ये विधवेच्या मेकपमध्ये चेहर्यावर पांढरा मुखवटा चिकटवल्यासारखा वाटतो. तो तसा कायमच असायचा तिच्या चेहर्यावर. विधवा असेल तर पांढरा, अन्य वेळी गुलाबी.
मसाला. फॉर अ चेंज, इफ्तिखार
मसाला. फॉर अ चेंज, इफ्तिखार यात विलन लोकांच्या बाजुने आहे. >> खेल खेल मे मधे पण आहे तसच.
हे पाहून आता हा पिक्चर
हे पाहून आता हा पिक्चर पाहायची हुक्की आली आहे >> चुकूनही पाहू नये असा पिक्चर आहे. विशेष म्हणजे हा बकवास पिक्चर रीमेक आहे का अशी चर्चा नेटवर आहे. ओरिजिनल जरी असला तरी साऊथ मधे नायक राजा, मुखिया, सरपंच इत्यादी असतो आणि गावासाठी खूप खस्ता खात असतो, त्यामुळं त्याचाच कायदा चालत असतो त्या छापाच्या पिक्चरमधला ओरिजिनल आहे. यादो कि बारातचा हरवले सापडले फॉर्म्युला मनमोहन देसाईंनी चोरला नाही असा वाद असावा तसला वाद आहे.
ती क्लिप भारी आहे

यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागते तेव्हां अशी रत्न मिळतात
बाकि, जुन्या पिक्चर्सच्या पोस्ट मस्त माहितीपूर्ण आहेत. धर्मेंद्रचा उभ्या रेघांचा शर्ट मी पण दोन तीन गाण्यात पाहिल्यसारखं वाटतंय.
Pages