चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ग पण निदान ते पालक पोरांना मोठे व्हायची वाट पाहात. मोठ्याने लवकर जाणते होऊन नोकरी धरुन कुटुंबाला हातभार लावायची अपेक्षा असायची. पण सिनेसृष्टीत चार पाच वर्षांच्या मुलामुलींना पालक कामाला लावायचे. ह्या इन्डस्ट्रीत काय प्रकारचे शोषण चालते हे माहित असुनही. श्रीदेवी चार वर्षांची
होती तेव्हापासुन तिने कामाला सुरवात केली. पालकांचा स्वार्थ आहे तशीच मजबुरीही असणार.

पालकांचा स्वार्थ आहे तशीच मजबुरीही असणार.
>>> मजबुरीचा विचार आईवडीलांनी (कुटुंब वाढवण्यापूर्वी) करायचा.
मुलाने आपल्या भावंडांची संपूर्ण आर्थिक जबाबदारी उचलणे मला त्या मुलावरचा अन्याय वाटतो. माझ्या आईबाबांच्या पिढीत ढिगाने उदाहरणं सापडतील.
कधीतरी इमर्जन्सीला आर्थिक हातभार लावणे समजू शकते.

असे सगळे विचारपुर्वक वागले असते तर जग किती आनंदी राहिले असते Sad

हो सारिकाही यात येते. सचिनही. पण त्याच्या केसमध्ये कुटुंबपालनापेक्षा वडलांची हौस हा पॉइंट होता.

वपुंनी कुठेतरी लिहिले होते की मराठी चित्रपटासाठी चार वर्षांचा मुलगा हवा ही जाहिरात बघुन तेही आपल्या मुलाला घेऊन गेले होते. मुलगा सिलेक्ट नाही झाला, सचिन सिलेक्ट झाला.

सारिका ची गोष्ट एखाद्या सिनेमापेक्षा अजिबात कमी नाही.
प्रत्यक्ष आईने शोषण केलं.. बाकिच्यांची काय गोष्ट.
युट्यूबवर सर्च दिलाकि सापडेल.

नीतू सिंग पण बालकलाकार होती.
कुणी तरी वेगळा धागा काढा म्हणेल आता. Happy

जुना अंदाज लावला होता.
व्यवस्थित स्मूथ चालला होता. पण पार्टी ती ही ७० च्या दशकातली सुरू झाली आणि मायबोलीकरांच्या प्रतिक्रिया काय असतील हेच आठवलं.
कुठला तो चेंडू हनुवटीखाली ठेवायचा आचरट खेळ कोण खेळतं ?
आणि तो ही हनुवटीनेच काढायचा. काही पण.
पार्टी शाळेच्या चॅरिटी साठी आणि त्यात असले आचरट गेम्स, फॅन्सी ड्रेस काँपिटिशन.
असेना का पण फॉरिनर थेट अ‍ॅडम ईव्ह बनून आलेले. आजच्या काळात सुद्धा शक्य नाही ते.
त्या वेळी नेमका हिरोलाच गाण्याचा आग्रह होणार. तो नको नको म्हणत असताना बँडवाले जशी काही त्याची स्केल जगप्रसिद्ध आहे अशा रितीने धून वाजवणार.
मग तो हिरॉईनला बघून गाणं सुरू करणार. वाद्यांची धून याची चाल तत्काळ मॅच होणार.
पण पूढचं कडवं पण हिरॉईन सुरा तालात म्हणु शकत असते. शब्दांची श्रीमंती अशी तुझ्या गळा माझ्या गळा वाहत असते.
ते वातावरणच गेलं , हल्ली कुणाला सुचतात का असे इन्स्टंट शब्द ?

आणि पावसात हिरो हिरॉईन कुठे तरी आडोशाला गेले कि तिथे फायर प्लेस असलीच पाहीजे.
पुढचं सांगत नाही. रूप तेरा मस्ताना असो नाही तर आ गले लग जा मधला मेडीकलचा सीन असो.

शम्मीकपूरचा चार्म संपल्यासारखा दिसतोय यात. राजेश खन्ना काय दिसलाय.
सुरूवातीला हेमा मालिनीच्या साड्या,नेसण्याची स्टाईल आणि दागिने , मोत्यांचा चोकरचा सेट सगळंच अप्रतिम.
तिच्या इतकी सुंदर हिरॉईन कदाचित कुणीच नसेल .
पण राजेश खन्नाच्या पुढे ती किंचित सावळी दिसते. राख लालबुंद टोमॅटो आहे.
उगीच क्रेझ नव्हती त्याची..

त्या सिनेमात शम्मीकपू र व हेमामालिनी आहेत का. तो हनुवटीवाला खेळ. याईक्स हाऊ हॉरिबल. आधी च्युइंग गम खाम्हणावं. अगदीच कै च्या कै गेम.

