Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2024 - 10:32
लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कालच्या सामन्याबद्दल अजिबात
कालच्या सामन्याबद्दल अजिबात चर्चा नाही. कमालच झाली म्हणायची.
काल तिलक वर्माला रिटायर
काल तिलक वर्माला रिटायर करायचा निर्णय काही झेपला नाही.... इतक्या दिवसांत पहिल्यांदाच बघितले! (अर्थात गल्ली क्रिकेट मध्ये कॉमन आहे ते)
आणि करायचेच होते तर इतक्या उशिरा का केले? सँटनरला आणले तर मग लास्ट ओव्हरला सिंगल काढून त्याच्यावर भरवसा का नाही दाखवला?
कालच्या सामन्याबद्दल अजिबात
कालच्या सामन्याबद्दल अजिबात चर्चा नाही. कमालच झाली म्हणायची.
>>>
काल रोहीत शर्मा नव्हता
याचा फटका टीआरपीच नाही तर निकालाला सुद्धा बसला.
तिलक वर्मा निवृत्त करायचा
तिलक वर्मा निवृत्त करायचा निर्णय तसा योग्य होता पण उशीरा घेतला गेला. त्याला सलग दुसरा सामना मोठे फटके मारताच येत नव्हते.
काल कुणीतरी टाइम आऊट झाले का?
काल कुणीतरी टाइम आऊट झाले का?.
क्रिकेट व्यतिरिक्त इतर गोष्टींचा संघ निवडी मध्ये परिणाम होत असेल तर असेच होणार मुंबईचे.
चार पाच सामने असेच जातात बदल करेपर्यंत.
रबाडा परत गेलाय. कुछ तो गडबड है दया.
भाऊ, very sorry. आदमी नया है.
भाऊ, very sorry. आदमी नया है. समजून घ्या.
यशस्वी काय सीन झाला आहे..
यशस्वी काय सीन झाला आहे..
आज ही पोस्ट वाचली.. खरे असेल तर फार वाईट वाटेल. गुणी खेळाडू होता. डोक्यात हवा जाऊ नये..
यशस्वी जैस्वालने मुंबई संघ सोडून गोव्याशी हातमिळवणी केली : नेमकं कारण काय ?
भारतीय क्रिकेटपटू यशस्वी जैस्वालने आपल्या घरच्या मुंबई संघाचा निरोप घेऊन आगामी २०२५-२६ हंगामासाठी गोवा क्रिकेट संघात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा क्रिकेट असोसिएशनने त्याच्या या निर्णयाची पुष्टी केली असून, राष्ट्रीय कर्तव्यांपासून मोकळीक मिळाल्यास जैस्वालला संघाचे नेतृत्वही सोपवले जाऊ शकते.
मुंबईतील वाद आणि रहाणेसोबतचे मतभेद
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई संघातील काही घटनांमुळे जैस्वाल आणि संघातील वरिष्ठ खेळाडू, विशेषतः कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्यात मतभेद निर्माण झाले. २०२२ साली झालेल्या दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात, जैस्वालने दक्षिण विभागाच्या फलंदाज रवि तेजावर सतत स्लेजिंग केल्यामुळे रहाणेने त्याला मैदानाबाहेर पाठवले होते. रहाणेने या निर्णयाबद्दल सांगितले की, खेळाडूंनी शिस्त आणि विरोधी संघाचा सन्मान राखणे आवश्यक आहे.
तसेच, रणजी ट्रॉफीमध्ये जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात जैस्वालच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर, त्याने कर्णधार रहाणेच्या किटबॅगला लाथ मारल्याची घटना घडल्याचे समजते. या घटनांमुळे संघातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.
गोव्याकडून नेतृत्वाची संधी
गोवा क्रिकेट असोसिएशनने जैस्वालला संघात सामील होण्याचे आमंत्रण दिले असून, त्याला नेतृत्वाची जबाबदारीही दिली जाऊ शकते. गोवा संघाचे सचिव शंबा देसाई यांनी सांगितले की, "तो आमच्यासाठी खेळण्यास इच्छुक आहे आणि आम्ही त्याचे स्वागत करतो. पुढील हंगामापासून तो आमच्यासाठी खेळेल."
मुंबई क्रिकेट असोसिएशनची प्रतिक्रिया
मुंबई क्रिकेट असोसिएशनने जैस्वालच्या विनंतीला मान्यता दिली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले, "हे आश्चर्यकारक आहे. त्याने काही विचार करूनच हा निर्णय घेतला असेल. त्याने आम्हाला सोडण्याची विनंती केली आणि आम्ही ती मान्य केली."
