आयपीएल २०२५

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2024 - 10:32

लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुळात असे खेळण्यात प्रॉब्लेम काय आहे >> हे खरच कळत नसेल तर ...... रोहित ला मुंबई इंडिअयन्स पैसे देऊन लिलावात विकत घेते. त्याच्या मोबदल्यामधे त्याने पुरेपूर खेळणे अशी अपेक्षा फारशी गैरलागू नसावी ना ? उगाच सारखे देशाला मधे आणून फाटे का फोडतो आहेस ह्याचाअ अर्थ कळत न नसण्यापेक्षा वळत नाहीये असा प्रकार दिसतो आहे.

आणि असे बिनकामाचे आकडे बघून तुम्हाला काहीच कसे वाटत नाही मला कमाल वाटते >> ह्यासाठी तुला तुझे जनरल कॉलेज वाढवावे लागेल. आम्ही जिथे क्रिकेट बघतो तिथे अशा थिल्लर गोष्टी दाखवण्यापेक्षा कॉमेंट्री नि खेळाचे अ‍ॅनालिसीस अधिककरून दाखवले जाते. तुला तिथे चालेल त्याचा कंटाळा येईल कारण ते लॉजिकल आकडे असतात - मला वाटते टाईप्स वल्गना नसतात. म्हणून तुझे हे मी म्हणतो म्हणून टाईप्स बिनबुडाचे बुडबुडे भारी खटकतात.

समजा ह्या IPL ला रोहित शर्मा धावा करत असला असता, तर अशा पोस्टी हित करता आल्या असत्या,

MI chya मालकांनी आणि पंड्या ने रोहित बरोबर जुळवूळ घेतलेल दिसतय. गेले 2-3 IPL त्यांच्या मूर्खपणा मुळे टीम च नुकसान झालं होत पण बघा शर्मा कसा धावा करतोय. शर्मा धावा करणार मला आधीच माहिती होत. मी मी मी

पण शर्मा काय धावा करत नाही, वाढलेल्या वयामुळे किंवा फॉर्म नसल्यामुळे त्याच्याकडून धावा होत नाहीत हे तर त्याच्या बायकोनेही मान्य केलं असेल. शर्माच्या धावा होत नाहीत तर तो जीव तोडून खेळत नाही. हे म्हणजे आमचा मुलगा हुशार आहे पण अभ्यास करत नाही म्हणण्यासारखं आहे.

ह्या IPL च्या अजून बऱ्याच मॅचेस शिल्लक आहेत. शर्मा नक्कीच खेळेल. शर्माच्या फॅन्सचा राग अजून पंड्यावर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बऱ्याच लोकांना मुंबई हारावी असेच वाटत असणार. शर्मा एकदा खेळला आणि मुंबई जिंकली ते पण करतील मुंबईला सपोर्ट.

रोहितला मुंबई इंडिअयन्स पैसे देऊन लिलावात विकत घेते. त्याच्या मोबदल्यामधे त्याने पुरेपूर खेळणे अशी अपेक्षा फारशी गैरलागू नसावी ना?
>>>>>

गेले पाच वर्षे रोहित शर्मा आयपीएल मध्ये कॅन्युअल खेळत आहे आणि देशासाठी खेळताना धडाकेबाज.. आणि हे उघड डोळ्यांना दिसत आहे तसेच आकड्यात सुद्धा रिफ्लेक्ट होत आहे.
मुंबई इंडियन्सला हे कळत नाही म्हणता का?
तरीही त्यांनी रोहीत शर्माला घेतले. कारण सोबत येणारी ब्रँड व्हॅल्यू हवी आहे. त्यांनी देखील काही मेहरबानी केली नाहीये. इट्स फेअर डिल.. त्याने काही अंधारात ठेवले नाहीये. तर गेले पाच वर्षे असेच कॅन्युअल खेळून दाखवून दिले आहेच की मी आता आयपीएल असेच खेळत आहे. परवडत असेल तर घ्या... आणि हे माहीत असून घेतल्यावर आणखी वेगळी अपेक्षा कश्याला?

आम्ही जिथे क्रिकेट बघतो तिथे
>>>
कुठे क्रिकेट बघता तुम्ही जिथे कॉमेंट्री पॅनल धोनीचे कौतुक करत नाही?
कॅमेरा सतत 24 तास धोनीवर असतो ते तुम्हाला एडिट करून कट करून दाखवतात का?
मैदानात किती डेसिबल मोठा आवाज आहे हे आकडे तुमच्या चॅनेल वर कधी दाखवले नाहीत का?

