Submitted by ऋतुराज. on 10 January, 2025 - 10:57

आपल्याकडे चहाचे कप, बश्या, प्लेट, वाडगे, चटण्या-लोणच्याच्या बरण्या अशी मोजकी चिनीमातीची भांडी असतातच. पण त्यात खूप वैविध्य असते. काही जणांकडे तर खूप सुंदर कलेक्शन असते.
तर चिनीमातीची भांडी - क्रॉकरी या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा. शीर्षक चिनीमातीची भांडी असे असले तरी इथे तुम्ही माती, चिनीमाती, सिरॅमिक, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल अश्या क्रॉकरीची चर्चा करू शकता आणि तुमच्याकडे असणाऱ्या क्रॉकरीचे फोटो टाकू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नेक्स्ट टाईम मी ह्या छोटया
नेक्स्ट टाईम मी ह्या छोटया फुलदाणीत Tea lights ठेवणार आहे, कोणे एके काळी टेबल सेट करताना टोमॅटो कोरून, ढोबळी मिरची, काकडी कोरून त्यात मेणबत्त्या लाऊन एकच वेळी कौतुक आणि ओरडा पण खाल्लाय...
ती परडी खरच छान दिसेल lights असले की. IKEA मध्ये सेल वर लागणारे टी लाइट्स छान मिळतात, पण नंतर ते सेल मिळत नाहीत मग अनावश्यक कचरा होतो घरात.
नेक्स्ट टाईम मी ह्या छोटया
डिनर साठी सेट केलेल्या बुफे मध्ये अधून मधून टी लाइट्स ने एकदम छान वाटते... आमच्याकडे आजकाल पावसामुळे
खुपदा इलेक्ट्रिसिटी जाते, दिवे गेले की आपसूक candle light dinner होऊन जाते. ;हा)
(No subject)
पार्टी साठी काढलेली भांडी परत
पार्टी साठी काढलेली भांडी परत ठेवताना मला कुंभमेळ्यात हरवलेलं ह्या छोट्या डिश ची आणखी छोटे कुटुंबीय सापडले.
गंधकुटी,
गंधकुटी,
Valerysthal नावाच्या जुन्या फ्रेंच ब्रँडचा बोल जबरदस्त आहे.
तुम्ही खऱ्या रसिक आहात. सगळी क्रोकरी किती निगुतीने वापरता, सांभाळून ठेवता.
(No subject)
अगदी छोट्या उथळ वाट्यासारख्या किंवा पणतीसारख्या ह्या सॉस डिश आहेत/असाव्यात.
ऋतुराज हा छोट्या डिशेस अगदी
ऋतुराज हा छोट्या डिशेस अगदी व्यवस्थित प्रत्येक डिशच्या मधे पेपर नॅपकिन्स घालून पॅक करून ठेवल्या होत्या आणि त्यांच्या बरोबर ते बाजूला मांडलेत ते छोटे काचेचे बहुदा कोस्टर किंवा dip serve करता येतील असे उथळ वाडगे असे जे काही आहे ते व्यवस्थित पॅक करून एक box मध्ये होते... आज त्यांना बऱ्याच वर्षांनी सूर्यप्रकाश दिसला आहे.
मज्जा... परत पॅक होऊन box मध्ये बसल्यावर ते आजच्या joy ride विषयी चिवचिवत असावेत कदाचित.
गंधकुटी, तुमच्याकडे अफलातून
गंधकुटी, तुमच्याकडे अफलातून कलेक्शन आहे आणि हा खजिना तुमच्यामुळे आम्हाला बघायला मिळत आहे.
पॅक होऊन box मध्ये बसल्यावर
पॅक होऊन box मध्ये बसल्यावर ते आजच्या joy ride विषयी चिवचिवत असावेत कदाचित. >>
किणकिणत असतील.
>> Lol किणकिणत असतील.....
>> Lol किणकिणत असतील..... +१११
किणकिणत असतील.…
किणकिणत असतील.… 😀
धागा सुना राहू नये, लोकांना
धागा सुना राहू नये, लोकांना फोटो शेयरण्यास हुरूप यावा म्हणोन:
१}