यशस्वी जैस्वालचा मुंबई संघ सोडून गोवा संघात प्रवेश करण्याचा निर्णय विविध कारणांमुळे चर्चेत आहे. संघातील अंतर्गत वाद, कर्णधारासोबतचे मतभेद आणि नवीन संधींच्या शोधात त्याने हा निर्णय घेतला असल्याचे दिसते. आगामी हंगामात गोवा संघासाठी त्याची कामगिरी कशी राहते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. यशस्वीने उचललेले हे पाऊल योग्य आहे असे तुम्हाला वाटते का?
#YashasviJaiswal #AjinkyaRahane #MumbaiCricket #GoaCricket #RanjiTrophy #CricketNews #IPL2025 #TeamIndia #CricketUpdates
*very sorry. आदमी नया है.
*very sorry. आदमी नया है. समजून घ्या. * - अहो, मी मनापासून कौतुक केलंय ! व्यंचि ही व्यंगपूर्णच असली पाहिजेत !! प्लीज तुम्ही माघार घेवू नका ! शुभेच्छा.
एक इंटरेस्टिंग स्टॅट. परवा
एक इंटरेस्टिंग स्टॅट. परवा केकेआर विरूद्ध सूर्या खेळायला आला तेव्हा स्कोअर होता ९१. त्यांचे टार्गेट होते ११७. मुंबईने प्रत्यक्षात १२१ केले असले, तरी विजयी शॉटचे सगळे रन्स धरले जातात म्हणून ते १२१ वर गेले. नाहीतर जिंकायला ११७ पुरेसे होते. तेव्हा त्यांना २६ रन्सची गरज होती. सूर्याने २७ रन्स केले.
असा जास्तीत जास्त स्कोअर कोणाचा असेल हे स्टॅट इंटरेस्टिंग असेल. म्हणजे एखादा खेळाडू खेळायला आला तेव्हा विजयासाठी गरज असलेल्या धावांपेक्षा त्याने एकट्यानेच जास्त धावा केल्या (इथे २६ वि २७) - अशी जी उदाहरणे असतील, त्यात सर्वात मोठा स्कोअर किती व कोणाचा असेल. ८-१० रन्स आवश्यक असतील तेव्हा त्यापेक्षा जास्त धावा (अशाच विजयी शॉटमुळे) केल्याची अनेक उदाहरणे असतील. पण २५-३० पेक्षा मोठा स्कोअर असेल तर इंटरेस्टिंग असेल.
बाय द वे या स्पर्धेत "स्पेन्सर जॉन्सन" नाव ऐकल्यापासून हे कोठे ऐकले आहे विचार करत होतो. मग शोधल्यावर सापडले. Who moved my cheese या प्रसिद्ध पुस्तकाच्या लेखकाचे नाव! इथे आल्यानंतर बिल ओ'रायली नाव ऐकले तेव्हा पूर्वी कधीतरी वाचलेले ऑस्ट्रेलियन खेळाडूचे नावही आठवले होते. जॉन स्नो - हे ही. बुश च्या काळात तो कसलातरी सेक्रेटरी होता व एक जुन्या इंग्लिश क्रिकेटरचेही नाव वाचले होते. गॉट मधला जॉन स्नो बराच नंतरचा.
पहिल्या दोन मॅचमधला आर्चर आणि
पहिल्या दोन मॅचमधला आर्चर आणि गेल्या दोन मॅचमधला आर्चर..... काय जादू झाली कळले नाही!!
त्याला आता सलग सुरुवातीला ३ ओव्हर्स आणि मग गरजेनुसार मध्ये किंवा शेवटी एखादी ओव्हर असेच वापरावे! आणि संदीप शर्माला पॉवरप्ले मध्ये एक आणि शेवटी तीन ही स्ट्रेटेजी वर्क करतीय त्यांच्यासाठी!!
यु्धवीर आणि कार्तीकेय सिंग ने पण काल थोडीफार छाप पाडली.
जयस्वालला फॉर्म गवसला ही राजस्थानसाठी जमेची बाजू पण अजूनही त्यांची लोअर मिडल ऑर्डर म्हणावी तशी क्लिक होत नाहीये
बुमराहला आयपीएल खेळताना बघणे
बुमराहला आयपीएल खेळताना बघणे त्रासदायक आहे..
आपल्या भारतीय संघाचा एक असेट आहे तो, जो इथे फुकट मनोरंजनासाठी वापरला जातोय असे वाटते.
त्याने उगाच जीव काढून गोलंदाजी करू नये. रोहित शर्माचा आदर्श ठेवावा. तसेही मुंबई संघातले दूषित वातावरण पाहता ते काही आयपीएल जिंकत नाही. तर त्यानेही उगाच स्वतःचा जीव जाळू नये.
पहिले ६ ओवर ७३-१
पहिले ६ ओवर ७३-१
पुढचे ६ ओवर ३९-१
आता वेळ झाली मारायची...
पुढच्या ५ ओवर मध्ये ८० आले..
