Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रोहीतची विकेट जाणार लवकरच.
रोहीतची विकेट जाणार लवकरच. अजून दोन वर्षे सातत्याने फॉर्म राहणे अवघड आहे. ज्या मालिकेत तो घसरला तिथे तो संघाबाहेर पडणार. कारण आता संघ निवडीत त्याची कप्तानी काउंट होणार नाही. जी खरे तर व्हायला हवी होती. म्हणजे रोहीत संघात असताना तोच सर्वोत्तम कर्णधार होता.
नवीन कर्णधार बदलायची हिच योग्य वेळ आहे या मुद्द्याला देखील नाकारता येत नाही. त्यामुळे निवड समितीला ब्लेम वगैरे करायचा नाहीये. पण त्यांच्या वागण्यात पारदर्शकता कमी भासते. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे असेही असेलच म्हणा..
*कारण आता संघ निवडीत त्याची
*कारण आता संघ निवडीत त्याची कप्तानी काउंट होणार नाही. * मान्य. पण तो जर फलंदाज म्हणून निवडला गेला, तर मात्र त्याची कप्तानी देखील वादातीत ठरते, असं माझं म्हणणं.
हो ते आहेच. संघात असल्यास
हो ते आहेच. संघात असल्यास कर्णधार म्हणून सर्वोत्तम पर्याय तोच होता.
जर मधल्या काळात तो वयानुसार फलंदाज म्हणून मागे पडला तर कर्णधार असल्याने त्याने जागा अडवू नये किंवा त्याला संघाबाहेर काढणे अवघड जाऊ नये म्हणून निवडसमितीने आताच हा डाव खेळला आहे.
जर रोहीत २०२७ पर्यंत तग धरू शकला नाही तर हा निर्णय योग्य ठरेल. जर खेळला तर तो संघात असून कर्णधार नसणे हे थोडे तोट्याचे पडेल.
अर्थात गिल काही वाईट कर्णधार आहे किंवा ठरेल असे नाही. फक्त रोहितने बार उंचावला होता. कर्णधार म्हणून नुसते डावपेच नाही तर त्याच्या काळात संघातले जे वातावरण होते ते कायम ठेवणे हे आता आपल्यासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे.
*भारत १२ – ० पाकिस्तान*
*भारत १२ – ० पाकिस्तान*
The Women in Blue have never lost a match to Pakistan in 12 encounters, including 5 World Cup clashes
*The Women in Blue have never
*The Women in Blue have never lost... * -
Operation सिंदूर !!
गिल उपकर्णधार किंवा संघातील
गिल उपकर्णधार किंवा संघातील खेळाडू म्हणूनही रोहितकडून खूप कांहीं शिकू शकतो. हे आपलं माझं प्रामाणिक मत. >> +१ पण रोहित अजून दोन वर्षे त्याचे फॉर्ममधे असेल ह्याचा विश्वास GG-AA ला वाटत नाहिये. रोहित नि कोहली दोघेही खेळले तर जैस्वाल बाहेर असेल हे चँपियन्स ट्रॉफीमधेच उघड झाले होते.
रणजी ट्रॉफी प्रॅक्टिस मॅच
रणजी ट्रॉफी प्रॅक्टिस मॅच मध्ये पृथ्वी शॉ ने 181 मारले
आणि मग मुशीर खानला बॅट मारली
त्याने याची काय खोडी काढलेली कल्पना नाही
पण संयम हवा
भारत आफ्रिका बघत नाहीये का
भारत आफ्रिका बघत नाहीये का कोणी...
धमाल सामना चालू आहे
जबरदस्त जिंकली आफ्रिका
जबरदस्त जिंकली आफ्रिका
मी मधून मधून डोकावत होतो.
मी मधून मधून डोकावत होतो. त्या एका ओवर मध्ये वाट लागली. १८ धावा.
एका ओवरने नाही तर एका बॅटरने
एका ओवरने नाही तर एका बॅटरने वाट लावली... वन वू मॅन शो!
अगदी युसुफ पठाण सारखे सिक्स मारत होती.
आणि ऑफ साईडला काढलेले चौके तिचे स्किल सुद्धा दाखवत होते.
सर
सर
मी cricbuzz वर फालो करत होतो. त्यामुळे त्या मुलीचे चौके/छक्के बघितलेले नाहीत.
हो तो अंदाज आला.. साधारणपणे
हो तो अंदाज आला.. साधारणपणे मुलींचे सामने असेच फॉलो केले जातात.. मी सुद्धा असेच करतो.. नंतर रंगात आले की आधी मोबाईल आणि नंतर टीव्ही चालू करतो .. आज तर इतर मित्रा सुद्धा बघायला लावले. हरलो तरी मजा आली
ऋचा घोष हिने ऋषभ पंत सारखे ब्रेक घेऊन त्यांचा मोमेंटम ब्रेक करायचा प्रयत्न केला. पण ती आफ्रिकन बाई काही थांबायच्या मूडमध्ये नव्हती
हो हेही मी वाचले.
हो हेही मी वाचले.
Harmanpreet is having a chat with Gaud after almost every delivery. The pressure is quite evident. Now there's some issue with Richa. de Klerk is not happy and is complaining to the umpire. She was in the zone and wanted to carry on. Is this India doing a Rishabh Pant? Slowing the game down. Khaka telling de Klerk to keep calm. They are ahead in this contest now. Richa getting her right leg stretched. de Klerk is pumped and animated while she's having a word with Khaka and the substitutes. Everyone is ready. Here we go
Pages