चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

yes.. जाट timepass ला.चांगला आहे.. डोक बाजूला ठेऊन बघायचा ...पण fast आणि happening आहे.. मै इडली खा रहा था..इडली गिर गई..भारी आहे Happy

सनी देओल च्या मारामाऱ्या किती रिअल असायच्या. अर्जुन, डकैत, घायल, यतीम. घातक थोडा अ आणि अ आहे. डॅनी त्यातला व्हिलन खूपच ड्रामेबाज बनवलाय.
त्यालाही (सनी) जाट मधे साऊथच्या स्टाईलला शरण जावं लागलं. अर्जुन मधे रस्त्यावरचे पाठलाग कसले खरे खरे वाटलेत. आता अव्हेलेबल नाही कुठेच.
उचलून फेकाफेकी सनीकडे बघून खरी वाटली नाही तर ते गालबोट होतं.

पण सनीचे सीन्स आणि त्याची मारामारी भारी आहे.>>> अरे वा धनी. आता जाट बघायलाच पाहिजे... च च मला वाईट वाटले कि थिएटर मध्ये बघायला हवा होता. सनी आणि CID फॅन असल्यामुळे घरी आणि फॅमिली मध्ये खूप जोक्स होतात माझ्यावर पण मी दुर्लक्ष करते Lol
घायल २ तर आम्ही वॅलेंटाईन डे ला बघितलेला . आवडला कारण एकदम फास्ट होता.

सनी देओल ची हाणामारी नेहमीच आवडते, Jaat बघितला, जेव्हा जेव्हा सनी आहे तेव्हा मजा येते , इतरवेळेस फार क्रूर, आणि भडक आहे,

>> अर्जुन मधे रस्त्यावरचे पाठलाग कसले खरे खरे वाटलेत. आता अव्हेलेबल नाही कुठेच.

अर्जुन चित्रपट einthusan.tv वर आहे. पण भारतात vpn ने बघावा लागेल किंवा वन टाईम $५० पे करावे लागतील. मी साधारण ६ महिन्यापूर्वि पाहिला होता

सनी आणि CID फॅन >>> मी पण Happy

मी जाट मधल्या फक्त सनीच्या मारामाऱ्या पाहिल्या. प्रचंड believable वाटतात. मजा आली बघायला. लोकांना एका हाताने उचलून गरगर फिरवून सनीने नाही फेकायचं तर कुणी? Proud

Lol खरंच रमड. जाट चांगला टिपी आहे वाचून बरं वाटलं. माझी काहीच अपेक्षा नव्हती. ट्रेलर पाहिला होता त्यात सनी थोडा AI सारखा दिसत होता. रणदीप हुडाला रागवत होता. असेल त्यांचं काहीतरी म्हणून पुढे गेले. साऊथ स्टाईल मारामारी आवडत नाही, आपलीच आवडते. शाहिद कपूरचा मधे आलेल्यातही तशीच होती. मला साऊथचा प्रभाव हिंदीवर आलेला नकोच वाटतो. त्यांची कोरिओग्राफी मात्र आवडते. डान्स नंबर हिंदीपेक्षा सरस असतात. CID मी पण काही वर्षं बघितले आहे. नंतर जगात गुन्हा म्हणजे फक्त खून असं वाटायला लागलं. नंतर 'फांसी होगी फांसी' पण पाठ झाले. लाश- खून - अभिजित - दया दरवाजा तोड दो - अभिजितची क्रश -साळुंखे- ACP प्रद्युमन (प्रद्युम्न)- फांसी होगी फांसी - रीपीट. Happy Happy

मिशन इम्पॉसिबल -द फायनल रेकनिंग
हा थिएटरमध्ये जाऊन पाहिला. जबरदस्त आहे. थिएटरमधेच पाहायला हवा असा चित्रपट खूप दिवसांनी थिएटरमधे जाऊन पाहिला याचं समाधान वाटलं. या सिनेमाचा पहिला अर्धा भाग प्राईमवर पाहिला होता मागच्या आठवड्यात तेही येथे लिहिले होते. बाहुबली सारखे पार्ट वन आणि पार्ट टू. पण बाहुबली बिगनिंग दुसरा आणि कनक्लुजन पहिला केल्याने, हा पहिला आणि तो दुसरा करताना विनाकारण गोंधळ उडायचा. तसे इथे नाही. पहिलाच पहिला आहे व दुसरा दुसराच आहे. Happy