आणि आता बुमराहने फक्त सहा सिंगल दिले..
हैदराबाद लखनऊ काही सामने जिंकायला हवेत.
मुंबई चेन्नई तळाला राहायला हवे..
२२२ टारगेट..
बूम राह ४ ओवर २९
बाकी सारे १०+ रन रेट
नवीन स्पिनर पुथुर याने एक सिक्स खाऊन एक विकेट काढली
पण त्याला एकच ओवर दिली
१ ओवर १०-१
हारली मॅच मुंबई. अंबानी फुल्ल
हारली मॅच मुंबई. अंबानी फुल्ल गंडलाय. ज्याला शे कोटी रुपये देऊन क्याप्टन म्हणून घेतला त्याला ती करता येत नाही आणि जुना क्याप्टन जाऊ नये म्हणून त्याला शे कोटी दिले तो सिरियस नाही. मी अंबानीच्या जागी असतो तर सकाळी बाबांसोबत कामाला जाऊन सगळं काम व्यवस्थित शिकलो असतो. हे काय पोरगं आहे बाप मेहनत करतय आणि पोरगं उडवतय.
त्याने उगाच जीव काढून
त्याने उगाच जीव काढून गोलंदाजी करू नये. रोहित शर्माचा आदर्श ठेवावा. >> म्हणाजे रोहित कर्णधार असतानाही असेच करत होता का ? कि तेंव्हा मात्र जीव तोडून खेळत असे नि आता 'कुत्त जाने चमडा जाने' वृत्तीने खेळतो ?
रोहीत गेले काही वर्षे आयपीएल
रोहीत गेले काही वर्षे आयपीएल मध्ये फलंदाजीत जास्त जीव जाळत नाही. हे मी तो कर्णधार असतानाच्या सीझनमध्ये सुद्धा लिहिले होते. तो आपला फिटनेस इंटरनॅशनलसाठी राखून ठेवतो.
आयपीएल मध्ये तो मुंबईसाठी कर्णधार म्हणून असेट होता..
पण मुंबईने त्याला नेमके कर्णधार पदावरूनच काढले
बुमराहने इथे दहा सामने मरमर
बुमराहने इथे दहा सामने मरमर गोलंदाजी केली
आणि इंग्लड कसोटी दौरा बाहेर गेला.. तर आपण काय मिळवले?
बोकलत एकदम अचूक लिहिले आहे
बोकलत एकदम अचूक लिहिले आहे
तुमची खालील पोस्ट व्हाट्सअप स्टेटसला ठेवतो..
ज्याला शे कोटी रुपये देऊन क्याप्टन म्हणून घेतला त्याला ती करता येत नाही आणि जुना क्याप्टन जाऊ नये म्हणून त्याला शे कोटी दिले तो सिरियस नाही
सूर्याची 26 चेंडूत 28 मारून
सूर्याची 26 चेंडूत 28 मारून पसार
मागच्या सामन्यात तिळकला निवृत्त केले तेव्हाही सूर्या चिडलेला..
पांड्या आल्या आल्या ६ ४ ६ ४
पांड्या आल्या आल्या ६ ४ ६ ४
चार बॉल २०
“ तो आपला फिटनेस
“ तो आपला फिटनेस इंटरनॅशनलसाठी राखून ठेवतो.” - ती काय डब्यातली साखर आहे का राखून ठेवायला? काहीही!! मॅच फिटनेस मॅच खेळून वाढतो/मेंटेन होतो - कमी होत नाही. फिल्डिंग करत नाही इथवर एक वेळ मान्य करण्यासारखं आहे.
फेफ +१. आपल्या वक्तव्याने
फेफ +१. आपल्या वक्तव्याने आपण कोणाच्या इंटिग्रिटीवर किती सहज ठपका ठेवतओ ह्याची जाणीव होईल तो भाग्याचा दिवस.
तिलक आज स्टेटमेंट द्यायचे ह्या जिद्दीने खेळला आहे. तिलक काय किंवा पांड्या काय दोघांपैकी कोणीही पुढे येऊन खेळत नाही.
- ती काय डब्यातली साखर आहे का
- ती काय डब्यातली साखर आहे का राखून ठेवायला? काहीही!! मॅच फिटनेस मॅच खेळून वाढतो/मेंटेन होतो
>>>>>>
खेळतो...
पण लोड घेत नाही..
किती खेळायचे हे त्याचे तो ठरवतो बरोबर..
आपण कोणाच्या इंटिग्रिटीवर
आपण कोणाच्या इंटिग्रिटीवर किती सहज ठपका ठेवतो
>>>>
ते आयपीएल फ्रॅंचाईजी बघून घेतील.
मला भारतीय खेळाडूना देशासाठी घाम गाळताना बघायला आवडते.
आपली आपली आवड.