शर्माच्या धावा होत नाहीत तर तो जीव तोडून खेळत नाही. हे म्हणजे आमचा मुलगा हुशार आहे पण अभ्यास करत नाही म्हणण्यासारखं आहे.
>>>>>

जर तोच मुलगा त्याच वेळी त्याच विषयांच्या दुसरीकडच्या परीक्षांमध्ये टॉपर येत असेल तर नक्कीच त्या बोलण्यात तथ्य असेल ना Happy

दुसऱ्या परीक्षांमध्ये टॉप मारला म्हणून सगळ्याच परीक्षांमध्ये टॉप मारलच पाहिजे अस काही नाही. तो पण माणूसच आहे.आणि महत्त्वाचं म्हणजे त्यानं चालू परीक्षेत तो प्रयत्नच करत नाही किंवा मुद्दामहून करतोय हे आरोपही चुकीचे आहेत.
ह्यावरून आठवलं सचिन किती दबावाखाली खेळत असेल ते, त्यानं 50 जरी केले तरी कमीच वाटायचं.

“ सूर्या सुद्धा खुश नाहीये. तिलक बाबत शंका आहे.”
हा प्रश्न गैरलागू आहे पण विचारतो - हे कसं कळलं? कुणी सांगितलं?
>>>>>>>>>>>

शंका आपण आपलीच आपल्याच निरीक्षणावरून घ्यायची असते ना..
मैदानात दिसते ना. खेळाडूंची बॉडी लँग्वेज बघत नाही का तुम्ही?
टीम हर्डल मध्ये सुद्धा समजते..
आणि मलाच नाही तर कित्येकांना समजले आहे. तुम्हाला मान्य करायचे नाही तर ते ठीक आहे

आयपीएल मध्ये त्यांनी किती खेळायचे ते त्याला ठरवू दे आणि त्याचा संघमालक बघेल.
>>
बघितलं की त्यांनी
म्हणूनच हटवलं असेल कर्णधार पदा वरून
की असा स्वार्थी सिलेक्टिव्ह अप्रोच घेणारा कॅप्टन नको आम्हाला...

स्वार्थी सिलेक्टिव्ह अप्रोच घेणारा कॅप्टन नको आम्हाला...
>>>>>

गंमत यातच आहे जे मी आधी म्हटले आहे.
फलंदाजी जी तो सिरीयसली करत नाही त्यासाठी ठेवले आहे.
आणि कप्तानी जी सिरीयसली करायचा ती काढून घेतली Happy

बाकी आयपीएल मध्ये असा अप्रोच घेणारा आणि देशासाठी खेळताना झोकून देणारा खेळाडू मला तरी भारतीय संघात हवा आहे Happy

फलंदाजी जी तो सिरीयसली करत नाही त्यासाठी ठेवले आहे.
आणि कप्तानी जी सिरीयसली करायचा ती काढून घेतली
>>
21,22,23 मधे टायटल जिंकले नाहीत ते
मग कप्तानी सिरीयसली कशावरून??

आयपीएल टायटल जिंकणे म्हणजे चणे फुटाणे खाणे इतके सोपे नाही जे ते नाही मिळाले तर कप्तानीच बाद म्हणाल... लोकांना दहा दहा वर्षे मिळत नाही.. शर्माने ते प्रकरण सोपे करून ठेवले आहे म्हणून तुमची अशी पोस्ट आली.

कुठे क्रिकेट बघता तुम्ही जिथे कॉमेंट्री पॅनल धोनीचे कौतुक करत नाही? >> परत जाऊन माझे पोस्ट नीट वाच. काय लिहिलय ते कळते का बघ. नसेल कळत तर परत वाच. परत परत वाच जोवर कळेल तोवर. देशात नि बाहेर वेगळे प्रक्षेपण असते.