हा शेवटचा आहे म्हणे. टॉम क्रूझचे किंवा या ॲक्शन ॲडव्हेंचर जॉन्राचे चाहते असाल तर थिएटर मधेच पाहा. चित्रपट सुरू होण्यापूर्वी टॉमने रीतसर आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली आहे. आमच्या टीमने खूप मेहनत केली आहे असे सांगितले. मला ते आपल्या प्रेक्षकाशी पर्सनल लेव्हल वर जाऊन कनेक्ट होणारं जेश्चर भलतंच आवडलं. काही अभिनिवेश दिसला नाही.

टॉमने प्रचंड मेहनत केली आहे. सबमरीनचे सीन्स जबरदस्त आहेत. विमानावरून विमानावर उडी मारून केलेली मारामारी पण एकदम छान आहे. सगळे स्टंट्स खरे वाटतात, कन्व्हिक्शन आहे सगळ्यात. त्याच्या गर्लफ्रेंड्स नेहमीच चपळ आणि बुद्धिमान दाखवलेल्या असतात, ह्यातही चपळ, आकर्षक व 'टाईमिंग' साध्य असलेली भुरटी चोर आहे. सगळ्या टीमची आपसातील केमिस्ट्री आणि camaraderie जमून आलेली आहे व ती आपल्या पर्यंत पोचते. गुंगून जायला होतं बघताना, स्क्रीन वर कोणीही असो. एंगेजिंग आहे. सगळ्यांची कामं जबरदस्त. नक्की बघा. Happy

'मिशन इम्पॉसिबल, फायनल रेकनिंग' बघून आलो. मस्त सिनेमा आहे. हा या फ्रांच्यायझीचा शेवटचा आहे. त्यामुळे सगळे आधीचे काय काय संदर्भ पेरले आहेत. स्टोरी, ऍक्शन सगळं जुळून आलंय. आधीचा डेड रेकनिंग मला अगदीच बोर झालेला. पण हा थिएटर मध्ये बघितलं म्हणून ही थोडाफार असेल... पण आवडला.
एमआय मधल्या काळाच्या ओघात बदलत जाणार्‍या मिशन्स, इव्हॉल्व होणार्‍या स्त्री व्यक्तिरेखा, अ‍ॅक्शन थ्रिलर तर आहेच पण यात येणारी मेटा एंटीटी सगळी फ्रँचायझी आपल्या काळातली असल्याने फार मस्त वाटलं. आता एम मॅरेथॉन करुन टाकेन म्हणतो. Happy

सनीच्या १९४७ लाहोरची प्रतिक्षा आहे. निर्माता आमीर खान आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी आहे.
मला नेमकं शब्दात सांगता येत नाहीये, पण जे एन्गेजिंग मूवीज हल्ली बनतात, त्यांची अपेक्षा अशी असावी कि प्रेक्षकाने याच्या पुढच्या अपेक्षा करू नयेत. वेळ मजेत गेला ना ? मग तक्रार करू नका. चायनीजच्या जमान्यात आम्ही असेच बनवतो, पटत असेल लॉजिक तर बघा.

सगळीच लोकं काय चित्रपट फार सिरीयसली घेत नाहीत. दोन घटका करमणूक असे म्हणायचे. किंवा बालन काकू म्हणाल्या तसे Entertainment Entertainment Entertainment

तेवढे असेल तर पुरेसे होते. खूप वैचारिक चित्रपट निघाले किंवा खूप दैनंदिन जीवनासारखे झाले तर मग त्याची करमणूक किंमत कमी होते असे मला वाटते. ते थोडेसे ओव्हर द टॉप हवेच. नेहमीचेच बघायचे असेल तर मी सिग्नल ला उभा राहीन ना.

