Submitted by ऋतुराज. on 10 January, 2025 - 10:57

आपल्याकडे चहाचे कप, बश्या, प्लेट, वाडगे, चटण्या-लोणच्याच्या बरण्या अशी मोजकी चिनीमातीची भांडी असतातच. पण त्यात खूप वैविध्य असते. काही जणांकडे तर खूप सुंदर कलेक्शन असते.
तर चिनीमातीची भांडी - क्रॉकरी या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा. शीर्षक चिनीमातीची भांडी असे असले तरी इथे तुम्ही माती, चिनीमाती, सिरॅमिक, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल अश्या क्रॉकरीची चर्चा करू शकता आणि तुमच्याकडे असणाऱ्या क्रॉकरीचे फोटो टाकू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तो बॉटल ओपनर काय मस्त आहे!
तो बॉटल ओपनर काय मस्त आहे! क्यूट!
हो, बॉटल ओपनर = bright.
हो, बॉटल ओपनर = bright.
Indian thingy with capital “I” vibes 👍
थँक्यू थँक्यू!
थँक्यू थँक्यू!
ऋतुराज, हा तुमच्या चौकोनी सटाला झब्बू:

हे कप भारतात घेतले होते, जर
हे कप भारतात घेतले होते, जर मला बरोबर आठवत असेल तर बॉम्बे स्टोअरमध्ये. त्यांचा रंग, घाट, साइज सगळंच मला फार आवडतं.
पण त्यांचं मटेरिअल भयंकर पोरस (सच्छिद्र) आहे, कप पटकन गरमही होतात आणि त्यातला चहा पटकन गारही होतो.
मग आता चहात साखर ऑप्शनल केल्यापासून साखर सर्व्ह करायला ते असे वापरेन म्हणते :
ह्याला झाकण नाहीये नाहीतर तूप
ह्याला झाकण नाहीये नाहीतर तूप किंवा लोणचं वगैरे ठेवायलाही मस्त वाटतील. त्या खालची मॅटही छान आहे.
ती सुशी मॅट आहे (कोणाला सांगू
ती सुशी मॅट आहे (कोणाला सांगू नका)!

स्वाती, Brown Girls फारच
स्वाती, Brown Girls फारच सुंदर. 😍 Curvy and shiny.
बटर/ चटणी सर्वर्स म्हणून वापरले असते मी.
धन्यवाद, तरी प्रत्यक्षात तो
धन्यवाद, तरी प्रत्यक्षात तो वर निमुळता होत जाणारा घाट आणखी छान दिसतो - फोटोत खूप प्रयत्न करूनही याहून चांगला कोन नाही साधता आला मला.
बटर डिश निराळी आहे रोजच्या वापरातली :


घरच्या फूड सायंटिस्टला यूरोपिअन बटर जास्त आवडतं - त्याच्या रुंद स्टिक्सही यात छान मावतात. जुनी म्हणून लाडाची आहे.
आज फार टंगळमंगळ झाली.
आज फार टंगळमंगळ झाली.
कामाकडे वळण्याआधी लास्ट - हा माझा आवडता रोजचे इयररिंग्ज, पिनाबिना हाताशी ठेवायचा छोटेखानी लाकडी ट्रिन्केट बॉक्स :
बटर डिश ! अगदी गोऱ्या
बटर डिश ! अगदी गोऱ्या सायबाकडं ब्रेडबटरच्या न्याहरीला बोल्यावल्यावानी वाटलं बघा.
सुंदर आहे. बटर डिश सर्वत्र ऑफ व्हाइट रंगाचीच दिसते, ही सुंदरी “रंग माझा वेगळा” वाली आहे.
आणि मला तुमची कमेन्ट वाचून
आणि मला तुमची कमेन्ट वाचून असं वाटलं.
.
😂
आता “साहेब”च व्हायचं ठरवलं
आता “साहेब”च व्हायचं ठरवलं असेल तर मग…. हा घ्या आमचा Tiered Tray / layered High-Tea Server.
गोरे लोक मारे प्रोटोकॉल प्रमाणे सर्वात खाली dainty sandwiches, मधल्या प्लेटमधे scones आणि वरच्या बाल्कनीत केक- पेस्ट्री सर्व करत असतील… आम्ही चटकदार बॉम्बे सँडविच, खमण ढोकला, सुरळीच्या वड्या, शेवपुरी आणि टॉप लेवल ला माखनबडा, बालुशाही किंवा चमचम / सुके गुलाबजामसारखी मिठाई वगैरे ठेवून गोऱ्यांच्या हाय टी चे अगदी देशीकरण करून टाकतो. 😀
आमच्याकडे चहाला येणाऱ्या सर्व पाहुण्यांमधे सुपरहिट प्रकार.
A real conversation enabler
वड्डे लोग… उँची चाय!
वड्डे लोग… उँची चाय!

