चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रानभुली, सलमानवरची पोस्ट Lol
रमड, सही पकडे है. संसर्गजन्य असतं डोळे येणं, दिलाला शराबी व्हायला काय झाले. Happy
चीकू, या आधीची कपडेपटाची व ही स्ट्रॉबेरी पोस्ट. Happy

@मीना कुमारी - मला खात्री नाही ती व्यसनी होती का नाही. नुसती ऐकीव माहिती आहे. व्यसनाने माणूस आपल्या वयापेक्षा मोठा दिसायला लागतो. जीभ जड होते, दात खराब होतात, डोळे व चेहऱ्यावरचा तरतरीतपणा जाऊन एक जडत्व येते. जेनेटिक फॅक्टरही आहे पण तुम्ही त्याची कशी वाट लावता हेही आहेच. तेच टॉम क्रूझ बघा. तो भरपूर पाणी पित असेल, जागरण करत नसेल, व्यायाम करत असेल. त्याचा जबडा पर्फेक्ट आहे अजूनही. त्याने दात, स्माईल पर्फेक्ट दिसते. वय दिसण्याचं पहिलं चिन्ह ओघळलेला चेहरा, दात आणि जबड्याची बिघडलेली ठेवण.

मी मिशन इम्पॉसिबल(५) पाहिला प्राईमवर. एकदम धमाल आणि एंगेजिंग आहे. ट्रेनचे सीन तर कमाल आहेत. किल्लीला फुल रेको कारण किल्लीभोवतीच फिरतो सिनेमा. Happy रमड आणि स्वस्ती दोघींनी दिलेल्या रेकोमुळे.

strawberry आंखे >>> चीकू यांनी फारच रोचक विषय इथे आणलेला असल्यामुळे आता हसणे अपरिहार्य झालेले आहे Lol
ते हल्ली चेहरा दिसू नये फोटो मधे म्हणून चेहर्‍यावर स्मायली वगैरे डकवतात तश्या तिच्या डोळ्यांच्या जागी स्ट्रॉबेर्‍या डकवल्या असतील Rofl

तेच टॉम क्रूझ बघा >>> लगेच बघते Proud कितीही वेळ बघू शकते त्याला. बचपनका क्रश.
या पोस्टसाठी तुला मोठ्ठा लाईक, अस्मिता!

मागची चारपाच पानी चर्चा फारच रंजक, रोचक आणि धमाल आहे. मजा आली वाचताना.

श्या! तो नारळ डोक्यावर पाडण्याचा सीन महान हहपुवा आहे.

बेखुदी मे सनम हे गाणं कदाचित मुळात ऐकायला छान वगैरे असेल पण अनेक ऑर्केस्ट्रामधे दळून दळून त्याचं पीठ झालंय त्यामुळे मला तरी ते अजिबात आवडत नाही.

अनेक ऑर्केस्ट्रामधे दळून दळून त्याचं पीठ झालंय त्यामुळे मला तरी ते अजिबात आवडत नाही. >>> एक्झॅक्टली! कोणीतरी हे लिहायची तीव्र गरज होती. मला फार पकल्याचे आठवते हे ऐकून ऐकून.

आणि चांगली उडत्या चालीची वगैरे गाणी सुरू असताना 'खास पब्लिक डिमांडवर' असं सांगून एकदम गळा काढतात ..... वैतागवाडी!

मला वाटतं ते ऑर्केस्ट्रावाल्यांसाठी 'इझी टू पर्फॉर्म' आहे. मधल्या पट्टीतच आहे बहुतेक गाणं, चढत नाही- उतरत नाही. गाणाऱ्याची परीक्षा पाहत नाही पण ऐकणाऱ्यांची पाहते. Lol

Happy Happy हो असेल.

आणि "साथ हम जो चले, मिटगये फासले" वगैरे "Duh!" किंवा कॅप्टन ऑब्व्हियस शब्दरचना काहींना आवडतही असेल. "सीद्धे शाळेपर्यंत जा. मग काय लागेल? शाळा" सारखे.

Lol बबितासाठी डम्ब डाऊन केलं असेल. त्या पातळीवर जाऊन श्रवणाचा आनंद घ्या, नाहीतर पलायनाचा घ्या. मात्र रसग्रहणाचा नको, सार्काझम बाहेर निघेल. वर मला ते 'आगये आगये' वरून राजतिलक चित्रपटातील लोक दरबारात येण्याआधीचे 'आगये आगये' आठवतेय. जवळजवळ पन्नास लोक येतात, प्रत्येकी एक 'आगये' ऐकावे लागते. त्यापेक्षा 'पन्नास लोक आगये' असं एकदाच म्हणायचे. Happy

आगये आगये >>> Rofl
पन्नास लोक आगये असं म्हटलं तर तुमच्या सहनशक्तीचा कस कसा लागणार? Proud

आता या आगये मुळे मला गंजस मधलं 'आनेवाले आगये' गाणं आठवायला लागलं Sad

बेखुदी मे सनम हे गाणं कदाचित मुळात ऐकायला छान वगैरे असेल पण अनेक ऑर्केस्ट्रामधे दळून दळून त्याचं पीठ झालंय त्यामुळे मला तरी ते अजिबात आवडत नाही >>> असा कोंडीफोडू धीटपणा हवा Proud

त्यापेक्षा 'पन्नास लोक आगये' असं एकदाच म्हणायचे. >>> Lol

कोंडीफोडू धीटपणा हवा >>> Lol

गंजस मधले ते गाणे अजिबात आठवत नाही. ते शोधले तर यूट्यूबला वाटेल मला इंटरेस्ट आहे आणि मग अजून तशी गाणी ते सजेस्ट करतील.