जास्ती विचार करायचा नाही. सनी गुंडांना बुकलतो ते भारी वाटते ते आवडते तर बघायचे. आवडले नाही तर नाही बघायचे. शेवटी हा का ना का Lol

एडीट केल्यानंतर ही कमेण्ट पाहिली.

वैचारीक सिनेमा असा रोख नाही माझा. कमर्शियलच पण निगुतीने बनवलेला.
सनीचाच घायल कसा बनलाय ? त्याला वैचारीक म्हणायचंय का ?
आमीरचे सरफरोश, जो जिता वही.., तारे जमी पर असे बरेच.
यात सुद्धा अ आणि अ काही वेळा असतंच. पण चालून जातं.

नवरा दोन तीन दिवस मिळून कॅप्टन अमेरीका बघत होता, मी आत्ता शेवट बघितला. धमाल फायटींग होती.

खूप वैचारिक चित्रपट निघाले किंवा खूप दैनंदिन जीवनासारखे झाले तर मग त्याची करमणूक किंमत कमी होते असे मला वाटते.
>>>> १००++
मला वाटत आजकालचं जगणं जास्त स्ट्रेसफुल झाले आहे. त्यामुळे लोक निखळ मनोरंजनासाठी जातात. त्यांना रोजचे जगण्याचे वैताग विसरायचे असतात. त्यातही एखादा पिक्चर सहजच समाज प्रबोधन करत असेल तर लोक त्याला एक्सेप्ट करतातही म्हणजे तारे जमींपर मुळे डिस्लेक्सियाबद्दल लोकांमध्ये जागृती झाली.
पण आम्ही बघा काहीतरी भारी करतो आहोत किंवा तुम्हाला काहीतरी नवीन दाखवतो आहोत असा आव आणून जर बोरिंग पिक्चर काढले तर लोक सणकून आपटवतात

मला वाटत आजकालचं जगणं जास्त स्ट्रेसफुल झाले आहे. त्यामुळे लोक निखळ मनोरंजनासाठी जातात. त्यांना रोजचे जगण्याचे वैताग विसरायचे असतात. >> हे युनिवर्सल आणि टाईमलेस स्टेटमेण्ट आहे.

पूर्वीही असंच होतं. प्यासा, गाईड, मुघल ए आजम पासून दीवार ते लगान. आव आणण्याचं माहिती नाही. पण ही एक कला आहे आणि त्या टीमने मेहनत घेऊन स्वतः आनंद घेत बनवलेली कलाकृती आपल्याही मनाला आनंद देतेच. धंद्याचं गणित काही का असेना.

'मिशन इम्पॉसिबल, फायनल रेकनिंग' बघायला मजा येते हे खरय. एकंदर ह्या सिरीजबद्दलच सॉफ्ट कॉर्नर आहे कारण अमेरिकेत पाहिलेला पहिला सिनेमा पहिला भाग होता. त्यातले स्टंट्स नि त्याहून परफेक्ट बॅकग्राऊंड स्कोअर जे प्रत्येक सीनला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवत होते हे अजूनही तेव्हढेच भारी वाटतात. नुसत्या बॅकग्राऊंड स्कोअर साठी टॉवर रेकॉर्‍ड मधे जाऊन कॅसेट घेतलेली आठवते Happy आधीच्या भागांमधल्या पात्रांना किंवा सीन्स ना शेवटच्या भागात शिताफीने लिंक केलेले मस्तच वाटले. त्याच्या सर्व हिरॉईन्समधे हायली साईनफिल्डचे पात्र नवीन सिरीज तिच्यावर सुरू करता येईल इतके जास्त इंप्रेसीव्ह वाटलेय.

जाट्/जट बद्दल चर्चा चालूच आहे त्या संदर्भात माझ्या मित्राने लिहिलेला रिव्हु इथे पोस्ट करतेय (नावासकट).. धमाल आहे.!

