चिनीमातीची भांडी - क्रॉकरी

Submitted by ऋतुराज. on 10 January, 2025 - 10:57

आपल्याकडे चहाचे कप, बश्या, प्लेट, वाडगे, चटण्या-लोणच्याच्या बरण्या अशी मोजकी चिनीमातीची भांडी असतातच. पण त्यात खूप वैविध्य असते. काही जणांकडे तर खूप सुंदर कलेक्शन असते.
तर चिनीमातीची भांडी - क्रॉकरी या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा. शीर्षक चिनीमातीची भांडी असे असले तरी इथे तुम्ही माती, चिनीमाती, सिरॅमिक, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल अश्या क्रॉकरीची चर्चा करू शकता आणि तुमच्याकडे असणाऱ्या क्रॉकरीचे फोटो टाकू शकता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol सामो.

फोटो सर्वच मस्त.

… जुम्मनच्या सासुरवाडीला जहन्नुम…

जुम्मन का swag अलग है.

ऋतुराजच्या धाग्यावर क्रॉकरीवरच फोकस करूया Happy

>>>>>ऋतुराजच्या धाग्यावर क्रॉकरीवरच फोकस करूया
कोणी खोदकाम करुन विषयांतर करत नाहीये. कल्जी नको Happy

Screenshot_20250727_222922_Gallery.jpg
Japanese Hagiware चा हा पेला... ह्यात काय प्यायचे ह्याचा निर्णय न झाल्याने हा सध्या रिकामा आहे. :हा)

गंधकुटी,
सर्व नवीन पाहुणे छान आहेत. वास विशेष, हँड मेड दिसतोय.

Screenshot_20250731_223718_Gallery.jpg
सतत पडणाऱ्या पावसाने आलेल्या गारव्यामुळे सूप पिण्यास अनुकूल वातावरण निर्माण झालंय... त्यामुळे आजचे डिनर दोन बोल भरून सफरचंद आणि बीटाच्या सूप चे होते.
पण खर कारण होते आज आणलेली कोथिंबीर, तिचे दांडे लांब आणि जाडजूड होते, ते फेकवेनात, मग त्यांना उकळून त्याचा आणि सफरचंदाच्या सालींचा वेज स्टॉक बनवला, त्यात १ बीट आणि एक सफरचंद टाकून शिजवून सूप बनवले होते.
अतिशय छान होते, करून बघाल.

These are vintage Turkish cofee shots glasses.
खालचा फोटो मुद्दाम चहाच्या कपाबरोबर काढला आहे त्यातून त्याच्या छोट्याच्या आकाराची आणि वैशिष्ट्यपूर्ण घाटाची कल्पना यावी... काचेच्या कपावर सोनेरी नक्षी आहे आणि छोटेसे उंट असलेले सोनेरी चमचे पण आहेत, त्या कपांचा कान खालच्या बाजूला आहे.

खरं सांगायचे तर मी त्याचा वापर अजून कधी होताना पाहिलेलं नाहीये. Baileys Irish Creme साठी हे मस्त सूट होतील.

Screenshot_20250731_234952_Gallery.jpg
ह्या टी सेटचे केवळ हे दोनच मेंबर हयात आहेत... चहाच्या किटलीचे झाकण सुद्धा दत्तक घेतलेले वाटतंय.
असो... कालाय तस्मै नमः.

Screenshot_20250731_235924_Gallery.jpg
हा खरं तर क्रोकरी गटात मोडत नाही किंवा चिनी माती चा ही नाही... हा एक जुना मिल्टन चा कॅसेरॉल आहे... त्याला आतून फिट केलेलं स्टील चे बोल आहे. इथे द्यायचे कारण ह्यात ice cubes ठेवले जायचे, आणि ड्रिंक्स च्या टेबलवर ह्यांची स्वारी विराजमान असायची... महत्वपूर्ण भूमिका ice cubes वितळू द्यायचे नाहीत... म्हणून त्यांना पण include केलं.

गंधकुटी,

Turkish cofee shots glasses. + उंटाच्या डिझाइनचे सोनेरी चमचे खास 👌

कॉफी / लाल चहा भरल्यावर आणखीच देखणे दिसत असतील.

शॉट ग्लासेस आवडता प्रांत. But the shapes and designs that naturally appeal me are overtly masculine, bold ones. नाजुक कलाकुसरीचे माझ्या हातून हमखास मोक्ष मिळवतात 😀

अतिशय पातळ काच असलेले हे goblets सुद्धा खूप नाजूक प्रकरण आहेत.Screenshot_20250815_161746_Gallery.jpg

अरे काय भारी फोटो टाकले आहेत...
BTW मला ह्या धाग्यावरील हे नवीन अपडेट का दिसले नाहीत आधी? मागे एकदा पण असे झाले होते Sad
Japanese Hagiware >>>>> भारी texture.
सुस्नात वारुणीपात्रे जणू गारठल्याने एकमेकांना बिलगून उभी राहिली आहेत.
प्लेट La Opala ची आहे>>>>> मला ती बांबूची प्रिंट फार आवडते.
बीटाच्या सुपाला अनिंद्य यांचा गुलाबो धागा दाखवा.
Vintage Turkish cofee shots glasses.>>>>>> Wow..... looking nice.
Ruby red wine goblets तर अगदी अगदी अप्रतिम.
जणू मयखाण्यातील पैमाना...

Pages