आज द डिप्लोमॅट पाहिला. जॉन अब्राहमचा दगडी चेहरा नी मिशी, ती बथ्थड उझ्मा आवडले नाहीत. त्यापेक्षा तो तिवारी, वकील सय्यद आणि आयएसआयचा माणूस आवडला.
सत्यकथा आहे म्हणून वन टाईम वॉच आहे. फिजीकल हिंसाचार अंगावर येत नाही. पण काय पोचवायचे ते पोचवतो.

भूल चूक माफ .. राजकुमार राव .. प्राईम
नुकताच तर रिलीज झालेला. लगेच ओटीटी वर सुद्धा आला. त्यामुळे वाटलेले पडेल चित्रपट असेल.
पण धमाल निघाला. सगळा चित्रपट एकट्या राजकुमार रावचाच आहे. पहिल्या सीन पासून अखेरपर्यंत. त्याची अश्या भूमिकेतील एनर्जी बघून तरुणपणीचा शाहरुख आठवतो. चित्रपटात त्याचा उल्लेख सुद्धा आहे एका सीनमध्ये.

पण ते सगळे एका बाजूला. माझ्यासाठी ती वामिका गाबी सरप्राइज पॅकेज निघाली. मस्त फाडू ॲक्टिंग करते. राजकुमार सोबत अगदी टक्कर केमिस्ट्री जुळली. एवढी आयटम दिसते आणि जिथे तिथे तिच्या दिसण्याचे, स्पेशली डोळ्यांचे कौतुक बघून वाटलेले ही शोभेची बाहुली असेल. पण अगदी पहिल्या सीनपासून अंदाज चुकवला.
बघून घ्या याच वीकेंडला

भूलचूक माफ बघायचा आहे.
वामिका गब्बी आवडतेच.
तिच्या दोन सिरीज पाहिल्या आहेत- ग्रहण (हॉटस्टार) आणि ज्युबिली (प्राइम). अजून पाहिल्या नसतील तर चुकवू नका.
सिरीजमधून ती सिनेमांमध्ये येणार हे दिसतच होतं.

वामिका गब्बी भारीच आहे
दिसते छान आणि acting देखील नीटच
ग्रहण मध्ये पाहिले तेव्हाच आवडलेली.

नेफ्लिवर जाट पाहिला. गेल्या आठवड्यात सिकंदर.
दोन्हीही साऊथचे रीमेक नाहीत हे नवलच आहे. जाट म्हणजे पूर्ण साउथ स्टाईल हिंसाचार.
कोण कुणाला का मारतंय, का एव्हढ्या लोकांची हत्या होतेय हे समजत नाही.
मग हळू हळू खुलासे होतात टिपीकल साऊथ.
सनीच्या जागी कोणताही साऊथ हिरो असता तरी खलप्रवृत्तीचं काही खरं नव्हतं. सनी असल्याने अ‍ॅक्शन्स खरे वाटतात इतकंच.
साऊथच्या फॅन्सना पण असंच वाटत असेल रजनीकांत आणि तत्सम लोकांना बघून.
शेवटी सनी देओल कोण असेल हा धक्का बसत नाही कारण आपल्याला साऊथचं धक्कातंत्र पाठ झाल्याने आधीच कळतं.
पिसं काढण्यासाठी मसाला आहे.

भूल चूक माफ बघितला, रटाळ वाटला>>>

अर्धा तास कसाबसा बघितला. होप नंतर काहितरी कथानक सुरु झालेले असेल.

“ भूल चूक माफ बघितला, रटाळ वाटला ….
अर्धा तास कसाबसा बघितला. होप नंतर काहितरी कथानक सुरु झालेले असेल.” - +१

पहिल्या अर्ध्या तासात फार काही घडलं नाहीये. राजकुमार राव वामिकापेक्षा मोठा दिसतो. ह्या प्रकारचे मूव्हीज पण आता मोनॉटोनस व्हायला लागले आहेत.

अन्जू तुम्ही १९८३ पाहिला असेल तर त्यात मदनलालच्या बायकोचा रोल केला आहे तिने. दीपिका बरोबर ती दाखवली आहे नेहमी.

जाट नेफिवर दिसतोय.

भूल चूक माफ नाही पाहिला अजून.

वामिका गब्बी कोण >>> जब वी मेट मधे गीतच्या असंख्य आगाऊ बहिणींपैकी सगळ्यात जास्त आगाऊ मुलगी - तिच्या दाताला ब्रेसेस लावल्या आहेत. त्या सगळ्या पोरींच्यात ती sort of टीनएजर आहे Happy

अगदीच लेटेस्ट रेफ हवा असेल तर खुफिया नावाच्या २०२३ मधे आलेल्या पिक्चरमध्ये होती ती.