इडली, सॉरी आणि अडीच किलोच्या हाताची दख्खनेने घेतलेली दखल : जाट

=============================

मी ‘जाट’ सारख्या विचित्र नावाचा चित्रपट बघण्याची सुतराम शक्यता नव्हती. चित्रपटच काय मी तर त्याचा ट्रेलरही बघितला नव्हता. पण एका मित्राच्या आग्रहाखातर त्याने टेलिग्रामवर पाठवलेला जाट एकदाचा डाऊनलोड करून पाहिला..... दोन दिवसांनी चित्रपटगृहात जाऊन पाहिला, दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा त्याच चित्रपटगृहात जाऊन (तिसऱ्यांदा) पाहिला आणि काही दिवसांनी टेलिग्रामवर चांगली प्रिंट आल्याने पुन्हा एकदा (फक्त पूर्वार्धातली फायटिंग) पाहिला.

पहिल्यांदा जेव्हा पाहायला घेतला तेव्हा पहिल्या अर्ध्या तासातच माझा आ वासला गेला होता. मी काही सनीचा डायहार्ड वगैरे फॅन नाही ही पूर्वसूचना आधीच दिलेली बरी. पण घायल, दामिनी या माझ्या आवडत्या सनीपटांच्या खालोखाल मला जाट आवडला. एंट्रीच्या प्रसंगापासूनच सनीने धमाल उडवून दिली आहे. त्याच्या एंट्रीला, मोबाईलवर बघताना फालतू वाटणारं पण चित्रपटगृहात मात्र थक्क करून सोडणारं असं 'जय श्रीराम' हे भगवे ध्वज, भगवे वेष अशा एकूणच भगव्या वातावरणाने भारलेलं अप्रतिम गाणं लागतं आणि वातावरण एकदम चैतन्याने भरून जातं.

शीर्षकावरून तरी चित्रपट भारतातल्या उत्तर भागातल्या एखाद्या खेड्यात किंवा नागरी भागात घडत असेल असं वाटून जातं. मात्र 'जय श्रीराम' गाणं संपल्यावर आपल्याला समोर दक्षिणेतल्या एका अतिशय दुर्गम भागातल्या छोट्याशा खेडेगावाचं दर्शन होतं. तिथे व्हिलन्सच्या उतरंडीमधल्या सर्वात तळातल्या टप्प्यावर असणाऱ्या लोकांची सनीबरोबर हातघाईची हाणामारी होते. पण तत्पूर्वी “या अडीच किलोच्या हाताची कमाल उत्तरेने बघितली आहे आणि आता दख्खनेने बघण्याची वेळ आली आहे” अशा अर्थाचा एक संवाद टाकून सनी चित्रपटाचा भूगोल स्पष्ट करून टाकतो. आपला उद्देश आणि शैली अधिक सुस्पष्ट करून सांगण्यासाठी "जब मैं मारना शुरु करता हूं तब मैं ना गिनता हूं ना सुनता हूं" असा निर्वाणीचा संदेश द्यायलाही सनी विसरत नाही!

थोडक्यात सनीपाजीच्या हाणामारीची पद्धत आणि प्रकृती ही एकंदरपणे दक्षिणेतल्या हाणामारीच्या चित्रपटांशी भलतंच जवळचं नातं सांगणारी आहे हे बॉलिवीड/टॉलिवीडच्या उशिरा (चित्रपटात कुठेही कणभरही वाटत नसला तरी सनी ६७ वर्षांचा आहे) का होईना लक्षात आलं हे नशीबच.