आयपीएल टायटल जिंकणे म्हणजे चणे फुटाणे खाणे इतके सोपे नाही जे ते नाही मिळाले तर कप्तानीच बाद म्हणाल. >> टायटल वरून उदो उदो तू करतोयस भल्या माणसा , मग ते न मिळणे हा हा ठपका कसा टाळता येईल ? (बॅटींग करत नाही हे तुझेच विधान आहे) मुंबई ने कप्तान म्हणून हकालपट्टी केलीच होती त्यामूळे त्यांनी त्यांच्या अपेक्षा क्लीयर केल्या आहेत. मुद्दा मुंबई ने काय केले हा नव्हता तर "महत्त्वाचं म्हणजे त्यानं चालू परीक्षेत तो प्रयत्नच करत नाही किंवा मुद्दामहून करतोय हे आरोपही चुकीचे आहेत." हा होता. असे बिनबुडाची विधाने फक्त समोर टीव्हीवर दिसते त्या लिमिटेड विंडो मधल्या प्रकारावरून धरणे नि त्याबद्दल बोंब मारणे अशक्य अप्रगल्भपणाचे लक्षण आहे.

टायटल वरून उदो उदो तू करतोयस भल्या माणसा , मग ते न मिळणे हा हा ठपका कसा टाळता येईल ?
>>>>>

ठपका Happy
पाच टायटल मिळवणाऱ्याला तीन सीजन मध्ये काय टायटल मिळाले नाही तर तो ठपका झाला.
स्टँडर्ड ऑफ रोहीत शर्मा Happy

असे बिनबुडाची विधाने फक्त समोर टीव्हीवर दिसते त्या लिमिटेड विंडो मधल्या प्रकारावरून धरणे नि त्याबद्दल बोंब मारणे अशक्य अप्रगल्भपणाचे लक्षण आहे.
>>>>

जर टीव्हीवर दिसत आहे त्या आधारावर एखादे मत मांडले तर ते बिनबुडाचे कसे झाले?

मुंबई ने कप्तान म्हणून हकालपट्टी केलीच होती
>>>>>

काढले होते म्हणू शकता.
हकालपट्टी खूप हार्श शब्द झाला.
तो सुद्धा पाच टायटल जिंकून देणाऱ्या कर्णधारासाठी वापरणे..
असो ...

पाच टायटल मिळवणाऱ्याला तीन सीजन मध्ये काय टायटल मिळाले नाही तर तो ठपका झाला. >> तुला आकडे आवडतात ना मग ३/८ म्हणजे सिग्निफिकंट होते कि नाही ह्याबद्दल विचार कर. लक्षात येईल. परत मुद्दा स्टँडर्ड नाही तर तुझाच मुद्दा घेऊन प्रतिवाद केल्यावर तो कसा घेऊ शकता ह्याला आहे.

जर टीव्हीवर दिसत आहे त्या आधारावर एखादे मत मांडले तर ते बिनबुडाचे कसे झाले? >> आयपील स्क्रिप्टेड असते असे तुच म्हणालास ना ? मग दिसते ते खरेच आहे हे कसे ठरवलेस तसेच.

हकालपट्टी खूप हार्श शब्द झाला. >> त्यापेक्षाही अर्धवट माहितीवरून प्लेयरच्या कमिटमेंटवर ठपका ठेवणे अधिक हार्श आहे.

एव्ह्ड पण भांडू नये की समोरच्या माणसावर प्रेम होईल. गुड नाईट चाललो मी झोपायला. शब्बा खैर. शुभ रात्री.

मग ३/८ म्हणजे सिग्निफिकंट होते कि नाही ह्याबद्दल विचार कर.
>>>>

शर्माआधी आणि शर्मानंतर मिळून ६ मध्ये शून्य आणि यंदाचा पकडून ७ मध्ये शून्य होईल आता बोला Happy

एव्ह्ड पण भांडू नये की समोरच्या माणसावर प्रेम होईल.
>>>>

मी तसेही सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करतो. मी अजातशत्रू आहे. कोणालाच माझा शत्रू समजत नाही.

शर्माआधी आणि शर्मानंतर मिळून ६ मध्ये शून्य आणि यंदाचा पकडून ७ मध्ये शून्य होईल आता बोला >> शर्माच्या कॅप्टन्सी चे मूल्यमापन करताना आधी नि नंतर ह्याने काही सिद्ध होत नाही ? विषयावर राहा , अवांतर बोलून फाटे फोडू नकोस. मूळ मुद्दा आधीच पोस्ट मधे आहे. रा.चा.च्या पोस्ट मधे पण आहे.

"समर्थन कसे झाले?" जे केले गेले तो व्यक्त करणारा शब्द वापरला आहे. रोहित च्या टॅलेंटचा किंवा अचिव्हमेंटचा काही संबंध नाही. त्याबद्दल आक्षेप असेल तर अंबानी ह्यांच्याशी संपर्क साधून पुढील अ‍ॅक्शन घ्यावी हि नम्र विनंती. अक्षरास हसू नये.