फारेंड तो पिक्चर नाही बघितला.

वामिका गब्बी कोण >>> जब वी मेट मधे गीतच्या असंख्य आगाऊ बहिणींपैकी सगळ्यात जास्त आगाऊ मुलगी - तिच्या दाताला ब्रेसेस लावल्या आहेत. त्या सगळ्या पोरींच्यात ती sort of टीनएजर आहे >>>आता आलं लक्षात. हा बघितलेला.

Stolen पाहिला prime वर. मस्त आहे. अभिषेक बॅनर्जी आहे यात तो आवडतो त्याच्यामुळे पाहिला. चांगला आहे. सगळ्यांची acting जबरदस्त...

भूल चूक माफ पाहिला. खास नाही वाटला. अपेक्षा जास्त झाल्या कदाचित. असं वाटत राहिलं आता काहीतरी मस्त फनी होणार आहे आणि फार काही झालंच नाही. Happy

स्माईल प्लीज - प्राईम

छान होता. फार आवडला Happy

मुक्ता बर्वे आणि प्रसाद ओके डिव्होर्स झालेले कपल. मुक्ता फोटोग्राफर तर प्रसाद ओक दिग्दर्शक. मुलगी बापाजवळ राहते आणि आईला क्वचित भेटते. तिचा राग राग करते. आणि मग एके दिवशी कळते की मुक्ताला डिमणेशिया झाला आहे. सगळे काही वेगाने आणि कायमचे विसरण्याचा आजार..
म्हटले उगाच बघायला घेतला. रडगाणे बघायला हल्ली नकोसे वाटते.
पण अश्यावेळी ललित प्रभाकरची एंट्री झाली आणि पिक्चरच बदलून गेला. आजारात सुद्धा ती आपली फोटोग्राफर म्हणून ओळख कायम ठेवते. या दरम्यान मुलगी सुद्धा बापापासून दूर आणि आईच्या जवळ येते. पण आईच्या आजारामुळे सहानुभूती पोटी नाही तर तिला स्वतःला काय चूक काय बरोबर याची अक्कल आल्यामुळे. शेवट देखील पॉझिटिव्ह नोट वरच केला आहे. बघितला नसल्यास जरूर बघा.

हा ललित प्रभाकर आधी फार आवडायचा नाही, पण हल्ली काही चित्रपटांपासून आवडू लागला आहे. यात त्याचे कॅरेक्टर छान दाखवले आहे. आपण ही असेच वागावे आणि जगावे असे वाटणारे..

वामिका गब्बी ज्युबिली मुळे चान्गलि लक्षात राहिली...चान्गलय तीच काम त्यात.
भुल चुक माफ मलाही रटाळच वाटला , विकान्ताची काम करताना एकिकडे लावुन ठेवला होत त्यामुळे पुर्ण बघितला गेला पण मुव्हि मधे लाफ्टर मोमेन्ट काही नाहिच आहेत आलमोस्ट..२९-३० चा गोन्धळ वैगरे बोअरच होता.
वामिकाचा रोल अगदी शोभेची बाहुलिचा आहे..ऑल अबाउट राजकुमार राव .
स्टोरीत काहिच नाविन्य नाही
चोरबझारी गाण याना एक टक्काही याना सुट झालेल नाही...इट्स बिलॉन्ग टु दिपु-सैफ ओन्ली.

अर्धा तासच इतका बोअर वाटला तर पुढे काय..

काल जुना कृष्णधवल हरियाली और रास्ता बघितला. सगळी गाणी सुण्दर, अर्थपुर्ण आहेत. हिरोइनच्या बाबाने आढमुठी भुमिका घेतली नसती तर चित्रपटात कथाच उरली नसती.

शेवटी शशिकला नवर्‍याला वैतागुन बोलते की मी पायाची दासी बनुन राहिले असते तर नवर्‍याचे सोन्याचे हृदय त्याने मला दाखवले असते का.. त्यावर माला सिन्हा म्हणते सेवा हाच स्त्रीचा धर्म आहे. सेवा प्रेम त्याग हेच तर बायांचे आयुष्य आहे.

शेवटी ती दरीत पडते, डोक्याला बँडेज बांधल्यावर शुध्धीवर येते आणि मग मरताना म्हणते स्त्रीने आधी घर सांभाळायला हवे हे मला कळले नाही. दरीत पडायच्या आधी वेगळे विचार आणि पडल्यावर १८० डिग्रीतुन विचार फिरले. दरीत पडताना १८० द्डिग्रीत पडल्यामुळे विचारही पडले असणार अन्यथा तिला हा साक्षात्कार कशामुळे झाला हे दाखवले नाही.

Pages