आणि त्यानंतर जवळपास तासभर सुरु होते ती बहुअंगी, बहुरंगी हाणामारीची बहुआयामी मैफल. गाडी, विजेचा खांब, वरवंटा, थाळी, काठी, टेबल, खुर्ची यातली प्रत्येक गोष्ट अस्त्राप्रमाणे वापरली जाऊन क्षणभरातच तिचा चक्काचूर झालेला असतो. यातली हाणामारी किल किंवा जॉन विक किंवा अगदी जेम्समधल्या हाणामारीसारखी सफाईदार नाही किंवा कोरिओग्राफ केलेली नाही. ती सनीसाठी लिहिण्यात आलेली शब्दशः हाणा आणि मारी आहे. दामिनीमधल्या गोविंदच्या ढाई किलोच्या हाताच्या संदर्भाप्रमाणेच गदरमधल्या एका प्रसंगाचाही संवाद न वापरता संदर्भ देण्यात आलेला आहे. गदरमध्ये हॅन्डपंपला अजरामर करणारा सनी इथे जमिनीवर उभ्या असलेल्या उंच खांबाच्या वरच्या टोकाला लावलेला पंखा (एक प्रकारचा सिलिंग फॅन) त्या खांबासकट उखडून टाकून त्यातल्या फॅनला एका व्हिलन्सच्या उतरंडीमध्ये बऱ्यापैकी वरच्या स्थानी असलेल्या एकाला, फॅनच्या वरच्या स्थानी लटकवतो. जाटचं पोस्टर नीट बघितलंत तर या पंख्याच्या फोटोत तो पंख्याचा गोल सनीच्या छातीवर दाखवून प्रेक्षकांना ‘आयर्न मॅन’ ची आठवण करून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.

इडली सांडल्याने चिडलेला आणि सुरुवातीला फक्त व्हिलन्सकडून ‘सॉरी’ ऐकण्यासाठी हातपाय चालवणारा सनी हळूहळू डॉट्स कनेक्ट करत उघडपणे न दिसणाऱ्या अनेक गोष्टींची साखळी जुळवून हळूहळू त्या एकूणच प्रकाराच्या तळाशी जायचा निश्चय करतो. आणि महिला पोलिसांच्या साथीने त्यात यशस्वीही होतो. सैयामी खेरने साकारलेली देखणी इन्स्पेक्टर आवर्जून उल्लेख करण्यासारखी!

सुरुवातीच्या एका तासात आवर्जून लक्षात राहणारा आणि खळखळून हसायला लावणारा बॅड मॅन म्हणजे राम सुब्बा रेड्डीचं पात्र साकारणारा अजय घोष. त्याचं अफलातून टायमिंग आणि विनोदी हावभाव सनीच्या चक्रीवादळात हास्याचे काही क्षण फुलवून जातात. सुरुवातीच्या एक दीड तासानंतर चित्रपटाचा वेग किंचित मंदावतो. पण ते आवश्यकही असतं कारण ही सगळी हाणामारी, हत्या, हल्ले चालू आहेत ते नक्की कशासाठी चालू आहेत, या एवढ्याशा टीचभर गावात एवढ्या टोकाला जाऊन, जीवाची बाजी लावून लोक आणि मुख्य व्हिलन का लढतायत याचं पटण्यासारखं काहीतरी स्पष्टीकरण असायला हवं असं वाटतं आणि पुढचा तासभर प्रेक्षकांना अतिशय तपशीलवारपणे ते स्पष्टीकरण एकूण एका बारीकसारीक मुद्द्यासह पुरवलं जातं.

'खुनी खाना' च्या बिनडोक चित्रपटांप्रमाणे इथे उगाच मनात आलं म्हणून मारलं अशी बिनडोक मारामारी चालू नसून त्या सगळ्यामागे एक महत्वाचं कारण आहे, त्या सगळ्याला एक भयंकर पार्श्वभूमी आहे हे स्पष्ट केलं जातं. आणि त्यामुळे प्रेक्षक त्यातल्या प्रत्येक घटनेशी हळूहळू का होईना कनेक्ट होत जातो.

रामूच्या ‘जेम्स’च्या चाहत्यांना (कोणी असल्यास.. मी तरी जेम्सचा प्रचंड चाहता आहे आणि जेम्सवरची एक पोस्ट लॉंग पेंडिंग आहेच) जेम्समधली जिममध्ये घडणारी अफलातून मारामारी नक्कीच आठवत असेल. जाटमधेही त्या हाणामारीतल्या एका प्रसंगाच्या अगदी जवळ जाणारा तुरुंगातला एक प्रसंग आहे. त्याचप्रमाणे 'मॅड मॅक्स फ्युरी रोड' मधल्या बाईक्सच्या हल्ल्याच्या प्रसंगाची आठवण यावी असाही एक प्रसंग यात आहे.