खेळा. मनोरंजन करा. पण इथे दुखापत पाठीशी लाऊन घेऊ नका इतकीच इच्छा.
किती खेळायचे हे त्याचे तो
किती खेळायचे हे त्याचे तो ठरवतो बरोबर
आज त्याला भूख लागली होती म्हणून लवकर आऊट झाला नाहीतर ४१ बॉल मध्ये १०१ करणार होता.
"किती खेळायचे हे त्याचे तो
"किती खेळायचे हे त्याचे तो ठरवतो बरोबर.." - ठरवून विकेट टाकली तरच हे शक्य आहे. नाहीतर 'मी इतकंच खेळणार' हे कुठलाही प्रोफेशनल अॅथलिट ठरवू शकत नाही. आजचं उदाहरण घेऊ. यश दयालच्या त्या इनस्विंगरवर शर्मा ठरवून (आता बास झालं, थांबू या) असं म्हणून आऊट झाला असा तुझा दावा आहे का? मग त्यावेळी तो तसा बॉल पडला नसता, तर काय झालं असतं? 'माईंड इज विलिंग, बॉडी इजन्ट' होऊ शकतं, जे धोनीचं होताना दिसतंय.
किती खेळायचे म्हणजे किती जीव
किती खेळायचे म्हणजे किती जीव जाळून खेळायचे.. किती बॉल, किती रन असे नाही...
नुकत्याच झालेल्या २० वर्ल्डकप स्पर्धेत त्याने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांच्या गोलंदाजांना आणि चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना नॉकआउट पंच दिला होता. ते जास्त महत्वाचे. आणि म्हणून तिथे त्याचा खेळ, अप्रोच, सिरीअसनेस सारेच वेगळेच होते..
असो
मनासारखा निकाल लागला आज
शुभरात्री
किती खेळायचे म्हणजे किती जीव
किती खेळायचे म्हणजे किती जीव जाळून खेळायचे. >> म्हणजे नक्की काय ते तुला सांगता येत नाहीये का ? वरच्या भारतीय संघामधे काय आवडते नि वर्ल्ड कप मधे काय केले वगैरे मधून तो नक्की काय करत नाहिये इथे ते कळत नाही. फिल्डींग करत असे तेंव्हा बापडा उड्या बिड्या मारत होता. त्याला मुंबई जितके पैसे देते आहे ते बघता तो कॅज्युअली खेळेल असे तुला वाटते ह्याचे नवल आहे. आणि वर परत त्याला कॅप्टन केले नाही हे रडगाणे आहेच सुरू
त्याला मुंबई जितके पैसे देते
त्याला मुंबई जितके पैसे देते आहे ते बघता तो कॅज्युअली खेळेल असे तुला वाटते ह्याचे नवल आहे.
>>>>>>
काही नवल नाही.
फलंदाजी क्षेत्ररक्षण जीवाला सांभाळून..
आणि कप्तानी .. ती एकदम फाडू..
पाच आयपीएल ट्रॉफी.. मुंबई काय कोणीही पैसे देईल कारण याचसाठी तर केला जातो अट्टाहास
आणि वर परत त्याला कॅप्टन केले
आणि वर परत त्याला कॅप्टन केले नाही हे रडगाणे आहेच सुरू
>>>>>
हो!
कारण त्या एका चुकीने आयपीएल मधील सर्वात मोठा चॅम्पियन संघ उध्वस्त झाला.
एक माजी मुंबई इंडियन्स फॅन आणि एक आजीवन रोहीत शर्मा फॅन म्हणून याची खंत कायम राहणार.
<<<आपल्या भारतीय संघाचा एक
<<<आपल्या भारतीय संघाचा एक असेट आहे तो, जो इथे फुकट मनोरंजनासाठी वापरला जातोय असे वाटते.
त्याने उगाच जीव काढून गोलंदाजी करू नये. रोहित शर्माचा आदर्श ठेवावा.>>>
सगळे आय पी एल मनोरंजनासाठीच आहे. आडव्या बॅटीने मारणे हे आमच्या काळी (साठ सत्तर वर्षांपूर्वी) निषिद्ध मानले जायचे. फक्त लेगचा चेंडू लेगला मारायला, आडवी बॅट. उगाच ऑऊटसाईड द ऑफ चा चेंडू आडव्या बॅटीने मारायचा असले काही करत नसत. शर्मा बुमराह, धोनी हे केवळ शो साठी. त्यांना बघायला अजूनहि लोक येतात.
असो.
बुमराहला खांदे उडवण्याची सवय आहे, सूर्यकुमार माशासारखे सतत तोंड हलवत असतो, नि सतत काहीतरी खात असतो. पांड्याने क्रिकेट संपल्यावर सिनेमात प्रवेश करावा. त्याचे चेहेर्यावरचे हावभाव पहाता त्याला अभिनय जमेल असे वाटते.
Pages