मस्त आहे टिअर्ड ट्रे!
माखनबडा नाव प्रथमच ऐकलं. याची गंगोत्री कुठली?
कसले एकेक सुरेख प्रकार आहेत
कसले एकेक सुरेख प्रकार आहेत सर्वच. स्वाती अंबोळे छान कलेक्शन.
वरच्या काही प्रकारातले गोऱ्या लोकांकडे असं असतं हेही माहिती नव्हतं
अनिंद्य सर्व्ह करताना छान देशीकरण केलंय, अफलातून. मागचं वन आणि हत्तीही सुरेख.
स्वाती, आडनाव थोडं चुकलंय
स्वाती, आडनाव थोडं चुकलंय माझ्याकडून, सॉरी. मोबाईलवर type करताना होतं कधी कधी, आत्ता येऊन बघितलं परत तेव्हा समजलं, एडिटची वेळ निघून गेलीय.
स्वाती,
स्वाती,
थँक्यू.
माखनबडा आपल्या बालुशाहीचाच मावसभाऊ. A bit brittle, with that whitish sugarcoat on the top missing. कोरडी, कमी गोड मिठाई.
गंगोत्री = ब्रज क्षेत्र + राजस्थान
@ अन्जू,
@ अन्जू,
😀
वन आणि हत्ती माझेही फेव्ह. त्यात फक्त एकच “नुक़्स” आहे - all are boy elephants; girl elephants are missing altogether.
Feminine touch शिवाय पेंटिगमधेच काय जगातही मजा नाही.
>>> माखनबडा आपल्या
>>> माखनबडा आपल्या बालुशाहीचाच मावसभाऊ
ओह ओके. धन्यवाद.
अंजूताई, सॉरी काय त्यात! टायपो होती ते लक्षात आलं होतं, नो वरीज!
>>> all are boy elephants
No wonder they all seem lost in the woods!
they seem lost …. Exactly!
they seem lost ….
Exactly ! 😀
Martini glass किंवा coupe
Martini glass किंवा coupe glass हौसेने घेतले आणि वापर होत नसेल तर ….