मुख्य व्हिलन असलेला राणातुंगा अर्थात रणदीप हुडाच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या रेजिना कॅसॅन्ड्राच्या अभिनयाचा, सौंदर्याचा आणि तिच्या एकूणच वावराचा आवर्जून उल्लेख करायला हवा. शेजारची काकू वाटावी अशी मुलगी प्रसंगी मुख्य व्हिलनला सांभाळते, त्याला काबूत ठेवते तर कित्येकदा त्याच्या बरोबरीने रक्तपात करायलाही मागेपुढेही पाहत नाही.

अत्यंत निष्ठुर आणि क्रूर राणातुंगा रणदीप हुडाने अप्रतिम साकारला आहे. येशू ख्रिस्ताच्या पावित्र्यात उभा असलेला आणि दुसऱ्याच क्षणी निष्ठुरपणे रक्तपात करणारा राणातुंगा काळजात धडकी भरवणारा असा आहे. अर्थात राणातुंगा ख्रिस्ताच्या रूपात उभा असण्याचा प्रसंग काही दिवसांनी ख्रिस्ती संघटनांच्या तक्रारीनंतर चित्रपटगृहात दाखवल्या जाणाऱ्या आवृत्तीतून काढून टाकण्यात आला असला तरी टेलिग्रामवर उपलब्ध असलेल्या आवृत्तीत तो अजूनही आहे. जिज्ञासूंनी शोध घ्यावा.

आवर्जून उल्लेख करावा, म्हणजे अर्थातच ‘सनीपाजींच्या फायटिंगनंतर आवर्जून उल्लेख करावा अशा काही गोष्टी’ हे वेगळं सांगायला नकोच. ते तसं नसतं तर ही पोस्ट पाडायची गरजच पडली नसती. तर ‘सनीपाजींच्या फायटिंगनंतर आवर्जून उल्लेख करावा अशा काही गोष्टी’ म्हणजे संकलन, संवाद आणि पार्श्वसंगीत. अनेकदा अरेखीय प्रकाराने घडणाऱ्या घटना प्रत्यक्षात बघताना त्यांचा क्रम नक्की कळून त्या मूळ कथेशी एकरूप होण्यासाठी संकलन चांगलं असण्याची अतिशय आवश्यकता होती. ते काम संकलन टीमने अतिशय चोखपणे बजावलं आहे. Action sequences साठी तर एका मोठ्या टीमने काम केलं आहे आणि ते अतिशय प्रभावी झालं आहे हे वेगळं सांगायची गरज नाहीच! पार्श्वसंगीतही पडद्यावर घटनांशी प्रेक्षकांना एकरूप व्हायला लावेल इतकं प्रभावी जमलं आहे. अशा प्रकारच्या चित्रपटाला आवश्यक असे तडाखेबाज संवाद आणि राम सुब्बा रेड्डीच्या काही भन्नाट संवादांनी धमाल उडवून दिली आहे.

आणि अर्थात सर्वात महत्वाचा म्हणजे ६७ वर्षांचा असूनही ६७ वर्षांचाच वाटणारा आणि अनेकदा न वाटणारा सनी. वाटणारा यासाठी की एवढ्या हाणामारीच्या प्रसंगांमध्ये पिळदार शरीर दाखवण्याची संधी असूनही पहिल्या प्रसंगापासून कोपराच्या चार इंच खाली असणारा सनीच्या शर्टाची बाही एक इंचभरही वर सरकलेली नाही. आणि न वाटणारा यासाठी की स्लो मोशनमुळे का होईना त्याच्या चपळ भासणाऱ्या हालचाली आणि अशक्य ताकद, त्याची संवादफेक, हावभाव, प्रेक्षकांना जुन्या सनीशी जोडून घ्यायला लावणारे, स्मरणरंजनात (nostalgia) रमायला लावणारे अनेक संवाद आणि प्रत्यक्ष हाणामारीचे प्रसंग.