हा दारचा 👆
२}
आणि हे दोघे घरचे 👆
शेवटी आंब्याचं लोणचं घातलं
शेवटी आंब्याचं लोणचं घातलं मागच्या महिन्यात. तेंव्हा काढलेला फोटो इथे टाकतोय. काचेच्या बरण्या आहेत; क्रॉकरीच्या धाग्यावर चालतील ना?
डायना स्पेन्सर आणि प्रिन्स
डायना स्पेन्सर आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या लग्न प्रित्यर्थ
OMG!! कातिल रंग आहे!!
OMG!! कातिल रंग आहे!!
मस्त.
मस्त.
लहान बरण्यांचा घाट आवडला.
Diana
फोटो कसा टाकू
(No subject)
फोटो एडीट केला, क्रॉकरी प्रकारात मोडत नाही म्हणून .
@ रानई
@ रानई
फोटो अपलोड / लेखात-प्रतिसादात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा हे इथे बघा :
https://www.maayboli.com/node/1556
दिसायला नाज़ुक देखणे आणि
दिसायला नाज़ुक देखणे आणि कामाला दणकट असे ग्लासेस आवडतात.
कॉकटेल ग्लासेस तर फार versatile असतात, त्यात नुसते मादक द्रव्यच नाही तर अनेक अन्य पदार्थसुद्धा serve करता येतात.
हा दारचा 👆(दारूचा नाही, दा र चा)
आणि हा घरचा 👆
पुढच्यांदा रिकामा नाही दाखवणार 😉
अनिंद्य,
अनिंद्य,
दारचा (दारूचा नाही, दा र चा) आणि घरचा दोन्ही आवडले
आता हे काही दारचे....... .
आता हे काही दारचे.......



.
.
असे अल्ट्रा सॉफिस्टिकेटेड
असे अल्ट्रा सॉफिस्टिकेटेड फिलिग्री वर्क म्हणजे म्यूझियम ग्रेड की हो
हो बरोबर ओळखलेत सालारजंग.
हो बरोबर ओळखलेत
सालारजंग.
अनिंद्य, घरचा आणि दारचा मस्तच
अनिंद्य, घरचा आणि दारचा मस्तच. रच्याकने तो दारचा प्री-दारुचा होईल ना? किण्वन न झालेली दारू
ऋतुराज, कसले भारी प्याले आहेत. तो नीळा तर खासच.
या ग्रूपवर सामान्यांच्या घरचे, गंधकुटी यांच्या घरचे, दारचे आणि सालारजंगचे असे ४ प्रकार आहेत.
हिरवा पेला चटकन डोळ्यात भरला.
हिरवा पेला चटकन डोळ्यात भरला.
>>> या ग्रूपवर सामान्यांच्या
>>> या ग्रूपवर सामान्यांच्या घरचे, गंधकुटी यांच्या घरचे, दारचे आणि सालारजंगचे असे ४ प्रकार आहेत
हाहा! खरं आहे.
प्री-दारु = किण्वन न झालेली
ज्यूस = प्री-दारु = किण्वन न झालेली दारू 😄
अद्भुत !
हा फोटो धाग्याला पायडल
हा फोटो धाग्याला पायडल मारण्यासाठी
हा घरचाच ; सासुरवाडी म्हणजे विवाहित पुरुषाचे दुसरे घरच.
>>>>>सासुरवाडी म्हणजे विवाहित
>>>>>सासुरवाडी म्हणजे विवाहित पुरुषाचे दुसरे घरच.
वाह आपल्या सासुरवाडीस घर म्हणायचे व जुम्मनच्या सासुरवाडीला जहन्नुम
Pages