वरील फोटोत क्रिस्पी कॉर्न सर्व केले आहेत. (फोटो मित्राच्या रेस्तरांत काढलाय.)
घरीसुद्धा वेगवेगळे कलरफुल Salads, दहीवडे, आलूटिक्की, भेळ, घट्ट वरण+ भात, लेयर्ड बिरियानी असे सर्व प्रकार यात नटवून खाता येतात/ खातो. तेव्हढाच ड्रामा बोअर आयुष्यात.
रिकामा वेळ आणि मूड is the only prerequisite
बटर डिश सुरेख आहे.
बटर डिश सुरेख आहे.
मला अशी पेस्टल कलर क्रॉकरी खूप आवडते.
@अनिंद्य >>>> परवाच वाईन ग्लास घेऊ का नको असं करत कार्टमधून बाजूला काढून ठेवले होते. तुमच्या मार्टिनी ग्लासचा वापर पाहून आता परत टाकते कार्टमध्ये. हवं तर कोकम सरबत सर्व करेन त्यातून.
स्वाती ,
स्वाती ,
वाटलच
जबरी कलेक्शन आहे तुमच्याकडे.
त्या चौकोनी सटाच्या कडा मस्त आहेत.
कप खूप आवडले. त्याचा रंग, घाट मस्तच आहे.
सुशी मॅट
बटर डिशचा रंग मस्त आहे.
अनिंद्य,
Tiered Tray / layered High-Tea Server एकदम भारी आहे.
मागे एकदा IKEA मध्ये पाहिला होता पण तो लोखंडी. हा काचेचा मस्त आहे. तुम्ही त्याचा केलेला देशी वापर पण मस्त आहे.
वन आणि हत्ती तुमच्या बऱ्याच फोटोत असते बॅकग्राऊंडला.
पण त्यातला नुक़्स का ते कळला नाही.
मार्टिनी ग्लासचा वापर मस्त. फोटो मस्त आलाय. वाफा स्पष्ट दिसतायेत.
कोकम सरबत तर खूप सुंदर दिसते/
माझेमन , कोकम सरबत तर खूप सुंदर दिसते/ दिसेल.
सोलकढी, पन्हे, ताक, गुलाबपाकळ्या टाकून नटवलेली गोड लस्सी, पाणीपुरीचे पाणी किंवा deconstructed पाणीपुरी, किंचित पातळ केलेले श्रीखंड, पियूष… भरपूर पदार्थ सर्व करता येतील.
Those glasses are very versatile when one thinks out of box
… वाफा स्पष्ट दिसतायेत.…. पारखी नजर !
सगळी नवीन, चौकोनी मेंबरं मस्त
सगळी नवीन, चौकोनी मेंबरं मस्त आहेत .
बटर डिश चा कलर मलापण आवडला पेस्टल शेड्स मस्तच दिसतात क्रॉकरी मध्ये.
अनिंद्य , तुमच्या आधीच्या एका फोटोतील सेम ज्यूस ग्लास मला मिळाले अजून उदघाटन नाही झालेय लवकरच त्यात काहीतरी करून त्याचे फोटो टाकेन.
तोपर्यंत हा रेस्टॉरंट मधला झब्बू.

"अख्ख खानदान टीटोटलर असताना तुला कशाला हवेत वाइन ग्लास" म्हणून माझीही त्याची खरेदी राहीली आहे . पण हिटलिस्टवर आहेत वाईन आणि शॅम्पेन ग्लासेस . वरचा मार्टिनी ग्लास पण ऍड करते कार्टमध्ये . वरचे कॉर्न वाले ऑप्शन्स मस्त आहेत करायला ते त्यात ट्राय करेन नाहीतर कोकम सरबत आहेच
मार्टिनी ग्लास + ड्रिंक सुंदर
मार्टिनी ग्लास + ड्रिंक सुंदर आहे. कॉफी ? मोल्टन चॉकलेट?
मार्टिनी ग्लासेस वापरायचे १६ ऑप्शन्स तर मीच सुचवलेत वर … तुम्ही डोकं लढवलं तर अजूनही भरपूर सुचतील. बेस्ट लक.
फोटो डकवायला मात्र विसरू नका.
चॉकलेट ओरिओ शेक समथिंग नाव
चॉकलेट ओरिओ शेक समथिंग नाव होतं. मी फुल बघून ऑर्डर केलेलं
सिमरन, चॉकलेट ओरिओ शेक in
सिमरन, चॉकलेट ओरिओ शेक in मार्टिनी ग्लास मस्तच.
आता सगळेच घेणार मार्टिनी ग्लास तर मी पण मागे नाही राहत.
उद्याच जमल्यास जातो क्रॉफर्ड मार्केट मध्ये...
सिमरन, सजावट एकदम सुरेख.
सिमरन, सजावट एकदम सुरेख.
थँक्यू थँक्यू!
थँक्यू थँक्यू!
मार्टिनी ग्लासमध्ये वरणभात???!!! हा हन्त हन्त!!
माझेमन, कोकम सरबतात पाण्याऐवजी सोडा, आणि थोडा आल्याचा आणि लिंबाचा रस घालून ट्राय केलंय का?
एखादी मिरचीसुद्धा नुसती उभी चीर देऊन घातलीत तरी चालेल.
ज्यांना चालत/आवडत असेल त्यांना थोडी वोडका घालून द्या. दिल बाग बाग न झाल्यास पैसे परत!
कोकम वोडका क्रश रेसिपी क्रेडिट - मायबोलीकर सायो.
Pages