मकरंद देशपांडे आणि उपेंद्र लिमये या दोन सशक्त मराठी कलावंतांनी नेहमीप्रमाणे हिंदीत काहीतरी थुकरट भूमिका करताना कणभराचाही विचार का केला नसावा या जाणिवेने हताश व्हायला होतं. मकरंद देशपांडेची भूमिका जरा तरी ठीक आहे मात्र उपेंद्र लिमयेची आधीच हास्यास्पद असलेली भूमिका त्याने चित्रविचित्र हावभाव करत आणि आवाज काढत अक्षरशः अजूनच हास्यास्पद करून ठेवली आहे हे बघून फार वाईट वाटलं. कारण उपेंद्र लिमये हा माझा अतिशय अतिशय आवडता अभिनेता आहे. असो. इलाज नाही.

जॅक रीचरच्या कादंबऱ्यांमध्ये अमेरिकाभर स्वच्छंद भटकंती करणारा, काहीही संबंध नसताना अचानकच एखाद्या खलप्रवृत्तीच्या माणसाशी संबंध आल्याने त्याचा नायनाट करणारा निवृत्त मेजर, ली चाईल्डने चितारला आहे. जाटमधला सनी हा अनेक अंगांनी रीचरशी साधर्म्य साधणारा आहे. फिरस्ती करणारा, लोकांच्या मदतीला धावून येणारा आणि हे करत असताना अचानकच एखाद्या राष्ट्रीय सुरक्षा आपत्तीची चाहूल लागल्याने तिथेच राहून सर्वात प्रमुख आणि भयंकर अशा मुख्य खलनायकाचा नायनाट करेपर्यंत त्याच गावात टिच्चून राहणारा आणि काम झाल्यावर हळूच तिथून निघून जाणारा! रीचरचे हे सारे गुणविशेष जाटमध्ये आढळल्याने कदाचित जाट अत्यंत आवडून तो साडे तीनवेळा बघितला गेला असेल.

तुम्हाला सनीपाजी, घायल, जॉन विक, जेम्स, किल, दामिनी, तुफान हाणामारी, रीचर (किंवा अगदी सैयामी किंवा रेजिना) यापैकी काहीही आवडत असल्यास आवर्जून बघायलाच हवा असा जाट. आणि नाही बघितलात तर..... तर मग मात्र "सॉरी" म्हणावंच लागेल!!!

तळटीप : यात सेन्सरबोर्डवाल्यांनी नेहमीप्रमाणे मजामजा केलीच आहे. एका प्रसंगात राणातुंगा तोंडात सिगरेट धरून तलवारीने एका माणसाचं शीर उडवताना दाखवला आहे. मात्र उजव्या टोकाला खाली दिसतं "सिगरेट स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे."

--हेरंब ओक

#CinemaGully

भारी लिहिला आहे की रिव्ह्यू.

जॅक रिचरची तुलना अगदीच apt आहे. मागे त्याचे असेच तो नेब्रास्का मधल्या गावात जातो. आणि तिकडे डायनर मध्ये बसलेला असताना असाच काही तरी पंगा घडतो. मग तो त्या गावातल्या सगळ्या दुष्टांचा नायनाट करतो अशी कादंबरी वाचली होती. ती आठवली. सनी पाजी अगदीच रिचर असू शकतात. नवीन सिरियल मधला रिचर जरी लेखनाच्या जवळ जाणारा असला तरी मला टॉम क्रूझच आवडतो रिचर म्हणून हे नमूद करेन.

मिशन इम्पॉसिबल ची आठवण निघालीच आहे तर आम्ही दोनदा पाहिला हे सांगेन. भन्नाट पिक्चर. पहिल्यांदा IMAX मध्ये. आणि मग अनुभव घ्यायचा म्हणून 4D मध्ये. भारी वाटले दोन्ही. IMAX चा भव्य पडदा आणि 4D च्या हलणाऱ्या खुर्च्या आणि येणारे वारे. अवघड तुलना आहे पण मी IMAX ला झुकते माप देईन.