काढले होते म्हणू शकता.
हकालपट्टी खूप हार्श शब्द झाला.
>>
ज्या प्रकारे प्रकरण झालं ती हकालपट्टी च होती

अन् जर 3 सीझन टायटल येत नसेल अन् कमिटमेंट इश्यू ही असेल तरी केवळ पूर्वी 5 टायटल जिंकून दिली या कारणास्तव च अंबानी नी संघात ठेवलं असेल... पण स्वार्थी खेळणाऱ्या वर लीड करण्याचा भरोसा नसेल ठेवला...

शर्माच्या कॅप्टन्सी चे मूल्यमापन करताना आधी नि नंतर ह्याने काही सिद्ध होत नाही ?
>>>>>

त्यानेच तर सिद्ध होते.
साधारण तीच टीम, तेच कोच, तोच सपोर्ट स्टाफ, तेच मॅनेजमेंट, तीच थिंक टँक.... पण कप्तान वेगळा असल्याने काय फरक पडतो हे आपण बघत आहोत Happy

राहुलचा बदललेला माईंडसेट, बॉडी लँग्वेज, प्रेशर हॅण्डल करतानाचा ॲप्रोच वगैरे सगळेच बदल सुखावह आहेत आणि कायम राहावे. निव्वळ टॅलेंट पाहता कोहलीच्या जवळपास जाणारा प्लेअर वाटायचा तो मला नेहमी पण या गोष्टीमुळे दोघात जमीन अस्मानाचा फरक पडायचा.

साधारण तीच टीम, तेच कोच, तोच सपोर्ट स्टाफ, तेच मॅनेजमेंट, तीच थिंक टँक.... पण कप्तान वेगळा असल्याने काय फरक पडतो >> साधारण तीच टीम, तेच कोच, तोच सपोर्ट स्टाफ, तेच मॅनेजमेंट, तीच थिंक टँक नि तोच कप्तान असतानाही तळाला गेले होते हेही लक्षात घे. परत एकदा, मुद्दा त्याची कामगिरी किंवा कॅप्टनशिप हा नाही . मुद्दा प्लेयरच्या कमिटमेंटवर ठपका ठेवणे हा आहे.

राहुलमधे हा बदल झाल्याला बरीच वर्षे झाली आहेत. पांड्याबरोबरच्या मुलाखतीनंतर जेंव्हा ड्रॉप झाला होता त्यानंतर तो बदलून गेला. तुझ्या सध्या लक्षात आले आहे बहुधा. ठीक आहे देर से आये पर दुरुस्त आये. बाकी कोहलीच्या आसपास का वगैरे ला माझा पास.

बरीच वर्षे बिलकुल नाही.
गेल्या वर्षी झालेल्या २० वर्ल्डकप मध्ये तो नव्हता, पहिल्या दोन कीपर मध्ये नव्हता आणि तो निर्णय योग्यच वाटला होता.
असो..

मुद्दा प्लेयरच्या कमिटमेंटवर ठपका ठेवणे हा आहे.
>>>>

मी माझ्या आवडीच्या प्लेअरच्या कमिटमेंट वर ठपका ठेवला तर तो आवडीचा कसा?

आयपीएलकडे बघायचा तुमचा आणि माझा दृष्टीकोन वेगळा आहे. आणि आपलाच नाही तर खेळाडूंचा सुद्धा वेगवेगळा आहे.
परदेशी खेळाडूंची उदाहरणे घेतली तर चटकन समजेल.

१) काही जण आयपीएल आणि जगभरातल्या २० लीग मध्ये खेळून पैसा कमावता यावा म्हणून राष्ट्रीय संघातून निवृत्ती घेतात.

२) काहीजण राष्ट्रीय कर्तव्य पहिले म्हणून आयपीएल सारख्या स्पर्धांपासून दूर राहतात.

आता परदेशी खेळाडूंची उदाहरणे दिली कारण कुठल्या भारतीय खेळाडूकडे हा दुसरा पर्याय नसावा. मग त्याला कोणाला राष्ट्रीय कर्तव्य बजावायला स्वताला फिट ठेवायचे असेल तर तो काय करणार, तर आयपीएल फारसा जीव न जाळता खेळणार..

भारतीय क्रिकेट फॅन म्हणून शक्य झाल्यास सपोर्ट करा अश्या विचारांच्या भारतीय खेळाडूना.. मी तरी करतो!

Pages