ते शोधले तर यूट्यूबला वाटेल मला इंटरेस्ट आहे >>> हो, तसंही यूट्यूब तुला एरवीच भलत्यासलत्या गोष्टी कारण नसताना सजेस्ट करतं त्यात याची भर नको Proud

तसंही यूट्यूब तुला एरवीच भलत्यासलत्या गोष्टी कारण नसताना सजेस्ट करतं त्यात याची भर नको >>> Lol

बबितासमोर जितू आला की सादरीकरण वेगळ्याच प्लेनवर जाते. इथे पाहा.
https://www.youtube.com/watch?v=oPBeeEidjmk&t=328s

इथे ते नृत्य दूरदर्शनवरच्या एकता का वृक्ष मधल्या नृत्यावर बेतलेले वाटते.
https://www.youtube.com/watch?v=MDUq13v6h-A&t=176s

इथे ते नृत्य दूरदर्शनवरच्या एकता का वृक्ष मधल्या नृत्यावर बेतलेले वाटते.
>>> Lol Lol

ज्यांना 'आ गये, आ गये' किंवा 'आनेवाले आ गये' मधून बाहेर निघायचे आहे त्या टॉम क्रूझच्या फॅन्ससाठी (आणि जेनिफर कॉनलीच्याही) 'टॉप गन'चे माझे अत्यंत आवडते गाणे. तरुणाई, एनर्जी आणि ताकद तिन्ही आहे यात. जिम मधे रिपीटावर असते. Happy
I ain't worried about it right now

फा Lol

अस्मिता, थँक्यू! दिल गार्डन गार्डन हो गया Happy

अस्मिता , माझ्या कडून पण thank you बर्का Happy
मागे सामो ने बहुतेक या गाण्याचा उल्लेख केला होता (की तूच??)
गाडी चिकवा वरून टॉकवा वर घसरण्याआधी पोस्ट आवरती घेते.

"साथ हम जो चले, मिटगये फासले" वगैरे "Duh!" किंवा कॅप्टन ऑब्व्हियस शब्दरचना काहींना आवडतही असेल. "सीद्धे शाळेपर्यंत जा. मग काय लागेल? शाळा" सारखे. >>> Rofl

हम तो तेरे आशिक है पाहिलं नव्हतं सुदैवाने आत्तापर्यंत. कुणालाही असे व्हिडीओ दाखवण्यापूर्वी वैधानिक इशारा तरी देत जा किमान…

एकता का वृक्ष
>> परफेक्ट. गाण्यातला बबिताचा लूकही त्यातल्या दोन पाय फुटलेल्या आईस्क्रीम कॅंडीसारख्या माणसांचा आहे.

टॉप गन म्हटलं की आपल्याला बुवा हेच आठवतं. टॉम क्रुज, रेड लिपस्टीक आणि जेनिफर कॉनली उतरत्या क्रमाने आवडतात.

टॉकवा हा प्रश्नच नसतो. चुक्कून तो नाही आवडला तरी त्याचे स्टंटस् आवडतात.

टॉप गन म्हटलं की आपल्याला बुवा हेच आठवतं. टॉम क्रुज, रेड लिपस्टीक आणि जेनिफर कॉनली उतरत्या क्रमाने आवडतात.
>>> माझेमन, करेक्ट !! मला पण.

कॉलेजला असताना टॉप गन अलका टॉकीजला लागला होता. येता-जाता आशाळभूतासारखं पोस्टर पाहिलं जायचं. पण सिनेमा तेव्हा पाहता आला नाही. नंतर कधीतरी केबलवर वगैरे पाहिला.
तेव्हा सुद्धा हे गाणं खूप काही नोंदलं गेलं नव्हतं. पुढे कधीतरी इंग्लिश गाण्यांची एक ऑडिओ कॅसेट घेतली त्यात एक हे गाणं होतं. ऐकताना खूप आवडलं. डिटेल्स पाहिले तर टॉप गन!
मग गाण्यासाठी पुन्हा कधीतरी सिनेमा पाहिला.

कॉलेजला शाळेत असताना टॉप गन अलका टॉकीजला लागला होता. येता-जाता आशाळभूतासारखं पोस्टर पाहिलं जायचं
>>
अन् डोक्यात वाजायचं
टॉप कधीच टॉप नसतं अन् सॉलिड कधीच सॉलिड नसतं...

Pages