किंडरगार्डन कॉप

जुनाच सिनेमा आहे पण बहुतेक नेटफ्लिक्सवर हल्लीच आला आहे. मी कितव्यांदातरी बघितला आणि यावेळेसही मस्त एंजॉय केला. कुणी नसला बघितला तर नक्की बघाच.

सरधोपट कथा, क्लिशे शेवट असं सगळं असूनही भट्टी जमलेला धमाल सिनेमा आहे हा. लहान मुलांकडून काम कसे करून घ्यायचे याचा सुंदर नमुना आहे. एकही मूल गांगरून गेलेले वाटत नाही आणि शेफारलेलं कार्टंही वाटत नाही. आपल्याकडे मुलांचा इतका नैसर्गिक अभिनय असलेले सिनेमे हाताच्या बोटावर मोजण्याइतके असतील. ठळक उदाहरण म्हणजे मासूम. मासूममध्ये फक्त तीन मुले आहेत पण यात तर खूप सारी मुले आहेत. त्यामुळे दिग्दर्शकाला पैकीच्या पैकी मार्क्स. मुलांसोबत त्याने अर्नॉल्डकडूनही थोडाफार अभिनय करवून घ्यायचा प्रयत्न केला आहे - त्याचे बोनस गुण.

बघितला हे सांगायची लाज वाटावी असा चित्रपट: हाऊसफुल 5.
त्यातल्या त्यात पैसे देऊन बघितला हे आठवून तोंडात जोडा मारून घ्यायची इच्छा व्हावी असा चित्रपट आहे हा
परीक्षण: तद्दन फालतू, निरर्थक, काहीच गरज नव्हती, हे काय आहे नेमकं, घरी गप झोपलो असतो तर बरं झालं असतं, मीच मूर्ख जो रिव्ह्यू न बघता आलो

मला खात्री अजिबात नव्हती, पण शालक म्हटले की त्यांनी असं ऐकलं वाचलं की अक्षयकुमारची हेराफेरी टाइप कॉमेडी परत येतेय ह्या चित्रपटातून.. आता आम्हीच एकमेकांना हसतोय.

सनी पाजी आवडतो
त्याने चार गुंड इकडून तिकडून फेकले तरी पटते असे करू शकेल हा
घायल, घातक, दामिनी, जिद्दी, हिरो,गदर असे खूप चित्रपट पाहिलेत

बघावेत काय? >>
बघ, पण ते त्या काळात बनलेले सिनेमे आहेत, त्या कालकुपीत डोकावून बघतोय हा विचार थोडा डोक्यात ठेवून बघ. Happy

ललिता प्रीती - उत्सुकता वाटत असेल तर शेवटचे दोन बघ. त्यातला एक प्राईमवर आहे. दुसरा थिएटरला. या आधीचे पाहायला हवेत असे काही नाही. द फायनल रेकनिंग बघून खतम कर, हाकानाका. Happy

रारा टक्कल पडल्यासारखी hairstyle आणि chiseled चेहरा त्याच्यामुळे म्हातारा दिसतो -> हो ना? मला वाटलेल मलाच असा दिसतो कि काय.

मी पण मिशन इम्पॉसिबल 4D मधे बघितला पण एक्तर मला चश्मा त्यावर ३D चश्मा आणि मधेच ते पाणी उडवतात . मसाज खुर्च्या ठेवलेल्या असतात पोप्कोर्न तर शक्यच नाही खाण.

Happy मलाही 3D , 4D आवडत नाही. अर्धा तासाचा असेल तर ठीक आहे तीन तास तर शक्यच नाही. सुखाने बघू देत नाहीत ते. वरून पाणी टाक, समोरून तलवार ये , डोळ्यात भाला घाल, खुर्चीतून उगाच टोचून जा करतात. डोळ्यांवर सुद्धा ताण येतो. आपले नेहमीचे बरे वाटतात. जास्त पैसे खर्चून कुठे स्वतःला रिलॅक्स होऊ द्यायचं नाही. Happy

Pages